विंचू चावला
मतदान झाल ,निकाल लागला ,आलं सरकार
आलं सरकार , तयाला माझा नमस्कार
अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
आर आर आबा , बा ..... विंचू चावला
अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?
सत्ता , स्वबळ विंचू चावला
सत्तेचा माज अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला
सत्तेची इंगळी अति दारुण
((हा, हा, म्हणजे अति 'दारू' नं)
दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही.
दारूण म्हणजे भयंकर.
(भयंकर म्हणजे ते कऱ्हाडकर का ?)
त्यांचा इथ संबंध नाही, कऱ्हाडकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
(अति भयंकर म्हणजे ?)
खूप भयंकर.
(अन् खूप भयंकर म्हणजे ?)
बारामतीकर.
(अन् बारामतीकर म्हणजे ?)
तुझा पुतण्या पडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
(बापरे !))
सत्तेची इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं .....
((तिनं म्हणजे त्या पंचायतीच्या निवडणुकीन
तिचा इथे काय संबंध ?
(मग त्या झेडपीच्या निवडणुकीन .)
कुणाचाही संबंध नाही.)
तिनं म्हणजे त्या इंगळीनं
(महाराज इंगळी म्हणजे ?) ..... सत्ता !
(अंदाजे केवढा ?) ......देशाएवढा !
सत्तेची इंगळी अति दारूण
देशाला नांगा मारिला तिनं
सर्वत्र वेदना जाण, त्या इंगळीची
या विंचवाला उतारा, नमोगुण मागे सारा
(ढोकळा खाणं मागे सारा)
नाही, नाही, या विंचवाला उतारा, नमोगुण मागे सारा
नमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
सत्वगुण लावा अंगारा, अन् विंचू इंगळी उतरे झरझरा
वाघ उतारा घेऊन (आला का ?)
अवघा सारिला नमोगुण
किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने
पुंडलीक वरदा (हरी विठ्ठल)
वेगळ्या विदर्भाच ....नावssssssss नको.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RBI in talks with govt over a Financial Resolution Authority Modi government cuts through red tape to make working easier in India