Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चांदणी

स — सुर्या गार्डी, Tue, 11/04/2014 - 16:37
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... बघेल सारं जग आपल्याकडे याची तमा कशाला बाळगायची... चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रोज रात्री चांदणी चोरुन चांदोबाला पहायची... चंदाराजाचं लक्ष्य नाही म्हणून सारखीच रुसायची... तरीही चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रुसता रुसता एखादी मधूनच चमकायची अन् चांदोबाचं लक्ष्य स्वतःकडे वेधायची... कारण चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...

प्रतिक्रिया द्या
3605 वाचन

💬 प्रतिसाद (12)
र
रामदास Wed, 11/05/2014 - 07:04 नवीन
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... नक्की कोण कोणाच्या मिठीत असणार आहे त्याचा निर्णय घ्या बॉ.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 11/05/2014 - 07:08 नवीन
इथे चंद्र आणि चंद्रकोर म्हणजे एकच की वेगवेगळे ;)...चांदणीचा गोंधळ उडायला नको :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विवेकपटाईत Wed, 11/05/2014 - 15:54 नवीन
काही तरी गोंधळ आहे.... चंद्रकोरीच्या मिठीत चांदणी जाणार. - याला काय म्हणावे ???? चंद्रमाच्या मिठीत चांदणी जाणार - कदाचित हेच म्हणायचं असेल
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Wed, 11/05/2014 - 18:56 नवीन
गोंधळ नाही हो विवेकजी, 'ती' चंद्रकोर, 'ती' चांदणी आणि तरीही त्यांची मिठी.....हे कायद्यालाही मान्य आहे हल्ली.... कवी पुरोगामी दिसतोय. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
स
स्वप्नज Wed, 11/05/2014 - 19:09 नवीन
१-२ तांत्रिक अडचणी सोडल्या तर कविता तशी मस्त आहे...भाव चांगला आहे कवितेतला. लुकलुकणारी चांदणी चंद्राचे लक्ष्य वेधण्यासाठी लुकलुकते ही कल्पना छान. अजून थोडीशी रंगवता आली असती..... छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
स
सुर्या गार्डी Wed, 11/05/2014 - 19:39 नवीन
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे. चंद्र हाच नायक आहे व चांदणी नायिका. पूर्ण चंद्रावर चांदणीचे प्रेम आहेच, पण तिथे मिलनाची अभिलाषा नाही. हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 11/06/2014 - 19:12 नवीन
पण हाच चंद्र जेव्हा अपूर्ण असतो चंद्कोरीच्या स्वरुपात,तेव्हा मात्र त्याची अपूर्णता दूर करण्यासाठी चांदणी त्याच्या मिठीत जातेय,असे सुचवायचे आहे. हा अर्थ अभिप्रेत असेल तर interesting germ आहे! (फक्त तो तसा कवितेत मात्र उतरला नाहीये...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुर्या गार्डी
प
प्रचेतस गुरुवार, 11/06/2014 - 04:17 नवीन
चांदणी म्हणजे रोहिणी का?
  • Log in or register to post comments
स
सुर्या गार्डी गुरुवार, 11/06/2014 - 11:38 नवीन
चंद्राचे नशीब अंमळ चांगले आहे.. खुप चांदण्या असतात.. रोहिणी तो सिर्फ झांकी है ;
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 11/06/2014 - 12:16 नवीन
नाही ओ. चांदण्या कितीही असल्या तरी बायको एकच. ती मात्र रोहिणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुर्या गार्डी
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/06/2014 - 18:25 नवीन
@चांदण्या कितीही असल्या तरी बायको एकच. >> =))))) सूचक आगोबा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पाषाणभेद Fri, 11/07/2014 - 07:32 नवीन
मिपाकरांना काहीही द्या ते त्या काहीहीचे काहीही करुन दाखवतील. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा