Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हेल्मेटसक्ती

प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 11/13/2014 - 05:01
🗣 360 प्रतिसाद
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

प्रतिक्रिया द्या
136542 वाचन

💬 प्रतिसाद (360)
न
नितिन थत्ते गुरुवार, 11/13/2014 - 05:38 नवीन
पुण्यातल्याच लोकांना हेल्मेट घालण्याचे वावडे का आहे हा प्रश्न मला नेहमी पडतो. देशातल्या बहुतेक शहरांत हेल्मेटसक्ती लागू आहे आणि तिथे असा ओरडा होत नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस गुरुवार, 11/13/2014 - 06:07 नवीन
१०००% सहमत. सक्ती विरोधात आंदोलने वगैरे कैच्याकै वाटलं होतं मला तरी. अपघाताला कारणीभूत इतर बाबींकडे लक्ष द्या असे सरकारी लोकांना का सांगतात पुणेकर? इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती. नुसता दम देऊन भागत नाही म्हटल्यावर चाबूकच काढावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/13/2014 - 06:12 नवीन
इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती. बाकी काहीही असो. या वाक्याला कडकडून टाळ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/13/2014 - 10:07 नवीन
पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती.
पुण्यात वाहने चालवतांना शिस्त म्हणजे काय रे भाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सूड Tue, 11/25/2014 - 14:03 नवीन
१) समोर लाल सिग्नल दिसत असतानाही आपले वाहन पुढे दामटणे. २) उजवीकडे वळण्याचा सिग्नल दिला असेल त्याला उजवीकडूनच ओव्हरटेक करणे. ३) दोन बाईकचालकांनी आपल्या गाड्या समांतर चालवत सारसबागेत चालत असल्या सारख्या चकाट्या पिटणे. ४) ऐन गर्दीच्या वेळी काकांच्या मागे बसलेल्या काकूंनी 'अहो हेच ते दुकान, हेच ते दुकान' बोंबलत आहे त्या क्षणी गाडी डावीकडे वळवायला लावून काकांचा आणि मागून येणार्‍या वाहनचालकांचा अंदाज चुकवणे. ५) सिग्नल सुटायला पाचेक सेकंद शिल्लक आहेत हे माहीत असूनही निवांत मोबिल्यावर बोलत बोलत रस्ता ओलांडणे आणि सिग्नल सुटला की जत्रेत चुकल्यासारखे इकडे पळू का तिकडे पळू असा आविर्भाव आणत स्वत:सोबत इतरांनाही गोंधळात टाकणे. आणखीही अनेक गोष्टी पुणेकर आपला वडिलोपार्जित हक्क असल्याप्रमाणे करत असतात. नसत्या सुक्या मिजाशी शिकाव्यात तर या लोकांकडून. आता पाण्यात राहून माशाशी वैर का करा म्हणून गप्प बसावं लागतं, पण वाहतुकीची बेशिस्त पाह्यली की देवाने केवळ शिक्षा करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर दहा छड्या मारुन एक मोजावे आणि अशा दहा छड्या माराव्या इतका राग येतो. :( म्हणजे पुन्हा गाडीवर बसताना छड्या आठवून तरी असले उपद्व्याप होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
सुनील गुरुवार, 11/13/2014 - 05:52 नवीन
त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत
हेल्मेट सक्ती आणि वाहतुकीचे नियम हे म्युच्युअली एक्स्क्लुसिव असतात काय? दोहोंची अंमलबजावणी एकाच वेळेस करता येत नाही काय?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/13/2014 - 06:02 नवीन
मुद्दा प्राधान्यक्रमाचा आहे. शिवाय धाग्यातील इतर मुद्द्यांचाही विचार केला पाहिजे नुसता शब्दच्छल करुन उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 11/13/2014 - 06:11 नवीन
कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हणतात. वैयक्तीक सुरक्षेचा आग्रह प्रथम धरा. तुम्ही अन्य लोकांच्या सुरक्षीततेचा विचार पहिला करत आहात जे योग्य आहे पण प्राधान्यक्रम चुकला आहे. जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्‍यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल. शेवटी स्वतःचे सिर सलामत तो डोक्यात विचार पचास.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/13/2014 - 06:17 नवीन
जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्‍यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल. हल्ली पुण्यात अश्याच प्रकारे गाडी चालवावी लागते... जरा इस्काटून... पुण्यात गाडी चालवताना, स्वतः नियम पाळण्याची जेवढी खबरदारी घ्यावी लागते, त्यापेक्षा अधिक "दुसरा कोणीतरी नियम मोडणारच आहे तेव्हा तिकडे ल़क्ष देवून अपघात टाळण्याची खबरदारी घ्यावी लागते.", हा स्वानुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
असंका गुरुवार, 11/13/2014 - 12:25 नवीन
+१ अगदी अगदी... सिग्नल हिरवा झाला तरी दोन्ही बाजूंना बघून मगच गाडी चौकातनं न्यावी हे योग्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विटेकर गुरुवार, 11/13/2014 - 06:23 नवीन
मी पुण्यातच रहातो आणि मला कॉलेजला मोटारसायकल घेऊन जाणारा मुलगा आहे. कितिही कंठशोष केला तरी तो हेल्मेट घालत नाही आणि याचा मला प्रचंड त्रास होतो. त्यामुळे या हेल्मेट सक्तिचे मी मनापासून स्वागत करतो , त्यातून एखाद्या कारखानादाराचा लक्षावधी - कोट्यावधी कोटी रुपयांचा फायदा झाला तरी मला आनंदच होईल. ( दुसर्‍याला मिळणार्‍या पैशाविषयी मला अजिबात असूया वाटत नाही ) एका मित्राचा हाता तोंडाशी आलेला तरुण मुलगा केवळ हेल्मेट नसल्याने जीव गमावून बसला , हे दु:ख मी आयुष्य भर विसरणार नाही. हेल्मेट्ला विरिध करणारे पुणेकर केवळ आत्मघातकी नसून समाज कंट्क आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. कशाला विरोध करावा याचा काही सारासार विचार आहे की नाही ?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 11/13/2014 - 06:31 नवीन
>>कशाला विरोध करावा याचा काही सारासार विचार आहे की नाही ? "प्रत्येक बाबतीत मतभेद....."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/13/2014 - 06:35 नवीन
>>हेल्मेट्ला विरिध करणारे पुणेकर केवळ आत्मघातकी नसून समाज कंट्क आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.<< अहो विरोध हेल्मेटला नाहीच आहे. विरोध सक्तीला आहे. माझा धागा नीट वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/13/2014 - 10:08 नवीन
सरळ सांगून ऐकतील ते पुणेकर कुठले? प्रत्येक गोष्टीत स्वःताची मते असणे हे पुणेकर असल्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/13/2014 - 10:12 नवीन
प्रत्येक गोष्टीत स्वतःचे विरोधी मत असणे हे पुणेकर असल्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. - असे पुलं म्हणतात, आम्ही नाही. तेव्हा ज्यांना ही व्याख्या पसंत नाही त्यांनी अगोदर व्हाया ओंकारेश्वर स्वर्गात जाऊन भाईकाकांशी बोलून यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ए
एस गुरुवार, 11/13/2014 - 10:58 नवीन
उगाच कुठल्याही गोष्टीत पुणेकरांचे पुणेरीपण काढणे हे बेकारीचे दातकोरक लक्षण आहे. हेल्मेटसक्ती आणि वाहतुकीच्या सर्व नियमांच्या सक्तीला संपूर्ण पाठिंबा देणारा कट्टर पुणेकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/13/2014 - 11:01 नवीन
आम्ही पुणेरीपण काढले नाही, तर पुलंप्रणीत पुणेकरांच्या व्याख्येचा उल्लेख मात्र केला. ती व्याख्या अंमळ चुकीची सांगितली होती म्हणून तो मिसिंग एक शब्द सांगितला इतकेच. अन्यथा टीचभर पुण्यातील चिमूटभर पुणेकरांचे पुणेरीपण काढण्याइतका बोरिंग प्रकार आम्ही कशाला करू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस गुरुवार, 11/13/2014 - 11:30 नवीन
सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून मावून कितीशी लोकसंख्या मावणार नाहीतरी? त्यामुळे सूर्याला दगड मारण्याचे कपाळमोक्षी प्रकार बाकीच्यांनी करू नयेत यासाठीच आम्हीही प्रतिसाद दिला होता. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/13/2014 - 11:36 नवीन
सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून मावून कितीशी लोकसंख्या मावणार नाहीतरी?
पाताळही उलटे पाहिल्यास शिखराइतकेच वर दिसते, तेव्हा बरोबरच आहे ते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस गुरुवार, 11/13/2014 - 11:50 नवीन
पाताळही उलटे पाहिल्यास शिखराइतकेच वर दिसते, तेव्हा बरोबरच आहे ते.
काय माहीत ब्वॉ... पुणेकरांना पाताळात काय आहे हे खाली वाकून पाहण्याची सवय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पगला गजोधर गुरुवार, 11/13/2014 - 12:30 नवीन
बाकी प्रकाशमान स्वर्गातून, अंधकारमय पाताळात पाहिल्यावर काय दिसणार म्हणा, वटवाघळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
य
यसवायजी गुरुवार, 11/13/2014 - 07:41 नवीन
तुमचा मुलगा हेल्मेट वापरत नाही ही त्याची चुकच आहे. मी स्वतः एकदा युन्वर्सीटी रोडवर बेक्कार आपटलो होतो, हेल्मेट असल्याने किरकोळ खरचटण्यावर निभावलं होतं. पण... सक्तीला माझा विरोध आहे. समजा तुमचा मुलगा अभ्यास सोडून दिवसभर गेम खेळत बसतो, तर तुम्ही गेमींगवर बंदी आणावी म्हणाल काय? जर एखादा सगळे नियम पाळतो, गाडी सावकाश चालवतो, पण काही कारणांनी त्याला हेल्मेट वापरायचे नाही तर का सक्ती? उगाच का दुसर्‍यांना त्रास द्यायचा? हेल्मेट वापरल्याने काहींना व्यवस्थीत दिसत नसेल, काहींना मानेचे त्रास असतील, टक्कल पडेल अशी भिती असेल. ;) , कणेकर म्हणतात तसा आंबाड्याचा प्रॉब्लेम असेल, किंवा काहीही हळक्षज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/13/2014 - 10:11 नवीन
जर एखादा सगळे नियम पाळतो, गाडी सावकाश चालवतो, पण काही कारणांनी त्याला हेल्मेट वापरायचे नाही तर का सक्ती? उगाच का दुसर्‍यांना त्रास द्यायचा?
त्या सगळे नियम पाळून गाडी हळू चालवणार्‍याला एखादा बेशिस्त पुणेकर कारवाला जाऊन धडकला तर मरेल कोण शिस्तित चालणारा का बेशिस्तित चालवणारा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी गुरुवार, 11/13/2014 - 10:23 नवीन
हेल्मेट न वापरता मेला तर त्याच्या चुकीने मेला. आपण त्रास करुन घ्यायचाच नाही. जागरुकता एकीकडे आणी सक्ती दुसरीकडे. दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी घातली तर समजू शकतो की, त्यामुळे दुसर्‍याच्या जिवाला धोका आहे. एखाद्याने हेल्मेट न वापरल्याने इतरांना काय त्रास होतो म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/13/2014 - 10:32 नवीन
हेल्मेट न वापरता मेला तर त्याच्या चुकीने मेला. आपण त्रास करुन घ्यायचाच नाही.
वा वा, हे विचार ऐकून पुणेकरांच्या संवेदनशीलतेचा अंदाज आला.
जागरुकता एकीकडे आणी सक्ती दुसरीकडे.
इतके दिवस जागरुक करण्याचे प्रयत्न काय कमी झाले, तेव्हा झोपले होते कां? आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या?
दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी घातली तर समजू शकतो की, त्यामुळे दुसर्‍याच्या जिवाला धोका आहे.
चला हे तर मान्य आहे म्हणायचे नाहीतर वरच्याच विधानाचा आधार घेऊन हे ही म्हणाल मला दारु प्यायचीये, पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने.
एखाद्याने हेल्मेट न वापरल्याने इतरांना काय त्रास होतो म्हणे?
नीट वाचा इतरांबद्दल बोललोच नाहीये, हेल्मेट न वापरणार्‍याबद्दच्च बोलतोय, तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर? जरा तर कॉमन सेन्स वापरा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी गुरुवार, 11/13/2014 - 11:22 नवीन
आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या? पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच? (जाताजाता- माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो). पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने. हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या. तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर? हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच. जरा तर कॉमन सेन्स वापरा की. यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/13/2014 - 15:25 नवीन
पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच?
सक्तीला विरोध हा दंड भरावा लागतोय म्हणूनच होत आहे नाहीतर इतकी आदळाआपट झाली असती अस वाटत नाही. अर्थात हे माझं वैयक्तिक मत.
माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो
चांगली गोष्ट आहे. वापरत जा चांगल असतं. :)
हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या.
वाद मी घालतच नाहीये. तुमच्या त्या आधिच्या विधानचा आधार घेऊन मी ते म्हणालो होतो, प्रतिसाद पूर्ण वाचलात तर आपल्याला ते लक्षात येईल.
हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच.
म्हणूनच ती सक्ती आहे. हेच म्हणायचे होते.
यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.
हेल्मेट सक्तीचा विरोध हाच मुळी कॉमन सेन्स च्या विरुद्ध आहे असे मला ध्वनित करावयाचे होते. त्यात तुम्हाला वैयक्तिकरित्या काहीही म्हणायचे नव्हते. तसा समज माझ्या विधानातून झाला असल्यास क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
प
पिवळा डांबिस गुरुवार, 11/13/2014 - 08:07 नवीन
कितिही कंठशोष केला तरी तो हेल्मेट घालत नाही आणि याचा मला प्रचंड त्रास होतो.
मोटारसायकलचे पैसे जर तुम्ही भरलेले असतील तर सरळ चावी काढून घ्या आणि बस पकडून जा म्हणून सांगा... चार-आठ दिवस नखरा करेल पण नंतर गुमान तुमच्या डोळ्यासमोर तरी हेल्मेट घालून जाइल... आता तुमच्या डोळ्याआड काय करेल ते सांगता येणार नाही, पण ते त्याचं नशीब. तुमचा मनस्ताप तरी थांबेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
कपिलमुनी गुरुवार, 11/13/2014 - 10:09 नवीन
कडक व्हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विटेकर गुरुवार, 11/13/2014 - 06:30 नवीन
ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कळवळा ? हेल्मेट सक्तिच काय , सरकारला जनतेच्या कोणत्याच गोष्टिविषयी कळवळा नाही ,म्हणून मग सगळेच नियम धाब्यावर बसविणार का ? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? असू देत की ! सरकार ने आपल्या जवळच्या अनेकांचे अनेकवेळा भले केले आहे तेव्हा नाही तुमच्या पोटात दुखले ? आणि तुम्ही बनवा की स्वस्त , टिकाऊ , आय एस आइ मार्क वाले हेल्मेट ? कुणी मना केली आहे का ? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? नाही , पण जीव वाचण्याची , कमी इजा होण्याची शक्यता वाढते. छत्री बाळगल्याने पाऊस थांबत नाही , तुमचे डोके भिजत नाही.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 11/13/2014 - 10:12 नवीन
१००००००% बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/13/2014 - 12:49 नवीन
*good*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मदनबाण गुरुवार, 11/13/2014 - 07:27 नवीन
चक्क प्रकाका लिहते झाले ! ;) माझे मत :- आत्ता पर्यंत माझे दुचाकी चालवताना अनेक अपघात झाले आहेत ! २ रिक्षांच्या मधे येउन हवेत सुपरमॅन जसा उडावा तसा उडुन अपघात, ट्रकला मागुन ठोकर देउन अपघात, टोलनाक्यावर दुसरा वायझेड दुचाकीस्वार अचानक तिरपा आल्यामुळे झालेला अपघात,वायझेड रिक्षावाल्याने वेगाने रिक्षा दामटवुन समोर अचानक खड्डा दिसल्याने करकचुन ब्रेक दाबल्याने रिक्षा ९० अंशात वळल्याने झालेला माझा अपघात आणि इतर... या सर्व अपघातात माझं टकुरं केवळ आणि केवळ हेल्मेट वापरल्यानेच अजुन फुटलेले नाही ! आणि आमचे हे अपघाती पराक्रम आमच्या तिर्थरुपांना माहित असल्याने चुकुन सुद्धा हेल्मेट शिवाय दुचाकी चालवण्यास सोडत नाहीत. निष्कर्ष :- हेल्मेट शिवाय दुचाकीचा प्रवास म्हणजे यमाच्या रेड्यावर लवकर बसण्याचा खुला परवाना आहे. प्रश्नाचे उत्तर :- हेल्मेट सक्ती का असुन नये ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 11/21/2014 - 18:43 नवीन
रिक्शा वाल्यांना तर xxxxx.. ता.क. पुढची दंगल कधी आहे हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
वेल्लाभट गुरुवार, 11/13/2014 - 08:11 नवीन
न सांगून कळत नाही मग सक्ती होणारच. नियम आला की सक्ती अलिखित आलीच. हेल्मेट मुळे'च' अपघात टळत नसले तरी हेल्मेट मुळे जीव वाचतो. वाहतुकीचे इतर नियमही महत्वाचे आहेत व पाळायला हवेतच. उगाच विरोघाला अर्थ नाही. मदनबाण म्हणाले ते एक नंबर आहे.
प्रश्नाचे उत्तर :- हेल्मेट सक्ती का असू नये ?
म्हणजे, उकडतं, की सुंदर चेहरा झाकला जातो, की दिसत नाही नीट, की कंटाळा येतो, की भार पेलवत नाही, की ट्रेन्डी हेलमेट मिळत नाहीत, की काय? प्रॉब्लेम काय आहे हेल्मेट घालायला? वरीलपैकी काहीही कारण असेल तरी ते सबळ नाही. असो. मी हेल्मेट सक्तीच्या समर्थनात.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 11/13/2014 - 08:32 नवीन
हेल्मेट पण सक्तीचे आणि हेलमेट सक्ती पण योग्य आहे. तुम्ही जे बाकीच नियम म्हणत आहात.. ते हेल्मेट घालुन पण पाळता येतातच ना ? सर्वच नियम पाळले पाहिजेत वाहुतकीचे असे माझे म्हणणे आहे. पुण्यात असुनही मी ९९ % नियम पाळतोच पाळतो.. आणि १ % मागील वाहणांच्या हॉर्ण मुळे मला सिग्नल तोडावा लागतो. उद्या शिक्षण सक्ती केली म्हणुन का कोणी त्याविरोधात पण आंदोलन करणार आहे.
रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय
रस्त्यावर होणार्या अपघातामध्ये हेल्मेट मुळे डोक्याला मार लागु नये म्हणुन हेल्मेट असते, अपघात न होण्यासाठी हेल्मेट नसते.
हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?
उत्पादक त्यांच्या माल खपवणारच असतात, त्यांचा फायदा होउ नये असेच जर आपल्याला वाटत असेन तर आपण बाईक उत्पादकांच्या विरोधात जावुन बाईकच घेतली नाही पाहिजे असे म्हणण्यासारखेपण आहे. होउद्या त्यांचा फायदा, आपला काही तोटा तर नाही ना . सुरक्षेसाठी विमा काढतो, यात त्या विमा कंपणीचा पण फायदा असतोच ना, फुकट का सुरक्षा मिळते. पोलिस हे सरकारी कामगार आहे, त्यांना सर्व गुन्हांवरच लक्ष दिले पाहिजे, ट्राफिक पोलीस वेगळे असतात. जागरुक मन .. सुरक्षित प्रत्येक क्षण.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 11/13/2014 - 09:02 नवीन
हो ना, आणि हितसंबंध जपायला हेलमेट?? अहो त्यासाठी मोठ्या गोष्टी आहेत जमीन, सामाजिक बांधकाम, इत्यादी अनेक. हेमलेट इज टू चीप अ थिंग टू मेक एनिवन रिच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
आ
आशु जोग गुरुवार, 11/13/2014 - 08:35 नवीन
इतर गुन्ह्यात आपल्या चुकीमुळे इतरांचा जीव जातो. हेल्मेट न घातल्याने इतरांचा जीव जात नाही. अर्थात हेल्मेट न घालणे हा गुन्हा तरी मानायचा का हा प्रश्नच आहे
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 11/13/2014 - 08:59 नवीन
हेल्मेट घालुन जर दुचाकी नी सुरक्षापट्टा लावुन चारचाकी चालवली तर त्यात चालवणार्‍याचीच सुरक्षा आहे. त्याचं काय आपल्यात मुडद्याला, हार घातलेल्या फोटोला हेल्मेट घालायची नी सुरक्षापट्टा लावायची सक्ती नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/13/2014 - 09:15 नवीन
शहरात रस्त्यांचे क्षेत्रफळ,संख्या,पादचारी पथ, पार्किंग या बाबी पण वाहतुक शास्त्राच्या नियमानुसार करा ना!. माझा मुळ मुद्दा हेल्मेटच्या सक्तीबाबत आहे उपयुक्ततेबाबत नाही. तसेच तो वाहतुक समस्येच्या निराकरण करण्यासाठी असलेल्या प्राधान्यक्रमाबाबत आहे
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 11/13/2014 - 09:43 नवीन
नियम विदाउट सक्ती कसा काय असू शकतो ब्वा? की म्हणजे बघा बाबा हेल्मेट चा पर्याय आहे... घातलात तर गुडबॉय, नाही तरी ठीक आहे इट्स युअर चॉइस नाही का आफ्टरऑल.... असं अपेक्षित आहे का तुम्हाला? हे प्लीज समजवलंत तर बरं होईल. पण सक्ती नाही हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/13/2014 - 10:36 नवीन
नियम विदाउट सक्ती कसा काय असू शकतो ब्वा?
नाही ना असू शकत म्हणुन तर सक्तीला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने नियम रद्द करणे हा पर्याय आहे.ज्यांना हेल्मेट वापरायचे आहे त्यांना कुणी ना म्हटले नाही. त्यांना ती मुभा आहेच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
काळा पहाड Fri, 11/21/2014 - 18:45 नवीन
आमचा नियम रद्द करायला विरोध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/13/2014 - 09:34 नवीन
हेल्मेट सक्ती करावी लागते, त्याविरुद्ध आंदोलने होतात, 'हेल्मेट सक्ती अजिबात असता कामा नये' असे मुद्दे अगदी हिरीरीने मांडले जातात ह्याचेच सखेद आश्चर्य वाटते. दुचाकी चालकाची सुरक्षा ही प्राधान्याने महत्वाची आहे. सक्ती नसतान, कायदा नसतानाही हेल्मेटचा आग्रह स्वतः दुचाकीस्वारानेच धरला पाहिजे. मस्कतमध्ये ४८ ते ५२ डिग्री तापमानातही हेल्मेटचा नियम सर्वच जणं पाळतात. मी स्वतः वापरलेले आहे. कांही विशेष घाम येत नाही किंवा उकडत नाही. आणि जरी उकडले, घामाच्या धारा लागल्या आणि टक्कल पडले तरीही मी वापरलेच असते कारण माझी सुरक्षा अग्रक्रमाने आहे. माझा मुलगा गेली अनेक वर्षे हेल्मेट वापरतो आहे. (४ हरविली/चोरीला गेली तरी नविन घेऊन वापरतो). सर्वात साध्या अपघातात पडताना जर डोके जमिनीवर/दगडावर आपटले तर तात्काळ मृत्यू येऊ शकतो. गेल्याच आठवडयात माझ्या वहिनीचा, असाच दुचाकीवरून पडून (भाऊ दुचाकी चालवत होता) मृत्यू झाला. अर्थात ती सुद्धा हेल्मेट वापरत नसणारच. (भावाचा स्वभाव मला माहित आहे). पाऊस पडत होता आणि भावाच्या मागे छत्री धरून बसली होती. पाऊस पडत असल्याने दुचाकीचा वेगही जास्त नव्हता. छत्रीत वारा शिरल्याने तोल गेला आणि कांही कळायच्या आतच रस्त्यावर पडली. ती पडल्याचे भावाला कळलेही नाही. रस्त्यावरच्या इतरांनी त्याला सांगितले. तातडीने तिला हॉस्पिटलात पोहोचविले. पण मेंदूला दुखापत झाल्याने बिचारीचे निधन झाले. हेल्मेट असते तर नक्कीच वाचली असती.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 11/13/2014 - 18:46 नवीन
वारजे पुलाखालची घटना सांगताय का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/13/2014 - 22:20 नवीन
होय. तिथेच घडला हा अपघात. कुठल्यातरी वर्तमानपत्रातही बातमी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
थ
थॉर माणूस गुरुवार, 11/13/2014 - 09:42 नवीन
पण मला मुळात हेच कळले नव्हते की आंदोलन, विरोध वगैरे कशासाठी करत आहेत ही मंडळी? वाहतुकीचे नियम पाळणे हा प्रकार तसाही यांना जमत नाही. मग त्यात अजून एक नियम वाढला तर काय फरक पडतो? यांच्या ऐवजी सरकारनेच यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला पाहिजे... वाहतूकीचे इतर सर्व नियम प्राधान्यक्रमाने पाळून दाखवलेत तर हेल्मेटसक्ती लगेच बंद करतो. मग पुढच्या १०० एक वर्षांची निश्चिंती.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 11/13/2014 - 10:07 नवीन
अतिशय पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
ह
हाडक्या गुरुवार, 11/13/2014 - 11:05 नवीन
च्या ऐवजी सरकारनेच यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला पाहिजे... वाहतूकीचे इतर सर्व नियम प्राधान्यक्रमाने पाळून दाखवलेत तर हेल्मेटसक्ती लगेच बंद करतो. मग पुढच्या १०० एक वर्षांची निश्चिंती.
याला पूर्ण अनुमोदन..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
व
वेल्लाभट गुरुवार, 11/13/2014 - 09:46 नवीन
माझ्या चांगल्या मित्राचा सख्खा भाऊ नुसता हळू असलेल्या बाईक वरून पडला, हेलमेट अर्थातच नव्हतं. गेला. अशा गोष्टी प्रतिसादांमधे वाचतोय आणि खूप वाईट वाटतंय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा