Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(पाठ शिवा हो पाठ शिवा)

स — सूड, Wed, 11/12/2014 - 18:50
पाठ शिवा हो पाठ शिवा वार्धक्यातही वाघ रडवला डाव टाकूनि नवा नवा बन कमळांचे मुदित* सापळे लपायास मज असे मोकळे सत्तांधाला काय का कधी शिवाशिवीचा खेळ नवा? टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा मालकी घेशील परी कशाची तुझ्या पदांची तुझ्या यशाची पाठलाग मग कुठे संभवे महाराष्ट्र जर तुला हवा !! ;) *मोद-मोदी-मुदित

प्रतिक्रिया द्या
5533 वाचन

💬 प्रतिसाद (19)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/12/2014 - 19:09 नवीन
है....................फटका एकदम! ;)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 11/12/2014 - 19:35 नवीन
सौ सुनार की.... जियो!!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 11/13/2014 - 00:28 नवीन
मान गये !!! फार वाईट वाटतयं अन डोक उठलयं. शिवसेनेला खरच अक्कल नाही. एव्हध मिळाल होतं बहुमत तर सत्तेत बसुन दाखवायच होतं, काय मिळणार आहे टेबल बडवुन देव जाणे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 11/13/2014 - 02:06 नवीन
आवडली !!!
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 11/13/2014 - 07:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
न
नाखु गुरुवार, 11/13/2014 - 07:36 नवीन
टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा
लई म्हंजे लई बेष्ट!!!
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 11/13/2014 - 07:40 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 11/13/2014 - 07:41 नवीन
आवडेश एकदम
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 11/13/2014 - 08:01 नवीन
मस्तच... मातोश्रीवर जमले सगळे फसलेल्या बैठकीतले हे मावळे ? कोण कुठला अफजलाखान तो कात्रजात सापडलेल्यांना समजेना... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/13/2014 - 08:10 नवीन
आहा!!! मस्ताड बे एकदम.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 11/13/2014 - 08:17 नवीन
हाय्च्च्य्यान कडक ! मस्त !
  • Log in or register to post comments
ह
होकाका गुरुवार, 11/13/2014 - 09:42 नवीन
शॉलिट्ट कवन! कुणीतरी व्याघ्रसैनिक हे वाचतायत का? अरे कुठे नेऊन ठेवलीये आमची व्याघ्रसेना? डरकाळी विझली, उरलाय नुसता आक्रस्ताळेपणा!!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/13/2014 - 09:47 नवीन
सगळ्या बातम्या वाचून जाम डोकं उठलंय. जबरदस्त लिहिलंस, पण हे ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं ते डोळे झाकून गप बसलेत सगळे!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास गुरुवार, 11/13/2014 - 11:30 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 11/13/2014 - 11:31 नवीन
सद्यस्थितीवर अचुक भाष्य !!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/13/2014 - 16:28 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/13/2014 - 16:55 नवीन
सद्यस्थितीला चपखल !
  • Log in or register to post comments
ट
टिवटिव गुरुवार, 11/13/2014 - 22:20 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/15/2014 - 08:13 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा