Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ....

म
माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/15/2014 - 11:19
🗣 43 प्रतिसाद
आजपर्यंत मिपावर हजारो धागे येऊन गेलेत... त्यातले काही मोजकेच ध्रुवासारखे अढ्ळ झाले....बाकी यथेच्छ पेटवले, उसवले आणि तुडवले गेले. तर त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की नेमकं काय लागतं धागा शतकी करायला? असे शतकोत्सुक प्रचंड प्रमाणात हल्ली ठिकठिकाणी दिसत असल्यामुळे हा धागा त्यांना समर्पित आहे. दुसरा फायदा असा की निदान ह्या निमित्ताने अशा घटकांची एक यादी तयार करून ते विषय थोडे बाजूला ठेवून नवीन विषयांवरही साधक बाधक चर्चा करता येईल कारण बरेच विषय परत येत आहेत आणि त्यामुळे चर्चेला मर्यादा येऊ लागली आहे असे कुठेतरी वाटतयं. आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत......

प्रतिक्रिया द्या
10798 वाचन

💬 प्रतिसाद (43)
य
यसवायजी Wed, 10/15/2014 - 11:46 नवीन
प्रतिसाद क्र. १
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 10/15/2014 - 16:43 नवीन
चर्चा चालावी कशी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Wed, 10/15/2014 - 17:38 नवीन
हे बघा.. हा अजुन १ प्रतिसाद. विषय कशाला पाहिजे तुमाला? (तसा या धाग्यात काय इशय हाय का? तरीबी आले नव्हं ७ पर्तिसाद? आँ? ) (काड्यासारू) SYG :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
ट
टवाळ कार्टा Wed, 10/15/2014 - 11:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 10/15/2014 - 17:14 नवीन
एखादा तडकता फडकता विषय, शाकाहारी-मांसाहारी, पुरोगामी-प्रतिगामी, भाजप-काँग्रेस, ब्राह्मण-इतर, श्रद्धा-अंधश्रद्धा, आयटी-इतर, पुणेकर-इतर वगैरे घ्यावा. त्यात एखाद्याला झोडपून काढावे, नाहीतर आपला कंपू करून एखाद्यावर हल्ला चढवावा नाहीतर तीव्र रागाने विडंबने पाडावीत आणि प्रतिसादातून वैयक्तिक हल्ले करावेत (हे स्वतःच्या जबाबदारीवर करा. तुमचे आधीचे अपराध असल्यास आयडी बळी जाऊ शकतो.) नाहीतर ..... बरेच घटक आहेत हो! इथले सगळेच यक्षपर्ट आहेत. म्या पामराने काय सांगावे!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 10/15/2014 - 17:40 नवीन
गांधीबाबांना विसरल्याबद्द्ल अतितीव्र णिषेध आणि जेवायची वेळ होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी उपोषण =))!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुहास.. Wed, 10/15/2014 - 17:47 नवीन
होईपर्यंत १८ मिनिटाचे निर्जळी उपोषण >> धन्यवाद , पण १८ हाच आकडा का निवडलात ;) , काय निकष आहेत त्या मागे , काही विदा उपलब्ध आहेत का , काही ऐतिहासिक पुरावे आहेत का, काही लिंका आहेत का , तिकडे परदेशात ही १८ हाच आकडा निवडला जातो का , काही एकावर आठ च्या ऐवजी आठावर एक केल्यास काय शक्यता निर्माण होवु शकते, अशी एखादी नवी पाकृ ही आहे का, माझ्या मामाच्या , तिसर्‍या मावशीची पुतणीची काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव, तसेच काही आपल्या उपोषणाबाबत आहे का ;) ;) ;) ( कोण म्हणत १८ वरून शंभर नाय करता येत ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/16/2014 - 05:40 नवीन
कारण माझी जेवायची वेळ अंदाजे १८ मिनिटांनी होती ;)...परदेशातलंं काय माहीत नाही बॉ. बाहेर गेलो नाही अजुन. (प्रतिसादामधे आयटी ऑनसाईट विरुद्ध देशी मेकॅनिकल विंजिनिअर चं पोटेन्शिअल लक्षात आलेलं आहे आणि कदाचित हा एक प्रतिसाद सुद्धा १०० मारु शकतो).
माझ्या मामाच्या , तिसर्‍या मावशीची पुतणीची काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव, तसेच काही आपल्या उपोषणाबाबत आहे का
तुमच्या मामाच्या , तिसर्‍या मावशीच्या पुतणीच्या काकुंनी सांगीतल्या प्रमाणे १८ च १९ व्हायच्या आधी उरकुन टाकाव असं आहे का नाही माहित नाही. पण माझ्या शेजारच्यांच्या सासुबाईंच्या नणंदेच्या मावसबहिणीच्या सुनेच्या मोठ्या दिराच्या मावशीचे मिस्टर असंचं करतात म्हणे ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 10/16/2014 - 06:10 नवीन
लिंका नासा वगैरेच्या अधिकृत संकेत स्थालावारील्च हव्यात ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ट
टवाळ कार्टा Wed, 10/15/2014 - 17:50 नवीन
पाशवी शक्ती राहिल्या की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पैसा Wed, 10/15/2014 - 18:07 नवीन
कित्ती पण काड्या टाका. जाने देव, बच्चा हय म्हणून सोडून देतात. (बास का? बॅट्या, ये आता. तो आला की एकटाच ५० प्रतिसाद देईल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सतिश गावडे गुरुवार, 10/16/2014 - 04:35 नवीन
याही धाग्यास शतकी करण्याच्या हेतूने ब्याट्याला डीवचण्याचा तुमचा हेतू लक्षात आला बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 10/16/2014 - 08:25 नवीन
सोदाहरण प्रात्यक्षिक म्हणतात याला. योग्य व्यक्तीला डिवचणे आणि योग्य जागी काड्या टाकणे अत्यंत महत्त्वाचे असते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 08:45 नवीन
योग्य जागी काड्या टाकणे>>> *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/16/2014 - 08:10 नवीन
काय ओ पाशवी तै? माझी सुखनिद्रा बघवत नाय का तुम्हांला आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 10/16/2014 - 08:22 नवीन
इलियड पुरे कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 10/15/2014 - 18:36 नवीन
इतके दिवस इथे आहे पण काही कळलं नाही ब्वा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 10/15/2014 - 18:39 नवीन
पूर्वी एक लै फ्येमस कंपू होता म्हणे. हल्ली कोण आहेत का काय म्हैत नै. पण तुम्ही स्वतःचा सुरू करा ना! हाकानाका! मी कित्ती दिवस प्रयत्न करतेय, पण संपादक म्हणून लोक वाळीत टाकतात! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 10/15/2014 - 18:48 नवीन
इन्स्पेक्टरनंच टोळीबाजीला प्रोत्साहन दिल्यासारखं वाटतंय.. रच्याक ने....एकदम अपक्ष म्हणून उभं राहण्यापेक्षा कुठ्ला कंपू तिकीट देतोय का ते बघू.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेपी गुरुवार, 10/16/2014 - 02:32 नवीन
सध्या पुणे पिंचीं वाल्यांचा कंपु आहे त्याला काही गोवेकरांचा पाठिंबा आहे.*wink* मी स्वत:चा कंपु तयार करत आहे. तुम्हाला यायचे असेल तर येलकम. *wink* एकदा कंपु झाला की शतक काय द्विशक पण होईल. (लावली काडी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/16/2014 - 04:08 नवीन
तुम्ही "मी पयला" कंपु सुरु करताय काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी गुरुवार, 10/16/2014 - 04:18 नवीन
'मी पयला' हि संघटना आहे चळवळ आहे. त्याचे सदस्य कधिच कंपुबाजी करत नाहित.उलट कंपुबाजीला बळी पडतात. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/16/2014 - 18:33 नवीन
@उलट कंपुबाजीला बळी पडतात.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
र
रेवती Wed, 10/15/2014 - 19:29 नवीन
निवाशी- अणिवाशी र्‍हायला का! कोन्ची पॅथी चांगली? हा एक आहे. आठवले तर अजूण लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुहास.. Wed, 10/15/2014 - 17:29 नवीन
पण कशाला ? चार चांगली वाक्ये लिहुन चारच प्रतिसाद घेतले तर काही वाईट होणार आहात का ? की दोन चपात्या कमी जाणारेत ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 10/15/2014 - 17:33 नवीन
असं कसं असं कसं??????? मग लोकांना कळणार कशी आपली लोकप्रियता? च्यामारी लोक येऊन येऊन सांगून जायचे. 'झगा मगा मला बघा' म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Wed, 10/15/2014 - 17:38 नवीन
'झगा मगा मला बघा' म्हणून. >> अरे ते तसं नव्हते " मला पहा आणि फुले वहा " असे होते ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 10/15/2014 - 18:02 नवीन
मी सामान्य : गल्लीच्या बाहेर गेला का हो कधी? म्हणे मला पहा आणि फुले वहा. आतापर्यंत तेच तर करा म्हणताय की तुम्ही. आँ? मला सांगताय. :-/ मी समीक्षक : आपल्या सीमित समाजजीवनाच्या अनुभव परिपेक्षामध्ये वावरताना स्वअनुभवा पलिकडं असलेलं एक अपरोक्ष अवकाश आहे आणि ह्या अवकाशामध्ये असलेल्या अनेकविध सामाजिक घटकांच्या मुखी असलेलं भाषेचं वेगळं अलंकृत रुप आपण नाकारत असू तर त्याबद्द्ल स्वतःलाच दोष देऊन, स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादा कबूल करुन स्वतःचा उमपर्द करणं ईष्ट. अर्थात तेवढंच करुन ते थांबायला हरकत नाही स्वतःच्या अल्पानुभवाच्या कूपामध्ये . पुन्हा एकदा असा परोक्ष अनुभव शवण होईपर्यंत. अन्यथा स्व मर्यादांच्या कुंपणाला धैर्या च्या कणखर बाहूंनी झुगारुन देऊन पंखांमध्ये बळ भरुन समाजविश्वामध्ये उत्तुंग भरारी घेण्याची तयारी करावी. असो! जरा घाई मध्ये आहे. (ओव्हर टु वाश्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
ख
खटपट्या Wed, 10/15/2014 - 22:05 नवीन
वरील "मी समीक्षक" म्हनून जे काय लिवलय, त्येचं इश्लेशण का काय म्हनत्येत त्ये करायची सुपारी घ्या कोनीतरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
स्पंदना गुरुवार, 10/16/2014 - 02:48 नवीन
सुपार्‍या कसल्या देताय? ह्या असल्या खंग्री भाषेला आडकित्ता गरजेचा राव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
स्वप्नज Wed, 10/15/2014 - 18:28 नवीन
धाग्याचे शतक व्हावे असे वाटत असेल तर "हुकुमी शतकी धाग्यांचे घटक पदार्थ...." असा एखादा धागा काढावा ..... ह.घ्या.
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 10/15/2014 - 19:27 नवीन
http://www.misalpav.com/node/27847 हा आमचा धागा याच विषयाला समर्पित होता.
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Wed, 10/15/2014 - 20:44 नवीन
बायकांना स्वयंपाक आला(च) पाहिजे(च) का? हा विषय घ्या. माझ्यामते तो मिपावरचा पहिला द्वि की त्रि शतकी धागा आहे. बरेच दिवस झाले. जरा फुंकर घातली कि पेटायला वेळ लागणार नाही. बायकांचे कपडे कसे असावेत हा विषय घेतलात तरी हरकत नाही. हे अतिशय ज्वालाग्राही विषय आहेत. सबब प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 10/15/2014 - 22:31 नवीन
नुस्त्या नै कै, ऐटीतल्या. आयटीतल्या पण म्हणतात काही जण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/15/2014 - 23:38 नवीन
ही एक जुनी पाककृती आहे. वेळ असेल तर विकान्ताची वाट न पाहताच करून पहा - (आपल्याच) धाग्याचा खफ
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/16/2014 - 04:21 नवीन
'समग्र नानाविचारामृत' ग्रंथ वाचल्यास धागे शतकीच काय सहस्त्रकी होतील.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/16/2014 - 05:41 नवीन
मिपाची बॅंडविड्थ लिमिटेड आहे नाना, माईंना नमस्कार सांगा बाकी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मदनबाण गुरुवार, 10/16/2014 - 06:13 नवीन
स्त्रीयांचे ड्रायव्हिंग { अत्यंत ज्वालाग्रही विषय :) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/16/2014 - 11:24 नवीन
फलज्योतीष / पत्रिका / मुहुर्त राहिले की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
V
vikramaditya गुरुवार, 10/16/2014 - 11:03 नवीन
पत्रिका, मुहुर्त... वगैरे... आणि हो, मला अध्यात्मातील काही कळते असे फक्त कोणी म्हणुन तर बघा...मग काय मौजा ही मौजा!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 10/16/2014 - 11:13 नवीन
ख र ड फ ळा. पब्लिक हल्ली जाम चेकाळायला लागलेय. माझं डुआयडी पासवर्ड असलेलं एक्सेल शीट हरवलय रिकव्हर कस करायच ? बर ते रिकव्हर करताना आजच्या युगातील स्रीयांना स्वयंपाक करता येतो काय ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 10/16/2014 - 15:51 नवीन
त्याच डू आयडींनी एकमेकांना प्रतिसाद देत रहायचे... मिपा सलामत, तो डू आय.डी. पचास..
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 10/17/2014 - 09:22 नवीन
धन्य ते मिपाकर आणि धन्य ते विषय..... दंडवत स्वीकारा.....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा