भेसळ
भेसळ करणाऱ्यांना काय शिक्षा दिली पाहीजे? खाद्य पदार्थांमधे भेसळ म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळ, आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अन्नपदार्थांमधे भेसळ करताना जे घटक वापरले जातात त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवु शकतात, एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, एखाद्याला आयुष्यभरासाठी व्याधि / व्यंग यांचा सामना करावा लागु शकतो, समाजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते हे भेसळ करणऱ्यांना माहित असते. तरीही बिनदिक्कत भेसळ केली जाते.
उदा.- दुधामधे युरीया मिसळणे, सिंथेटिक दुध बनवणे, सिंथेटिक खवा बनवणे- त्यापासुन मिठाई बनवणे, मिठाईला चांदीच्या ऐवजी अॅल्युमिनियमचा वर्ख लावणे, कृत्रिम रंग वापरणे, किडनाशकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करणे, सफरचंदावर चकाकीसाठी मेण लावणे, इ.इ. ही सगळी प्रातिनिधिक उदाहरणे आहेत, अजुन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बहुतेकांना माहित नाही.
खून करणे, खूनाचा प्रयत्न करणे, सदोष मनुष्यवध इ. विविध कलमांखाली कठोर शिक्षा सुनावली जाते, तर अशाच एखाद्या कलमाखाली कठोर शिक्षा ह्या भेसळबाजांवर केली पाहिजे. कारण यांचे कृत्य तत्क्षणी दिसत नसले तरी दुरगामी भयंकर परिणाम करणारे असतात.
सणासुदिच्या काळात तर यांच्या या दुष्कृत्यामधे विलक्षण वाढ होते. सर्वसामान्य माणुस आनंदामधे सण साजरा करायला जातो आणि हि मंडळी त्याच्या आनंदावर विरजण घालायचे काम करतात. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्यासाठी ग्राहकवर्ग जागरुक असला पाहिजे.
आणखी भेसळयुक्त पदार्थ कोणते, भेसळयुक्त पदार्थ कसे असतात, त्यांना ओळखायचे कसे, कुठल्या ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ असतात, भेसळ रोखण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात माहितीची देवाण-घेवाण करुन आपणा सर्वांच्या ज्ञानात भर घालता येईल.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms