Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला पडलेले काही गंभीर काही चिल्लर व काही किंचीत थिल्लर प्रश्न

म
मारवा
Fri, 11/14/2014 - 05:51
🗣 80 प्रतिसाद
१-चांगली अत्तरे मुंबईत कुठे मिळतात. चांगल्या सुंगधाची पारख कशी करावी. कुठला सुगंध पुरुषाला धुंद करतो ? अरोमा थेरेपी मध्ये वापरलेली तेले मिळण्याचे रीलायबल ठीकाण मुंबई त कुठले ? त्यातील कुठले स्ट्रेस बस्टर म्हणुन उत्तम असते ? सर्वोत्तम अगरबत्ती कुठली ? ऑथेंटीक मेलीस्सा ऑइल कुठे मिळेल ? कसे ओळखावे ? २-मकाऊ व लासवेगास मधील कॅसिनोमधील जुगाराची सर्वात कॉम्प्लेक्स मशीन कुठली? जुगाराचा सर्वात चॅलेंजींग गेम कुठला ? का ? कसा खेळला जातो ? त्यात मानवी क्षमतेचा रोल कितपत असतो ? ३-ब्रायडल (नववधु श्रुंगार) मेकअप चे पॅकेजेस कीती किमंती पर्यंत हायएस्ट जाउ शकतात ? त्यात नेमक्या कुठल्या सौंदर्यवृद्धी प्रक्रीयांचा स्टेप्स चा समावेश केला जातो (या मध्ये कमालीची गुप्तता पाळली जाते म्हणुन आपलं एक कुतुहल वाढल ) ४-मराठी अभिनेत्रींमध्ये स्तंभलेखनाची (वा लेखनाची) परंपरा जुनी आहे का ? त्यात कोणकोण आहे? उदा. गेला बाजार स्मिता पाटील सद्य बाजार स्प्रुहा जोशी अजुन कोण आहेत? मराठी अभिनेत्रींना ललित च का लिहावेसे वाटते? काय प्रेरणा आहे या मागे ? ५-ब्रह्मकुमारी मध्ये माऊंट अबु च्या हेडक्वॉर्टर मध्ये शिवबाबा एका मोठ्या कार्यक्रमात मुख्य स्त्री च्या अंगात संचार करतात व त्यानंतर शिवबाबांचा विवाह दुसर्या ब्रह्मकुमारीं शी लावला जातो हा काय प्रकार आहे नेमका ? या मागे काय भावना आहे ? यानंतर त्या ब्रह्मकुमारीच्या जीवनात नेमके काय बदल होतात ? बह्मकुमारी ची याबाबत काय स्पष्टीकरण असतात ? ६-बाबा सेहगल , सुनिता राव ( परी हु मै), सिल्क रुट ग्रुप,(डुबा डुबा रहता हु) इला अरुण,(सरसो के खेतो मे पहला उजाला ) हे पक्षी एन्डेनजर्ड स्पेसीज म्हणुन घोषीत झालेत की यांचा डोडो झालाय ? हे कुठे आहेत ,काय करतात, दैनंदिन खर्च कसा भागवत असतील ? यांना परत कधी तरी (इंडीपॉप चा गोल्डन एज संपल्यानंतर) कधी कंठ फ़ुटला होता का ? आणि हो ते सय्योनी, हसन जहांगीर (हवा हवा )कुठे आहेत सध्या ? हे का संपले व जे टिकले (शान-सोनु आदि) ते का टिकले ? ७-पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिउन मिळतो ?त्याचे चांगले कापड व शिंपी मुंबईत कुठे आहेत? व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ? याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो? ८-इम्पीरीयल ब्ल्यु चा खल पुरुष (जो अनंत काळाने तसाच आहे व तसाच राहणार असे जे सुचित केले जाते )ते पुरुषाचं खर चित्र आहे कि रेमंड चा पुर्ण पुरुष हा खरा पुरुष आहे ? की तो नुसताच एक पोकळ आदर्श आहे ? कि खरा पुरुष तिसरच काही तरी मिश्रण असतं जे अजुन या दोघा जाहीरातदारांना दाखवण्यात अपयश आलेलं आहे? या संदर्भात डिओड्रंट मधील पुरुषी क्षमतांच जे चित्रण आहे ते अतिरेकी आहे की वास्तव ? ९-मे,पु,रेगें नी एक दिर्घ मुलाखत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीं जोशीं ची व मंगेश पाडगावकरांनी एक मुलाखत श्री,पु.भागवतांची घेतलेली आहे, या दोन्ही मुलाखती अत्यंत मार्मिक आहेत असा उल्लेख अनेक ठीकाणी रीपीट झालेला वाचला. या मुलाखती कोणाकडे आहेत का ? कुठल्या पुस्तकात आहेत ? कुठे उपलब्ध होतील ? नुकतीच एक मुलाखत विंदा करंदिकरांची विजया राज्याध्यक्षांनी घेतलेली वाचल्यानंतर वरील भुक नव्याने वाढली. १०-माझे आवडते मराठीतले महान मुलाखत कार राजु परुळेकर सध्या कुठे आहेत? त्यांच काय चाललय? त्यांचा एखादा कार्यक्रम कुठल्या वाहीनीवर चालु आहे का सध्या ? त्यांनी आयडीयाज आर डेंजरस नंतर अजुन काहि लिहीलय का? ११- इनसेक्ट्स स्मगलींग मध्ये कुठल्या कीटकांच स्मगलींग सर्वात जास्त होत ? त्यांची किंमत कीती पर्यंत जाते ? यात कुठल्या विषयातील तज्ञ कीटक ओळखण्यासाठी लागतो ? भारतात यापैकी कुठले कीटक उपलब्ध आहेत ? भारतातुन कुठुन हे कीटक गोळा केले जातात ? १२ -सुथबी, ख्रिस्तीज सारख्या लिलाव करणारया कंपन्या एखाद्या वस्तुच्या एन्टीक व्हॅल्यु ची मुल्यनिश्चीती कशी करतात ? यासाठी कुठले निकष वापरले जातात? विशेषत: चित्रांची व्हॅल्यु कशी ठरविली जाते? कुठल्या घटकांवर बोलीची मिनीमम किंमत ठरविली जाते ? म्युझियम मध्ये क्युरेटर नावाचा जो मनुष्य असतो ? तो नेमक काय काम करत असतो ? त्याच्या कामाच स्वरुप काय असत ? १३-अक्चुरीअल हा इन्स्युरन्स क्षेत्रामध्ये काय काम करतो ? याचे कोर्सेस असतात का ? हे एक खरच ब्राइट करीअर आहे का ? सनराईज फ़िल्ड आहे का ? याच्या कामाच स्वरुप काय असत नेमकं ? १४-हंसांविषयी जे सांगितल जात की हंसां च जोडपं हे आयुष्यभर एकत्र राहत कधीच एकमेकांना सोडत नाही दो हंसो का जोडा हे नुसतच कविकल्पना आहे की अस खरोखर असत ? हंसांमध्ये व्याभिचार नसतो का ? १५-बोस च्या साऊंड सिस्टीम्स मध्ये घरातील होम थिएटर मध्ये घेण्यासाठी सर्वात चांगली सिस्टीम कुठली आहे ? कुठल मॉडेल आणि काय वैशिष्ट्य आहेत बोस च्या साउंड सिस्टीम्स ची ? म्हणजे कुठल्या बाबतीत हि सिस्टीम उजवी आहे नेमकी ? १६-पुर्वी जत्रेत एक खेळणं मिळायच बांगडीचे रंगीत तुकडे वापरुन व भिंग काच मला वाटत वापरुन त्याच्या एका बाजुला नुसते तुकडे बांगड्याचे असायचे व दुसरया बाजुने फ़िरवुन बघितल काचेतुन की वेगवेगळे अनेक सुंदर पॅटर्न्स सुंदर डिझाइन्सचे दिसायचे हे खेळण कुठे मिळेल? याच नाव काय? हे घरी बनविता येईल काय ? १७ -डेबोनेर मासिका चे जुन्यात जुने अंक कुठे मिळतील त्यातल्या मुलाखती त्यातील सेंटरस्प्रेड इतक्याच इंटरेस्टींग होत्या त्यातील मुलाखतींच कलेकशन असलेलं एखाद पुस्तक आहे का ? किंवा जुने अंक मिळण्याच मुंबईतील ठीकाण कुठल ? १८-काळ्या मुंग्या व्यवस्थित पाळायच्या आहेत कशी माती कसे अन्न काय काय व्यवस्था करावी लागेल ? त्यांची वस्ती कशी डेव्हलप करता येईल ? १९- रांगोळी काढतांना रेषा फ़ार जाड जाड पडतात, त्यासाठी रांगोळी पेन प्लास्टीकचा वापरुन बघितला पण जमत नाही. बारीक रेघ उमटण्यासाठी चिमुट कीतीही हळु सोडली तरी रांगोळी जास्त सांडुन रेघ जाड होते ? यावर काही उपाय आहे का ? प्रॅक्टीस कशी करावी ? की हळुहळु च जमत हे ? पोर्ट्रेट रांगोळी हा काय प्रकार असतो ? २०- बॅलन्सशीट च्या लायबीलीटी साइड ला पहिला हेड कॅपिटल हा इथे का असतो ? ती तर प्रोप्रायटरने केलेली स्वत:ची गुंतवणुक असते. ती लायबीलीटी का म्हणुन धरली जाते ? त्यामागे काय लॉजिक असत ? स्वत:चीच गुंतवणूक ही तर आपली संपत्ती आहे मग ती लायबीलीटी साइड ला कशी येते? ( अकाउंट हा माझा विषय नाही पण हे कुतुहुल कुठलीही बॅलन्सशीट बघितली की उफ़ाळुन येत. आणी एक डिफ़र्ड टॅक्स लायबिलीटी हा नेमका काय प्रकार असतो ? टॅक्स हा असा कायदेशीर रीत्या डिफ़र करता येतो ? म्हणजे काय आहे हे ? २१- मंगलमय क्षणांचे सोबती त्या कालावधीत कल्पनेच्या पातळीवर प्रामाणिक असतात का ? म्हणजे किती टक्के प्रामाणिक असतात ? व वयाचा यात महत्वाचा रोल असतो का ? म्हणजे वाढत्या वयाबरोबर अप्रामाणिकता वाढते का ? २२- राजु परुळेकरांनी एकदा त्यांनी स्वत: दिलेल्या मुलाखतीत एका कवितेचा उल्लेख केला होता ती अफ़्रिकन कविता होती इतकच माहीती आहे.(तो मुलाखतीचा व्हीडीओ नेट वर आहे) व त्यातल इतकच आठवतय. मला प्लिज कुणी ही मुळ कविता पुर्ण देइल का ? मला आठवत असलेल्या मोजक्या ओळींनी मी अजुनही भारावुन जातो. या वयातही माझ्या सरावल्या हातांना कंप सुटु लागतो. ( शब्दांची चुकभुल पुढे मागे देणे घेणे) जगातल शेवटच झाड जेव्हा उन्मळुन पडेल जगातल शेवटच फ़ुल जेव्हा गळुन पडेल जगातील शेवटची नदी जेव्हा सुकुन जाइल जगातला शेवटचा पक्षी जेव्हा गायचा थांबेल अस काय काय येत असत आणि शेवटी अशी काहीशी ओळ येते तेव्हा आणि तेव्हाच माणसाला या निसर्गाची या प्रुथ्वीची किंमत खरोखर कळेल. हि कविता मला पुर्ण हवी आहे अनुवाद इंग्रजी नेटवर कुठे असेल तर हवा आहे. यावरुन च दुसरी एक आठवते. रॉबिन्सन जेफ़र्स नावाचा कवि पृथ्वीला उद्देशुन म्हणतो. डु नॉट वरी ऒ ब्युटिफ़ुल प्लॅनेट ह्युमन रेस इज नॉट इम्मॉर्टल ! सहकार्यासाठी मंडळ आपले आभारी आहे!

प्रतिक्रिया द्या
19251 वाचन

💬 प्रतिसाद (80)
म
मारवा Fri, 11/14/2014 - 19:25 नवीन
२}स्त्रीया गजरा माळतात म्हणुन पुरुषांनी मोगर्‍याचा सुगंध घेउ नये असे थोडीच असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मारवा Fri, 11/14/2014 - 19:26 नवीन
२}स्त्रीया गजरा माळतात म्हणुन पुरुषांनी मोगर्‍याचा सुगंध घेउ नये असे थोडीच असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
र
राही Fri, 11/14/2014 - 09:23 नवीन
मराठीमध्ये केवळ चित्रपट किंवा नाट्यक्षेत्रातले अभिनेते/नेत्रीच नव्हेत तर या क्षेत्राशी संबंधित इतर अनेकांनी आत्मचरित्रपर लिखाण केले आहे. जुन्या काळातले वसंत शांताराम देसाई, गजानन जागिरदार, केशवराव धायबर, लीला चिटणीस, स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, वी.शांताराम(लिहवून घेतलेले), हरिभाऊ मोटे, विश्राम बेडेकर, अलीकडचे श्रीराम लागू, याव्यतिरिक्तही अनेक आहेत. निशिगंधा वाड, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, यांनी मासिके/दैनिकांमध्ये स्तंभलेखन अथवा अतिथी संपादन केले आहे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/14/2014 - 17:32 नवीन
खुपच दिर्घ परंपरा आहे हो आपल्या अभिनेत्रींची लेखनाची सगळ्या गोगोड्ड ललित च लिहीतात मेल्या पण.... एखादि देखील उग्र विषय घेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
आ
आयुर्हित Fri, 11/14/2014 - 17:44 नवीन
अश्विनी भावे (मनोभावे हे सदर)यांना विसरलेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 11/14/2014 - 10:01 नवीन
-पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिउन मिळतो ?त्याचे चांगले कापड व शिंपी मुंबईत कुठे आहेत? व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ? याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो?
पूर्वी दादरला रानडे रोडला लागून जी दुकाने आहेत तेथे अनेक शिंपी बसत.गिरगावात मुगभाट लेन्,भडकमकर रस्त्यावर असली दुकाने होती.पण सध्याच्या पीटर इंग्लंड्,लुइ फिलिपच्या जमान्यात हा असला अवतार करून अत्तर लावून कुठे फिरणार आहेस?(ह.घे.रे)
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/14/2014 - 17:36 नवीन
अग मी हिप्पी होतो एकेकाळी तेव्हा करायचो पुष्कर मध्ये पडिक असायचो अजुनहि ते धुंद दिवस आठवतात मारवा मारिजुआना मध्ये मिसळुन जायचा वुडस्टॉक फेस्टीवल तर असा लक्ख आठवतोय मला जसाचा तसा... आता सुधारलोय आता सिमेट्री आवडते गणितात रस येतो कायद्यांच हि महत्व पटु लागलय, सिस्टीम पाहिजेच जीवनात कशी का असेना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 11/14/2014 - 10:42 नवीन
जे येत होतं तेही विसरलोय.... चांगलं मानधन देत असाल तर करतो तुमच्यासाठी संशोधन. ;-)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 11/14/2014 - 10:59 नवीन
अक्चुरीअल बद्दल मोग्याम्बो याम्ना विचारा
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 11/14/2014 - 11:30 नवीन
हरिहरेश्वरला काही दुकानांमध्ये १२ राशींनुसार १२ वेगवेगळे पर्फ्युमस मिळतात . ज्यांचा राशींवर विश्वास आहे ते त्यानुसार किंवा सहज गंमत/बदल म्हणुन घेतात.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 11/14/2014 - 11:30 नवीन
२०- बॅलन्सशीट च्या लायबीलीटी साइड ला पहिला हेड कॅपिटल हा इथे का असतो ? ती तर प्रोप्रायटरने केलेली स्वत:ची गुंतवणुक असते. ती लायबीलीटी का म्हणुन धरली जाते ? त्यामागे काय लॉजिक असत ? स्वत:चीच गुंतवणूक ही तर आपली संपत्ती आहे मग ती लायबीलीटी साइड ला कशी येते?
Liabilities & Assets ऐवजी Sources & Application of Funds असं (योग्य) नामकरण केल्यास उलगडा होईल.
आणी एक डिफ़र्ड टॅक्स लायबिलीटी हा नेमका काय प्रकार असतो ? टॅक्स हा असा कायदेशीर रीत्या डिफ़र करता येतो ? म्हणजे काय आहे हे ?
VAT Incentive Scheme मधे, काही अविकसित क्षेत्रात इंडस्ट्रीअल डिवेलपमंटसाठी, VAT Collect करुन तो State Loan म्हणून वापरुन नंतर परत करायचा असतो. याला डिफरल म्हणतात. अशी टॅक्स लायबलिटी डिफर्ड टॅक्स म्हणून दाखवली जाते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद प्रसाद Fri, 11/14/2014 - 12:57 नवीन
आणी एक डिफ़र्ड टॅक्स लायबिलीटी हा नेमका काय प्रकार असतो ? टॅक्स हा असा कायदेशीर रीत्या डिफ़र करता येतो ? म्हणजे काय आहे हे ? अकौंट बुक्समधील आणि आयकर कायद्याप्रमाणे आलेला घसाऱ्यातील फरकातून येणाऱ्या डिफर्ड टॅक्स लायबिलीटीबाबत ही हा प्रश्न कदाचित असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आदूबाळ Fri, 11/14/2014 - 13:46 नवीन
बॅलन्सशीट बद्दल एक पुरवणी: अकाऊंटिंग हे "independent entity concept" ने केलं जातं. म्हणजे अकाऊंटिंग करताना व्यवसायधंदा आणि प्रोप्रायटर/प्रमोटर/पार्टनर हे वेगवेगळे व्यक्ती आहेत (independent entities) असं धरलं जातं. प्रोप्रा/प्रमोटर्/पार्टनरने एक्विटी कॅपिटल धंद्यात घातलं म्हणजे धंदा त्या प्रोप्रा/प्र/पा ला ते कधीतरी परत देणं लागतो असा त्याचा तात्त्विक अर्थ आहे. व्यवसायाच्या लिक्विडेशनच्या वेळेला अ‍ॅसेट्स विकून, बाकीची देणी भागवून उरलंसुरलं प्रो/प्र/पा ला परत दिलं जातं. डिफर्ड टॅक्स लायाबिलिटीबद्दलः संक्षी आणि प्रसाद यांनी DTLची दोन उदाहरणं दिली आहेत. यामागचं तत्त्व असं आहे, की अकाऊंटिंग प्रॉफिट (गॅप**नुसार काढलेलं) आणि आयकर कायद्यानुसार काढलेलं प्रॉफिट यात काही कारणांमुळे फरक असू शकतो. सहाजिकच,ती कारणं अनेक असू शकतात - टॅक्स इंसेंटिव्ज (संक्षींचं उदा.), घसारा (प्रसाद यांचं उदा.), आयकर कायद्यानुसार खर्चापेक्षा जास्त मिळणारी वजावट (उदा. रिसर्चसाठी केलेला खर्च), इ. यातले काही फरक कायमस्वरूपी असतात (उदा. रिसर्च) तर काही तात्पुरते असतात (उदा. घसारा). मग या तात्पुरत्या फरकांवरचा टॅक्स हा "डिफर्ड टॅक्स" म्हणून वेगळा दाखवतात. डिफर्ड टॅक्स लायाब्लिटी म्हणजे या फरकांमुळे आज टॅक्स कमी भरलाय, पण तो भविष्यात भरावा लागेल. (डिफर्ड टॅक्स अ‍ॅसेट म्हणजे बरोब्बर उलट) तर टॅक्स हा कायदेशीररीत्या डिफर वगैरे करता येत नाही##. बॅलन्सशीटमध्ये दिसणारी डिफर्ड टॅक्स लायाबिलिटी हा गॅप आणि करकायद्यांतला सेतू आहे. ------ **Generally Accepted Accounting Principles ## भारतात तरी. लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंडसारख्या देशांत मांडवली करून टॅक्स भरणं लांबणीवर टाकता येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मारवा Fri, 11/14/2014 - 17:28 नवीन
आदुबाळ- आपल्या मार्मिक विसृत प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद अकाउंट हा किती इंटरेस्टींग विषय आहे हे लक्षात येतय. मला माझा एक ग्लास टेक्नॉलॉजी विषय सोडुन दुसर काहीच येत नाही याची खंत वाटते इंडिपेंडंट एंटीटी हि खुपच कन्विन्सींग आणि इंटरेस्टींग कन्सेप्ट वाटली पुन्हा एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 11/14/2014 - 18:06 नवीन
धन्यवाद! आणि डेबोनेरच्या जुन्या अंकांसाठी फाउंटनच्या फुटपाथवरील विक्रेत्यांना विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
झ
झकास Fri, 11/14/2014 - 11:38 नवीन
http://new.arvindguptatoys.com/activity/kaleidoscope-magic/
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/14/2014 - 19:55 नवीन
साईट अतिशय सुंदर आहे अनोखी आहे सर्वांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी झकास धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकास
झ
झकास Mon, 11/17/2014 - 05:57 नवीन
अरविंद गुप्ता ह्यांचा TED talk सुद्धा अगदी must watch. http://www.ted.com/talks/arvind_gupta_turning_trash_into_toys_for_learning अंधांसाठी बनवलेला drawing board आणि सगळ्यात शेवटी सांगितलेली गोष्ट एकदम अप्रतिम. एकदा पहाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संजय क्षीरसागर Fri, 11/14/2014 - 11:44 नवीन
२१- मंगलमय क्षणांचे सोबती त्या कालावधीत कल्पनेच्या पातळीवर प्रामाणिक असतात का ? म्हणजे किती टक्के प्रामाणिक असतात ? व वयाचा यात महत्वाचा रोल असतो का ? म्हणजे वाढत्या वयाबरोबर अप्रामाणिकता वाढते का ?
इतकी लांबण लावण्यापेक्षा, पती-पत्नी प्रणयात, काल्पनिक पातळीवर वेगळ्या विश्वात असतात का? शारीरिक आणि मानसिक पातळीवर एकरुप असणार्‍यांचं प्रमाण किती? आणि वय वाढल्यावर त्या एकरुपतेमधे फरक पडतो का? सगळ्यांच उत्तर एकच : जे भोगायचं आहे ते प्रत्यक्षात हजर असावं लागतं हे ज्यांना शेवटपर्यंत कळू शकत नाही; त्यांना आहे ते भोगता येत नाही. आणि कल्पनेतलं भोगण्याचा प्रश्नच येत नाही!
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/14/2014 - 17:22 नवीन
संक्षी प्रश्न थोडा नाजुक , त्यात सामाजिक संस्थळ , त्यात आपण मराठी माणसं, त्यात मी शालीन, त्यात संपादकांची करडी नजर चुकवुन मग काहितरी सांकेतिक तर व्हाव च लागेल ना ? अहो प्रश्न भौतिकच आहे प्रश्न कल्पनेतल्या स्वकीय-परकीय कल्पनाचित्रांसंदर्भातील आहे. कल्पना कल्पनातीत उन्नयन गाठु शकते मात्र मग नैतिकतेचा कुट प्रश्न तेथे उपस्थित होतो कल्पना व वास्तव वेगवेगळे असावे का नसावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 11/14/2014 - 18:59 नवीन
कल्पना कल्पनातीत उन्नयन गाठु शकते मात्र मग नैतिकतेचा कुट प्रश्न तेथे उपस्थित होतो
मूळ प्रश्न नैतिकतेचाच आहे! आणि एकदा प्रश्नाचा भुंगा निर्माण झाला की स्वास्थ्य हरवलं. स्वास्थ्य हरवलं की भोगातली मजा संपली!
कल्पना व वास्तव वेगवेगळे असावे का नसावे
कल्पना एक खेळणं म्हणून उत्तम आहे. पण इच्छा तिच्यावर स्वार झाली की संपलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संजय क्षीरसागर Fri, 11/14/2014 - 11:53 नवीन
१९- रांगोळी काढतांना रेषा फ़ार जाड जाड पडतात, त्यासाठी रांगोळी पेन प्लास्टीकचा वापरुन बघितला पण जमत नाही. बारीक रेघ उमटण्यासाठी चिमुट कीतीही हळु सोडली तरी रांगोळी जास्त सांडुन रेघ जाड होते ? यावर काही उपाय आहे का ? प्रॅक्टीस कशी करावी ? की हळुहळु च जमत हे ?
मुळात रांगोळी अत्यंत बारीक दळलेली हवी. मग ती चिमटीतून सोडण्यावर रेष कमी-अधिक येण्याचं सगळं कौशल्य आहे. माझी पणजी सांगायची की एका चिमटीत, `श्रीराम जय राम जयजय राम' अशी सगळी अक्षरं आली पाहिजेत.
पोर्ट्रेट रांगोळी हा काय प्रकार असतो ?
ते प्रत्यक्ष ऑन साइट पाहा.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/14/2014 - 17:13 नवीन
मी माझ्या प्रश्नांना उत्तरे दिलेल्या सर्व प्रतिसादकांचे हार्दिक धन्यवाद मानतो. तुमच्या उत्तरांनी मला खरोखर मोठा लाभ झाला माझ्या ज्ञानात मौल्यवान भर पडली. अनेक अनेक बाबी नविन माहीती झाल्या कुतुहुल पुर्ण जरी नाही तरी अपेक्षेपेक्षा जास्त शमले. पुन्हा एकदा सर्व उत्तरे माहिती देणारया प्रतिसादकांचे अनेक अनेक आभार ! मंडळ आपले आभारी आहे ( कन्फ्युज्ड अकौटंटा तुझ कनफ्युजन अकाउंट च्या कक्षा भेदुन जात आहे रे, मंडळ आभारी आहे ही एक दैनंदिन महाराष्ट्रीय जीवनातील गमतीची फ्रेज आहे. आगाउ व पावती फाडल्यानंतर च्या गणेश मंडळाकडुन पावती पुस्तकावर व नंतर तोंडात रुळलेले वाक्य आहे. तु यात ही कनफ्युज झालास व मला हे हि एक्सप्लेन कराव लागल याहुन मोठ मराठी माणसांच दुर्देव काय असु शकत ?)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 11/14/2014 - 18:44 नवीन
१८चं उत्तर देईन मी हे केलं आहे. २०चं उ॰ आदुबाळने अगोदरच दिलं आहे. वैज्ञानिक आणि रसिक प्रश्न वेगवेगळे थोडेथोडे विचारलेत तर मारवाजी तज्न सूज्ञ आणि मग्न सर्वांचेच काम सोपे होईल आणि थंडीत शेकोटी न पेटवता उब मिळेल.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 11/14/2014 - 19:08 नवीन
लई मोकळा वेळ आहे राव तुमच्यापाशी :-) थोडा पाठवून द्या जमलं तर! २२: हे quotation आधी वाचलेलं होतं म्हणून पटकन सापडलं, मला माहीत आहे ते असं: “When the last tree is cut, the last river poisoned, and the last fish dead, we will discover that we can’t eat money…” बाकी इतिहास इथे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/14/2014 - 20:08 नवीन
बहुगुणी जी तुमच्याकडे खजिना दिसतोय नेटवर निवडु चांगल काही सारखं खुप सुंदर लिंक थोडीच वाचली निवांत वाचायची साठवुन ठेवली पण बहुगुणी जी राजु परुळेकरांनी जी म्हणुन दाखवली होती ना ती थोडी जास्त ओळींची कविता होती बहुधा एक उल्लेख नक्क्की आठवतो ते म्हणाले होते अफ्रिकन आहे असा मला डाउट आहे ती वेगळी कुठली तरी अफ्रिकन ट्राइबची ( जे निसर्गाच्या सानिध्यात पिढ्यानपिढ्या राहतात व त्यामुळे जी अटॅचमेंट नॅचरल निर्माण होते अशाच कुठल्या तरी कम्युनीटीची ट्रॅडिशनल कविता वा गाण लोकगीत असाव बहुधा) असो मात्र तुम्ही दिलेल्या सुंदर लिंक साठी अनेक धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
म
मुक्त विहारि Fri, 11/14/2014 - 19:34 नवीन
तितकेच छान प्रतिसाद. हसते-खेळते मिपा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 11/14/2014 - 19:44 नवीन
>>> ७-पट्यापट्याचा टीप्पीकल डिझाइनचा मध्यमवर्गीय फ़ेम अभिजात पायजामा मुंबईत कुठे शिउन मिळतो ?त्याचे चांगले कापड व शिंपी मुंबईत कुठे आहेत? व्हेंटीलेशन च्या बाबतीत हा पायजामा वापरण्याचा अनुभव कसा आहे ? याच्या आत हि काही घालाव लागत की तोच पुरेसा असतो? पायजम्यातून व्हेंटिलेशन होत नाही. व्हेंटिलेशनसाठी संघाच्या गणवेषातील अर्धी खाकी विजार सर्वोत्तम. ती मान्य नसेल तर (म्हणजे जातीयवादी अशी शिवी ऐकून घ्यायची नसेल तर) लुंगी, बर्म्यूडा इ. वापरा. आत काही घालणे किंवा न घालणे हे व्यक्तिगत आवडीनिवडीवर अवलंबून आहे. >>> १६-पुर्वी जत्रेत एक खेळणं मिळायच बांगडीचे रंगीत तुकडे वापरुन व भिंग काच मला वाटत वापरुन त्याच्या एका बाजुला नुसते तुकडे बांगड्याचे असायचे व दुसरया बाजुने फ़िरवुन बघितल काचेतुन की वेगवेगळे अनेक सुंदर पॅटर्न्स सुंदर डिझाइन्सचे दिसायचे हे खेळण कुठे मिळेल? याच नाव काय? हे घरी बनविता येईल काय ? याला शोभादर्शक किंवा कॅलिडोस्कोप म्हणतात. कोणत्याही वैज्ञानिक खेळण्यांच्या दुकानात हे घरी बनविण्याचे किट मिळते. हे किट वापरून साधारण अर्ध्या तासात शोभादर्शक घरी बनविता येतो. >>> १७ -डेबोनेर मासिका चे जुन्यात जुने अंक कुठे मिळतील त्यातल्या मुलाखती त्यातील सेंटरस्प्रेड इतक्याच इंटरेस्टींग होत्या त्यातील मुलाखतींच कलेकशन असलेलं एखाद पुस्तक आहे का ? किंवा जुने अंक मिळण्याच मुंबईतील ठीकाण कुठल ? फुटपाथवरील पुस्तक विक्रेत्यांकडे किंवा गुगलून पहा. >>> २१- मंगलमय क्षणांचे सोबती त्या कालावधीत कल्पनेच्या पातळीवर प्रामाणिक असतात का ? म्हणजे किती टक्के प्रामाणिक असतात ? व वयाचा यात महत्वाचा रोल असतो का ? म्हणजे वाढत्या वयाबरोबर अप्रामाणिकता वाढते का ? 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' हे नाटक पहा. बर्‍याच शंकांची उत्तरे मिळतील.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/15/2014 - 08:48 नवीन
अर्धवटरावांची तुमच्या एका धाग्यावरची कमेण्ट आठवली. अगदी योग्य आयडीनाव. :)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/17/2014 - 11:41 नवीन
खरा तो एकचि धर्म जगाला प्रश्न अर्पावे.... :-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा