Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंक्चरवाल्यांची चालुगिरी

र
राजेंद्र मेहेंदळे
Wed, 10/08/2014 - 10:14
🗣 132 प्रतिसाद
मंडळी आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल. प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १० ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते. त्याने अजुन एका पोराच्या मदतीने पटपट बोल्ट काढले आणि ट्युबमध्ये हवा भरुन चेक करायला घेतले.मी बाजुलाच उभा राहुन बघत होतो.पाहता पाहता बेट्याने ४ पंक्चर खडुने दाखवले.म्हणजे किमन १२० रुपयाला फटका.त्याच्या मदतनीसाने लगेच मशीन गरम करायला लावले आणि पंक्चर काढायची तयारी केली. तोवर पहील्याने काळजीपुर्वक टायर चेक करायला घेतला.गप्पा मारता मारता "गाडी कितना साल हुवा?" (प्रत्येक टायरवाला हा प्रश्न विचारतोच्..त्याचे कारण माहीत नाही.) वगैरे विचारतानाच त्याने २ ठीकाणी टायर कट झालेला दाखवला. वरती एक छोटा खिळा काढुन दाखवला. मग २ प्रकारचे रबरी पॅच दाखवले..त्यातला मोठा (आणि जास्त किंमतीचा) गळ्यात मारला. असे करुन ४२० रुपये उकळले (मला ४२० बनवले). रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचलो. प्रसंग २-स्थळ-वाकडेवाडी वेळ-दुपारी १२ तपशील थोड्या फरकाने सेम. ६०० रुपयाला फटका. एकदोनदा मी फक्त ट्युबचे पक्चर काढुन घेतले..पण टायरला पॅच मारला नाही...दोन दिवसात पुन्हा पंक्चर होउन डबल खर्च झाला. काही प्रश्न--- पेट्रोल पंप वाले कसे बनवतात हे सर्वांना थोडेफार माहीत आहे. हे टायरवाले नक्की कसे चुना लावतात? टायरला आतुन पॅच मारायची खरंच गरज असते का?की ती एक बिझनेस ट्रिक आहे? टायरवाल्यांचे ट्युबचे भाव एरियानुसार का बदलतात? जी ट्युब गावात २०० रुपयाखाली मिळते तीच हिंजवडीला २५० चे का होते? चांगल्या कंपनीची एक्स्ट्रा ट्युब घेउन ठेवल्यास किती दिवस टिकते? रस्त्यात एव्हढे खिळे/चुका कुठुन येतात? तुम्ही या प्रसंगात कसे वागता? या लोकांकडुन न फसण्यासाठी काही टिप्स मिळतील का?

प्रतिक्रिया द्या
25830 वाचन

💬 प्रतिसाद (132)
प
पिलीयन रायडर Wed, 10/08/2014 - 10:18 नवीन
आमची अ‍ॅक्सेस पण गेल्या २-३ महिन्यात ६-७ वेळा पंक्चर झाली आहे.. नक्की भानगड काय असेल?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 10:24 नवीन
हा अनुभव लै वेळेला आला आहे. आताशा मी अनोळखी ठिकाणी पंक्चर आहे असे सांगितले तर चक्क फक्त हवा भरायला सांगतो. हवा भरताना नीट लक्ष ठेवतो आणि मग ओळखीच्या दुकानातुन परत एकदा चेक करतो. २-३ वेळा पंक्चर नव्हतेच. १-२ वेळा होते पण एकच होते. स्वस्तात काम झाले. हे लोक नक्की काय करतात अजुन मला झेपलेले नाही. पण हातचल्लाखीने काम करतात एवढे नक्की.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/08/2014 - 10:26 नवीन
च्यायला, टायर पंक्चर झाल्यावर आपल्याला कधी एकदा हे सोपस्कार होतील असे वाटते. पंक्चरवाल्याला आपण सर्व सोपस्कार झाले की विचारतो भै कित्ते हुये.... मग तो जे सांगतो ते निमुटपणे द्यावे लागतात आणि आपलं तोंड वाकडं होतं. पेक्षा भै पंक्चर निकालेना कित्ते लेगा हे पहिले विचारावं. नै पटलं तर ट्युब टायर फाटेपर्यंत आपल्या जवाबदारीवर गाडी चालवावी पण पकंचर वाल्याचा मनस्ताप खुप वेळ बोचत राहतो. आपण फोर व्हिलर मधुन फिरतो म्ह्णजे पैसे वाटायलाच फिरतो असे अनेकांना वाटते पैकी पंक्चरवाला एक. असो. सालं हे पंक्चर काढायचं आपण शिकलं पाहिजे, असं मला राहुन राहुन वाटलं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/08/2014 - 10:41 नवीन
ह्म्म... माझाही अनुभव असाच आहे ! तोंडाला येइल ती टायर ट्युबची किंमत सांगतात ! बरं बर्‍याचदा जवळपास दुसरे दुकानही नसते की जिथुन टायरट्युब विकत घ्यावी. एकदा रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अश्या पंक्चरवाल्याच्या दुकानावर पोहचलो होतो... दरवाजा ओढलेला होता, मी जरासा जोर लावुन ढकलला तर आत ३ जण जेवत होते, त्यांना विनंती केली. नशिबाने त्यातला एक तयार झाला आणि माझी घरी जायची सोय झाली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Wed, 10/08/2014 - 10:46 नवीन
टायरपंक्चर वगैरेची कामे करणारे बरेचदा रगेल आणि गुंडप्रवृत्तीचे असतात ,विशेषतः गावाबाहेर हमरस्त्यावरचे मा*** त असतात, पैसे द्यायचे आणि गप चालायचे पूढे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 10/08/2014 - 10:54 नवीन
ट्यूबवाल्या टायरबाबतीत पंक्चर बरेच नि:संदिग्ध असते ब-याचवेळा. पण ट्यूबलेसबाबत ते अत्यंत संदिग्ध असते. हवा भरायला सांगितली की चारपैकी एक चाक पंक्चर असल्याचे जाहीर करुन त्या उत्तम टायरमधे खडे काढण्याच्या आणि छिद्र चेक करण्याच्या निमित्ताने हमखास भोसकून पंक्चर घडविले जाते आणि अशी एकदोन भोके पाडून मग ती बुजवून भरपूर कमाई केली जाते. हे कळायला बरीच वर्षे गेली पण एकाच पंचरवाल्याने विस्मरणामुळे फार जास्तवेळा माझ्याच सोबत ही ट्रिक केल्याने तेकळले. मग लक्ष ठेवू लागलो तेव्हा जवळजवळ सर्व पंचरवाले हेच करतात हे स्पष्ट दिसले. आणि शेवटी दोस्तीतल्या पंचरवाल्याकडून खात्रीहीzझाली या "ट्रेड" सीक्रेटची ( कोटी अपेक्षित). यावर उपाय: जिथे फक्त हवा भरण्याचीच सोय आहे, पंचरवाला नाही अश्या उत्तम पेट्रोल पंपावरच हवा भरणे. तिथे कोणालाच टिपखेरीज बाकीचा बिझनेस इंन्ट्रेस्ट नसतो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 10/08/2014 - 11:10 नवीन
बाकी टायर पंक्चर होतो तिथेच बाजूला पंचरचे दुकान कसे असते हा मला पडलेला सार्वकालीन प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Wed, 10/08/2014 - 11:11 नवीन
हवा भरुन घ्यायला गेलो की हे लोक सांगतात की गाडी पंचर आहे. मला कळायचेच नाही की यांना बाहेरुनच कसे कळते? पण त्यांचा अनुभव जास्त म्हणून पंचर काढायला सांगायचो. हे असे ३-४ वेळा झाल्यावर लक्षात आले, की हे लोक पहिल्यांदा हवा न 'भरता' ती हळूच 'सोडतात' आणी ट्यूब बाहेर काढताच हातचलाखीने २-४ भोकं पाडतात. आता मात्र लै शिव्या घालून सरळ हवा भरायला लावतो XXXच्याना.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 10/08/2014 - 11:26 नवीन
त्यांच्या समोर उभे राहून नीट निरखून बघितले तर फक्त एकच पंचर निघेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 10/08/2014 - 11:34 नवीन
नीट निरखुन बघितले तरी २-३ पंक्चर काढतातच हे लोक..शिवाय टायरला पडलेले कट वेगळेच एकाच वेळी एक जण ट्युब चेक करतो आणि दुसरा टायर चेक करतो म्हटल्यावर कधे कधी दुर्लक्षही होतेच म्हणा वरच्या सर्व प्रतिसादांमध्ये कोणी टायर कट विषयी मत प्रदर्शित केले नाहीये..त्या सल्ल्याची वाट बघतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ब
ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 10:28 नवीन
हा प्रकार टायर जास्त फाटला असल्यास जरुरी आहे, कारण फाटलेल्या जागेतुन खडी, व रस्तावरील इतर टोकदार वस्तु जाऊन टयुब फुटण्याची शक्यता खुप वाढते.. पॅच हाच उपाय आहे, पण त्यात अच्छी, कामचलाऊ असे काही प्रकार नसतात.. सर्व रेट तुम्ही किती गाळात आहात, यावरुन ठरतात... बेस्ट आहे, की नाही म्हणावे, रेट आपोआप कमी करतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
य
यसवायजी Wed, 10/08/2014 - 11:42 नवीन
पंचर असतानाचे सोडाच, नसतानाही हवा सोडून मला गंडीवलंय त्यांनी. बायकांना तर पेट्रोल पंपावाले आणी पंचरवालेसुद्धा लैच गंडवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 10/08/2014 - 11:46 नवीन
यावर एक लेख टंकणारच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
त
तुषार काळभोर Wed, 10/08/2014 - 11:30 नवीन
केरळचे पंक्चरवाले 'इतर कोणत्याही' (मराठी+उत्तर भारतीय+इतर) प्रांतातील पंक्चरवाल्यांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात, असे एक निरीक्षण नोंदवतो. शिवाय ते रात्री-अपरात्री पंक्चर काढायलापण जास्त सहकार्य करतात. (माझे वैयक्तिक निरीक्षणआहे, जनरलायजेशन नव्हे. माझे अनुभव बहुतेक पुण्याच्या पुर्वेकडचे आहेत.) (एक उदाहरणः डोळ्यादेखत जाऊद्या, गाडी त्याच्याकडे सोडून गेलं तरी जेवढ्या पंक्चर निघल्या तेवढाच आकडा सांगून तेवढेच पैसे घेणारा पंक्चरवाला बीटी कवडे रस्त्यावर- सिटाडेलजवळ आहे)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 11:35 नवीन
सहमत आहे. केरळी पंचरवाले जास्त प्रामाणिक व नम्रही असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
व
विजुभाऊ Wed, 10/08/2014 - 13:29 नवीन
बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे. तुमच्या कडे काय विदा आहे. चाक पंक्चर झालेले असताना तुम्ही केरळ पर्यन्त कसे ड्राईव्ह केले हे लिहाल का? ह्या! साधं चाक पंक्चर झालं तरी केरळ्पर्यन्त जावं लागतं.......आरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 14:03 नवीन
महाराष्ट्रात केरळी पंचरवाले नस्तात कायं विजुभौऽऽऽऽ?? अन कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?>>>गुजरातच्या खाली अन कर्नाटकच्या वर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
काउबॉय Wed, 10/08/2014 - 20:42 नवीन
परवा एका मित्रासोबत सहकुटुंब प्रवास करत होतो अपरात्री 2.30 ला नटराज मंदिर जवळ सातारा हायवेवर गाडी पंक्चर झाली. बरीच शोधाशोध झाल्यावर पंक्चर काढायला झोपेतून उठून तयार शेवटी एक केरळि माणूसच मिळाला, त्याने बिल 450 सांगितले. काम झाल्यावर थोडीसी दमदाटी करून ते 250 वर आणले. आमचा ड्रायव्हरने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून तुम्हाला मदत करणार्याशी तुम्ही चुकीचे वागत आहात असे सुनावले होते तेंव्हा आम्ही परप्रांतीय हां एकमेव नॉर्म गृहीत धरला होता पण आज मिपावरील प्रतिसाद बघता केरळि पंक्चरवाले चांगले असतात असे म्हणावेसे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सूड Mon, 10/20/2014 - 18:21 नवीन
बी टी कवडे रोडचं सांगू नका राव!! बाईकचा हॉर्न वाजेना म्हणून घेऊन गेलो तिथल्या एक गॅरेजवाल्याकडे. मला म्हणे साब नया बिठाना पडेगा, ढाईसो होगा. म्हणलं ठीकाय नंतर घेऊन येतो गाडी तुझ्याकडे आता जरा गडबडीत आहे. दुपारी मगरट्ट्यापाशी अमानोरा कडल्या रस्त्यावर एक ग्यारेजवाला आहे, त्याच्याकडे नेली. वायर वैगरे चेक करुन सगळं नीट केलंन दहा रुपयात काम झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 10/08/2014 - 11:37 नवीन
माझे दोन्ही अनुभव बिहारी/यु.पी. वाल्या पंक्चरवाल्यांचे आहेत...आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 10/08/2014 - 11:46 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
स
सर्वसाक्षी Wed, 10/08/2014 - 12:26 नवीन
आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात
आश्चर्यच आहे. टायर तिथे नायर असे आम्ही बरोबरच्या मल्लूंना म्हणत असू. पूर्वी अगदी कोकणातही टायर पंक्चरवाले मल्लूच असायचे. आम्ही गमतीने म्हणायचो की ३ मल्लू दुकान उघडतात. एक दुकानात बसून पंक्चर काढतो. उरलेले दोघे दोन बाजुंना अर्ध्या किमिवर झाडाआड लपून रस्त्यात चुका टाकतात. माझा पंक्चरवाला अजुनही मल्लू आहे. मी त्याच्या कडुन टायर घेत नाही म्हणुन थोडा नाराज असतो पण काम चोख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
क
काळा पहाड Wed, 10/08/2014 - 13:57 नवीन
युपी बिहार वाले पाहिले की उगीचच कानखाली मारावंसं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
स
समीरसूर Wed, 10/08/2014 - 12:17 नवीन
आमच्या स्कुटीचे गेल्या २ महिन्यात ५-६ वेळा पंक्चर निघाले. टायर फाटले आहे असे सगळे सांगत. मी दुर्लक्ष करत होतो. शेवटी गेल्या शनिवारी टायर-ट्युब दोन्ही बदलून घेतले. रु. १२०० खर्च आला. महिती नाही जास्त घेतले की बरोबर घेतले. कमी घेणं शक्यच नाही. माझ्या बाईकच्या पुढच्या टायरमध्ये एकदा हवा भरायला गेलो आणि बळी पडलो. तो म्हटला पंक्चर आहे. ट्युब काढून तपासलं तर ४ पंक्चर निघाले. पॅच-बिच लावले. भरपूर पैसे दिले. काय चलाखी केली माहित नाही. :-( फार खोलात जात नाही मी. एकतर मला त्यातलं काही कळत नाही. त्यांच्याशी भांडत-बिंडत बसायचा कंटाळा येतो. एकदा रात्री १० वाजता पाषाण रस्त्याच्या नेकलेस गार्डनजवळ स्कुटी पंक्चर झाली. मी आणि बायको होतो. आता काय करणार? तिथे कुठेच कसलीच दुकाने नाहीयेत. मग हळूहळू बायको अगदी कमी वेगात स्कुटीवर आणि मी पायी असे आम्ही बावधन पोलीस चौकीजवळ आलो. तिथे एक दुकान उघडे होते. त्याने पंक्चर काढले. रु. २२० घेतले. मी विचारलं एवढे कसे काय तर म्हणाला एक पॅच लावला. तो १८० चा होता आणि ४० कामाचे. अर्थात, पॅच त्याने मला दाखवूनच लावला होता. पैसे दिले आणि घरी येऊन आडवा झालो. आता या सगळ्यात नेमके कधी, कसे, आणि काय बोलायचे हा प्रश्नच असतो. सगळं तो समोर दाखवतो. मग काहीच पर्याय नसतो. एनीवे, असा खर्च झाल्यानंतर मी ताबडतोब तो मनातून काढून टाकत असतो. आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. :-)
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 08:50 नवीन
आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. Smile +११११ दुसरे काही करून काही सिध्द होत नाही, म्हणून मी पण हेच विचार करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
म
मीता Wed, 10/08/2014 - 12:28 नवीन
फातिमानगरच्या चौकात ३,४ पंक्चरवाले आहेत. एकदा टायरमध्ये हवा कमी वाटली म्हणून हवा भरुन घ्यायला गेले तर सांगितलं की गाडी पंक्चर आहे.हवा भरून व्यवस्थित गाडी चालली आणि पंक्चर निघाले नाही. मैत्रिणीला विचारलं तेव्हा तिचाही हाच अनुभव .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/08/2014 - 12:44 नवीन
आता जरा काडी सारण्याची इच्छा होत आहे... ;) पंक्चर झाल्यावर मी बरेच अंतर बाईक ढकलुन नेली आहे, नशिब मी बुलेट वापरत नाही ! ;) बाकी बुलेट पंक्चर झाल्यावर चालवणार्‍याचीच "हवा टाईट" होत असावी ! ;) जाता जाता :- समस्त बुलेट प्रेमींनी हलकेच घ्यावे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 10/08/2014 - 14:00 नवीन
जाता जाता :- समस्त बुलेट प्रेमींनी हलकेच घ्यावे. Wink
हे बुलेटवाल्यांना चिडवायला ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 03/31/2015 - 11:59 नवीन
आताशा आम्ही एलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर बसवून घेणार आहोत. सो हवा टाईट नै व्हायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 12:00 नवीन
बुलेटला अलॉय व्हील्स छान नाही दिसत. ओल्ड स्कुल स्पोक्सचं छान दिसतात. बाकी ट्युअबलेस्स टायर बेस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
ट
टवाळ कार्टा Tue, 03/31/2015 - 12:02 नवीन
सहमत...पण स्पोक व्हिलला ट्युबलेस बसवत नैत असे ऐकले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/31/2015 - 12:03 नवीन
आयड्याची कल्पना नाही ह्याबद्दल. कॉलिंग मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 03/31/2015 - 12:16 नवीन
स्पोक्समधून हवा निघून जाइल. रीमला स्पोक्स जिथे लावलेले असतात तिथल्या छिद्रांमधून हवा लीक होते अस सांगितलय लोकांनी. बाकी स्पोक्स लूक खूप छान आहे बुलेटचा. आत्तापर्यंत बटबटीत २ किंवा ३ पाते असलेले अलॉय व्हील्स यायचे. आता जरा चांगले हार्ले स्टाइल व्हील्स आलेत. ते थंडरबर्डला शोभून दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Tue, 03/31/2015 - 12:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
म
मोदक Tue, 03/31/2015 - 12:47 नवीन
हे दिसायला (त्यातल्यात्यात) चांगले आहे... आणखी प्रकार पाहिलेत का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Tue, 03/31/2015 - 13:02 नवीन
भारी दिसते आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 03/31/2015 - 13:44 नवीन
हेच व्हील्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 14:04 नवीन
पंक्चरवाल्याच्या पाणी भरलेल्या पिंपात, मला वाटतं, एक सुई (सापडेल अशी कशाला तरी टोचून) ठेवलेली असते. त्यांचे ते पिंपातले पाणी कधीच पारदर्शक नसते. त्यामुळे आपल्याला कळत नाही. टायर पाण्यात बुडवला की त्या सुईने ते आणखिन २-३ पंक्चर करून आपल्याकडून पैसे उकळतात. हातचलाखी आहेच.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 10/08/2014 - 14:28 नवीन
बाकी समीरसूर यांच्याशी सहमत...रात्री बेरात्री अशी वेळ आली तर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो...गाडी चालती झाली यातच समाधान असते
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/08/2014 - 14:33 नवीन
वाचतिये, काय बोलणार?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 10/08/2014 - 14:33 नवीन
ट्युबलेस टायर असतील तर एक पंक्चर किट विकत घ्यावे .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 10/08/2014 - 14:41 नवीन
डांगे चौकातल्या एका पंक्चरवाल्याने माझ्या ट्युबलेस टायरला पंक्चर झाले असे संगून १५ टोचे मारले होते. एकाने गाडीला किती वर्षे झाली आणि इतर फालतू चौकशा करीत माझे लक्ष वेधून घेतले आणि दुसर्‍याने टोचे मारण्याचे उद्योग चालू ठेवले आणि १००० रू मजकडून उकळले. दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 10/08/2014 - 15:20 नवीन
>>> दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले. नमस्कार सर. कसे आहात? ठीक ना सगळं? जरा लक्ष असू द्या बरं का आमच्याकडं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विटेकर Tue, 10/14/2014 - 10:52 नवीन
सातारा रोडवर सातार्‍याकडे जाताना म्याक डोनाल्ड आहे तिथे भा पे चा पम्प आहे त्याच्या शेजारी एका पन्चर वाल्याची टपरी आहे. त्याने मला एका भयाण संध्याकाळी १७०० रुपायला गंडवले आहे !!! त्या संध्याकाळी मी एकटा आणि मला त्या रात्री वरंधा उतरायचा होता ... जाम टरकली होती माझी. मी त्या विवंचनेत आणि हा आपला पाडतोय टायरला भोके ! सुदैवाने तोच टायर अजून वापरतोय झाली त्याला आता ३ वर्षे ! आता मात्र कानाला खडा. पक्चर फक्त कुलकर्णी टायरकडे ! ( त्यांचे आम्ही गेल्या जन्मीचे देणे आहे ) एरव्ही फक्त आपली आपण स्टेपनी बदलणे. सहसा हवा सुद्धा बाहेर चेक न करणे. ( बाकी इंडिका वापरली असेल तर माणूस पंचरला भेत नाय, दांडगा अनुभव असतो इंडिका वाल्यापाशी ! माझ्या इंडिकाच्या जिवावर कुलकर्ण्यांनी नवीन दुकान टाकले ! ) पण सध्या बरे आहे , ट्युबलेस इज बेश्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 09:14 नवीन
हा प्रकार मला पण समजला नाहीये.. माझ्या ट्युबलेस टायर गाडिचे कधीच १० पंक्चर च्या खाली बिल आले नाहीये.. अगदी १५ पंक्चर पण काढले आहेत एकदा.. हा प्राब्लेम आहे का ट्युबलेस टायरमध्ये.. पंक्चरवाले म्हणतात, तुम्ही कमी हवेवर गाडी चालवली की असे प्रकार घडतात.. हातचलाखी खरच असावी..?? माझ्यापुढे एकदा टायर मध्ये हवा कमी होती म्हणून भरून घेत होतो.. जशी जशी हवा भरत होता, टायर पुर्ण बसला.. पंक्चर आहे म्हणाला, मला विश्वास बसेना, म्हणून स्वता हवा भरुन बघितली, पण उपयोग शुन्य.. कमीतकमी १२ पंक्चर काढले त्याने.. :( ..हातचलाखी असेल तर सुपर केलीये त्याने.. माझे पुर्ण लक्ष होते, एकटाच होता तो... आता अनुभावाने शहाणा झालोय, स्वतः किट घेतलीय, तसेपण १२० रु. पंक्चर देण्यासारखे (ट्युबलेस टायर असल्यास) काहीच कष्ट नसते त्यात. टायर न काढता पंक्चर दुरुस्त करता येतो.. ही पुर्ण किट २५० रु. आनलाइन भेटते, पंप ५०० पुढे, त्यामुळे इतका कमी भांडवली खर्च असतांना रेट एव्हडे जास्त का हा दुसरा प्रश्न आहेच... दुसरे डायरेक्ट पंक्चर काढु देत नाही, पहिले सर्व पंक्चर मोज म्हणतो.. जेव्हडे जास्त पंक्चर तेव्हडा रेट कमी करवतो, त्याला ३० सुध्दा परवडत असेल... नाहीतर सरळ स्टेपनी लाऊन दे म्हणतो... पण काही चुका आपल्याही होतात, जसे :- १) टायर मध्ये प्रेशर मेण्टेन न करणे.. २) ट्युबलेस टायर पंक्चर झाल्यावर पण चालु शकतात, पण सहसा खिळे वैगरे दिसत असल्यास लवकर दुरुस्त करावे, हा एक खिळा पुर्ण टायर फाडतो.. ३) फ्यामिली पंक्चरवाला असावाच.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शिद Wed, 10/08/2014 - 15:26 नवीन
वाहन नसल्याकारणाने अजून तरी असे अनुभव आलेले नाहीत पण वर दिलेल्या अनुभवांवरुन बरंच काही शिकता आलं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 10/08/2014 - 17:08 नवीन
केरळी पंक्चरवाल्यांचा अनुभव खरचं चांगला आहे. दापोडी-ते चिंचवडस्टेशन मधे ग्रेड सेपरेटर मधे खिळे टाकुन ठेवतात चक्क् गाड्या पंकचर व्हाव्यात म्हणुन. सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे अँटीपंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्स बसवुन घेणं. पैसे जातात जास्त पण कमीत कमी रात्री-अपरात्री गाडी ढकलायला लागत नाही.
माझा अनुभव
गाडीमधे एकदा हवा कमी वाटली म्हणुन एका अनोळखी यु.पी. बिहारी पंकचरवाल्याकडे हवा भरायला गेलो. त्यानी पंकचर है साब म्हणलं. लांब जायचं होतं परत डोक्याल कटकट नको म्हणुन काढायला सांगीतलं. आधी अतिशय कमी प्रमाणात हवा जात असताना त्यानी ट्युबला ७-८ पंक्चर्स दाखवली. मला संशय आला म्हणुन मी त्याचे हात चेक केले. त्या **नी हाताच्या अंगठीला सेफ्टीपिनेचं टोकं लावलेलं आढळुन आलं. सणासण कानाखाली हाणल्या त्याच्या, पंक्चर फुकटात काढुन घेतलं वरती त्याच्या धंद्याचं ट्रेड सिक्रेट असलेली अंगठी काढुन घेतली. साला, माझ्या गाडीशी खेळ नाही करायचा.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 10/08/2014 - 17:10 नवीन
स्थळं- कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या पुढे लागणारी एक टपरी. आता बसतो का तो ते माहीत नाही.
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 10/08/2014 - 17:13 नवीन
ट्यूबलेसबाबत एक काळजी नेहमी घ्या, जो हवा भरणार असतो तो हमखास नोझल वापरून व्हाल्व तोडतो.. व पुढील वेळी तुम्ही हवा भरायला गेलात की तोडून तुमच्या हातात एवढ्या सफाईने ठेवतो की आपण साफ गंडतो.. मी हवा भरताना आता मोबाईलवर व्हिडिओ रेकोर्डिंग करतो :)
  • Log in or register to post comments
आ
आनंद Wed, 10/08/2014 - 19:41 नवीन
खर आहे ! अजुन एक गोष्ट गाडीत बसुन हवा भरायला सांगितली कि बरोब्बर डाव्या बाजुच पुढच चा़क पंक्चर आहेत म्हणुन सांगतात. कारण नेमक त्याच चाका वर आत बसुन लक्ष ठेवता येत नाही .बाकि चाक आरश्यात किंवा प्रत्यक्ष दिसतात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा