Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुंदन मोर

इ
इशा१२३
Mon, 10/20/2014 - 12:44
💬 16 प्रतिसाद
कुंदन मोर r नमस्कार मंडळी! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची खरेदी केली असेलच. कपडे खरेदी , भेटवस्तू याबरोबरच महत्त्वाची खरेदी असते ती गृहसजावटीच्या वस्तूंची. मोठ्या वस्तूंपासून ते छान छान पणत्या, दिवे, तोरण, लाइटच्या माळा इ. एक ना दोन वस्तू खरेदी केल्या जातात. त्यातच रांगोळीच्या विविध रंगाची खरेदी येते. रांगोळी येत असो वा नसो चार रेघा काढून रंग भरावेसे वाटतातच. आजकाल तयार छापही मिळतात तेही आणले जातात. या रांगोळीतच थोडी विविधता आणण्यासाठी आता बाजारात सुबक लाकडी साचे विविध आकाराचे मिळू लागलेत. त्यावर रंगीबेरंगी कुंदन चिकटवून रांगोळ्या तयार करता येतात. http://www.misalpav.com/node/26882 चाळणीने रांगोळीचे रंग पसरून वा विविधरंगी फुलांच्या पाकळ्या पसरून या कुंदनच्या रांगोळ्या मांडता येतात. कधी हेच साचे ताटाभोवती महिरप म्हणून मांडता येतात तर कधी देवापुढे मांडता येतात. साच्यांचे वेगवेगळे प्रकार आकर्षक दिसतात. या वेळेस दिवाळीसाठी मी आणले मोराचे साचे. आणि त्यावर चिकटवायला विविध कुंदन. मोरासाठी वापरलेले साहित्य:
  • मोराचे लाकडी साचे
  • सोनेरी आणि जांभळ्या रंगाची मण्यांची चेन
  • रंग (जांभळा आणि सोनेरी)
  • आवडीप्रमाणे विविध आकाराचे आणि रंगाचे कुंदन (डिझाइनवर अवलंबून)
  • चिकटवायला ग्लु
r1 प्रथम साच्याला हवा तो आकर्षक रंग देऊन घ्यावा. मोर असल्याने मी जांभळा रंग वरच्या भागाला आणि पिसार्‍यासाठी सोनेरी रंग दिला. रंग साधारण दोन वेळा द्यावा लागतो तरच तो नीट बसतो. r2 रंग वाळल्यावर त्यावर कडेने सोनेरी रंगाची बारीक मण्यांची चेन चिकटवून घेतली. पिसारा कुंदनने पूर्ण भरून घ्यायचा होता म्हणून मोराच्या वरच्या भागात कमी कुंदन वापरले. मोराचा पोटाचा भाग उठावदार होण्यासाठी वेगळा आखून घेतला. तो चेन आणि कुंदन लावून पूर्ण केला. r3 त्यानंतर मोराच्या पिसार्‍याला दुहेरी सोनेरी आणि मधे जांभळी चेन लावली. (चेन चिकटवताना आकारानुसार कापून घ्यावी.) मग मधल्या पिसार्‍यावर कुंदनने डिझाईन बनवले. r4 असे दोन मोर तयार केले. दोन्ही मोरांमधे वेगळ्या आकाराची कुंदन रांगोळी ठेवून फुले आणि पणत्यांनी एक मोठी रांगोळी सजवली. r5

प्रतिक्रिया द्या
7811 वाचन

💬 प्रतिसाद (16)
आ
आयुर्हित Mon, 10/20/2014 - 17:16 नवीन
सुंदर संकल्पना व माहितीपूर्ण लेख!
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 10/21/2014 - 11:41 नवीन
छानच आहे रांगोळी.
  • Log in or register to post comments
M
Maharani Tue, 10/21/2014 - 12:30 नवीन
अप्रतिम...सुरेख...
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Tue, 10/21/2014 - 16:21 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 10/27/2014 - 17:28 नवीन
सुरेख दिसत आहेत कुंदन मोर
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 10/28/2014 - 14:32 नवीन
अजून काही नमुने द्यायला हवे होतेस.
  • Log in or register to post comments
स
सखी Tue, 10/28/2014 - 15:46 नवीन
किती सुरेख दिसत आहेत रांगोळ्या, एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 10/28/2014 - 16:57 नवीन
शेवटच्या फोटोतली रंगसंगती अप्रतिम साधली आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 10/29/2014 - 00:05 नवीन
अप्रतिम!! मी कोयर्‍या आणलेत लाकडाच्या. आता हे पाहून, नक्की कस बनवायचं ते समजल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आरोही Mon, 11/03/2014 - 08:24 नवीन
खुप सुंदर झालेत मोर ..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 11/03/2014 - 12:26 नवीन
दिल माँगे (कुंदन) मोर...!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 11/05/2014 - 11:40 नवीन
सगळ्यांचे खूप आभार.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/08/2014 - 06:38 नवीन
कल्पनाशक्ती लढवायला भरपूर वाव आहे यात! हे मोर मस्तच झालेत!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 11/11/2014 - 12:22 नवीन
इशा, मस्तच गं
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 11/14/2014 - 02:25 नवीन
खुपच सुरेख
  • Log in or register to post comments
न
नूतन Tue, 12/02/2014 - 14:44 नवीन
मस्त दिसतेय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा