Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पत्र

अ — अजब, Wed, 10/08/2014 - 09:15
खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो... आधी विषय सुचत नव्हता मग वेळ मिळत नव्हता शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय आणि आळस- अशा एक ना अनेक सबबी... पूर्वी पत्रांना गंध असायचा आणि अक्षरांत ओलावा न लिहिलेला मजकूरही दिसायचा लिहिणार्‍याचा चेहरा आणि बोलण्याचा आवाज वाचता-वाचता उमटायचा... इतकंच कशाला; ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा... खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं वेळ, कागद, पेन काढणं स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं आणि खाडाखोड झाल्यावर किंवा चुकीचं लिहिल्यावर फाडाफाडी करणं.. इतकं करून झालंच लिहून तर पाकीट, तिकीट आणि पत्ता या सोपस्कारांतून पेटीपर्यंत पोचवणं पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं... पण पत्र 'पत्र' होतं टेक्स्ट मेसेज किंवा मेल नव्हतं जसा फोटो आणि पोर्ट्रेटमधे फरक असतो- फोटो एखाद्या व्यक्तीचा क्षणिक चेहरा दाखवतो तर पोर्ट्रेट तिचा जीवनपट उलगडतो, तसा.... पत्रात एक जाणिव होती,जबाबदारी होती उत्सुकता आणि आतुरता होती दूर असलेल्या व्यक्तींमधला दुरावा मिटवायची क्षमता होती... एक जुनं रायटिंग पॅड सापडलं तेव्हा लक्षात आलं की या पॅडला जो 'फील' आहे तो 'टचपॅड'ला नाही... शेवटी हेच एक कारण किंवा निमित्त मिळालं तुला हे पत्र लिहायला; नाहीतर आता पोस्टखात्याच्या (तारेप्रमाणे) पत्रसेवा बंद करायच्या जाहीर निवेदनाचीच प्रतिक्षा आहे...

प्रतिक्रिया द्या
1708 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/08/2014 - 10:03 नवीन
अजुन लिहा. पत्र भावना पोहचल्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 10/13/2014 - 20:16 नवीन
हेच म्हणतो. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
वेल्लाभट Wed, 10/08/2014 - 13:13 नवीन
सुरेख !!!! सुरेख !!!!
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 10/08/2014 - 17:37 नवीन
कधीकाळी पोस्टमनची घरच्या माणसांपेक्षा आतुरतेने वाट पाहिली जायची...
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Wed, 10/08/2014 - 17:40 नवीन
सुंदर लिहिलंय.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 10/09/2014 - 09:00 नवीन
अाता मामाचं पत्र खरोखरीचं हरवलं!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 10/13/2014 - 21:33 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा