तसे देव मोकळेच असतात..!!
सध्या देव एकटेच असतात
काल सहज त्याची
आठवण आली तिला
आणि ती अशी येथे
दूर ...दूरदेशी
आणले तिने जुजबी देव
नाही असे नाही
लंगडा बाळकृष्ण एकटाच घरी
सोबत विठ्ठल रुखमाई
आणि शंकराची पिंड
त्याच्या समोर नंदी
तेवढीच एकमेकाची एकमेकाला सोबत
नाही असे नाही
रात्रीच्या अंधारात
त्याना दिसणार मात्र काहीच नाही
कालच
कशी कुणास ठाऊक
आभाळातील ढग बघून
तीही उदास ,खिन्न
आणि आली आठवण देवाची
दिसून गेले उदास देवघर
किती दिवस प्रसाद सोडा
किती महिन्यात त्याना कोणी
आंघोळ देखील घातली नाही
कसे करमत असेन त्यांना..?
रात्रीचा गच्च अंधार
काय वाटत असेन त्यांना...?
सगळ्यांची हालहवाल विचारीत असते ती
देव तेवढे राहून जातात
करमत नसेन त्यांना
तसे ती दोघे घरी
एकटीच असतात
सुख दुख्ख शेयर करायला
तसे देव मोकळेच असतात ....
प्रकाश
💬 प्रतिसाद
(7)
ख
खेडूत
Tue, 10/28/2014 - 16:09
नवीन
सुंदर!
- Log in or register to post comments
अ
अमित खोजे
Tue, 10/28/2014 - 19:24
नवीन
छान आहे. आवडली
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Tue, 10/28/2014 - 21:16
नवीन
तसे Boss आणि देव मोकळेच असतात..!!
एक year end ला आणि दुसरे life end ला apraisal घ्यायला मोकळेच असतात..!!
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 11/04/2014 - 14:38
नवीन
कविता आवडली. मानसिकता अचूक व्यक्त झालीये.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 11/05/2014 - 06:44
नवीन
+१
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/04/2014 - 15:46
नवीन
आवडली
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 11/05/2014 - 06:49
नवीन
मस्त
- Log in or register to post comments