Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतातील प्रवासात येणारे लॉजींगचे चित्र विचीत्र अनुभव

म
माहितगार
Fri, 11/14/2014 - 06:37
💬 70
पांघरुणातच गुरगुटून रहावं, उठूच नये असं वाटायला लावणारी छान थंडी पडलीये. मी अंथरुणात पडल्या पडल्या परिस्थितीचा आढावा घेतेय. संगमरवरी फरशी, बुरशी लागलेल्या भिंती, वाळवीने पोखरलेला दरवाजा, डाग आणि भोकं पडलेली चादर असा एकंदर थाट. ३-४ फील्डवर्क्सचा अनुभव गाठीशी असल्याने याहून वाईट परिस्थितीत राहण्याची सवय मला आहे. प्रत्यक्षात मात्र, याहून कैक पटींनी चांगल्या अशा दुसर्‍या एका ठिकाणी आमची व्यवस्था करण्यात आली होती. पण ..... संदर्भ: ... आणि माझी काशी झाली! (एका फील्डवर्कचा वृत्तांत) उपरोक्त उधृत केलेल्या वाक्यावर जाऊ नका, भाषाविज्ञानासंबधी वाराणशीतील मराठी भाषेचा अभ्यास करतानाच्या प्रवासा दरम्यानचा लेखिका राधिका यांचा ऐसी अ़क्षरेवरील वाचनीय वृत्तांत आहे. अर्थातच उपरोक्त वाक्य मी मिपावर वेगळ्या चर्चेसाठी आणि येथे अधिक चर्चा होऊ शकेल म्हणून घेतले आहे हे ओघाने आलेच.
असंख्य समस्या अशा असतात की ज्यांची आपण रोज दररोज चर्चा ही करत नाही. त्या स्विकारायच्या असतात असे समजून सोडून देण्या शिवाय खरेतर वेगळा पर्यायही रहात नाही. त्यातीलच एक म्हणजे भारतातील कोणत्याही प्रवासा दरम्यान येणारे लॉजींग आणि तत्सम प्रकारात येणारे चित्र विचीत्र अनुभव. रोजचं राहण पंचतारांकीत मध्ये परवडणार्‍या गटा पैकी तुम्ही नसाल किंवा प्रवासात हव तिथे पंचतारांकीत बुकींग मिळाले नाही तर तुमचा सर्व साधारण अनुभव कसा असतो ? एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजींग डायरेक्टराने भारतातील तीन ते पंचतारांकीत हॉटेल्स तौलनीक दृष्ट्या कशी नफेखोरी करत अव्वाच्या सव्वा दर लावतात याची डॉलर रुपी कन्व्हर्शन आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल दरांचा तौलनीक चार्ट समोर ठेवत माहिती दिली होती. अर्थात असे विषय क्वचीतच चर्चेत येतात आणि मग केव्हातरी विस्मरणात जातात. मला या पंचतारांकीत दरांची सध्याची तौलनीक स्थिती माहित नाही. अर्थात आपण प्रवासा दरम्यान आपल्याला अचानक कुठे मुक्काम करावा लागत असेल तर हॉटेल तीन किंवा पंचतारांकीत आहे हे बघण्याची संधी पण मिळत नाही. त्यात तुम्ही अपरात्री एखाद्या गावी पोहोचला असाल तर जे काही अकोमोडेशन उपलब्ध होईल ते पदरी आले आणि पवित्र झाले म्हणून स्विकारावे लागते. किंवा पेंगुळलेल्या अवस्ततेच चोखंदळपणा करत हे किंवा ते करत दोन तीन हॉटेलांपैकी एखाद्यात रुम बुक करून शरीरास काही आराम पडेल तर पहावे म्हणून काय असेल ते सकाळी पाहू म्हणून विचार करावा लागतो. त्यात तुम्ही कुणा रिक्षावाल्यांच्या तावडीत सापडले असाल तर तो तुम्हाला नेमके कसल्या दर्जाची हॉटेले दाखवेल ते विचारावयास नको. यातील छोट्या मोठ्या लॉजेसवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि कर आकारणी पुरते स्थानिक स्वराज्य संस्था काय ते लक्ष ठेवतात त्यांच्या सेवांच्या दर्जा बाबत तशी कोणती देखरेख असते असे कधी वाटले नाही. यातील छोट्या मोठ्या लॉजेसचेही दराचा वर्षातील ३०० दिवस जरी खोली भाड्याने गेली तर एकुण उत्पन्न तसे बरेच असते त्या मानाने सेवा सुविधा पाहिल्यास हाती काहीच लागत नाही. बाहेरून झकपक असलेल्या हॉटेलाच्या उंची सुट मध्ये विटलेले वासघाण जुने गालिचे पांढर्‍या शुभ्र चादरीतून अचानक येणारी झुरळे तर काही ठिकाणी चक्क ढेकुण हे वर्णन दिवसाचे ३५००/- दर असणार्‍या अहमदाबादेतील एका लॉजींगचा जवळपास चारेक वर्षापुर्वीचा अनुभव सांगतो आहे. माझा एक साएब प्रत्येक शहरातल उंची नव्हे तर नव्यातल नव लॉज कोणत त्याचीच माहिती ठेवायचा कारण तिथे रुम फर्नीचर इत्यादी जरा फ्रेश असतं. दुसरे मार्ग परिचया पैकी कुणाला चांगल लॉज माहित असल्यास विचारून ठेवणे. आपण स्वतः रहातो त्या शहरातील विशीष्ट लॉजची स्थिती काय असेल याची काही माहिती स्थानिकांनाही असेलच अशी स्थिती नसते. प्रत्येकवेळी प्रत्येकाला सर्व माहिती अ‍ॅडव्हान्स मधे मिळते असही नाही. त्यात तुम्ही परदेशी प्रवासी असाल तर रिक्षा, विक्रेते ते टूरगाईड सर्वजण लुटण्याचाच विचार करत असतात. प्रवासा दरम्यान शेजारचा एक इझ्राएली प्रवासी एकदा त्याच्या भारतातील प्रवासाच्या अनुभवा बद्दल म्हणाला, की मला उपलब्ध वेळेत तुमचा देश जास्तीत जास्त दूरवर फिरायचा आहे सर्व पैसा एकाच गावात खर्च करण्याची माझी इच्छा नाही पण माझे सर्व आर्थिक आडाखे इथे आल्या पासून चुकताहेत खुप सुविधा नको पण किमान टापटीप आणि स्वच्छ लॉजींग साठी मला अपेक्षेपेक्षा खूपच अधिक पैसे मोजावे लागताहेत, रिक्षा टॅक्सी यांच्याही परदेशी माणूस म्हटला की उकळा उकळी होते पाट्।ई मागे लागलेल्या दोनचार विक्रेत्यांकडून काही ना काही घ्यावेच लागते घेतले तर अजून विक्रेती मुले पाठी मागे लागतात नाही घेतले तर क्षणभर स्वस्थ बसूही देत नाहीत. हा एका परदेशी प्रवाशाचा किस्सा, असो. आपण मिपावर या समस्यांची चर्चा केल्याने समस्या कमी होतील असे नाही पण एकतर समस्या बोलून दाखवली की मन मोकळे होते, आणि मुख्यम्हणजे कुठे कोणते लॉजींग चांगले आहे आणि कोणते नाही याची थोडी फार कल्पना आल्यास आपापल्या अनुभवांचा सर्वांनाच फायदा होऊ शकेल.

प्रतिक्रिया द्या
46737 वाचन

💬 प्रतिसाद (70)
आ
आदूबाळ Sat, 11/15/2014 - 07:03 नवीन
खर्च दोनदा "मोजण्या"ची काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
होकाका Sat, 11/15/2014 - 07:28 नवीन
पूर्वी दीपा पब्लिकेशनचं 'प्रवासी डायरी' म्हणून एक पुस्तक मिळायचं. त्यात स्वस्तात स्वस्त ते महाग अशा बर्‍याच लॉजेसची माहीती आणि दूरध्वनि क्रमांक असायचे. तसंच आयटीडीसी चं चर्चगेटजवळ एक ऑफीस आहे. तिथेसुद्धा भारतातल्या बहुतेक सगळ्या पर्यटन स्थळांबद्दल अशीच नेमकी आणि उपयुक्त माहीती असायची. म्हणजे राजस्थानमधल्या रु. २० पासून ते रु. १२००० पर्यंतच्या राहण्याच्या सोयींची माहीती बघितली होती. पण हे साधारण १५ वर्षांपूर्वी -- हल्लीचं माहीत नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/15/2014 - 10:11 नवीन
'कॉस्ट टू--'बद्दल गैरसमज झाला आहे परंतू अवांतर म्हणून सोडतो. हॉटेल मालक आपली जागा न सोडता रोज बारा गावचे पाणी पीत असतो. कोण एलटिए च्या विवंचनेत आहे (पक्के बिल), कोणाला खोटे बिल हवे आहे, उडती पाखरे कोण आहेत, याप्रमाणे तो रूम गळ्यात बांधतो. शिवाय आपला अवतारही बरेच काही सांगून जातो. काही ठिकाणी रूम रेट मोठ्या बोर्डावर लिहिलेले असतात तिथे स्वच्छता वगैरे चांगली असते. मी बऱ्याचवेळा रे स्टेशन बाहेर येऊन एखाद्या स्कुटर /टु व्हीलरवरच्या माणसाकडे चौकशी करतो "कोणत्या रस्त्यावर फैम्लीसाठी लॉज आहेत ?"हा बहुधा स्थानिक माणूस असतो आणि योग्य माहिती देतो.
  • Log in or register to post comments
र
रघुपती.राज Sat, 11/15/2014 - 19:27 नवीन
धर्मराज मुटके यांनी फार सुंदर लिहिले आहे. धन्यवाद. काही मिपाकरांनी वर उल्लेख केला की सहल विषयक वेब साईटवर विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने लिहिले जाते. पण याला आपण जबाबदार आहोत. अश्या वेबसाईट वर मी आणि माझी पत्नी विस्तृत रिव्यू लिहितो. लिहिताना सदर हॉटेल मध्ये कोण कोण (मी- पत्नी आणि ४ वर्षांची मुलगी) राहिले होते व कधी राहिले (वर्षातील कोणता महिना ) होते हे स्पष्ट लिहितो. रिव्यू लिहिताना मुलीला देखील काय आवडले किंवा काय आवडले नाही ते स्पष्ट विचारतो. लहान मुले बऱ्याचदा अत्यंत महत्वाच्या पण आपल्या नजरेतून सुटलेल्या बाबी समोर आणतात. अधिकाधिक भारतीय माणसे रिव्यू लिहितील तेव्हाच हे रिव्यू आपल्या उपयोगाला येतील. हॉटेल मध्ये आपल्याला काही चांगले कर्मचारी भेटले असतील तर त्यांचा नावानिशी जरूर उल्लेख करावा. तसेच त्या परिसरातील एखादा प्रामाणिक रिक्षावाला, घोडेवाला, गाईड यांचे देखील त्यांच्या मोबाईल सह (अर्थात त्यांच्या पूर्व परवानगीने ) नाव लिहावे. यामुळे प्रामाणिक, मेहनती माणसे पुढे येतात. तुम्हाला असा एखादा उल्लेख वाचनात आला असेल तर जेव्हा कधी त्या माणसाला भेटलं तेव्हा त्याला जरूर हे सांगा की त्याच्या एका जुन्या ग्राहकाने त्याच्या विषयी चांगला अभिप्राय लिहिल्याने तुम्ही त्याला भेटत आहात. जेव्हा प्रामाणिक व मेहनती माणसे पुढे येतील तेव्हाच गलिच्छ आणि चोर माणसे मागे पडतील. आम्ही एकाच ठिकाणी एका पेक्षाजास्त वेळा जातो. तरीही न कंटाळता आम्ही रिव्यू लिहितो. जागेत झालेले चांगले वाईट बदल आम्ही लिहितो. ट्रीप अडवायझरचा फायदा तुम्हाला तेव्ह्याच होईल जेव्हा तुम्ही आधी इतरांना तुमचे अनुभव धन देऊ कराल. मुटके साहेबाना पुन: धन्यवाद. टीप: येथे लिहिणे मला जमत नाही. त्यामुळे जीमेल मध्ये टाईप करून येथे चिकटवत आहे. शुद्ध लेखनाबद्दल माफी असावी. चूक भूल द्यावी घ्यावी
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 11/16/2014 - 02:03 नवीन
जेव्हा प्रामाणिक व मेहनती माणसे पुढे येतील तेव्हाच गलिच्छ आणि चोर माणसे मागे पडतील. ..... न कंटाळता आम्ही रिव्यू लिहितो. जागेत झालेले चांगले वाईट बदल आम्ही लिहितो. ट्रीप अडवायझरचा फायदा तुम्हाला तेव्ह्याच होईल जेव्हा तुम्ही आधी इतरांना तुमचे अनुभव धन देऊ कराल. अगदी खरं आहे, कौतुकापद कामाबद्दल धन्यवाद! आपले रिव्ह्यूज कोणत्या संस्थ ळावर असतात तेही कळूद्यात. वाचायला आवडतील. धर्मराज मुटके यांनाही वाचनीय सूचनांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुपती.राज
म
मुक्त विहारि Sat, 11/15/2014 - 19:39 नवीन
आणि माहितीपुर्ण प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/15/2014 - 22:18 नवीन
रघुपतिराज आपला प्रयत्न स्तुत्य आहे. टुअर कंपन्यांबरोबर जाणाऱ्यांनी पण लाजिंगचा अनुभव लिहिला पाहिजे. १)चेक आउट टाईम याची खात्री करावी अन्यथा एक दिवसाचे पैसे वाया जातात. २)रूममध्ये कार्पेट नसावा फार वाईट परिस्थिती असते. ३)सकाळी लवकर पाच ते सात मध्ये रूम सोडायची असल्यास रात्रीच खात्री करावी. ४)धार्मिक ठिकाणी देवळाच्या जवळ लॉज घेणे टाळावे. ५)पाच सहा कुटुंबे एकत्र गेल्यास एकाच ठिकाणी रूमस मिळवतांना बरीच शोधाशोध करावी लागते. शिवाय रेंटची घासाघिस करता येत नाही. ६)माउंट अबूला पक्के बिल नको असल्यास रेँट कमी करतात. ७)दुपारी चारनंतर रेँटची घासाघिस करता येत नाही. शिवाय दुसरीकडे हॉटेल शोधून नाही मिळाल्यास परत पहिल्याकडे आल्यास तो आता वाढवून सांगतो. ८)स्थान- काळवेळ पाहून एक दिवस कसातरी काढावा आणि दुसरे दिवशी सकाळी नवे लॉज शोधावे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 11/16/2014 - 05:12 नवीन
भारतात मच्छरं/डांस, ढेकूण ह्यांचे अनुभव घेतले आहेत. तरी, स्वच्छ्तेबाबत एकूण अनुभव अगदीच वाईट नाही. तसेही , माझे फिरणे, लॉजवर राहणे जास्त झालेले नाही. पण भारतात हॉटेलचे दर, सोयी सुविधांच्या तुलनेत, अव्वाच्या सव्वा असतात हे अनेकदा अनुभवले आहे. त्या मानाने युरोपातील मध्यम पातळीवरची निवासस्थानेही उत्तम प्रकारची असतात असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 11/16/2014 - 06:05 नवीन
सर्व्हिस इंडस्ट्री हळूहळू बदलत जातेय. येत्या काही वर्षात आपल्याकडे काऊचसर्फिग किंवा ऐअरबीएनबी सारख्या उपयुक्त कल्पना आल्यास नवल वाटणार नाही... ह्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल तिथल्या स्थानिक लोकांनी ह्या वेबसाईटवर रजिस्टर केलेल्या जागेत तुम्हाला राहता येते. ९०-९५% ते त्यांचे स्वतःचे घर असते आणि एक पर्यायी उत्पन्न म्हणून याचा वापर केला जातो. सुरुवातीला वाटेल थोडी इनसिक्युरिटी, पण माझा मित्र पूर्ण युरोप ट्रीप कुठल्याही हॉटेलला न थांबता करून आलाय. त्यामुळे ह्या संकल्पनेबद्दल मी खूपच आशावादी आहे. भारतात हे काही मोजक्या जागीच उपलब्ध आहे. आशा आहे भारतात असे "अच्छे दिन" लवकर येवोत..
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 11/16/2014 - 06:59 नवीन
काऊचसर्फिग यामध्ये वाईट अनुभव सुध्धा येउ शकतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
स
सुहास झेले Sun, 11/16/2014 - 08:33 नवीन
हो नक्कीच... म्हणून तर म्हटले जेव्हा हे फुल्लप्रुफ आणि सुरक्षित होईल, तेव्हाच अच्छे दिन येतील ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कंजूस Sun, 11/16/2014 - 07:44 नवीन
जरा तुलनात्मक सांगा. समजा भारतातले एक कुटुंब पर्यटनासाठी भारतातच फिरले आणि त्यांचे एक महिन्याचे उत्पन्न (रुपये ५०हजार धरू)खर्च करायचे ठरवले तर त्यांना किती चांगल्या सोयी मिळतील ?हीच गोष्ट युअरोपातल्या कुटुंबाने त्यांचे मासिक उत्पन्न (साडेतीन हजार युअरो धरु)अथवा अमेरिकेत (पाच हजार डॉलर ) त्यांच्याच देशात खर्च करायचे ठरवले तर त्यांना किती चांगल्या प्रकारे सुखसेयींच्या हॉटेल अथवा लॉजमध्ये पाच सात दिवसतरी सुट्टी साजरी करता येईल ? रकम चुकेल पण मुद्दा लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 11/16/2014 - 09:57 नवीन
साडेतीन हजार युरोत airfare धरून १५ दिवस सुट्टी सहज साजरी करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्यारे१ Sun, 11/16/2014 - 08:08 नवीन
वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 11/17/2014 - 07:01 नवीन
कामानिमित्त भारतभर फिरणे होते आनि बहुतेक ठिकाणी उत्तम होटेल्स मध्ये व्यवस्था होते. तक्रारीला जागाच नाही अशी व्यवस्था ! तिथले काही अनुभव ! १. हे अतिशय देखणी पूर्ण स्वच्छ होटेल्स असतात २. पण एका रात्रीकरता अवाच्य सवा पैसे द्यावे लागतात. ३. पण १-२ दिवस ( खरे तर रात्रीच ) राहणार , त्यातील जिम , तरण तलाव याचा आपल्याला शून्य उपयोग ! ४. खोलीतील फ्रीज मध्ये असलेल्या वस्तू , चौपट दराने !! ( एकदा मी ५ स्टार खाल्ले आणि नन्तर किंंअत पाहिल्यावर रिप्लेस केले) ५. अशा होटेल मधे "लोकल फ्लेवर" अजिबात नसतो. ताज चन्दिगडमध्ये नाष्ट्याला इडली= वडा? तिथेच लोकल फ्लेवर म्ह्णून जर्मनच्या किटलीतून मसला चाय नावाचे फुळ्ळ्क पाणी!! बाहेर गाड्यावरचा चहा अफलातून ! ६. परिटघडीचे आदरातिथ्य आणि जबरदस्तीचे आगत्य ..सगळे आपले ठराविक साच्यात ! म्हणजे लहु हास्य करताना जीवणे किती इंच रुन्द करावी हे ही ठरलेले ! असला अनुभव भुवनेश्वरसारख्या ठिकाणी देखील आला. ७. कंपनी देत असली तरीही पैसा हा पैसा आहे , तो कुणाचाही असला तरी अपव्यय होऊ नये असे माझ्या भारतीय मनाला वाटते . हा अपव्यय झालेला पैसा कुठेतरी पुन्हा आप्ल्याच बोकांडी बसतो याचीही बोचरी जाणीव !! त्याच बरोबर खालील गावी आलेले अनुभव खतरनाक आहेत .. ते ही सवडीने लिहिन .. १. रामगुण्डम - आन्ध्र २. बारबील - ओरिसा ३. धनबाद - झारखंड ४. वैझाग - आन्ध्र ५. तिन्सुखिया - आसम ६. चन्द्रपूर - महाराष्ट्र ७. सिन्ग्रलि - मप्र ८. भतिन्डा- पन्जाब
  • Log in or register to post comments
ज
जिन्क्स Mon, 11/17/2014 - 09:40 नवीन
बाकीचे अनुभव सवडीने लिहा पण धनबादचा अनुभव आधी येउ द्या..."गँग्स ऑफ वासेपूर" पाहिल्या पासुन ह्या शहरा बद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
सौंदाळा Mon, 11/17/2014 - 07:37 नवीन
आमच्या (मित्रांबरोबरच्या) औरंगाबाद सहलीच्या वेळचा अनुभव. एका ढाब्यावर जेवलो. जेवण मस्त होते. तिथल्याच एका माणसाला राहण्याची चांगली सोय कुठे होईल विचारले, त्याने एक लॉज सांगितले तिकडे निघालो (कारने) रस्ता माहित नव्हता म्हणुन मधे एका माणसाला त्या लॉजला कसे जायचे विचारले त्याने रस्ता सांगितला आणि जाता जाता म्हणाला xxx लॉज अजुन मस्त आहे तिकडे तुम्ही जात आहात त्या लॉजपेक्षा चांगल्या मुली इकडे मिळतील. आम्ही टरकलोच. शेवटी मित्राच्या मित्राचा मित्र अशी ओळख काढुन रात्री १०.३० ला एकाला फोन लावला आणि त्याने सांगितलेल्या एका लॉज वर गेलो. तिकडे जाउन बघितले तर बेड आणि कचर्‍याची बादली बघुन तिकडे आधी काय झाले असावे ते समजले. तसेच खाली आलो, जवळच्या रिक्षा स्टँडवर जाऊन दोघा-तिघांना लॉज कसे आहे विचारले. परत येताना अजुन एकाला विचारले, ते लोक ठिक आहे म्हणाले आणि मग गेलो. अर्थात घरच्यांसोबत प्रवास करताना अशी रिस्क मी तरी कधी घेत नाही. लॉज्/हॉटेल आधीच बूक करतो किंवा ठरवतो.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Sat, 01/12/2019 - 12:34 नवीन
ओयोरूम्स मध्ये सर्रास असे अनुभव येतात. शहरात संपुर्ण अपार्टमेंट ओयोरूम्स म्हणून देतात. मला वेगवेगळ्या शहरात तब्बल चार वेळेला असे अनुभव आले आहेत. तेंव्हापासून कानाला खडा. कोणतही रजिस्टर मेंटेन केलेलं नसतं. सहसा रिसेप्शनवर उत्तरभारतीय लोकं असतात. पोलिसांना मॅनेज केलेलं असततं. अतिशय गलिच्छ रूम्स आणि बहुतेक तरूण उत्तरभारतीय जोड्या रहात असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
म
माहितगार Sat, 01/12/2019 - 12:18 नवीन
सहज तुनळी चाळताना एका विदेशी प्रवासी मुलीचा सहा सात महिन्या अनुभव ऐकण्याचा योग आला.
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Sun, 01/13/2019 - 13:49 नवीन
आपल्या देशातील एकूण घाणेरडेपणा, बेपर्वाई, अनोळखी माणसांना लुबाडण्याची वृत्ती, सेवावृत्तीचा पूर्ण अभाव, अचूक व संपूर्ण माहितीचा त्याहूनही दुष्काळ (ह्याची सुरुवात विमानतळावर उतरल्यापासूनच होते), हे पाहता परदेशी पर्यटक भारतात येतात ही मोठीच आश्चर्याची गोष्ट म्हटली पाहिजे. ह्यात फाईव्ह स्टार प्रवासी धरायचे नाहीत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा