Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्राच्या स्वयंघोषित मराठी सम्राटांना काही प्रश्न

च
चिनार
Mon, 11/10/2014 - 13:31
🗣 32 प्रतिसाद
१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ? २. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ? ३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ? ४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ? ५. केंद्रात बहुमतांनी सत्तेत असलेल्या सरकारनी आपल्यासमोर झुकावं ही अपेक्षा म्हणजे सूर्यानेच आता पृथ्वीभोवती फिरावं या अपेक्षेपेक्षा काय वेगळी आहे? ६. केंद्रातलं वाढीव मंत्रीपद जर आपल्याला नको होतं तर मंत्रीपदाच्या उमेदवाराला दिल्लीला तिथलं तापमान मोजायला पाठवलं होतं का ? आणी हे तापमान आपल्याला झेपणार नाही हे कळल्यावर वापस बोलावलं का ? ७. आपल्या शब्दकोशात सन्मान म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि लाचारी म्हणजे केंद्रीय मंत्रीपद असं लिहिलंय का ? ८. आधी भावकीत भांडणं करायची. नंतर सख्ख्या शेजाऱ्यांशी भांडायचं ! भविष्यात पुण्याला किंवा कोकणात स्थायिक होण्याचा आपला विचार आहे का ? ९. "भिजत घोंगडं " नावाच्या मराठी सिनेमाची निर्मीती करायला आपल्याला आवडेल का ? १०. "अस्मिता " हा शब्द आपल्या पक्षातला कोणताही नेता न चुकता एकदातरी लिहू शकेल का ? --चिनार

प्रतिक्रिया द्या
19184 वाचन

💬 प्रतिसाद (32)
H
hitesh Mon, 11/10/2014 - 13:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्राध्यापक Mon, 11/10/2014 - 13:51 नवीन
आधी भावकीत भांडणं करायची. नंतर सख्ख्या शेजाऱ्यांशी भांडायचं ! भविष्यात पुण्याला किंवा कोकणात स्थायिक होण्याचा आपला विचार आहे का ? पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे काय कारण?
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 11/10/2014 - 13:53 नवीन
पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे काय कारण?
अता २०० फिक्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राध्यापक
च
चौकटराजा Tue, 11/11/2014 - 05:37 नवीन
दोनशे कशाला ?तुम्ही त्यात क डोंं म पा घुसवा चारशे होतील. बाकी नाथाभाउ खडसे ना एक टोपी फुकटात मिळाली. सरकार पडले तर हाती काय लागले असा प्रश्न पडावयास नको !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
पिवळा डांबिस गुरुवार, 11/13/2014 - 07:57 नवीन
क डों म पा चा संबंध इथे लावायचे काय कारण? आपला, हरचंद पाटील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
क्लिंटन Mon, 11/10/2014 - 14:02 नवीन
विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ?
अहो महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा घेतला होता, अठराव्या वर्षी फत्तेखानाचा पराभव केला होता आणि शहाजहानला पत्र लिहून कैदेत पडलेल्या शहाजीराजांची सुटका मोठ्या युक्तीने करून घेतली होती हे विसरलात वाटते? पराक्रमाला आणि तेजाला वयाचे बंधन नसते. आणि मुळात शिवसेनेतला आणि त्यातून मातोश्रीवर जन्माला आलेला म्हणजे डायरेक्ट शिवरायांचाच अवतार तो हे तुम्ही कसे विसरलात? (हा उपहास आहे हे वेगळे सांगायलाच नको :) )
  • Log in or register to post comments
H
hitesh Mon, 11/10/2014 - 14:05 नवीन
या ठाकरेंवर दोन दिवसात तीन नवीव धागे निघाले.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 11/10/2014 - 14:07 नवीन
त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा आला आहे
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 11/10/2014 - 14:51 नवीन
मला पण कटाळा आला.
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Mon, 11/10/2014 - 14:51 नवीन
राज्यात मोठा पक्ष भाजप. सरकार बनलेय भाजपचे (तरणार पवारांच्या मर्जीने) मात्र गेले महिनाभर मीडिया आणि चर्चेचा फोकस उद्धव आणि शिवसेनेवरच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 11/10/2014 - 14:57 नवीन
आमच्या अगदी रटाळ आयुष्यात गंमत निर्माण करणार्‍या जोकरने आमचे सर्व लक्ष वेधून घेतली आहे, हे अगदी खरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/10/2014 - 15:26 नवीन
मस्तच रे चिनार्या.राज्याचे राजकारण जरा इण्टरेस्टिंग का काय म्हणतात तसे होतेय असे हेही म्हणतात. गेले २५ वर्षे महाराष्ट्राचे राजकारण अगदी रटाळ असे होते.अन्य भारतात अनेक पक्ष आलटून पालटून सत्तेवर आले,समीकरणे बदलली पण मराठी मतदार ढिम्म्.काँग्रेस एके काँग्रेस.यावेळी मात्र अगदी असे काही मतदान केले की उलथापालथच करून टाकली.कोणी जातोय मुंबईहून नागपूरला तर कुणी नागपूरहून दिल्लीला तर कुणी विमानतळावरूनच परत....
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 11/10/2014 - 15:30 नवीन
बाकी माईसाहेबांचा सूर बदललेला पाहून अंमळ मौज वाटली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बोका-ए-आझम Mon, 11/10/2014 - 19:24 नवीन
माईसाहेबांनी एकसमयाच्छेदेकरून समस्त मतदारांचा परामर्श घेतलेला पाहून आमोद सुनास जाहल्याची भावना होऊन राहिली आहे!;)
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 11/11/2014 - 04:32 नवीन
=)) माई,मी तुझी पंखी आहे!अनाहितामध्ये येतोस का गं? लेखक साहेब,अवांतराबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ख
खटपट्या Tue, 11/11/2014 - 05:28 नवीन
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ज
जेपी Tue, 11/11/2014 - 05:40 नवीन
म्हणजे माई अनाहीता मधे नाहीत ? माई एकटी येत नाहि ना कुठे. त्यांचे "हे" सोबत आसतात. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 11/11/2014 - 07:36 नवीन
हा हा हा. आणी आमच्या मागून श्रीगुरूजी कवायत करत व आपण जेपी,संपूर्ण क्रांतीच्या अपेक्षेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Tue, 11/11/2014 - 07:59 नवीन
तेथे कॉलवून कंफर्म करतात ना??? म्हणुन असेल कदाचित ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ज
जेपी Tue, 11/11/2014 - 08:17 नवीन
तेथे कॉलवून कंफर्म करतात ना फक्त कॉलवुन जमत नाय. पण माई खमकी असल्यामुळे , तिला तिकडची गरज पडत नसेल. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
इ
इरसाल Wed, 11/12/2014 - 07:10 नवीन
मी नाव बदलुन इरसाली किंवा इ-रसाली (रसना रसाळकर सारखे) केले तर अनाहिता मधे प्रवेश मिळेल काय ? आणी हो मी तोपर्यंत अगं, गेले, आले, बोलले, चालले, ची प्रॅक्टीस करते.....आपलं करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
H
hitesh Wed, 11/12/2014 - 08:57 नवीन
अनाहिता म्हणजे काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ज
जेपी Wed, 11/12/2014 - 09:17 नवीन
हितेस भाय, आमच्या देखत तुमचे तीन जन्म झाले तरी तुमाला अनाहिता माहिती नाही.कुठल्या जगात राहता.नाय मंजे आब्यास बघता तुमी इतच राहात असणार की .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
सतिश गावडे Wed, 11/12/2014 - 09:19 नवीन
हितेस भाईंचे आधीच्या दोन जन्मामधील नावे काय होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ट
टवाळ कार्टा Wed, 11/12/2014 - 09:35 नवीन
=)) काय तो निरागसपणा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेपी Wed, 11/12/2014 - 10:27 नवीन
आमच्या नानांचा जीव असाच चुकीच्या ठिकाणी खरड टाकुन गेला. हितेस भाय तु बी ती चुक करु न ये *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
H
hitesh Wed, 11/12/2014 - 12:55 नवीन
कुनास ठाउक... लोकानी माझ्या नावासाठी नाना , उदयन आणि माई यांच्यावर मटका लावला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेपी Wed, 11/12/2014 - 12:58 नवीन
हितेस भाई, कुठला मटका लावला आहे. कल्याण का मुबंई ? सांगा.आकडेमोड करुन सांगतो कुठला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ख
खटपट्या Mon, 11/10/2014 - 19:42 नवीन
उद्धवा अजब तुझे सरकार !!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 11/11/2014 - 09:51 नवीन
धाग्याचा विषय बदला हो; हा फार पकाऊ झालाय आता. चालायचा नाही. :D
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 11/11/2014 - 09:56 नवीन
. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?
बाकी वरील प्रश्न खुप जणांना लागु आहे , जसे आज पर्यंतची सगळी सरकारे, प्रिंट मिडीआ, टीव्ही मीडीआ, फिल्म इंडस्ट्री ईत्यादी
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 11/14/2019 - 19:03 नवीन
५-वर्षांपुर्वीचा लेख आज पण चपखलपणे लागू होतोय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा