Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्यालीफोर्नियाचा कोकण....

व
विजुभाऊ
Fri, 11/07/2014 - 07:37
🗣 53 प्रतिसाद
आपले राजकारणी कोकणचे क्यालिफोर्निया करायच्या बर्‍याच बाता करत असतात. कोकण खरेच निसर्गसुंदर आहे. निसर्गाचा इतका वरदहस्त महाराष्ट्रात इतर कोणत्याच भागास मिळालेला नाहिय्ये. लाम्बच लांब समुद्रकिनारा. त्यांची जणु सोबत करत असल्या सारख्या लागुनच असलेल्या डोंगर रांगा. ती तांबडीलाल माती, वार्‍यावर डुलणारी नारळी पोफळीची झाडे. या सार्‍याला दृष्ट लागु नये की काय म्हणून असणारे गरीबीचे देणे, लोकाना असलेले रीकामपण, बेकारी , अशिक्षण , त्यातून निपजलेला तिरकस स्वभाव हे सगळे कोकणातच आढळतात. आपले राजकीय नेते कोकणचा क्यालिफोर्निया करण्याच्या घोषणा करतात. मात्र त्यासाठी आवश्यक सोयी सुवीधांबद्दल काही करणे सोडा कोणी त्याबद्दल बोलतसुद्धा नाही. समजा उद्या एखाद्या युरोपातील किंवा दुबईतील किंवा अमेरीकेतील राजकीय नेत्याने युरोपचा किंवा दुबईचा किंवा क्यालिफोर्नियाचा कोकण करायची घोषणा केली तर त्यासाठी त्या प्रान्तात कोकणची सारी वैषिष्ठ्ये आणण्यासाठी काय करावे लागेल? उदा: १)क्यालिफोर्निया च्या "करेक्षनल ट्रेनिंग फ्यासिलीटीत खास रत्नागिरीतील मधल्या आळीतील तज्ञांचे तिरकस बोलण्याचे क्लासेस चालवावे लागतील" २) क्यालिफोर्नियातील रस्त्याम्वर स्पीडब्रेकर नामक छोट्या टेकड्या उभ्या कराव्या लागतील ( आणि त्यावरील मार्किंग पुसून टाकावे लागेल) आणखी काही सूचना असतील तर सांगा ना

प्रतिक्रिया द्या
11730 वाचन

💬 प्रतिसाद (53)
स
सौंदाळा Fri, 11/07/2014 - 07:43 नवीन
शिवास रिगल, ग्लेन्फिडीच जॅक डॅनियल्स वगैरे बंद करुन ताडी, माडी, फेणीची भरपुर उघडावी लागतील ओपेरा शो ऐवजी दशावतारी नाटके ;) बाकी आठवेल तसे टंकतो कोकणभुषण आणि कॅलिफोर्निया किंग पिवळा डांबिस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 11/07/2014 - 18:55 नवीन
शिरां पडो त्या विजुभाउचें तोंडार! अवदसा आठवली मेल्याक!!!!! :( माझे बाकीचे सजेशन नंतर, राग थंड झाल्यावर दितंय.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
व
विजुभाऊ Sat, 11/08/2014 - 05:31 नवीन
शिरां पडो त्या विजुभाउचें तोंडार! डाम्बीसकाका आम्हा पच्छीम म्हाराष्ट्रातल्या माणसांक "शिरा" असे म्हंटले की रव्याचा सांजा आठवतो. तोसुद्धा मस्त सांगलीच्या तासगावची "बेदाणे मनुका "घातलेले. त्या अर्थाने "शिरा" इज वेलकम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sun, 11/09/2014 - 05:32 नवीन
ओके, व्हॉटेव्हर दॅट मेक्स यू फील सुपिरियर!!!! आता आमचे सजेशन.... १. कॅलिफोर्नियातल्या सगळ्या शेकडो एकर शेतांचे तुकडे पाडून माणशी अर्धा एकर असाच मॅक्सिमम जमिनीचा तुकडा दिला पाहिजे. २. बदाम, पिस्ते याचे मळे तोडून तिथे रातांबे, जगमं, अणि आंबाड्यांच्या झाडांचीच लागवड करावी... ३. द्राक्षं आणि स्ट्रॉबेरीजची शेतं बंद करून तिथे नाचणी, वरी आणि नागलीसारख्या कॅश क्रॉपची जोपासना करावी. ४. बाहेरुन आलेल्या टूरिस्टशी आदराने वा फेअरली न वागता त्याचे शक्य तितके पैसे पिळवटून कसे घेता येतील याच्याच सदैव योजना आखाव्यात. ५. ... ६. ... ७. ... ८. ... ९. ... १०. बाहेरच्याकडून शक्य तितकं सगळं पिळून घ्यावं पण त्याबदल्यात जर त्याने आंबे मागितल्यास, "औंदू मोहर जल्लो, काय्येक आंबो गावूक नाय!!!" हे वारंवार बजावण्यास विसरू नये!!!!_ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विकास Mon, 11/10/2014 - 03:16 नवीन
ते सगळे कराल हो, पण त्या शिंच्या पाण्याच्या दुर्भिक्षाचे काय करायचे? ;) बाकी कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची गोष्ट माझ्या आठवणीप्रमाणे ७७ सालातले रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी केली होती. आता कोणी करत असेल तर माहित तरी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
नितिन थत्ते Mon, 11/10/2014 - 13:10 नवीन
शक्य आहे. मला वाटत होते उद्योगपती बा म गोगटे यांनी ती कल्पना मांडली होती. आमचे एक बंधू म्हणतात, "फेणीला परवानगी द्या, कोकणाचं काय पायजे ते करता येईल".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पिवळा डांबिस Mon, 11/10/2014 - 21:23 नवीन
पण त्या शिंच्या पाण्याच्या दुर्भिक्षाचे काय करायचे?
हां, तां बाकी खरां! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पाषाणभेद Fri, 11/07/2014 - 07:44 नवीन
कोकणीपणा अस्सल व्हायला तसे जीन्स लागतील. म्हणजेच कोकणाचे बीज रुजवावे लागेल.
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Fri, 11/07/2014 - 07:50 नवीन
म्हणजे कोकणात फॉरीनची पाटलीण आणायची का??? आपोआप बिया रुजतील क्यालिफोर्नियात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ग
गवि Fri, 11/07/2014 - 07:45 नवीन
रोचक आहे कल्पना. मुळात पलीकडल्या आवारातल्या शेजा-याच्या आंब्याची खांदी आपल्या परसात आली तर त्यावरच्या कै-या चुपचाप उतरवून नंतर वरुन त्या खांदीची तक्रार नोंदवणे शिकले पाहिजे. उदा. आमच्या कौलाला तुमची खांदी घासते. तुमच्या कै-या पिकून आमच्या कौलांवर पडतात त्याचा आवाज होतो. तुमच्या खांदीवरुन काल घरात जनावर आले. आमच्या घरी पोरेबाळे आहेत. ( शेजा-याला नसतील तर या वाक्यावर जोर) उद्या तुमची खांदी आम्ही उपभोगली असा आरोप आमच्यावर नको. तस्मात ती खांदी तोडा.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Sat, 11/08/2014 - 10:19 नवीन
"शेजा-याला नसतील तर या वाक्यावर जोर" >>> हे लैच भारी !!! :)) बाकी, @ आंब्याची खांदी >> आमच्याकडे फांदी किंवा ढांपी म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ख
खटपट्या Fri, 11/07/2014 - 07:57 नवीन
सगळे शक्य आहे पण आमच्या कोकणात पडणारा धोधो पाउस कुठुन आणणार ? "प्रत्येक घरातुन एक केस कोर्टात" या धर्तीवर तिथे तेवढी न्यायालये लागतील..तेवढीच एकमेकान्बरोबर भांडणारी माणसे कोकणातुन आयात करावी लागतील. कोकणात चालणारी यष्टी तिकडे न्यावी लागेल. पानाची सुपारीची दुकानं. पान खाउन पचा पचा थुकणारी माणसं येवडा सगला पायजे. तवा कायता कोकन दिसुक लागल !!
  • Log in or register to post comments
स
साती Sat, 11/08/2014 - 07:26 नवीन
या वाक्याचा निषेध! कोकणी माणूस पान खाऊन पचापचा थुंकत नाही इतरांसारखा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sat, 11/08/2014 - 09:00 नवीन
भावना दुखावल्याबद्द्ल क्षमस्व पण मी पाहीलेत थुंकताना. एस टी स्टॅन्ड तर रंगलेले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
व
विजुभाऊ Sat, 11/08/2014 - 09:37 नवीन
पण मी पाहीलेत थुंकताना. एस टी स्टॅन्ड तर रंगलेले असतात. ते होय.विसरलात का कोकणच्या मातीचा रंगच लाल असतो. अवांतरः ते थुंकणारे थुंकायच्या वेळेपुरते भय्या रुपात असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ब
बॅटमॅन Sat, 11/08/2014 - 15:18 नवीन
अवांतरः ते थुंकणारे थुंकायच्या वेळेपुरते भय्या रुपात असतात.
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 11/07/2014 - 10:42 नवीन
उत्तम कल्पना रे विजू. हॉटेलांमध्ये 'थंडगार कोकम सरबत' ठेवावे लागेल. तिकडच्या स्त्रियांनि करवंदाचा जॅम्,लोणचे,सुपारी बनवायला शिकले पहिजे. आंबे विकणार्यांनी त्यांच्या व्यवसायचे नाव 'निक्सन बंधू आंबेवाले'वगैरे ठेवायला शिकले पाहिजे.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 11/07/2014 - 12:47 नवीन
तेथिल सर्व फॅक्ट-या, प्रकल्प हाकलून लावले पाहीजेत.
  • Log in or register to post comments
उ
उपास Fri, 11/07/2014 - 14:46 नवीन
अहो विजूभाऊ, आहात कुठे? दोन तीन महाराष्ट्र मंडळ वा तत्सम मराठीभिमुख संस्था काढून आणि आपापसात वाद घालात त्या सॅन ओझे वाल्यांनी मधल्या आळीचं नाव सार्थ केलय म्हणॅ.. खरा काय ता तिथलीच मंडली सांगतिल.. ;)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 11/07/2014 - 16:12 नवीन
त्या गावाचं नाव सॅन ओझे नसून सॅन जोसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/07/2014 - 18:02 नवीन
त्याचा उच्चार सॅन होजे (स्पॅनिशमधील सेंट जोसेफ) आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
स
सतिश गावडे Fri, 11/07/2014 - 18:58 नवीन
जरा कुठे गंमत करायची म्हटलं तर काका लोकांना पाहवत नाही. :( रच्याकने, श्यान होज्येला लई येळा गेल्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/08/2014 - 07:42 नवीन
आस्सं हाय व्हय ? मंग "सॅन ओझे" बर्‍यापैकी वजन्दार इनोद व्हता की ?! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ध
धर्मराजमुटके Fri, 11/07/2014 - 15:35 नवीन
लिंबू मिरची मिळतात काय हो क्यालिफोर्नियात ? नाही म्हणजे करणी करायला अडचण येऊ नये, झालेच तर मुंजे, हडळ, खवीस, झोटींग इ. इ. जमाती एक्स्पोर्ट कराव्या लागतील.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 11/07/2014 - 16:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
सतिश गावडे Fri, 11/07/2014 - 16:13 नवीन
क्यालिफोर्नियाची संस्कृती इतकीही प्रगत नाही. अजूनही ते उत्क्रांतीच्या मंदिर याच पायरीवर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
प्रदीप Fri, 11/07/2014 - 18:21 नवीन
नुकत्याच एका सेल-बाय-डेट होऊन गेलेल्या कोकणी नेत्याने म्हटल्यानुसार, प्रथम गुजरात्यांना बडवून काढावे लागेल. आता कोकणचा कॅलिफोर्निया करतांना काय अथवा कॅलिफोर्नियाचा कोकण करतांना काय, गुजरात्यांचा त्यात संबंध काय, असे विचारायचे नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 11/08/2014 - 05:28 नवीन
तुमका काय म्हनायचा तां म्हना वो. पण कुठेही जा गुजराती येतीलच तेथे. निदान एखादे पटेल मोटेल तरी असेल. कोकणात पटेलमोटेल ला धर्मा भंडार्‍याची खानावळ म्हणतात इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अर्धवटराव Fri, 11/07/2014 - 18:58 नवीन
पण धर्मा मांडवकराची म्हैस कुठुन आणायची :(
  • Log in or register to post comments
स
साती Sat, 11/08/2014 - 07:30 नवीन
बफेलोमधून मागवा. मात्रं तिला आयुष्यभरात मिळून दहा दहा शेर दूधदेण्यासाठी वेगळ्या प्रकारची इंजेक्शने द्यावी लागतील. आणि तिचं चांदी नाव कुणाला नाय कळलं तर मूनहेड ठेवावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
भ
भिंगरी Sat, 11/08/2014 - 09:16 नवीन
आणि मग .... सॅमचे श्याम मूरचे मोरू अ‍ॅनीचे अनू मायकलचे मछिंन्द्र इ.इ. नावे बदलावी लागतील मग म्हणा..... यावा,कॅलिफोर्निया आपलाच आसा.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Sat, 11/08/2014 - 10:10 नवीन
किनार्‍यावर, नवसाला पावणारे, कुठल्याशा उत्खननात सापडलेले गंपती/येशू बसवावे लागतील. बिकनी-बेब्जना पोकल बांबूचे फटके दिले जातील. पुरषांनी फक्त चट्टेरी-पट्टेरी चड्ड्या आणी 'प्यांटी' (हो, माहीत्याय माका याक्रण) घालावे आणी बायांनी फक्त साडी/च्युडीडार!!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 11/08/2014 - 10:32 नवीन
चट्टेरी-पट्टेरी चड्ड्या घालून गडग्यावर एक पाय ठेवून मशेरी लावता आली पाहिजे.रशिया-जपानच्या पंतप्रधानापासून ते कुडाळच्या सरपंच- सर्वांची मापे काढता आली पाहिजेत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 11/08/2014 - 13:27 नवीन
क्यालिफोर्नियाचो कोकन करुचा आसा तर तेथल्या वकिलांना खटले निकाली न सोडवण्यासाठी खास ट्रेनिंग द्यायलाच हवे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 11/08/2014 - 15:17 नवीन
कॅलिफोर्निया म्हणजे काली-पूर्णिया हो मूळची!!!! पौर्णिमा आणि अमावस्या अर्थात 'काळी' रात्र या दोन्ही वेळेस जी चांगली वाटते ती कालीपूर्णिया. त्याचा आता या हरामखोर इ. इंग्रजांनी अपभ्रंश केला ही गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 11/08/2014 - 15:25 नवीन
अदुगर शेराच्या मध्यावर एक पिंपलाच्या झाडासर पार आनी चावडी बांदूक व्हयी.. गाववाले थयसर सुशेगात बसूक तम्हाखूचा बार टाकत आजूबाजूच्या गावातल्या खबरींची देवान घेवान करतले.... अवांतर....सोकाजीनानांक क्यालीफोर्नियाचो म्हापौर करूक व्हया...
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 11/08/2014 - 17:48 नवीन
गजाली....गजाली म्हन्तत तेका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 11/08/2014 - 16:05 नवीन
तुमच्या त्या pier 39 वर सोलकढी,कोंबडी वडे,गोटी सोडा ठेवावयास हवा.शॉपिण्ग मॉलमध्ये आंबा पोळी,खास उग्र वासाची फणस पोळी,तळलेले गरे हवेत. .
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत भोसले पाटील Sat, 11/08/2014 - 17:43 नवीन
हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
विश्वजीत भोसले पाटील Sat, 11/08/2014 - 17:39 नवीन
विश्वजीत भोसले पाटील
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत भोसले पाटील Sat, 11/08/2014 - 17:42 नवीन
आमच्या पश्चिम महाराष्ट्रावर एक धागा काढा, शिकागोचे सांगली वगैरे....
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 11/08/2014 - 17:53 नवीन
लेका...आरं कुठं त्ये शिकाकाई का काय ते...कुठं आपलं साखरसम्राटाचं सांगली ? तुलनाच सोड रे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वजीत भोसले पाटील
फ
फारएन्ड Sat, 11/08/2014 - 20:32 नवीन
हे वाक्य पहिल्यांदा कोणी म्हंटले कोणास ठाउक. नंतर कायम चिकटले आहे कोकणाच्या बाबतीत. कॅलिफोर्निया आणि कोकण यात दोन्ही पश्चिम किनार्‍यावर आहे हे सोडले तर काय साम्य आहे मला माहीत नाही. अमेरिकेच्या एखाद्या भागाशी साम्य शोधायचेच म्हंटले तर हवाई शी जास्त आहे. तेथील निसर्ग, फळे, फुले ही जास्त कोकणासारखी वाटतात.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 11/09/2014 - 04:33 नवीन
तुमी ब्वॉ लैच शिरेसली घेताय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 11/09/2014 - 05:46 नवीन
नारबाची वाडी हा त्यांचा णॅशणल शिनेमा घोशित करा. राजकारणातल्या नारोबाचं तिकडं पुनर्वसन होतय का पाहा.
  • Log in or register to post comments
H
hitesh Sun, 11/09/2014 - 09:15 नवीन
नाष्ट्याला आम्लेट पावाऐवजी उसळ पाव
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत भोसले पाटील Sun, 11/09/2014 - 10:00 नवीन
ब्याकयार्डाची पडवी करुन टकावी व तिथे एक कॉमन संडास बांधावा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 11/09/2014 - 12:25 नवीन
विजुभाऊ उथळ निव्वळ कॉमेडी चालू केलीत पण शेवटी फारच शिरेस काकांसारखे बोलताय. टेँपो जातो ना अशाने. मस्त अर्ध पान चुना आणि बकणाभर सुपारी तोंडात कोंबून चिऱ्यावर बसायचं. अगोदर पंचमंडळी मुंडी हलवू देत. मग दशावतार रंगेल इकडे. असं सह्याद्री मुलाखतीसारखं लगेच आवराआवर करायची नाही.सध्या पुण्यावरचं वादळ कोकणात गेलं म्हणून जरा दम खाऊ दे त्यांना. तोपर्यँत प्रतापगडावरची चर्चा जोर पकडतेच आहे.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 11/10/2014 - 03:55 नवीन
जपानचे पंतप्रधान एकदा बोधगयेचे दर्शन करण्यासाठी बिहार मध्ये गेले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यांना भेटले होते. त्यांनी लालूजींना सुचवले की बिहारची सर्वसत्ता त्यांच्याकडे पाच वर्षे सोपवली तर ते बिहारचा जपान करून दाखवतील. त्यावर लालूजी म्हणाले त्यात काय मोठे!तुम्ही माझ्याकडे तीन वर्षासाठी सत्ता सोपवली तर मी जपानचा बिहार करून दाखवतो .
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 11/10/2014 - 05:35 नवीन
ठिव तुझो डबो, सोन्याचो नाय तो. कॅलिफोर्नियात मालवणा नेमके कुठे शोभून दिसेल ;-) ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा