Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फरसाण

अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 10/08/2014 - 17:02
🗣 105 प्रतिसाद
फरसाण हा नमकिन पदार्थ प्रत्येकाच्या घरातल्या डब्यात असतोच... लहान थोर सा-यानाच तो आवडतो.. फरसाण असले कि गृहिणी मिसळ... भेळ आदी चट्पटीत प्रोग्राम करत असतातच फरसाण तयार करणारे अनेक लोक्स आहेत... पण पुण्यात..चितळे ..काका हलवाई.. पुरोहित...हॉट चिप्स..चौधरी तर क्यांप एरियात बुधानी कराची वाला आदी प्रख्यात आहेत.. मला पुरोहितांचे फरसाण आवडते,. या व्यतिरिक्त हळदिराम..बिकानेर असे अनेक ब्र्यांड्स पण आहेत ज्यांची पाकिटे जनरल स्टोर मधे लोंबकळताना दिसतात.. हल्ली तर फरसाण मधे पण बरेच प्रकार आलेले आहेत पुण्यात चितळे ..काका हलवाई तसे नशिक नागपुर आदी शहरात पण फरसांण कुणा हवलवायाची खासियत असणार आपल्या गावात कोणता हलवाई प्रसिद्ध आहे ..फरसाण..नमकिन साठी?? .. ..

प्रतिक्रिया द्या
25603 वाचन

💬 प्रतिसाद (105)
व
विनोद१८ Wed, 10/22/2014 - 20:09 नवीन
...आत्ताच्या ह्या दशकात तिकडे 'मोदीछाप' उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे. असे नान्याने मला एकदा हळुच सांगितले होते. तो म्हणे तिकडे हल्ली वरचेवर जात असतो, हे खरे आहे काय ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 07:27 नवीन
वा वा वा माईसाहेब. तुमच्या त्या १८८० च्या दशकातल्या दौर्‍याचे वर्णन ल्ह्या की.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 10/09/2014 - 08:17 नवीन
व्यक्ति:श मला चितळे, काका हलवाई यांच्याकडचे फरसाण नाही आवडत. फारच मिळमिळत असतात. कराचीवालाची जाड शेव मस्त असते. तीच मी शेवभाजी साठी सुद्धा वापरते.
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 10/09/2014 - 08:24 नवीन
खरं तर गुजराती लोक तशा प्रकारच्या सगळ्याच नाश्त्याला 'फरसाण' असे म्हणतात. फक्त मुंबई-पुण्याकडे या मिक्स्चरला 'फरसाण' म्हणतात. 'फरसाण' नांवाने जे मिळते त्याहीपेक्षा चविष्ट मिक्स्चर खायचे असेल तर ' शेव खमणी' खाऊन बघा. बडोदा-अमदाबादला उत्तम चवीची मिळते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 08:36 नवीन
माहितीकरिता धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
प्रदीप गुरुवार, 10/09/2014 - 08:47 नवीन
आपण ज्याला फरसाण असे संबोधतो, त्याला गुजराती 'फाफडा' म्हणतात. ताटात 'डाव्या व मधल्या' बाजूला जे जे काही असते, म्हणजे लोणची, चटण्या, भजी, ढोकळा इत्यादी. -- ह्या सगळ्याला मिळून 'फरसाण' म्हटले जाते. मी अहमदाबादेत पूर्वी रहात होतो, तेव्हा आमच्या जवळच एक नवे फरसाणचे दुकान उघडले. त्याचा गल्लीच्या कोपर्‍याबर 'फरसाण नो दरियो' व त्याखाली दुकानाच्या दिशेने बाण--असा बिलबोर्ड लावला होता, तो ह्या लेखाच्या निमीत्ताने आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
व
विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 09:05 नवीन
प्रदीप जाजा. गुजराथी लोक ; जेवणातील तळलेल्या विषेषतः खार्‍या-तिखट पदार्थाला उदा : पापड, समोसे , गाठेया ,कचोरी , पात्रा , ढोकळा ,या सर्वाना फरसाण असेच सम्बोधतात. आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Fri, 10/10/2014 - 07:24 नवीन
माझी एक चूक झाली होती, लोणची- चटण्या इ. 'अथाणूं' म्हटले जाते-- ते 'फरसाण'चा भाग नव्हेत. आणि तुम्ही लिहील्याप्रमाणे जेवणातील तळलेल्या,खार्‍या-तिखट पदार्थांना फरसाण असे संबोधतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिवळा डांबिस Fri, 10/10/2014 - 19:02 नवीन
आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो
गडी अंगानं किरकोळ, न आडवा, त्याच्या काव्यात सातारवी गोडवा, गंऽऽ त्याच्या काव्यात सातारवी गोडवा... हसरा मुखडा, काळजाचा तुकडा मिपावरी रुतला, गं बाई बाई, मिपावरी रुतला!!! हितंबी दिस्तोय, तिथंबी दिस्तोय, शोधू नको, शोधू नको, शोधू नको.... बाटला गं बाई, बाटला!!!! बाटला गं बाई, बाटला!!!! घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
न
नाटक्या Fri, 10/10/2014 - 19:56 नवीन
पिडां कडे भरपूर मोकळा वेळ दिसतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sat, 10/11/2014 - 07:07 नवीन
फ्रायडे मूड! दुसरं काय!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
व
विजुभाऊ Wed, 10/22/2014 - 15:19 नवीन
बाटला गं बाई, बाटला!!!! बाटला गं बाई, बाटला!!!! घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!!
ओ हायच मी पक्का घाटी. कृष्णेच्या घाटावरचा. उगाच डोंबोली अन ठाणे असल्या बीनघाटाच्या गावातला नाय पिडां काका कदी येताय हिकडं.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सस्नेह गुरुवार, 10/09/2014 - 08:27 नवीन
फरसाणसारखाच खुसखुशीत अन सात्विक धागा !
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 10/09/2014 - 08:32 नवीन
आमचे मत नाशिककर फरसाण, एच्.ए. कॉलनी पिंपरी १ लंबर परदेशी फरसाण, गांधी पेठ, चिंचवड्गाव. २ नंबर
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 10/09/2014 - 08:55 नवीन
पुण्यातलं फरसाण हे कसलं फरसाण? पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव सारखाच पुणेरी फरसाण हा विनोदाचा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा गुरुवार, 10/09/2014 - 10:47 नवीन
पुणे आणि पिंपरी चिंचवड्मधे फरक आहे. खरे खवय्ये गावांवरुन नाही तर प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन, चाखुन मत बनवतात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
प्रचेतस गुरुवार, 10/09/2014 - 08:58 नवीन
नाशिककर सहमत. लै भारी. पण हल्ली अंमळ सोडा जास्त असतो. परदेशीकडचे अगदी ताजे आणि मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
च
चाणक्य गुरुवार, 10/30/2014 - 11:58 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Fri, 10/10/2014 - 07:39 नवीन
कुठे आहे? एकदा भेट द्यावी काय? नेह्मीचे परदेशीपेक्षा जरा बदल म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
व
विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 09:07 नवीन
पुण्यात फरसाण हा प्रकार इतका मोठ्ठ्या रेन्ज मधे मिळतो की लोक बटाटा वेफर्स आनी वडा पावाला सुद्धा फरसान म्हणतात
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 10/09/2014 - 09:10 नवीन
इंदोरी नमकीन हेच खरे. बाकी सर्व व्यर्थ.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 10/09/2014 - 09:58 नवीन
पुण्याच्या मंडळींनी या धाग्यास टक्कर म्हणून मिठाईवर लवकर धागा याने डोमेननेम रेजिस्टर करावे अन्यथा कोणीतरी ढापेल आणि पुणेरी आत्मे अतृप्त राहतील चितळे,काका आणि सिरवी आहेतच सुरूवात करण्यासाठी.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 10/09/2014 - 10:55 नवीन
नडियादी भुसा आणि महाबळेश्वर मिक्स हे दोन फरसाणप्रकार उत्तम. कोंककातले फरसाण इन जनरल उजवे. गणपतीपुळ्याला मंदिराबाहेर लागून जी मिसळ नाश्त्याची दुकाने आहेत तिथे गेल्यास नक्की दोनेक किलो ष्टाक भरुन आणावा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 12:01 नवीन
सदाशिव पेठेत एस पी कॉलेज समोर एक भेळेचे दुकान आहे ( हो तेच ते ; आरशात सुलट दिसावीत म्हणून भिंतीवर उलटी पाटी लावलेले" ) तेथे फरसाण खाऊन बघा. अर्थात पुण्यात क्याम्पात लाल देवळाजवळ एक मोठे भावनगरी दुकान आहे. तेथे भरपूर व्हरायटी मिळते.
  • Log in or register to post comments
व
विलासराव गुरुवार, 10/09/2014 - 15:11 नवीन
कुर्ला (प.) चा दिप़क फरसानवाला आमचा नं १.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 10/22/2014 - 20:25 नवीन
फरसाणाशिवाय त्याच्याकडे एकदा शेवबुंदीसुद्धा खाउन बघा, अप्रतिम चव. त्याने बाजुलाच एक काउंटर चालु केलेय चाट व फास्ट फुड्चे तिथले जंबो बटाटे वडे व सामोसे तसेच उत्तम दर्जाचे व चवीचे दहीवडे न चुकता खावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 10/09/2014 - 18:01 नवीन
बध्धा गुजरात एवूच खाय छे अने पछी बुलेटनी सवारीना जाय छे !
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 10/09/2014 - 20:16 नवीन
वा विलासराव तुम्ही जुन्या आठवांनी ताज्या केल्यात कुर्ला वेस्ट ला स्टेशन जवळ लहान पणापासून माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग दीपक फरसाण ह्यांची खासियत म्हणजे शेंदरी रंगाच्या जिलब्या ताज्या ताज्या गरमागरम जिलब्या खाण्यासाठी तेथे दिवस रात्र गर्दी असते , माझे बालपण डोंबिवली मध्ये गेले सुट्टीत कुर्ला येथे आल्यावर पहिले जिलब्या खाणे ठरलेले असायचे तेही पत्रावळी मध्ये बांधून त्यामुळे पाक सांडत नाही. इतर फरसाण पण लाजवाब
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 10/10/2014 - 08:00 नवीन
चिपळूणच्या परांजपे यांचा लाल चिवडा आणि जाड शेव फार अप्रतिम असते..
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 10/10/2014 - 09:11 नवीन
गुजरातमध्ये आणि आता मुंबईत पण - थाळीमधल्या तळणीच्या तिखट पदार्थांना सरसकट फरसाण हा शब्द वापरला जातो - समोसा, कचोरी, ढोकळा, खमण, तिरंगी - हे सगळं फरसाण यातच मोडतं. बाकी तसं फरसाण म्हणाल तर दर शनिवारी आमच्या इथे शिवाजी पार्कात फरसाणवाला चक्कर मारतो. निव्वळ अप्रतिम! शिवाय छेडा, रोका आणि ब्रिजवासी या त्रयीने आज गेली ५०-६० वर्षे तरी आमचा हा चस्का पुरा केलेला आहे!दादरला रानडे रोडवर कच्छी फरसाण पण सुंदर!
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 10/10/2014 - 11:59 नवीन
मागे संगमनेर मध्ये बाजारतळावर नढे ची फरसाण भेल खाल्ली, अन् बस दिल खुश झाला, मझा आली.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 10/10/2014 - 13:43 नवीन
आमच्या गावातील ब्रिजवासी फरसाण एक नंबर हाय.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Fri, 10/10/2014 - 19:58 नवीन
गुजरात मधील काही भागात फरसाण ला पर्चुरण असेही संबोधतात. लहानपणी या नावाने खाल्ले आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 10/11/2014 - 06:55 नवीन
गुजराथीत "परचुरण". हा शब्द "किरकोळ " या अर्थाने वापरला जातो
  • Log in or register to post comments
अ
असंका Sat, 10/11/2014 - 07:36 नवीन
फरसाणात चिवडा जास्त असावा की फाफडा? दाणे कमी असावेत की जास्त? चिवडा मक्याचा हवा की जाड पोह्यांचा? डाळं कमी हवं की जास्त? फरसाण तयार घ्यावं की हवं तसं मिश्रण बन्वून घ्यावं? मनुका जास्त असाव्यात की काजू? बारीक शेव किती बारीक असावी? भडभुंजाकडचं फरसाण घ्यावं की घेऊ नये? अर्थात हे मी माझ्यासाठी विचारत नाहिये...उगाच एक आपलाही शेर असावा म्हणून!!
  • Log in or register to post comments
प
प्रोलिफिकगाय Sat, 10/11/2014 - 19:15 नवीन
कोठारीचं फरसाण मुलुंडला नक्की कुठे आहे ?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 10/11/2014 - 23:53 नवीन
कोठारींच्या दुकानात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रोलिफिकगाय
ब
बॅटमॅन Mon, 10/13/2014 - 18:19 नवीन
=)) आदर्श इंधन कुठे मिळते? आदर्श शाळेत (मिरजेतली इपॉनिमस शाळा). असे आमच्या सरांनी एकदा सांगितल्याचे आठवले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ग
गौरीबाई गोवेकर Mon, 10/13/2014 - 17:49 नवीन
आजकाल मेले मैद्याचे फरसाण मिळते. चावता चावत नाही. बेसनाचे खुसखुशीत फरसाणाचे दिवस गेले आता
  • Log in or register to post comments
व
विजय पिंपळापुरे Tue, 10/14/2014 - 12:05 नवीन
माझ्या माहीतीप्रमाणे ते फरसाण वाट्याण्याचे असते.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/14/2014 - 12:27 नवीन
@ वाट्याण्याचे असते.>>> रैट्ट +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पिंपळापुरे
क
कंजूस Tue, 10/14/2014 - 12:30 नवीन
तेलातली प्रामाणिक भेसळचा पेठकरकाकांचा अनुभव खरा आहे. मी पूर्वी घडयाळे दुरुस्तीनिमित्ताने वेगळी तेले वापरून पाहायचो. एका एमआईडीसीला लागणाऱ्या तेल विकणाऱ्या दुकानात गेलो होतो. मी अर्धा लिटरच मागितल्याने दुकानदाराने विचारले कशाला पाहिजे ?वाणी आमच्याकडून नेतात गोडेतेलात मिसळायला. 'गोडा तेला'(?)तली भेसळ हा गुन्हा होऊ शकत नाही परंतू 'शेंगदाणा तेला'तल्या भेसळीबद्दल खटला भरता येतो. फरसाणात भेसळ केल्याबद्दल माफ करा.
  • Log in or register to post comments
व
विजय पिंपळापुरे Tue, 10/14/2014 - 12:57 नवीन
होय, सफेद वाटाणे भिजवुन त्याच्या पासून बनवतात फरसाण. तेच फरसाण कड्क असत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 10/14/2014 - 14:33 नवीन
शतकाकडे !
  • Log in or register to post comments
प
प्रोलिफिकगाय Wed, 10/22/2014 - 14:03 नवीन
कोठारींचे फरसाण दुकान मुलुंडला कुठे आहे ? मुलुंड कॉलनी मध्ये आहे तेच का ?
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 10/22/2014 - 20:37 नवीन
मुलुंड स्टेशनहुन पाच रस्त्याकडे जाताना डाव्या हाताला पोलीस स्टेशनच्यापुढे कोपर्‍यावरचे दुकान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रोलिफिकगाय
स
सुबोध खरे गुरुवार, 10/30/2014 - 16:03 नवीन
मुलुंड स्टेशन पश्चिम ला उतरल्यावर डावीकडे वळून भांडुपच्या दिशेने जवाहरलाल नेहरू रोड कडे चालायला सुरुवात करा.दोन मिनिटाच्या अंतरावर डावीकडे कोपर्यावर CCD दिसेल त्याच्या समोरच्या बाजूला चौकाच्या कोपर्यावर असलेले फरसाण मार्ट म्हणजे कोठारी निवास्चे फरसाण मार्ट. बर्याचदा रिक्षाची रंग तिथपर्यंत पोहोचते इतके स्टेशनच्या जवळ आहे. तितक्याच अंतरावर पूर्वेला माझा दवाखाना सुद्धा आहे. माझ्या वेळेत आलात तर फरसाण माझ्यातर्फे. (सर्व मिपाकरांना खुली ऑफर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रोलिफिकगाय
प
प्रोलिफिकगाय Wed, 10/22/2014 - 14:06 नवीन
Kothari Sweets Farsan Pipe Line Bus Stop, Guru Gobind Singh Marg, Mulund West Mumbai, Maharashtra 400082, India‎
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Wed, 10/22/2014 - 15:47 नवीन
शतकाकडे अजुन एक पाऊल :)
  • Log in or register to post comments
V
vikramaditya Wed, 10/22/2014 - 19:23 नवीन
एस. व्ही. रोड, तृप्ती फरसाण... worth checking out!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा