Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी लोकलयात्री

व — वेल्लाभट, Wed, 10/08/2014 - 13:04
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री येता माझे स्टेशन जवळ अंगी एकवटून पुन्हा बळ प्रवाहात मज झोकून देतो मी लोकलयात्री एकच रेटा अखेर देतो चुटकीसरशी खाली उतरतो स्वतःस पळभर धन्य मानतो मी लोकलयात्री चाचपतो मग खिसे मी सगळे तपासतो मम अवयव सगळे धडधाकट असल्याचे बघतो मी लोकलयात्री रोज असं हे करायचंच गर्दी असते; चालायचंच विचार झटकून चालू पडतो मी लोकलयात्री - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
2140 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ए
एस Wed, 10/08/2014 - 13:22 नवीन
अतिशय शांत शांत वाटलं वाचून. सलाम! :-) आपला, मिपायात्री!
  • Log in or register to post comments
श
शिद Wed, 10/08/2014 - 15:35 नवीन
विरार लोकलची आठवण पण नकोशी झाली आहे आता. :( - वैतागलेला विरार-चर्चगेट लोकल प्रवासी.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 10/08/2014 - 18:17 नवीन
सगळे अंधेरी-घाटकोपर-बदलापूर प्रवास आठवले.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 10/08/2014 - 19:02 नवीन
:) धन्यवाद्स
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा