Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

( ओळखलत का साहेब मला?)

अ — अमोल केळकर, Fri, 11/07/2014 - 06:28
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी, कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’. कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली, स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली . पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले, निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला ‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला. आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा, पक्षात परत घेउन तुम्ही, फक्‍त लढ म्हणा (लढाऊ ) सैनीक ७/११/१४

प्रतिक्रिया द्या
3282 वाचन

💬 प्रतिसाद (13)
म
मराठी_माणूस Fri, 11/07/2014 - 06:33 नवीन
फुटीरतीचे (फीतुरतीचे?) उदातीकरण
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/07/2014 - 07:17 नवीन
लाचारीचे समर्थन. याला शुद्ध मराठीत म्हणायचे झाले तर :- ढुं**** चार लाथा हाणा पण आपला म्हणा.........
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 11/07/2014 - 07:26 नवीन
वरील दोन्ही प्रतिसाद योग्य आहेत.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 11/07/2014 - 08:34 नवीन
झक्कास !
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 11/07/2014 - 09:34 नवीन
आभार ..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 11/07/2014 - 10:30 नवीन
सध्याच्या स्थितीवर एकदम योग्य....
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 11/07/2014 - 15:30 नवीन
कविता जमली खरी पण तेवढी कुसुमाग्रजांची कणा आठवण ठेवा राव!
  • Log in or register to post comments
द
दिनेश सायगल Fri, 11/07/2014 - 18:35 नवीन
उठता बसता कुणालाही श्रेय न देता कॉपी पेस्ट करणार्‍यांनी श्रेय देण्याची आठवण करावी हे पाहून डोळे पानावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
व
विवेकपटाईत Fri, 11/07/2014 - 15:38 नवीन
कोकणी आंब्याची परिस्थिती सध्या लाजिरवाणी आहे, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले, आता कुर्सी ही गेली. परतीची वाट धरतील का?
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Fri, 11/07/2014 - 21:00 नवीन
आंबा संपलाच आता जवळपास विवेकजी. पण १ छोटी कैरी आहे की त्याच आंब्याची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ध
धर्मराजमुटके Fri, 11/07/2014 - 15:49 नवीन
असे कार्यकर्ते आहे म्हणूनच नेते आहेत. यात कोणत्याही प्रकारे लाचारीचे समर्थन नाहिये. "अहो महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती." माणसाने कसे लवचिक असले पाहिजे. कार्यकर्त्याने चार दिवस वाघाचे जीवन जगण्यापेक्षा हजार वर्षे शेळीचे जीवन जगले पाहिजे. शेवटी चार दिवसात काय रिझल्ट मिळणार हो ? शेवटी क्वांटिटी महत्त्वाची. क्वालीटीच काय घेऊन बसलात भाऊ ? मोडेन पण वाकणार नाही इ. इ. सुविचार फळ्यावर आणि पुस्तकात लिहायला चांगले असतात.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 11/08/2014 - 10:32 नवीन
अतिशय कण/णा खर कविता कणा पेक्षा हि काकण भर सरस कविता !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/10/2014 - 10:24 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा