काजू अॅपल मिठाई
Primary tabs
साहित्यः
१ वाटी काजू पावडर
१/२ वाटी साखर
१/४ वाटी पाणी
सजावटीसाठी लवंगा
खायचा रंग (मी केशर सिरपमध्ये थोडा खायचा रंग मिसळला आहे)
पाकृ:
नॉन-स्टीक पॅनमध्ये साखर्+पाणी एकत्र करून त्याचा एकतारी पाक तयार करावा.
पाक तयार झाल्यावर त्यात काजू पावडर घालून मिश्रण एकत्र गोळा होईपर्यंत ढवळावे.
मिश्रण कडेने सुटू लागले व त्याचा गोळा होऊ लागला की ताटात काढून थोडे गार होऊ द्यावे.
सधारण कोमट झाले की त्याचे गोळे करुन घ्यावे. (इथे थंड वातावरण असल्यामुळे मिश्रण लगेच गार झाले त्यामुळे मला लगेच त्याचे गोळे करावे लागले)
छोटे गोळे तयार करुन वरुन हलके दाबून घ्यावे.
आता एक न वापरातला रंगाचा ब्रश स्वच्छ धुवून घ्यावा.
खायच्या रंगात बुडवून तयार गोळ्यावर त्याचे स्ट्रोक्स मारुन घ्यावे.
दाबलेल्या भागात लवंग देठ म्हणून रोवून ठेवावी. (तुम्ही देठासाठी पिस्त्याचे काप ही वापरू शकता)

काजू अॅपल तयार आहे. दिवाळीला मिठाई म्हणून तुम्ही खाऊ शकता , खिलवू शकता :)
तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!.
कातिल फोटो! (आणि ती बॉक्सची सजावटही आवडली.)
अच्छा.....असे करतात काय हे प्रकार! मिठाईच्या दुकानात सफरचंदे, कलिंगडे बनवून ठेवलेली बघितलीत पण ते प्रकार कसे बनत असतील हे माहित नव्हते. छान दिसतायत अॅपल्स.
फोटो न दिसल्याने अतीव आनंद जाहला. :D
छान दिसते आहे मिठाई..
स्वाती
आहाहा...काय ती पाकृ, काय ते फोटो, काय ते सादरीकरण...डोळे निवले अगदी.
मला सफरचंद आवडत नाही,पण हे नक्की आवडेल.
अप्रतिम. सुंदर.
व्वा.....! :)
उठा उठा दिवाळी अाली
सानिकाची पाकृ आली!!
पहिला फोटो पाहून डोळेच बाहेर आले. एवढा चिकना मी लग्नातही दिसलो नव्हतो...
अरे काय हे? :-)
मिठाई मस्तच
आवडली....
पहिला आणि शेवटचा फोटो कहर आहेत. :)
हेच म्हणते, नक्की कशाकशाला दाद द्यायची हे ही कळत नाही सानिकेची पाकृ आल्यावर.
एक खोका { या अॅपल मिठाईचाच बरंका... ;) } इकडे माझ्याकडे पाठवुन द्या बरे ! :)
{मॅंगो काजुकतली प्रेमी} ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rajan gets his way on RBI's restructuring plan
हेच प्रमाण मी काजूच्या फुलांसाठी वापरते.
हे काय आणिक?
इथे अनन्या ताईच्या काजुच्या फुलांची पाकृ आहे.
एक नंबर मिठाई आणि फोटो तर क्या कहने..
दिवाळीच्या अॅटमबाँबसारखे दिसलेत ते ;)
असल्या हुच्चभ्रू ऐटमची पाकृ इतकी सोपी !
फार्फार धन्यवाद सानिकाताई.
अप्रतिम!!!
मस्तच आणि तुझ्या सादरिकरणाच्या कौशल्यामुळे कोणतिहि रेसेपी सोपीच वाटते.
नक्की करुन पाहिन.आत्तापर्यंत आयतीच दुकानातली खाल्ली होती.
फोटो...जाउदे...तु छळ चालुच ठेवणार आमचा. :'(
छान रेसिपी.
___/\___
पाकृमधली सचिन तेंडुलकर.
कन्सिस्ट्न्टली अबोव्ह द क्लास.
हि दुकानातच पाहिली होती.. घरीही करता येते.. ते ही एवढ्या चार ओळींच्या कृतीत.. ग्रेट!
पहिला फोटो काय कातील !!
आणि हे घरी करता येत हि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
कमाल आहे तुमची