Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मित्रा

त — तुषार जोशी, गुरुवार, 10/23/2014 - 09:46
मित्रा मी पहिला श्वास घेतला तेच महानगरात आणि.. तू पहिला श्वास घेतलास गावात... शेतात. मग मी कधीतरी शब्दांच्या प्रेमात पडलो तसाच तू ही या शब्दांच्या प्रेमात पडलास आता मी माझ्या शब्दांमधे महानगर ओततोय आणि तू गाव ओढे आणि शेते. मी कधीतरी एखादी रानाची, पानाची शेताची कविता लिहेनही पण तिच्यात तितका दम नसेल तो उत्कटपणा नसेल जो तुझ्या कवितेत सापडेल तू ही कधी शहर लिहिलेस तर तितके खोल उतरणार नाही. पण मला तुझ्या रानातल्या कविता हव्या आहेत मला कदाचित कधीच न मिळणारे काही अनुभव मी तुझ्या शब्दांच्या सफारीत अनुभवेन तुलाही महानगराची सहल माझे शब्द घडवतीलच मी लिहित राहतो माझे महानगर आणि त्यातले गुंते कवितांमधे एक सांगू .. आपली विश्वे वेगळी असली ना तरीही आपल्यातले विकार तेच आहेत रे तुला संघर्ष आहेत.. ताण आहेत तसेच मला वेगळ्या पद्धतीने .. पण आहेतच रे आपले भाव वेगळ्या शब्दात उतरतील पण उत्कटता तीच असेल तू गावराणी शब्द घेऊन ये जे मला माहित नसतील.. पण मी समजून घेईल मी महानगरी शब्द आणतो.. पण आपल्यात जो जिंवंतपणाचा अंश आहे ना तो अजिबात वेगळा नाही.. तोच आहे जो उत्कटतेची परिसीमा गाठायला लावतो. तू लिही गावचे अनुभव मला तुझ्या शब्दात बसून ते जगता येतील मी कधीच गावात जाऊन राहणार नाही मी कधीच शेतातले चांदण्यात न्हाणार नाही जसा देह मिळतो तसेच परिस्थिती पण आंदण मिळते आपल्याला मी माझे महानगर स्वीकारले आहे पण मला तुझे शेत तुझे रान पण हवे आहे तुझ्या शब्दातून.. तुझ्या अनुभवातून.. विकसित होण्यासाठी मी महानगराचा इतिहास लिहितो माझ्या अनुभवातून.. मित्रा.. तू तुझ्या गावच्या शब्दातच लिहिणे थांबवू नकोस.. . तुष्की नागपुरी नागपूर, १० ऑक्टोबर २०१४, २२:३०

प्रतिक्रिया द्या
1865 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पाषाणभेद गुरुवार, 10/23/2014 - 10:37 नवीन
सालं आज दिवाळी सण असूनही कामाला जुंपलेलो असल्याने, अन ठिक हाय गावाकल्ड्या भाशेमदीच लिवीन म्हंतो पुन्यांदा, क्काय?
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 10/24/2014 - 05:46 नवीन
मी या लिखाणाला काव्य न म्हणता कदाचित मुक्तक म्हणेन, पण भावना ज्या सहजतेने मांडल्या आहेत ती सहजता खूप आवडली. जसा देह मिळतो तसेच परिस्थिती पण आंदण मिळते आपल्याला हे खासच!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 10/24/2014 - 06:39 नवीन
भावना आवडल्या.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 10/24/2014 - 06:55 नवीन
अब मै राशन की कतारो मे खडा नजर आता हु अपने खेतो से बिछडने की सजा पाता हु.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/24/2014 - 12:53 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/24/2014 - 13:43 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 10/25/2014 - 16:21 नवीन
भावना पोचल्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा