साचेबंद बुध्दिबळ ?
आनंद वि॰ कार्लसन यांचा प्रत्येक डाव नंतर पुन्हा खेळून पाहतोय. इथे खेळाडूची पहिली खेळी झाली की लगेचच सिसिलिअन, फ्रेँच, ग्रंडफिल्ड, इत्यादी सुरवात/ रक्षण पध्दती अशी टिप्पणी येते. कम्प्युटर आणि महालढवैये त्याचे बरोबर-चूक विश्लेषण करून पुढील खेळी कोणती खेळणार हे सुचवतात बहुतेक तीच चाल चालली जाते. बुध्दिबळ हा खेळ आता इतक्या साचेबंद अवस्थेत पोहोचला आहे का?खेळाडू आता वेळेशी जमवून घाईने खेळताना चुकला की डाव घसरून हारतो. खेळातले वैविध्य हरवत चालले आहे असं वाटू लागतं.
राजा -गुलाम आणि वजीराच्या जोडीला रंभा ही मानवी मोहरी वाढवायला हवीत आणि पट १० चौकडीँचा करावा.
गुलाम:याचा एकवेळा बळी देऊन एकदा शह निष्क्रिय करता येईल.
रंभा:शत्रुपक्षाच्या वजीराच्या संपर्कात आल्यास एक खेळी वजीर निष्क्रिय होईल. एक खेळी गमावण्याच्या बदल्यात रंभेला पटावरून काढता येईल.
गुलाम आणि रंभेचे गणित करताना कम्प्युटर बहुतेक चुकेल.
तुमच्या आणखी काय कल्पना आहेत ?
रंभा:शत्रुपक्षाच्या वजीराच्या संपर्कात आल्यास एक खेळी वजीर निष्क्रिय होईल.रंभेची नेमणूकः मजेशीर कल्पना आहे! फक्तः इंग्लिश मधल्या बुद्दीबळात मध्ये वजीर नसतो, त्याला क्वीन म्हणतात! :-)