Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंबट-गोड नाती

स — स्वाती फडणीस, Tue, 08/05/2008 - 13:19

प्रतिक्रिया द्या
4089 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मदनबाण Tue, 08/05/2008 - 13:35 नवीन
व्वा...एक वेगळी पण मस्त कविता... (गाभुळलेली चिंच खाणारा) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 08/05/2008 - 15:52 नवीन
छान कविता! अगदी लोकगीताची चव आली. साती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 08/05/2008 - 16:52 नवीन
मस्त!!! पण : १. गोडी-खुळी हुळहूळ-कळ गोड-चव या तीन कडव्यांत पहिल्या दोन कडव्यांसारखीच यमके जुळवली असती तर बहार आली असती. २. खेळ खेळताना म्हणायचे गाणे वाटते (हे उत्तम) - तसे असल्यास शेवटच्या कडव्यात लांबलांब ओळींमुळे ठेका जातो. टाळ्या वाजवत-वाजवत कसे नाचता येणार? ३. "चिंचेजशी आंबटगोड नाती" बोधवाक्य फारच बटबटीत दिसते. खेळ खेळताना हाच बोध कळे-न-कळे ध्वनित केला असता तर खेळकरपणा तसाच अबाधित राहिला असता. कवितेची कल्पना सुंदर आहे. बहुतेक कडवी मस्त उतरली आहेत. तुमच्यापाशी प्रतिभा आहे, म्हणून टीका जास्त धारदार करतो आहे, राग मानू नये.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Tue, 08/05/2008 - 19:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ऋ
ऋषिकेश Sat, 08/09/2008 - 17:21 नवीन
खेळ खेळताना म्हणायचे गाणे वाटते (हे उत्तम) - तसे असल्यास शेवटच्या कडव्यात लांबलांब ओळींमुळे ठेका जातो. टाळ्या वाजवत-वाजवत कसे नाचता येणार?
असहत. अनेक खेळाच्या गाण्यात एकसंध ताल नसतो. लहानपणी आईबरोबर अनेक मंगळागौरींना गेल्याचे आठवते आता ती बरीचशी गाणी आठवत नसली तरी कित्येकगाणी अचानक ठेका बदलतात.. विषेशतः समारोपाला वेगळा ठेका येण्यात वेगळी गंमत असु शकते. उदा: गोफ विणतानाचे गाणे: गोफ विणू बाई गोफ विणु अर्ध्या रात्री गोफ विणू या नंतर लगेच गरे घ्या गरे, पोटाला बरे................. वगैरे सुरु होते. लहान मुलांचे "आळंचो का पाळंचो" या गाण्यात शेवटाचे "दुधात टाकू का दह्याऽऽत" हे ऑफ बीट छान वाटते की बाकी १ व ३ शी सहमत स्वाती, गाणे खूप आवडले.. आता कोणता खेळ खेळताना गायचे ते ही सांग :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
स्वाती फडणीस Tue, 08/05/2008 - 21:07 नवीन
गाभूळ नाती . चिंचेचा आकडा गं.. शेपटावाणी वाकडा गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी गं.. चिंचोक्या बाटी गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. आकड्याची गोडी गं.. पोरं यडी-खुळी गं.. आकड्याची खुळी..गोडी गं.. जिभेला हुळहूळ गं.. दाताना कळ गं.. खाताना हुळहूळ.. कळ गं.. चिंच आंबट-गोड गं.. भली-बुरी चव गं.. चिंच आंबट-गोड.. चवीला गं.. चिंच जशी गाभूळ गं.. नाती कच्ची-पक्की गं.. चिंच गाभूळ.. कच्ची-पक्की गं.. ===================== स्वाती फडणीस............. ०५-०८-२००८
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 08/06/2008 - 04:11 नवीन
गाभुळलेली कविता मस्त आंबट गोड होती.
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 08/06/2008 - 05:45 नवीन
गावाकडची आठवण आली... गावाकडे श्रावणात अशी लोकगीतं म्हणतात... मुहुर्ताची गरज नसते... छान लिहिलं आहे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 08/06/2008 - 09:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/09/2008 - 07:35 नवीन
मस्तच कविता... आपला, (चिंचेचे डोहाळे लागलेला) तात्या. :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Mon, 08/11/2008 - 08:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा