Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाकरवडी

इ
इशा१२३
Sun, 10/19/2014 - 21:37
💬 25 प्रतिसाद
नमस्कार मंडळी! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! सगळ्यांकडे दिवाळीची तयारी झाली असेलच. दिवाळीचा फराळ काय काय बनवलात? लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, चिरोटे, अनारसे असतातच, पण एखादा नवीन पदार्थ केला जातोच. या वेळेस मी केलीये बाकरवडी! तशा पुण्यात चितळे मामा, हलवाई काका, जोशी अशा अनेक चवीच्या बाकरवड्या मिळतात. पण सणानिमित्त घरी केलेल्या खमंग बाकरवड्या छान वाटतात. b1 साहित्यः बाकरवडीच्या सारणासाठी लागणारे साहित्यः सुक्या खोबऱ्याचा कीस १ वाटी खसखस १/४ वाटी तीळ १/४ वाटी शेव १/२ वाटी (ऐच्छिक) तिखट २ चमचे काळा मसाला २ चमचे ओवा १/२ चमचा हळद १/२ चमचा जिरे पूड १/२ चमचा धने पूड १/२ चमचा कोथिंबीर २ वाट्या (बारीक चिरलेली) मीठ चवीनुसार हिंग चिमूटभर b2 सारणाची कृती: तीळ्,खसखस्,खोबरे भाजून घ्यावे.भाजलेले तिन्हि पदार्थ मिक्सर मधून कोरडेच बारिक वाटून घ्यावे. एका भांड्यात काढून त्यात कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,धने जिरे पुड,काळा मसाला,हिंग घालून एकत्र करून घ्यावे. b3 सारणाची कृती: तीळ, खसखस, खोबरे भाजून घ्यावे. भाजलेले तिन्ही पदार्थ मिक्सरमधून कोरडेच बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात हे कोरडे वाटण काढून त्यात कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद, धने-जिरे पूड, काळा मसाला व हिंग घालून एकत्र करून घ्यावे. आवरणाचे साहित्य: डाळीचे पीठ ३ वाट्या मैदा १/२ वाटी तिखट २ चमचे हळद १/२ चमचा तेल (मोहनासाठी) २ चमचे मीठ तळणीसाठी तेल b44 कृती : प्रथम डाळीचे पीठ, मैदा, तिखट, मीठ, हळद, २ चमचे तेल एकत्र करून मळावे. या पिठाचे गोळे करून घ्यावे. त्याच्या थोड्या जाडसर पोळ्या करून त्यावर एकसारखे सारण पसरून घ्यावे. आता या पोळीचे रोल करावे. b5 हे तयार रोल ढोकळ्याप्रमाणे वा चाळणीत खाली पाणी ठेवून १० ते १२ मिनिटे वाफवून घ्यावे. वाफवून झाल्यावर हे रोल गार करावे. गार झाल्यावर रोलचे एकसारखे तुकडे करावे. b6 गरम तेलात बाकरवडी तळहातावर हलकेच दाबून (तळताना वडी सुटू नये यासाठी) सोडावी. मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावी. खमंग, खुसखुशीत बाकरवडी तयार! b7

प्रतिक्रिया द्या
11760 वाचन

💬 प्रतिसाद (25)
आ
आयुर्हित Mon, 10/20/2014 - 18:48 नवीन
सुंदर फोटो व माहिती. खमंग,खुसखुशीत बाकरवडी पाहून तोंडाला पाणी सुटले!
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 10/21/2014 - 11:09 नवीन
मस्तच! नक्की करून बघणार.
  • Log in or register to post comments
M
Maharani Tue, 10/21/2014 - 12:23 नवीन
वा मस्त गं ईशा..करूँ बघीन एकदा...उकडून घ्यायचं माहीत नव्हतं..
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 10/21/2014 - 12:49 नवीन
पाकृच्या फोटोतील कोंथिंबिरीचे पान पाहिले की आमच्या मनात वेगळीच चलबिचल होते. नको त्या आठवणी! बाकी बाकरवडी हा एकदम आवडता प्रकार! कोणी करून खायला घातल्यास किती बरं होईल! बोलवा रे बोलवा मला जरा!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 10/21/2014 - 13:05 नवीन
दिवाळी फराळातील वेगळेपण फार आवडलं. कधी बनविलेल्या नाहीत आता ह्या पाककृती बरहुकूम प्रयत्न केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 10/21/2014 - 13:26 नवीन
वाचनखूण साठवता येत नाहीये याचं वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 10/21/2014 - 13:56 नवीन
पण प्रचंड नाजूक व निगुतीने करायचा पदार्थ आहे, त्यामुळे आमच्या घरी कधी ट्राय केला गेला नव्हता. हे दाखवून प्रयत्न करण्याविषयी सुचवता येईल.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/21/2014 - 14:50 नवीन
सुंदर पाकृ व फोटू. खंमंग, खुसखुशीत झालीये हे कळते आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 10/21/2014 - 15:02 नवीन
सुंदर दिसताहेत. कधी खायला येउ?
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 10/21/2014 - 18:18 नवीन
मस्तं दिसतेय बाकरवडी एकदम खमंग, खुमासदार :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 10/21/2014 - 18:31 नवीन
नजाकतदार पाकृ. तपशील छान दिले आहेस गं इशा
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 10/21/2014 - 21:52 नवीन
नक्की करुन बघणार!!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 10/21/2014 - 21:54 नवीन
सहीच... पहिल्यांदा मला बाकरवडी कशी बनवतात हे समजले. धन्यवाद यासाठी :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 10/22/2014 - 05:05 नवीन
पा.क्रु. नक्की करून बघणार...
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 10/22/2014 - 07:16 नवीन
कधी करून पाहिली नाहीय, सविस्तर पाकृ. वाचून करावीशी वाटतेय.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 10/22/2014 - 12:16 नवीन
मस्त दिसतेय.. वेगळी कृती! वाफवून घ्यायची कृती माहित नव्हती.. अशा प्रकाराने करुन बघेन वेळ झाला की.. स्वाती
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ गुरुवार, 10/23/2014 - 10:10 नवीन
सगळ्यांचे खुप आभार.नक्की करून बघा.=) :smile: एक लिहायचे राहिले.हेच सारण आवरणासाठी भिजवलेल्या गोळ्याच्या पुर्‍या लाटून त्यात भरून चौकोनी बंद करायचे आणि तळायचे छान दिड तयार होतात.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sun, 10/26/2014 - 14:28 नवीन
फोटो अगदि तोंपासू आलेत. फोटोवरुन बाकरवड्या अत्यंत खमंग आणि खुशखुशीत झाल्या असणार ह्यात वाद नाहि. पण काहि ठिकाणी पारी/पोळीला चिंचेची आंबट-गोड चटणी लावून मग सारण पसरवतात ना? शीवाय वड्या डायरेक्ट तळल्याचं एकीवात आहे. वाफवल्याने काय होतं?
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 11/05/2014 - 11:37 नवीन
पारिला आंबट-गोड चटणी लावतात किंवा सारणात थोडी आमचुर पावडर घालतात.चवीत थोडा फरक पडतो.मी वापरलेली नाहिये.पण वापरायला हरकत नाहि.छान लागेल. वड्या वाफवल्याने जास्त टिकतात.आणि तळताना सट्ट्या होत नाहित.(उलगडत नाहित् आणि सारण बाहेर येत नाहि)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
ज
जुइ Sun, 10/26/2014 - 23:56 नवीन
करुन बघण्यात येईल.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 10/27/2014 - 01:30 नवीन
खमंग वास सुटला फोटो पाहिल्या बरोबर.
  • Log in or register to post comments
आ
आरोही Mon, 11/03/2014 - 08:26 नवीन
खूप आवडली बाकरवडी ..
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 11/05/2014 - 11:38 नवीन
धन्यवाद सगळ्यांना.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/08/2014 - 06:40 नवीन
हा प्रकार घरी करता येतो हे तुझ्यामुळे कळले! मस्त सादरीकरण!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Mon, 11/10/2014 - 07:01 नवीन
तुमचे विशेष धन्यवाद पैसाताई!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा