Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या शेल्फवरची पुस्तके...!!

प — प्रकाश१११, Wed, 10/08/2014 - 18:37
जमवून जमवून गोळा करून मांडून ठेवलेली असतात पुस्तके माझ्या पुस्तकाच्या खास शेल्फवरची संदर्भ ग्रंथासकट काही कवितेची मी चाळत रहातो मला हवे तेव्हा हवी तशी मी फिरत असतो पुस्तकाच्या रानात अक्षरांच्या ओळीओळीतून मनसोक्त फिरत राहतो घुसतो शब्दांच्या निबिड रानात मला हवा तो मोसम सुरु होतो जेव्हा माझ्या हातात पडतात मला हवे ते शब्द जादू करतात मनावर भ्रमित करतात मला मग कोसळू लागतो पाऊस मी शब्दांच्या पावसात भिजून जातो नको ईतका माझ्या बेड रूमची खास खिडकी मी काढून टाकल्यात त्या दुधी काचा नि बसवल्यात शुभ्र पारदर्शक ज्यातून सकाळचा सूर्य अलगद येतो भेटीला सांडतो प्रकाश माझ्या पुस्तकावर मग ती मला निराळीच भासू लागतात चंद्र पण येतो त्याच खिडकीतून भेटीला एकाच खिडकीतून येणारा चंद्र आणि सूर्य मला नव्यानेच जाणवून जातो मी बघत बसतो कधीतरी भर रात्री पौर्णिमेच्या चंद्राला मी कधीतरी प्रयत्न करतो चंद्र प्रकाशात कविता वाचण्याचा एक अनोखी संवेदना पसरते तेव्हा माझ्या रक्तात हल्लीहल्ली खूप छान छपाईची पुस्तके दिसतात चित्रासकट परदेशातील काय किंवा माझ्या देशातील काय माझ्या मनात छान सूर लावून जातात तरी देखील मी कधी कधी वाद घालत बसतो पुस्तकांशी त्यातील शब्दांशी ,त्यातील विचारांशी पण ती मात्र गप्प असतात ,मौन धारण करून बसतात कुठलाच वाद न घालता...!! प्रकाश

प्रतिक्रिया द्या
2269 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ए
एस गुरुवार, 10/09/2014 - 11:46 नवीन
आवडली. ते सेल्फ ऐवजी शेल्फ असं करून घ्या संपादकांकडून.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 10/09/2014 - 21:52 नवीन
त्यांना त्यांच्या आल्टर इगोनं इगो वर लिहीलेली पुस्तकं म्हणायचं असलं तर? आय मी मायसेल्फ मधलं सेल्फ असायला काही हरकत? आहेत की मिपावर बरीच सेल्फं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Fri, 10/10/2014 - 08:36 नवीन
नाहीतर ह्यांच्याही काव्याला कसलं कसलं विरसग्रहण लागायचं! @लेखकसाहेब, पुलेशु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रकाश१११ Fri, 10/10/2014 - 00:53 नवीन
सॉरी… लिहिताना झाले .शेल्फ ऐवजी सेल्फ कशी दुरुस्ती करायची माहित नाही . सेल्फ ऐवजी शेल्फ वाचावे . चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार . मनापासून
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/10/2014 - 08:19 नवीन
पुस्तकं आवडतात. त्यांच्याबद्दल लिहिलेली कविताही आवडली!
  • Log in or register to post comments
व
विलासराव Fri, 10/10/2014 - 08:28 नवीन
छान. मी सध्या विनोबांनी लिहीलेले "कुराण-सार" वाचतोय.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 10/10/2014 - 09:06 नवीन
पुस्तकप्रेमी की गति पुस्तकप्रेमीही जाने!अावडली कविता.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 10/10/2014 - 12:18 नवीन
कविता आवडली हे सांगायचं राहीलं. बाकी मिपावर असलेला प्रत्येक जण पुस्तक प्रेमी आहे असं माझं मत आहे. प्रतिसाद नाही दिले म्हणून पुस्तकप्रेमी नाही असा कुणाचा समज हो ऊ नये म्हणून सांगावंसं वाटलं. आगावू धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Fri, 10/10/2014 - 15:27 नवीन
सर्व मित्रांचे मनापासून आभार . हसत खेळत चूक दाखवून देणा-या मित्राचे आभार .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/11/2014 - 03:02 नवीन
मस्त ...! शेवट आवडला.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा