Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गजरा

स — सुर्या गार्डी, Sun, 11/02/2014 - 18:12
नाजूक रेशीमगाठीनी फुला फुलां ना गुंफिले होते तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते ।। ठाऊक त्यांना आयुष्य त्यांचे क्षण भंगूर होते परी केसांवरी तुझ्या झुलायचे भाग्य थोर होते ।। भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले तुझ्यासवे फिरायचे ते दिवस फुलांच्या गजर्‍याचे होते । नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची गजर्‍यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी सौदर्य तुझं खूलवायची । नशिबाला ही ते उशीरा कळले फुल होउनी फुलायचे होते गजर्‍यात गुंफूनी झुलायचे होते आयूष्यच माझे गजर्‍यात गुंफायचे होते ।। »» सुर्या ««

प्रतिक्रिया द्या
1954 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ज
जेपी Sun, 11/02/2014 - 18:33 नवीन
आवडल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/03/2014 - 04:09 नवीन
नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची गजर्‍यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी सौदर्य तुझं खूलवायची । हं खरंय.. नशीब लागतं गजरा माळायला, तिच्या बटा सावरायला. -दिलीप बिरुटे (नशीबवान)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/03/2014 - 08:54 नवीन
भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते या ओळी खुपच छान .. एक्दम मस्त
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Mon, 11/03/2014 - 16:28 नवीन
छान. लिहीत रहा. चांगले लिहताय.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 11/04/2014 - 13:47 नवीन
कविता आवडली, भौंरा (भ्रमर) झाले असता, तर एखादे चुंबन मिळण्याची शक्यता होती, फक्त मध्ये कुणी दुष्यंत टपकला नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सुर्या गार्डी Fri, 11/07/2014 - 18:39 नवीन
हो ना।। नाहितर "भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललहाटावर लिहीलेले" अशी गत होयची।।।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 11/05/2014 - 14:00 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Fri, 11/07/2014 - 14:21 नवीन
छान, आवडली
  • Log in or register to post comments
स
सुर्या गार्डी Fri, 11/07/2014 - 18:20 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनपुर्वक आभार ।।
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा