Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सत्यनारायण पूजा:

व
वगिश
Wed, 11/12/2014 - 16:47
🗣 78 प्रतिसाद
सत्यनारायण पूजा: मी मिपा वर नविन आहे.येथे असलेले लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचून माझे शंकानिरिसन होईल असे वाटते. काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली. पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली. ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?

प्रतिक्रिया द्या
24594 वाचन

💬 प्रतिसाद (78)
ट
टवाळ कार्टा Wed, 11/12/2014 - 16:55 नवीन
कॉलिंग आत्मुबाबा :)
  • Log in or register to post comments
H
hitesh Wed, 11/12/2014 - 17:04 नवीन
प्रसादाचा शिरा मस्त असतो.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Wed, 11/12/2014 - 17:05 नवीन
साजूक तुपातला, काजू-बेदाणे आणी केळ्याचे काप घातलेला मस्स्स्तं शिरा खायला मिळावा म्हणून ही पूजा करतात.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Wed, 11/12/2014 - 18:17 नवीन
यसवायजींशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ध
धर्मराजमुटके Wed, 11/12/2014 - 17:06 नवीन
तुम्ही फारच पैसेवाले दिसता बुवा ! तुमचे काय नुकसान होईल ही माहिती तुम्हाला एवढीच वाटते ?
  • Log in or register to post comments
व
वगिश Wed, 11/12/2014 - 17:13 नवीन
काही नसल्यामुळे नुकसान(आर्थिक) होण्याची चिंता नहि. हि पूजा धनलाभ होण्यासाठी असते का? *scratch_one-s_head* *SCRATCH*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 11/12/2014 - 17:21 नवीन
इथे प्रश्न विचारण्यापेक्षा सत्यनारायण पुजा व्यवस्थित ऐकली असती तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. असो. माझा अंदाज असा की तुमचे नुकतेच लग्न झाले आहे व नवदांपत्यास सत्यनारायण पुजेस बसण्यास सांगीतले असल्यामुळे तुमचे लक्ष पुजेपेक्षा जोडीदाराकडेच अधिक असावे. :) तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारची उत्तरे ऐकण्यात रस आहे ते सांगा. तुमच्या आवडीप्रमाणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करु. शेवटी हे हॉटेल आहे ना. जे गिर्‍हाईकाला पाहिजे ते देणार. मात्र हॉटेलात काही पुणेरी बाण्याचे वेटर आहे ते तुम्हाला हवे ते नाही तर त्यांना हवे तेच देतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
व
वगिश Wed, 11/12/2014 - 17:44 नवीन
नुकतेच लग्न झालेले नाही तरी जोडीदारकडे लक्ष होतेच *yes3*.पूजा वेगळ्या कारणासाठी होति. असो, पुजेविषयी,म्हणजे ती का,कशासाठी करतात ह्याविषयी तुमच्याकडे काही माहिती असल्यास ती इथे लिहा म्हणजे माझा गणमन वृत्ती मुळे ज्या गोष्टी मला पुजेत कळल्या नाहीत त्या इथे कळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संजय क्षीरसागर Wed, 11/12/2014 - 18:29 नवीन
ते कारण सांगितल्याशिवाय पूजाफलाविषयी चर्चा कशी होईल? बाकी तुमचं म्हणणं "पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.", बरोबर आहे. कारण मूळात देव हीच (मानवी) संकल्पना भीतीतून निर्माण झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
प
पगला गजोधर Fri, 11/14/2014 - 09:58 नवीन
इलेक्ट्रॉनिक सत्यनारायण वर्जन: एका माणसाने सात्यानारायानांच्या बाजून ब्लॉग-प्रतिक्रिया दिली, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, पण नंतर दुसऱ्या वर्षी तो तसं करायचं विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला.सगळे पैसे गेले, धंदा बुडला आणि तो देशोधडीला लागला, नंतर पुन्हा ब्लॉग-प्रतिक्रिया केल्यावर त्याचं सुख , पैसा त्याला परत मिळाला.. ( देव माझा सत्यानाश करेल, मला त्रास देईल, दहशतीखाली असली कर्मकांडे नको. मला वाटतं आजच्या युगात इतकी समज आपल्या मधे असायला हरकत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
व
वगिश Fri, 11/14/2014 - 17:13 नवीन
भावाच्या नवीन कार्यालयची पुजा होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आदूबाळ Wed, 11/12/2014 - 17:15 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/12/2014 - 17:59 नवीन
सत्यनारायण...सत्यदत्त..सत्यविनायक...सत्यांबा..
हे चारही पूजा प्रकार अगदी अलिकडच्या काळातले आहेत.किंबहुना वैदिक धर्मात पूजा--हाच प्रकार बसत नाही..तो अलिकडे बसवला गेला आहे. {मूळ धर्मात देवतांना मंत्र पठण/गायनाने बोलावणं(आवाहन करणं) आणि त्यांना यज्ञात आथवा पाण्यात आहुती देणं..(अन्न देण) एव्हढच आहे.} तर ते असो...कुठलिही पूजा ही पंचोपचार किंवा षोडशोपचार असते..इथे प्रश्न आहे..तो चारही पूजांमधे आलेल्या कथांचा! त्या उघडपणे चमत्कारांची भलामण करणार्‍या आहेत,यात वाद नाही. तुमचा यावरच जर आक्षेप असेल..तर माझा तुम्हाला १ प्रश्नः- तुमच्या(सारख्यां)साठी मी दोन प्रकारच्या कथा तयार केल्या आहेत. १) मूळ कथेतील सगळे चमत्कार आणि पूजा केल्यावर(च) मिळणारी फळं मी वगळली आणि काहि ठिकाणी बदलली आहेत. त्यात जास्तीत जास्त प्रयत्नवाद्/आशावाद माणुसकी ही मूल्य आणायचा प्रयत्न मी केलेला आहे. २) दुसरी कथा ही सरळ सरळ पूजेला बसलेल्याची(जीवनवाद आणि नैतिकतेच्या बाबतीत) परिक्षा पाहाणारी आहे.. तुम्हाला कोणती कथा हवी? :) जी कुठली कथा हवी...ती का हवी? आणि दोन्ही नको(च) असतील..तर का नको? ==================================== समांतरः- आमच्या वैदिक धर्मापासून ते जगातल्या यच्चयावत चालू/बंद धर्मांमधे असणारी लबाडी/दांभिकता/खोटेपणा/अनैतिकता हीच मी कधिही सर्मथन करत नाही..करु शकणार नाही. फक्त मी माला(च) स्वतःला हल्ली असा प्रश्न विचारतो..की,त्या त्या धर्मांमधे असलेल्या या सर्व वाइट गोष्टी त्या त्या धर्माच्या अनुयायांना चालतात किंवा हव्या असतात..किंवा यापैकी काहिच नसलं..तरी त्याविरोधी आवाज उठवायचा नसतो.. हे सगळं कशाचं लक्षण आहे... प्राचीन काळी दोन पैलवानांच्या झुंजी लाऊन त्या पैकी एक मरेपर्यंत त्या एंजॉय करण्याचा धर्म होता...हा प्रकार अमानुष आहे..हे पटायला लागल्यावर त्या झुंजी फक्त लुटुपुटुच्या..म्हणजे दिखाऊ स्वरुपाच्या होण्याचा धर्म (WWF) सध्या प्रचलीत आहे..हा जो त्या प्रांतात घडलेला बदल आहे..तसा आपल्याला धर्मात झालेला चालणार आहे का? का नाही चालणार? का..., कशाचीच आपल्याला गरज नाही..असं आपलं म्हणणं असणार आहे? :)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 11/12/2014 - 18:13 नवीन
मुळात प्रत्यक्ष नारायण समोर असताना त्याला सोडुन त्याच्या पुजेने मिळणार्‍या फळांची हाव का निर्माण होते हेच कळत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 11/13/2014 - 07:53 नवीन
बुवा , तुमच्या सत्यनारायण कथेचे ते व्हर्जन ऐकवाना ज्यात तो साधुवाणी जहाज बुडेल म्हणुन पाणबुडीच घेवुन जातो ती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 11/13/2014 - 08:00 नवीन
बाकी मुळ कथेविषयी बोलायचे मी टाळतो , आजकाल लोकांच्या भावना लईच् नाजुक झाल्यात ... मागे सर्वमान्य श्रध्देची चिकित्सा करणारे एक विधान फेसबुक वर टाकले होते तेव्हा माझ्या विरुध्द पोलीस कंप्लेन्ट करेन अशी धमकी मिळाली होती ... पण ते असो ... मागे एकदा मी घरी बोललो होतो की " देव जर असला दहशतवादी असेल तर मी अमेरिकन आहे म्हणाव त्याला ." तेव्हापासुन घरचे देव देव कर म्हणुन मागे लागत नाहीत :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/14/2014 - 09:12 नवीन
लैच भारी. -दिलीप बिरुटे (आधुनिक बुवांचा फ्यान)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
वगिश Fri, 11/14/2014 - 17:49 नवीन
तुम्हाला म्हणून विचारतो पूजेचे पैसे किती असतात हो(आउट ऑफ कुरियोसिटी).मी 200 रुपये देऊ केल्यावर गुरूजींनी माझी "मी काय तुम्हाला मराठवड्यातला भटजी वाटलो काय?" असे विचारले.(का ते माहीत नाही,मीही तिकडचा नाही हो.)असो,गरिब जनतेसाठी कुठे स्वस्त भट्जी मिळतात का? ह्या कथेचा इतिहास,मूळभाषा,कूळकथा इत्यादी विषयी कुठे माहिती मिळेल?तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया इथे द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सतिश गावडे Fri, 11/14/2014 - 17:52 नवीन
मी म्हणतो नसेल परवडत तर पुजा करावीच कशाला हो. ते "देव भावाचा भुकेला" वगैरे कसं काय विसरतात बुवा लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/14/2014 - 18:07 नवीन
@पूजेचे पैसे किती असतात हो >>> माझ्या सारख्यांचा असा कुठलाच/कधिच फिक्स रेट नसतो..पण काहि जणं तो ठेवतात. तरिही खेडेगाव शहर पातळीवर अर्थार्जनाच्या दृष्टीने थोडा (वरपांगी..)फरक असतोच.. मी पुण्याचा..त्यामुळे इथलं सांगतो..आता सगळ्याच भटजिंनी सत्यनारायणा सारख्या सर्व पूजांचा- ऑफ सिझन ३०० आणि ऑन'ला ५०० -असा (मानसिक) दर ठरवलेला आहे.. प्रत्येक जण त्यासाठी अगदी हटून वगैरे बसत नाही..पण ही सामान्यतः अपेक्षा असते. आणि ती पूर्ण होते देखिल.. काहिजण (डॉमिनोज पिझ्झा सारखे) ११०० रुपये वगैरेही सांगतात..आणि वर पुन्हा...आमची पूजा हायक्लास असते..असलंही तर्कट चालवतात..हायक्लास म्हणजे काय??? असं तुंम्ही विचारलत..तर मात्र त्यांना राग येतो..असो चालायचच... धंदे धंदे मे होता है..गन्ने गन्ने का दाम! ;) लेकिन हर गन्ने को चुसो..तो अंदर मिठास ही होती है...आम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
स
सतिश गावडे Wed, 11/12/2014 - 18:17 नवीन
माझा अनुभव उलट आहे. काही दिवसांपुर्वी दोन सश्रद्द मित्रांसोबत जेजुरीला जायचा योग आला होता. ते दोघे देवाच्या दर्शनाला तर मी "आहे वेळ तर फीरुन येऊ" या उद्देशाने गेलो होतो. मित्र दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. मी मंदीराभोवतीच्या ओवरीमध्ये बसून पिवळ्या रंगाची उधळण पाहत होतो. मंदीरात चालू असलेली सत्यनारायणाची जवळपास संपत आली होती हे लाऊडस्पिकरवर चालू असलेल्या फलशृतीवरुन कळत होतं. जगातील यच्चयावत सुखं सत्यनारायणाची पुजा घातल्याने मिळतात असं त्या पुजा सांगणार्‍या व्यक्तीचं म्हणणं होतं. सत्यनारायण हा देव तसा वेगळाच म्हटला पाहिजे. केवळ एखादया व्यक्तीने पुजेचा प्रसाद खाल्ला नाही तर त्या व्यक्तीला अद्दल घडावी म्हणून त्याची सोन्या-नाण्याने भरलेली नौका सरळ सरळ बुडवणारा देव पुराणांमध्ये विरळाच. एकदम "माझा प्रसाद खात नाही म्हणजे काय. बघतोच तुला आता" असा अ‍ॅट्टीट्युड. हल्ली फक्त माणूस गेल्यावर सत्यनारायण घालत नाहीत. बाकी आयुष्यातील कुठल्याही इव्हेंटला सत्यनारायण घालतात लोक. लग्न झालं, मुलगा झाला, नोकरी लागली, नविन गाडी घेतली, वर्षभरार देवाचं काही केलं नाही असं काहीही कारण सत्यनारायणाच्या पुजेला चालतं. पुजार्‍याला दक्षिणा मिळते, लोकांना देवाचं काही केल्याचं समाधान. शिवाजी महाराजांनी सत्यनारायणाची पुजा घातल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. पेशवे देवभक्त असूनही त्यांनीही सत्यनारायण घातल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. सत्यनारायणाची जन्मकथा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक अफलातून माहिती मिळाली. ब्रिटीश काळात कलकत्त्याला म्हणे सत्य पीर नावाच्या पीराचा उत्सव होत असे. हिंदू मुस्लिम कुठलाही भेदभाव न ठेवता उत्सवात सामिल होत. पुढे ब्रिटीशांनी मुस्लिमांची मने कलुषित केल्यावर त्यांनी हिंदूंना उत्सवात सामिल होण्यास मनाई केली. त्यामुळे मग हिंदूंनी सत्य पीराला पर्याय म्हणून हा नवा सत्य नारायण नावाचा देव शोधला. अर्थात ही वाचलेली गोष्ट आहे. किती सत्य आहे ते सत्यनारायणालाच माहिती. सत्यनारायणाची पुजा महाराष्ट्राबरोबर अजून कुठल्या राज्यांमध्ये घातली जाते हे जाणून घ्यायला आवडेल. सत्यनारायणाच्या पुजेच्या माझ्या लहानपणीच्या खास आठवणी आहेत. कोकणात पुजा सांगायला येणार्‍या ब्राम्हणाला "बामन" म्हणतात. पुजेच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पुजा मोडतात. त्यावेळी पुजा मांडताना वापरलेल्या खारका, बदाम, सुपार्‍या,आरतीनंतर लोकांनी देवाला टाकलेले पैसे हे सारं पांढर्‍या वस्त्रात बांधून बामनाला दक्षिणेबरोबर द्यावे लागत असे. ही गोष्ट तेव्हा लहानपणी प्रचंड खटकायची. दुसरी आठवण म्हणजे सत्यनारायणाच्या पुजेला वाजवली जाणारी "ऐका श्री सत्यनारायणाची कथा" ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली रेकॉर्ड. ही रेकॉर्ड वाजल्याशिवाय सत्यनारायणाची पुजा होतच नसे.
पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.
आता हा भाग त्या पोथीतून काढून टाकला तरी चालण्यासारखा आहे. हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 11/12/2014 - 18:43 नवीन
अगदी अगदी. खटकण्याबद्दल प्रचंड सहमत आहे. ती लक्ष्मी अन शामबाला इ. ची कथाही तशीच. म्हणे माझी पूजा केली नाही म्हणून मी शासन करते. च्यायला, स्वतःचा ईगो सुखावण्यासाठी माणसांची गरज असलेले हे देव नव्हेतच, सगळा पोरकट प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
आ
आदूबाळ Wed, 11/12/2014 - 18:55 नवीन
सत्यनारायणाची जन्मकथा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक अफलातून माहिती मिळाली. ब्रिटीश काळात कलकत्त्याला म्हणे सत्य पीर नावाच्या पीराचा उत्सव होत असे. हिंदू मुस्लिम कुठलाही भेदभाव न ठेवता उत्सवात सामिल होत. पुढे ब्रिटीशांनी मुस्लिमांची मने कलुषित केल्यावर त्यांनी हिंदूंना उत्सवात सामिल होण्यास मनाई केली. त्यामुळे मग हिंदूंनी सत्य पीराला पर्याय म्हणून हा नवा सत्य नारायण नावाचा देव शोधला. अर्थात ही वाचलेली गोष्ट आहे. किती सत्य आहे ते सत्यनारायणालाच माहिती.
हायला! इंट्रेष्टिंग जन्मकथा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/12/2014 - 19:21 नवीन
@सत्यनारायणाची पुजा महाराष्ट्राबरोबर अजून कुठल्या राज्यांमध्ये घातली जाते हे जाणून घ्यायला आवडेल.>>> कर्नाटक्/तामिळनाडू/आंध्र.. या ३ प्रांतात.. याचं प्रस्थ नाही.. गुजराथी/मारवाडी/बंगाली/हिंदि भाषिकांमधे...आपल्या प्रमाणेच आहे.. @कोकणात पुजा सांगायला येणार्‍या ब्राम्हणाला "बामन" म्हणतात. पुजेच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पुजा मोडतात. त्यावेळी पुजा मांडताना वापरलेल्या खारका, बदाम, सुपार्‍या,आरतीनंतर लोकांनी देवाला टाकलेले पैसे हे सारं पांढर्‍या वस्त्रात बांधून बामनाला दक्षिणेबरोबर द्यावे लागत असे. ही गोष्ट तेव्हा लहानपणी प्रचंड खटकायची.>> अहो..धनाजीराव..त्या काळातला अर्थशास्त्रीय मुद्दा आहे हा! त्याकाळात दक्षिणा म्हणून मिळणारे पैसे..हे अत्यंत कमी असायचे.. म्हणून इकडनं..नाही,तर तिकडनं पूर्तता! एव्हढच.. :) @हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.>>> Image removed. ही माहिती तुंम्हाला कुठून (हाती ;) ) लागली हो! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रचेतस गुरुवार, 11/13/2014 - 01:47 नवीन
माहिती तुंम्हाला कुठून (हाती ) लागली हो! >>>> त्यांचे एक भडजी मित्र आहेत. कदाचित ही माहिती त्यांनीच सांगितली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आनन्दा गुरुवार, 11/13/2014 - 11:10 नवीन
भडजी
? भडंग सारखे वाटले :) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ख
खटपट्या Wed, 11/12/2014 - 21:01 नवीन
हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.
वर "बामनाला" भरभक्कम दक्षिणाही द्यावी लागते. समजा एखादा बामन नसलेला माणसाने ही पुजावीधी शीकुन घेतली आणी स्वतःच पुजा केली तर चालते का ? बामनानेच ही पुजा करावी असा नियम आहे का ? जाणकारांनी शंका निरसन करावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/13/2014 - 02:31 नवीन
मुळात माझा तरी सत्यनारायण ह्या संकल्पनेवर विश्र्वास आहे आणि मी तो दरवेळी जमेल तसा पाळतो. कार्य हीच पूजा आणि त्यात पारंगत व्हायला जे कष्ट करायला लागतात तीच अर्चना. दरे वर्षी द्यायला लागणारी परीक्षा आणि त्यात पास झाले, की पालकांसमवेत मौज-मजा करणे, हा विद्यार्थांचा सत्यनारायण. तर दर वर्षीचे अप्रायझल हीच माझ्यासाठी परीक्षा आणि त्यात चांगली पगारवाढ मिळाली की मित्रांबरोबर पार्टी करणे, हाच माझा सत्यनारायण. आणि मुळात जो उत्तम शिकतो आणि शिकवतो, तो ब्राह्मण अशी माझी धारणा असल्याने, मला माझ्या सत्यनारायणासाठी, ब्राह्मणांची कमतरता कधीच जाणवत नाही. प्रथे पेक्षा त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेतला, तर ह्या अशा कालबाह्य प्रथांना उडवून लावायला वेळ लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/23/2015 - 14:31 नवीन
ब्येष्ट...*clapping*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रशु Sat, 11/15/2014 - 09:25 नवीन
मी मराठा आहे मात्र पौरोहित्य शिकलोय आणि करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/15/2014 - 09:36 नवीन
वा... वा! अत्यंत चांगला निर्णय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
र
रेवती Fri, 01/23/2015 - 14:49 नवीन
आपले मनापासून अभिनंदन! आमचाही एक मराठा मित्र जानवे घालून जेवणावळीस येतो. तेही आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
अ
अस्वस्थामा Wed, 11/12/2014 - 20:34 नवीन
आमाला सत्यनारयण आत्मूगुर्जींनी सांगितला तेव्हा ते फुलांची रांगोळी काडीत होते. तेव्हा आमचे लक्ष तिकडेच सगळे.. कथा आणि त्यातले नफा-नुकसान त्यांनाच माहीत. ;)
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 11/13/2014 - 00:11 नवीन
मला मुक्तविहारी साहेब ज्या पद्धतीने सत्यनारायणाची पुजा करतात तो प्रकार आवडतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/13/2014 - 02:34 नवीन
तुमच्या बरोबर आणि तुम्ही म्हणाल तिथे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नीलकांत गुरुवार, 11/13/2014 - 01:43 नवीन
या पुजेची कथा ऐकल्यावर आपल्या लक्षात यायला हवे की ही चित्रपटाची पटकथा शोभेल अशी कथा आहे. राग, अपमान, प्रलोभन आदी सर्वच आहे. खरं तर माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्या निर्गुण निराकार म्हणवल्या जाणार्‍या देवाला मानवी पातळीवर उतरवून आणि त्याला मानवचे सर्व गुण दोष देवून वर आपण कुठल्या तोंडाने त्यालाच आशिर्वाद मागतो? मी गेली १५ वर्षे सत्यनारायण नामक पुजेत बसलेलो नाही. पुढे कधी बसण्याचा संबंध नाही. मात्र ही पर्याय व्यक्तीगत आवडीचा आहे. बाकी सत्यनारायणाचा तुपातील प्रसाद मस्तंच लागतो. आपण शिरा म्हणून खायचा :) वर उल्लेखल्याप्रमाने फक्त मरण सोडून हा कधीही करतात मात्र लग्नानंतर वैवाहीक आयुष्य सुरू करण्या अगोदर ही पुजा करावीच असा आग्रह असतो. मानसीक दृष्ट्या संवेदनशील झालेल्या व्यक्तीला अशी कथा ऐकवल्यावर तो पुढील आयुष्यात हमखास ही पुजा करणार. काय साला टायमींग आहे ना? :) तर अशी वेळ माझ्यावर आल्यावर मी आमच्या सासरकडच्या गुरूजींना बोललो होतो की सत्यनारायण सोडून अन्य पुजा सांगा. तर ते अगदीच ब्लॅन्क होते .... या वेळी हीच पुजा करतात... शेवटी माझे दैवत शंकराची कसलीही पुजा केलेली चालेल अश्या उपायावर चर्चा थांबली व पुजा झाली. शेवटी पुजा काय तर देवाचे अस्तीत्व मान्य करून त्याची कृपा आपल्यावर घेणे हे आहे. हे करण्याची पध्दत म्हणजे पुजा. मध्यंतरी वेगवेगळ्या पंथानी आपआपल्या दैवताचे पुजन करण्याच्या पध्दती ठरवल्या. आपल्याला बरी वाटेल ती पुजा करण्यास काहीही हरकत नाही. एखादी पुजा खटकत असेल तर ती नाही केलेली बरी. पुजा केल्यावर मनाला समाधान वाटले पाहीजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा. :) - नीलकांत
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 11/13/2014 - 04:33 नवीन
च्यायला, स्वतःचा ईगो सुखावण्यासाठी माणसांची गरज असलेले हे देव नव्हेतच, सगळा पोरकट प्रकार आहे.
इथे एक बाब दुर्लक्षीत झालीय की ही कथाच मूळी एक मानवाच्या "सुपीक्"डोक्यातून आलेली आहे तेव्हा त्यातील देवही तितकेच दुराग्रही/शीघ्रकोपी असणारच्!आपण सगळे फक्त मसाल्यालाच भाजी (हाटेलातील पंजाबी डिश) समजतोय कालांतराने त्यात मूळ भाजीतरी शिल्लक राहिल का नाही हाच प्रश्न आहे!!!
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 11/13/2014 - 10:59 नवीन
एकोणिसाव्या शतकातले मुंबईतले एक प्रसिद्ध आणि समाजसुधारक गृहस्थ दैनंदिनी लिहीत असत. (हे गृहस्थ बहुधा रावसाहेब वि.ना. मंडलिक असावेत. आता नक्की आठवत नाही.) या दैनंदिनीतल्या मजकुराचा उल्लेख एका ठिकाणी वाचला. त्यात रावसाहेबमजकुरांना एकेदिवशी आलेल्या सत्यनारायणपूजेच्या निमंत्रणाविषयी लिहिताना त्यांनी लिहिले होते की अलीकडे मुंबईत ही प्रथा बोकाळू लागली आहे. मूळ बंगाल्यात ब्रह्मसमाजी लोकांनी धर्मसुधारणा म्हणून ही होमहवनविरहित पूजा प्रचलित केली. ही पूजा कोणीही (चातुर्वर्णिक) करू शकतो. हिला मुहूर्ताची जरूरी नाही. सोवळ्याओंवळ्याचे अवडंबर नाही. प्रसादही अगदी साधा, फक्त रव्याचा शिरा. संस्कृत मंत्रांचीही जरूरी नाही. पण मुळात साधेपणा हे उद्दिष्ट असलेल्या या पूजेचे आता मात्र अवडंबर होत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. त्या वेळी (एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी )मुंबईतल्या धनवान मिश्र समाजात या पूजेची 'फॅशन' आली होती असेही यात लिहिले होते. बाकी पोथी कशी प्रचारात आली ते सांगता येत नाही. पण पोथीतही एक गुजराती वैश्य व्यापाराला दूरदेशी जातो आणि तो सुरक्षित परत यावा म्हणून त्याची पत्नी हे व्रत करते असे काहीसे आहे. अगदी अलीकडच्या काळातही मार्गशीर्षातल्या गुरुवारी करावयाच्या 'वैभवलक्ष्मी' व्रताची प्रचंड क्रेझ आहे. मजा म्हणजे या व्रतात या पोथ्या आठ/अकरा/सोळा जणांना वाटाव्या आणि त्यांनीही हे व्रत करावे असेही असते. या पोथ्या छापून एका प्रकाशनगृहाला भरपूर फायदा झालेला आहे. त्यांना जवळजवळ लाखभर प्रती छापाव्या लागतात असे ऐकले आहे. ( त्यांनी आपल्या फायद्यासाठी हे व्रत प्रचारात आणले असे अर्थात अजिबातच म्हणावयाचे नाही. त्यांना फायदा झाला तर त्यात तक्रार करण्याजोगे काही नाही.) काही वर्षांपूर्वी शुक्रवारच्या संतोषीमाताव्रताचीही जोरदार चलती होती.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/13/2014 - 11:04 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ह
हाडक्या गुरुवार, 11/13/2014 - 11:19 नवीन
मूळ बंगाल्यात ब्रह्मसमाजी लोकांनी धर्मसुधारणा म्हणून ही होमहवनविरहित पूजा प्रचलित केली. ही पूजा कोणीही (चातुर्वर्णिक) करू शकतो. हिला मुहूर्ताची जरूरी नाही. सोवळ्याओंवळ्याचे अवडंबर नाही. प्रसादही अगदी साधा, फक्त रव्याचा शिरा. संस्कृत मंत्रांचीही जरूरी नाही. पण मुळात साधेपणा हे उद्दिष्ट असलेल्या या पूजेचे आता मात्र अवडंबर होत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
आक्षी हेच आमीपण वाचले होते... 'ब्रह्मसमाजी' लोकांनी सुरु केलं एका हेतूने आणि लोकांनी त्याला पण सोवळा करून घेतलं. त्या 'ओह माय गॉड' मधल्या कांजीभाईचा पण शेवटी देव करणार्‍या लोकांची आठवण झाली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
आ
आदूबाळ गुरुवार, 11/13/2014 - 13:12 नवीन
जबरीच! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
पामर गुरुवार, 11/13/2014 - 11:16 नवीन
मला ही पुजा फक्त प्रसादामुळेच आवडते.बाकी पुजा केली नाही म्ह्णुन सुड घेणारा,भक्ताची वाट लावणारा देव मला कधी आवडला नाही.माझा दहावीचा निकाल लागला त्यावेळी वडिलांनी घरी सत्यनारायणाची पुजा ठरवली होती..गुरुजी उपलब्ध झाले नाहीत.मला ती पुजा भंपकपणा वाटत असुन पण केवळ वडिलांची इत्छा म्ह्णुन मी पुजा केली..मात्र ती नेहमीची पोथी बिलकुल वाचली नाही त्याऐवजी विवेकानंदांच्या चरित्रामधल्या ४-५ कथा वाचल्या होत्या आणि आईला जास्तीचा प्रसाद करायला लावुन तो घराजवळच्या वृद्धाश्रमात पोचता केला होता...मला काय मिळ्णार होतं त्या साधु वाण्याचं काय झालं ते वाचुन...
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ गुरुवार, 11/13/2014 - 11:20 नवीन
काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली. पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली. ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?
पुजा लक्षपुर्वक ऐकली असं म्हणता आणि प्रत्येक अध्यायात पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होइल एवढीच माहीती मिळाली असेही म्हणता म्हणजे पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल इतकच लक्षपुर्वक ऐकले का? राही यांचा प्रतिसाद अगदी माहीतीपुर्ण आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 11/13/2014 - 11:29 नवीन
म्हणजे पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल इतकच लक्षपुर्वक ऐकले का?
पुर्ण पोथीत काय नुकसान होईल हेच जर प्रत्येक अध्यायात लिहिले असे तर त्याला पुजेला बसणारा काय करणार? अर्थात अशी भीती घालण्याचा हेतू एकच असणार. लोकांनी पुजा घालावी आणि पुरोहिताची पोटा-पाण्याची सोय व्हावी. आता या पोथीत सुधारणा करण्यास हरकत नाही. कारण लोक आता स्वतःहून पुजा घालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
अ
असंका गुरुवार, 11/13/2014 - 12:05 नवीन
मी वाचलेल्या दोन गोष्टी या निमित्तानं आठवल्या, १. SBI च्या लेबर कोर्ट शाखा अहमदनगर इथे व्यवस्थापनासंबंधी अनेक सुविचार भिंतींवर लिहिले होते. त्यात एक होता की "कुठलाही प्रश्न/समस्या वरीष्ठांकडे नेताना, त्याचे आपल्याला योग्य वाटणारे कमीत कमी एक तरी उत्तर/समाधान घेऊन मगच जावे". २. दुसरी गोष्ट आठवली ती एका विचारवंताची, ज्याच्याबद्द्ल असे म्हणले जाते की तो लोकांना विचार करायला उद्युक्त करणारा माणूस होता- The Man Who Asked Questions: Socrates- सॉक्रेटीस. आपण फक्त शंका विचारत आहात. प्रश्न मांडत आहात. वरच्यापैकी कुठली भूमिका आपल्या ह्या वागण्याशी सुसंगत आहे? (मीही फक्त प्रश्न विचारत आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे वरच्या प्रश्नाचे जे उत्तर आपण स्वत:कडे घेताल, तेच माझ्याकडेही द्या एवढीच विनंती)
  • Log in or register to post comments
व
वगिश Fri, 11/14/2014 - 17:22 नवीन
माज्या प्रश्नाचे उत्तर मजकडे आहेच,पण ते माज्या मर्यादित ज्ञानवर मी बनवले अहे.इथे मला काही नवीन विचार मिळतात का ते बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/14/2014 - 17:46 नवीन
@इथे मला काही नवीन विचार मिळतात का ते बघतोय. >> कृपया हे वाचा :) http://www.misalpav.com/node/29438
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
त
तिमा गुरुवार, 11/13/2014 - 13:23 नवीन
लबाडांनी मूर्ख माणसांना फसवण्यासाठी काढलेल्या अनेक क्लुप्त्या आहेत. दुनिया पुजती है, फसानेवाला चाहिये.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 11/14/2014 - 06:09 नवीन
माझे आजोबा भटजी होते. घरोघरी पुजा सांगुन त्यातुन मिळणारे पैसे, धन्य, खारिक खोबरं वगैरे वर आमचं घर चालायचं (पुजेतले पैसे ब्राह्मणाला देणं खटकणं स्वाभाविक आहे.. पण कधी काळी लोकांची घरं त्यावरच चालत होती..) अर्थात ते पुरेना म्हणुन मग शिवणकाम / छोट दुकान चलवुन बघणे असे प्रकारही झाले.. पण त्यात काही राम नव्हता.. दुकान तर चोरांनी घरात घुसुन लुटुन नेले... ..तर आमचे बाबाही पुज शिकले.. गरज पडल्यास घरोघरी जाउन सांगायचेही.. जर बारावी पास झालो नाही तर सत्यनारायणाच्या पुजा सांगायच्या हा Plan B होता.. पुढे ते शिकले.. पुन्हा कधी पुजा सांगायची वेळ आली नाही... आणि गंमत म्हणजे आमच्या घरात सुद्धा बाबांनी कधीही सत्यनारायण / सत्यांबा घातला नाही. आमचं कधीही काही नुकसान झालं नाही.. काही त्रास झाला नाही.. सामान्य माणसाच्या आयुष्यात जेवढे चढ उतार असतात तेवढेच आम्ही पण पाहिले.. त्यात पुजा घालण्या - न घालण्याचा संबंध नाही.. त्यामुळे माझा व्यक्तिशः ह्यावर अजिबातच विश्वास नाही.. बादवे.. सत्यनारायणची कथा कुणी थोडक्यात सांगेल का? मी कधीही ही कथा ऐकली नसल्याने मला फक्त "वाणी - जहाज - प्रसाद नाही खाल्ला - बुडवले" इतकंच माहित आहे...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/14/2014 - 06:37 नवीन
@सत्यनारायणची कथा कुणी थोडक्यात सांगेल का? मी कधीही ही कथा ऐकली नसल्याने मला फक्त "वाणी - जहाज - प्रसाद नाही खाल्ला - बुडवले" इतकंच माहित आहे...>> चला आता मि.पा.सत्यनारायण करायलाच हवा.. ! ;) थोडं थांबा हं..आता..जुनी..नवी कथा एकदमच लावतो..सविस्तर विवेचनासह! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा