Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कालातीत घोडदौड

च
चलत मुसाफिर
Sat, 11/01/2014 - 20:28
💬 23
हेच वर्णन माझ्या ब्लॉगवर इंग्रजीमध्ये येथे वाचता येईल. ***** जम्मू भागातील पीरपांजाल पर्वतरांगात फिरताना जर्जर रस्त्यांमुळे हाडे खिळखिळी होत असली, तरी चकित करणारे अनुभवही येतात. Map ***** यापूर्वी या भागाबद्दल लिहिलेले फुटकळ काही: आडवाटेवरील रियासी चिनाब रेल्वे पूल **** या भागात घोडा गली (मराठीत घोडखिंड म्हणायला हरकत नाही) हे नाव अनेकदा ऐकण्यास मिळते. कारण ही एखादी विशिष्ट गल्ली (खिंड) नसून, एक सामान्य नामच आहे. दगडाचे प्राचीन घोडे आणि घोडेस्वार हे या खिंडींमधून कुण्याकाळी उभे करण्यात आले होते. पूर्वी या सर्व खिंडींमधून पायी अथवा घोड्यांवरून जाण्याचे मार्ग होते. त्यापैकी काही खिंडी गाडीरस्त्यांनी जोडल्या गेल्या आहेत. पण अनेक खिंडी दुर्गम भागात गावोगाव पसरलेल्या आहेत. तिथे पोचणे दुरापास्त असून, तासनतास चालल्याशिवाय गत्यंतर नाही. यातील बहुतेक घोडे हे दुर्लक्षित आणि भग्न अवस्थेत आहेत. कधीकधी अचानक एखाद्या गावातील पाणवठ्यावर एखादा 'घोडा' कपडे धुण्यासाठी उपयोगात आणलेलाही दिसतो. शिवाय, हा भूप्रदेश आता जवळजवळ संपूर्णपणे मुस्लिम झालेला आहे. त्यामुळे बहुधा या 'हिंदू' शिल्पांचा स्तर खालचा मानला जात असावा. हे शापित घोडे आणि स्वार अनंतकाळपासून कुणाची वाट पाहत आहेत, हे कोडे आहे. मला तरी असे वाटले की या केवळ दिशादर्शक खुणा असाव्यात. मी पाहिलेल्या दोन घोडा गल्ल्या: ***** १. जमसलान गावाजवळ माहोर - गुल रस्त्यावर असलेल्या या लहानशा गावाजवळ ही खिंड आहे. ही पाहाण्यासाठी सुमारे पाऊण तास चालत (चढत) जावे लागते. Ghoda Gali near Jamsalan 1 Ghoda Gali near Jamsalan 2 Ghoda Gali near Jamsalan 3 Ghoda Gali near Jamsalan 4 ***** २. गुल शहराजवळ ही गल्ली गुल - रामबन रस्त्याला लागूनच आहे. येथील घोडे थोड्या मोठ्या आकाराचे आहेत. पहिल्या छायाचित्रात ठेवलेल्या पेनची मदत घेऊन आकाराचा अंदाज लावता येईल. Ghoda Gali near Gul 1 Ghoda Gali near Gul 2 Ghoda Gali near Gul 4 Ghoda Gali near Gul 5 जलकुंड Ghoda Gali near Gul 3 ***** कसे पोचावे:- जम्मू - श्रीनगर हमरस्त्याने रामबनपर्यंत जावे. तिथून गुलच्या दिशेला डावीकडे वळावे. रामबन - गुल अंतर सुमारे ६० कि.मी. जवळ इतर पाहण्याजोगे:- वर दिलेले दुवे वाचावेत.

प्रतिक्रिया द्या
13020 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ख
खटपट्या Sun, 11/02/2014 - 02:32 नवीन
फोटो फार धुरकट आले आहेत. घोड्यांबद्द्ल अजुन माहीती मिळाली असती तर बरे झाले असते. वल्लींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/02/2014 - 13:35 नवीन
मलाही याबाबतीत काहीच माहित नाहीपण साधारण १० व्या शतकात हे घोडे कोरले गेले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
च
चलत मुसाफिर Mon, 11/03/2014 - 12:11 नवीन
पावसाची संततधार आणि दाट धुके अशा वातावरणात चिखल तुडवीत पर्वत चढून जाऊन काढलेले फोटो असल्यामुळे धूसर येणे स्वाभाविक आहे. जमसलान गावाचे फोटो तसे आहेत. पण गुल शहरानजिकचे फोटो स्पष्ट दिसत आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मुक्त विहारि Sun, 11/02/2014 - 13:22 नवीन
आमचा गणेशा झाला.....
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 11/03/2014 - 12:12 नवीन
समजलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
क
कपिलमुनी Mon, 11/03/2014 - 12:30 नवीन
त्यांना फोटो दिसत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
प
प्रचेतस Sun, 11/02/2014 - 13:34 नवीन
अद्भूत आहे ठिकाण तितकेच गूढही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 11/02/2014 - 19:32 नवीन
एका वेगळ्याच जगात गेल्यागत वाटले. घोडगळही एकदम मस्ताड आहेत. लैच आवडले.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 11/02/2014 - 19:35 नवीन
गूढ वाटायचे अजूनेक कारण म्हणजे ते 'भारतीय' असे वाटत नाही. (*) युरोपियन गूढ स्टाईलगत वाटते. अंमळ ब्रेव्हहार्ट पिच्चरची आठवण झाली फोटो पाहून. (*)म्हणजे काय अन कसे, ते तेवढे विचारू नका. वाटले तेवढे सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
थ
थॉर माणूस Mon, 11/03/2014 - 12:41 नवीन
घोड्यावर ट्रीपल सीट... नक्कीच भारतीय आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चलत मुसाफिर Mon, 11/03/2014 - 13:20 नवीन
*lol* *lol* *lol* आपला मुद्दा विचारार्ह आहे. पण ही शिल्पे ग्रीक शैलीतली असल्यासारखी वाटतात का? जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
आ
आदूबाळ Sun, 11/02/2014 - 19:40 नवीन
इंट्रेस्टिंग!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 11/03/2014 - 08:28 नवीन
हे असे काही भारतात आहे हेच माहिती नव्हते. पुरातत्व खाते नक्कीच झोपा काढते आहे आणि पर्यावरण खातेही. युरोपात आत्तापावेतो केवळ याच्यासाठी एक टुर आयोजित केली गेली असती.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 11/03/2014 - 12:17 नवीन
या सर्व जागा मुद्दाम पहाण्यायोग्य आहेत यात शंकाच नाही. पण खराब रस्ते, लांब अंतरे, कठीण पर्वतीय भाग, दुष्कर पायी चढाई आणि सोयीसुविधांचा संपूर्ण अभाव यामुळे मौजमजा करायला आलेला पर्यटक इकडे वळणे जरा मुश्किलच आहे. कदाचित काश्मीर रेल्वे सुरू झाल्यावर चित्र बदलेल (या प्रस्तावित रेल्वेमार्गावरील धाडम रेल्वे स्टेशन हे गुल शहराच्या जवळ आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कवितानागेश Tue, 11/04/2014 - 04:00 नवीन
हे असे काही भारतात आहे हेच माहिती नव्हते.>> +१ एकदम वेगळा प्रकार पहायला मिळाला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/04/2014 - 04:22 नवीन
वेगळाच प्रकार सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 11/06/2014 - 23:36 नवीन
खरच असल काही आहे भारतात हेच माहीत नव्हत. त्या जलकुंभातला एक अजून पाणी सांडतो आहे. किती सुंदर!!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 11/07/2014 - 03:40 नवीन
आयला , एकदम नविन. तुमची पण कमाल आहे , कसे शोधुन काढलेत हे ठिकाण ?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/10/2014 - 05:32 नवीन
अजुन माहिती वाचायला आवडली असती. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/07/2020 - 13:27 नवीन
कलम 370 गेले आणि काश्मीर केंद्रशासित झाले. आता त्यालाही सहाआठ महिने होऊ घातले. निमित्ताने धागा पुन्हा वर काढावा म्हणतो.. :-)
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 04/07/2020 - 17:54 नवीन
आणि इंटरेस्टिंग पण. बघायला हवे. जम्मू ते श्रीनगर प्रवास कधी झाला नाही.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/07/2020 - 19:50 नवीन
जम्मू- कटडा- रियासी- माहोर- गुल- उधमपूर असा रस्ता घ्यावा लागेल. बराच जास्त लांब आणि कठीण रस्ता आहे. पर्यटकांना राहण्यासाठी या भागात (कटडा वगळता इतरत्र) काहीच सोयी नाहीत. जम्मू- उधमपूर जो सरळ रस्ता आहे तो मात्र आता संपूर्ण चौपदरी झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार
म
मनो Tue, 04/07/2020 - 20:33 नवीन
माहीती इथे आहे https://scfh.ru/en/papers/riders-lost-in-the-himalayas/ Undoubtedly, the monuments date from the pre-Muslim period of the region’s history though they are neither Buddhist nor Hindu. We are facing an entirely original cultural layer supposedly belonging to a “dark” period of Indian history connected with the Hephthalite conquest and rule (5th to 7th cc.). This ethnicity was as enigmatic as it was powerful and left a detectable trace in the history of both Central Asia and India. पुढे In order to explain why we think that the stone statues of horsemen could be attributed to the Hephthalite culture, let us turn to the statues themselves. The first thing that catches your eye at once is that all the riders have the same face. To convey the image of a warrior, the unknown masters created a character that embodies the warrior host in their entirety by personifying the most typical and marked features. The flatly cut napes of all the men figurines may reflect a typical anthropological trait of the population – ​the so-called ring, or fronto-occipital deformation. This type of artificial deformation was characteristic of the Central Asian peoples in the early 1st c. This regional tradition was domesticated by the nomads known by the collective name of the Huns, who then spread it around Europe and India.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा