ज्याचे त्याला कळले
शिलेदार धारातीर्थी
बालेकिल्ले ढळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
तरातरा निघालेले
पुन्हा मागे वळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
बेघर होतील आता
जे पंधरा वर्ष रुळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
पीळ बघूया जाईल का
सुंभ मात्र जळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
शुभ्र कपड्यांमागचे
रंग खरे उजळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
आहे नव्याची आशा
संकट परी ना टळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
मतदाराचे कौतुक की
कर्तव्य त्याला कळले
कोण किती पाण्यात आहे
ज्याचे त्याला कळले
- अ ज ओक
💬 प्रतिसाद
(3)
व
विवेकपटाईत
Sun, 10/19/2014 - 16:26
नवीन
१४४ आणि १४४ वर राजी झाले असते तर आज शिवसेनेला १०० जागा किमान मिळाल्या असत्या, कदाचित उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद ही मिळण्याची संभावना झाली असती. चुकीचे सल्लागार मिळाले कि असेच होते. आता भा ज प ला समर्थन देण्या व्यतरिक्त दुसरे काही करता येणे शक्य नाही, अन्यथा पार्टी फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मिळेल ते गोड मानून पदरात टाकावे लागेल.
एवढेच नव्हे तर युती टिकली तर पुढील निवडणूकीत ११७ जागा आनंदाने स्वीकार कराव्या लागतील. स्वतच्या पायावर कुल्हाडी मारणे म्हणजे हेच.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Mon, 10/20/2014 - 07:03
नवीन
अगदी हेच
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 10/20/2014 - 07:49
नवीन
लील्याची आठवण आली
- Log in or register to post comments