Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शुभ्र मोगर्‍याची कळी

म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/20/2014 - 12:43
💬 12 प्रतिसाद
शुभ्र मोगर्‍याची कळी शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही कधी? --- पहाटेच्या दवात भिजलेली आता उमलावं की नको या विवंचनेत गुंतलेली शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? ---- पाहता पाहता पहाटेची सकाळ झाल्यावर हलकेच डोळे मिचमिचे करुन हिरवे हिरवे जग बघून शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? ---- सकाळ कलंडतांना आळसाने भरलेले डोळे चोळत त्या एका वेड्याची वाट पाहणारी शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? ---- तो आल्यावर पटकन त्याच्यासमोर उडी घेणारी लाजरी बुजरी शुभ्र मोगर्‍याची कळी पाहिलीये का हो तुम्ही? ---- तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना गोळा करुन एका सुंदरश्या गजर्‍यात माळून जेव्हा तिला देतो तेव्हा त्याच्या समोरची शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? --- सांगाना पाहिलीये का हो? |- मिसळलेला काव्यप्रेमी -|

प्रतिक्रिया द्या
5272 वाचन

💬 प्रतिसाद (12)
आ
आयुर्हित Mon, 10/20/2014 - 17:22 नवीन
कळी अजून उमलायची आहे!
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 10/21/2014 - 09:00 नवीन
भन्नाटच , ज्याम आवडली :)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 10/21/2014 - 18:41 नवीन
वाचणं वसूल! अर्थातच आवडली...तो वेडा अश्याच सगळ्या कळ्यांना गोळा करुन एका सुंदरश्या गजर्‍यात माळून जेव्हा तिला देतो तेव्हा त्याच्या समोरची शुभ्र मोगर्‍याची कळी लाजतांना पाहिलीये का हो तुम्ही? पाहिलीय, पाहिलीय, ओंजळीतल्या कळ्या फिक्या पडतील इतकी लाजली होती :-) कंबख्त, तुमने भी क्या याद दिलाया?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 10/22/2014 - 10:52 नवीन
ही तर खास जुईची नाजुक कळी !
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Wed, 10/22/2014 - 14:59 नवीन
असेच म्हणते. छान.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सखी गुरुवार, 10/23/2014 - 19:17 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 10/24/2014 - 08:06 नवीन
मिका टच :-)
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/24/2014 - 11:42 नवीन
अतिशय तरल, रोमॅन्टिक.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/24/2014 - 20:24 नवीन
प्रचंड गुरफटून गेलो... उलगडता उलगडता! :)
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 10/25/2014 - 15:07 नवीन
आता कसे फार्मात आलाय जनुं! कविता आवडली अगदी भावार्थासहित!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sun, 10/26/2014 - 08:55 नवीन
छान आहे कळी!! आवडली...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 11/02/2014 - 10:28 नवीन
मिका रॉक्स पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा