Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स

व
वेल्लाभट
Fri, 11/14/2014 - 10:37
🗣 165 प्रतिसाद
'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच. माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता. तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे. आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात. या क्षणी हा क्रम आहे. १) पाको रबान pour homme - अतिशय वेगळा आणि स्ट्राँग वास. वुडी व फ्लोरल नोट्स Top Notes - Rosemary Clary Sage Brazilian Rosewood Middle Notes - Tonka Bean Lavender Geranium Base Notes - Honey Amber Musk Oakmoss prpr २) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla drred ३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk boss ४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla. brut ५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk jm ६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss. lomani ७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar. nblue ८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar. cred ९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk edw १०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco. tabac जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो. आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया द्या
123252 वाचन

💬 प्रतिसाद (165)
स
समीरसूर Fri, 11/14/2014 - 10:40 नवीन
किमती पण द्या ना सोबत प्लीज. म्हणजे मग ठरवता येईल की तुम्ही सांगीतलेले सेंट्स खरोखर चांगले आहेत की नाही... ;-) माझ्या मते रु. ५०० च्या पुढचे सगळे सेंट्स भिकार असतात. ;-) छान माहिती.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/14/2014 - 10:58 नवीन
पण जाऊदे किमतींवरून ठरवणं मला पटत नाही. असं जनरलाईझ नाही करता येत. काही बाबतीत असं असतं, की किंमत जास्त मोजली की वस्तूचा दर्जा निश्चित वाढीव असतो. पण प्रत्येक बाबतीत नाही. शेवटी आवडीचा प्रश्न आहे. ह्युगो बॉस जितका आवडतो तितकाच बाटलीत रिफिल केलेला वन मॅन शो सुद्धा आवडतो. नथिंग अबाउट द प्राईस आय फील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
क
कपिलमुनी Fri, 11/14/2014 - 10:56 नवीन
ओरिजिनल सेंट कसा ओळखायचा ? माझ्या एका दुकानदार मित्राच्या सांगण्यानुसार बाजारमधले ८०% हून अधिक सेंट बनावट असतात. बाकी ब्रुट आणि लोमानी आवडते. या धाग्यावरून परफ्युम या चित्रपटाची आठवण झाली
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/14/2014 - 10:59 नवीन
मी बघितलाय तो पिक्चर. कैच्याकै आहे... वेगळाच्च. वेड कॉन्सेप्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 11/14/2014 - 13:42 नवीन
कसा ओळखायचा ? की दुकानदार भरोसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 11/14/2014 - 11:04 नवीन
PARFUM - सर्वाधिक कॉन्सन्ट्रेटेड. १५% किंवा अधिक EAU DE PARFUM - ८-१५% EAU DE TOILETTE - ५-८% EAU DE COLOGNE - २-५% कुठला अधिक चांगला, किंवा प्रखर, लाँग लास्टिंग, हे उघड आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/15/2014 - 03:33 नवीन
मनापासून धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
य
यसवायजी Sat, 11/15/2014 - 14:11 नवीन
परफ्युममधील नक्की कशाचे प्रमाण १५% वगैरे असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
मदनबाण Fri, 11/14/2014 - 11:10 नवीन
मला परफ्यूम्स आणि अत्तरे प्रचंड आवडतात... :) परफ्यूम्स ची आवड मी शाळेत होतो तेव्हा पासुन झाली.... एका परफ्यूम्स बनवणार्‍या दुकानात सहज म्हणुन गेलो आणि माझा सुगंधाच्या दुनियेत प्रवेश झाला तो कायमचा. :) मी पहिला वापरलेला परफ्यूम हा पॉयझन होता, आणि आजही माझ्याकडे तो आहे. मॅक्सी, चार्ली, ब्रुट इं वापरले... पण काही काळा पासुन मला अत्तराचे अक्षर: वेड लागले आहे, अत्तराचा जो प्रभाव पडतो तो पूर्णपणे वेगळा असतो... मी शक्यतो फॅन्सी अत्तरे वापरत नाही, मला ट्रेडिशनलच जास्त आवडतात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/14/2014 - 11:13 नवीन
ऊद वालं अत्तर वापरलंयत का? खास 'त्यांचा' आवडता वास. आखाती देशात प्रचंड खपतो. स्ट्राँग. मु.अली रोड ला मिळतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 11/14/2014 - 11:30 नवीन
उद माझं सध्याच सगळ्यात आवडत अत्तर आहे, वेगवेगळा गंध असणारे उद अत्तर मिळतात, माझ्याकडे एक उद कोल्हापुरच्या कटक्यांच आहे, एक मु.अली वरचं आहे, तर एक माणिकलाल अत्तरवाला {MANEKLAL ATTAR WALA 452, JAWAHR MARG SAIFE HOTEL CHOURAHA INDORE} यांच्याकडचे आहे. मध्यंतरी सोसायटीच्या एका समारंभात हे किंचीत लाउन गेलो होतो तेव्हा माझ्या एका मित्राच्या लगेच लगेच लक्षात आले, काय अत्तर का ? असा त्याचा प्रश्न होता. माझं अत्तर वेड फोटोतुन सुद्धा एकदा डोकावलं आहे.... :) बाकी खास 'त्यांचा' आवडता वास म्हणशील तर जन्नत ए फिरदोस सुद्धा त्यांचाच समजला जातो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 11/14/2014 - 11:38 नवीन
एखाददा सविस्तर चर्चा करायंस हवी तुमच्याशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 11/18/2014 - 04:39 नवीन
सध्या जे उद इंदुरातुन आणले आहे, ते १२०० रु तोळा या भावाने मिळाले. :) आहाहा... कसलं जब्राट वाटतं सांगु ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 11/18/2014 - 07:16 नवीन
क्लास ! देखना पडेगा. आय मीन सूंघना पडेगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 12:53 नवीन
मी पहिला वापरलेला परफ्यूम हा पॉयझन होता
क्या...रे पाय्झन दाल्ल्लीया.... अर्रे तुम लोकल बस्तीके चीप कॅटेगरीके सी ग्रेड लोगां...तुम्कू क्या मालूम पाय्झन क्या होनां हे आठवले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कपिलमुनी Fri, 11/14/2014 - 13:30 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रचेतस Fri, 11/14/2014 - 11:10 नवीन
सोत्रिंची गाथा परफ्युम्सची आठवली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/14/2014 - 11:30 नवीन
दुव्या बद्धल धन्यवाद. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पा Fri, 11/14/2014 - 11:19 नवीन
वात्स अप्प वर लिंक आली कि मग वाचेन ;)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/14/2014 - 11:22 नवीन
बर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मराठी_माणूस Fri, 11/14/2014 - 11:27 नवीन
पुर्वी एक बॉस कं.ची concentrated Eau de Cologne ची एक छोटी चपटी बाटली येत असे. ते स्प्रेड करायच्या ऐवजी काना मगे थोडेसे लवले जायचे. ती बाटली सध्या कुठे दीसत नाही. कुठे मिळु शकते का किंवा त्या प्रकारचे दुसरे कुठले पर्फ्युम आहे का ?
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 11/14/2014 - 11:32 नवीन
हरिहरेश्वरला काही दुकानांमध्ये १२ राशींनुसार १२ वेगवेगळे पर्फ्युमस मिळतात . ज्यांचा राशींवर विश्वास आहे ते त्यानुसार किंवा सहज गंमत/बदल म्हणुन घेतात.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/14/2014 - 11:36 नवीन
इंटरेस्टिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
भ
भाग्यश्री कुलकर्णी Fri, 11/14/2014 - 12:32 नवीन
मी पण वेडी आहे अत्तराची आणी माझा भाउ पण.पुर्वी रोज कानात फाया असायचाच.सध्या खस,हिना,जन्नत ऐ फिरदोस,डव,असे बरे कलेक्शन आहे.आत्ता भावाच्या लग्नात एक व्हिस्की फ्लेवर आणलाय.महाग आहे पण भारीये.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/14/2014 - 13:22 नवीन
अत्तराचा फाया कानात घातलेले लोक कापुस बाहेर आलेल्या गादीसारखे दिसतात
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 12/02/2014 - 12:36 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ह
हरकाम्या गुरुवार, 07/21/2016 - 20:44 नवीन
विजुभाउ आज पहिल्यान्दा पोट भरुन हसलो.एकदम मारु उपमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आनन्दा Fri, 11/14/2014 - 14:02 नवीन
धागा बूक्मार्क करण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Fri, 11/14/2014 - 14:34 नवीन
silence, evening in Paris, born rich, bawari, forever Paris, sweet hearts (blue), आणखी बरेच आहेत . आठवतील तसे सांगतो.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 11/14/2014 - 14:42 नवीन
वेल्लाभटांनो - एकच धागा काढून कसं चालेल? पुढचा भाग येऊंद्या. हे टॉप, मिडल आणि बेस नोटस काय प्रकार आहे? एकाच वासात हे तीन उप-वास कसे ओळखायचे?
  • Log in or register to post comments
प
पेट थेरपी Sat, 11/15/2014 - 02:34 नवीन
भाई लोक्स, लेख वाचून अतिशय आनंद झाला. मी भारतातल्या एका अग्रगण्य अत्तर कंपनीत काम करते. ह्या विशयावर सखोल माहिती लिहू शकेन. लिहू का? मराठी माणसाचा जगभर गेलेला उद्योग आहे हा. फक्त ५०० रु. च्या वर ते सर्व बेकार अशी परिस्थिती नक्की नाही. आपल्याला अधिक माहितीची गरज आहे. वरील फोटोतले सर्व हे डायल्युटेड व्हर्जन्स आहेत. जितके पर्फ्यूम त्यापेक्षा जास्त खर्च बाटलीचा व पॅकेजिंगचा आहे. नो वरीज क्वालिटी चांगलीच आहे. पण तांत्रिक बाजू बघता. समजा एक भाग कॉन्संट्रेट असेल तर त्यात काही भाग अल्कोहोल व इतर द्रव्ये घालून ते ईडीटी, स्प्रे वगैरे बनवतात. टॉप मिडल बेस नोट हे अत्तर क्रि एट करताना वापरले जाणारे तांत्रिक शब्द आहेत. ह्याबद्दल पण लेख लिहायला पाहिजे. लिहू का? वेल्ला भट लेखनाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/15/2014 - 03:24 नवीन
लिहा की... ह्या जरा हटके विषयाविषयी वाचायला नक्कीच आवडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेट थेरपी
व
वेल्लाभट Sat, 11/15/2014 - 03:45 नवीन
नक्कीच लिहा. म्हणजे लिहाच. तांत्रिक बाबी समजून घ्यायला आम्हाला फार आवडेल. वर दिलेले डायल्यूटेड आहेतच अर्थात. अत्तर प्रकार नक्कीच जास्त कॉन्सन्ट्रेटेड. त्यामुळे जरूर लिहा तुम्ही यावर सखोल. स्वागत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेट थेरपी
प
पिवळा डांबिस Sat, 11/15/2014 - 05:52 नवीन
कारण माझ्या अनुभवानुसार रू ५०० च्या वरचे सगळे पर्फ्यूमस बेकार असतात हे अतिशय अज्ञानी (किंवा मूर्ख म्हणा) विधान आहे... कारण चांगले दुर्मिळ असे सेंट्स तर सोडा पण भेसळ नसलेली इसेन्शियल ऑईल्स जरी घ्यायची म्हटली तर ती आज मुंबई-दिल्लीमध्ये रू५०० च्या खाली मिळत नाहीत (यात हीना वगैरेंचा तसेच लखनौ-जबलपूर या मार्केट्सचा समावेश नाही). मग आमचं काही चुकतंय की ते विधान मूर्ख आहे? तुमचे जाणकार विचार वाचायला आवडतील. बाकी आमची आवड म्हणाल तर शॅनेल-५ (स्त्रियांसाठी) आणि इटर्निटी, पोलो-ब्लू, जोवन्स रिच ही पुरुषांसाठी!!! बाकी प्रिफर्र्ड स्टॉक आणि ओल्ड स्पाईस ओरिजिनल ही ऑल टाइम फेव्हरिट!!! (बाकी यानिमित्ताने केळकरांनी फार फार पूर्वी दिलेली आणि आम्ही नाकारलेली एक ऑफर आठवली!! पण त्याविषयी कथा अन्यत्र कधीतरी!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेट थेरपी
व
वेल्लाभट Sat, 11/15/2014 - 06:28 नवीन
ओल्ड स्पाईस डिओ.......... कमाल ! कमाल ! आणि कमाल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
र
रामदास Sat, 11/15/2014 - 06:57 नवीन
सहमत. शॅनेल-५ (आवडत्या स्त्रियांसाठी) असा बदल करतो आहे. सध्या कूल वॉटर वापरतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मुक्त विहारि Sun, 11/16/2014 - 02:14 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
पिवळा डांबिस Mon, 11/17/2014 - 07:23 नवीन
शॅनेल-५ (आवडत्या स्त्रियांसाठी) असा बदल करतो आहे.
च्यामारी! बूरझवा समदे!!! लाल क्रांती, लाल सलाम!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
र
रेवती Sat, 11/15/2014 - 14:38 नवीन
केळकरांच्या कंपनीत आहात का आपण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेट थेरपी
र
रामदास Sun, 11/16/2014 - 14:27 नवीन
केळकरांच्या मुलीशी लग्न केल्यामुळे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sun, 11/16/2014 - 15:30 नवीन
अरे वा! हौ लक्की! :) मग हवे ते सुगंध तुम्ही केवा फ्र्याग्रन्सेसकडूनच मागवता का? शेवटी जावई आहात ना! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
र
रामदास Mon, 11/17/2014 - 06:47 नवीन
खाण्याचे रंग बनवते . जिलबी- लाडू यात टाकण्याचे रंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Mon, 11/17/2014 - 21:04 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
सूड Mon, 11/17/2014 - 20:29 नवीन
लिहू का काय विचारताय? लिहाच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेट थेरपी
स
सुबोध खरे Tue, 11/18/2014 - 07:33 नवीन
@ पेट थेरपी नेकी और पूछ पूछ लिहा ताबडतोब .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पेट थेरपी
म
मदनबाण Sat, 11/15/2014 - 05:10 नवीन
मी भारतातल्या एका अग्रगण्य अत्तर कंपनीत काम करते. वल्ला ! क्या बोलती ! ;) लिहू का? नेकी और पुछ पुछ ? तुम लिखती तो हम पढती... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- दगड दगड दगड दगड दगड दगड... :) { Elizabeth Ekadashi }
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 11/15/2014 - 05:33 नवीन
एक इडियो देउन जातो :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- दगड दगड दगड दगड दगड दगड... :) { Elizabeth Ekadashi }
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 11/15/2014 - 06:12 नवीन
आपण तर अत्तर घेण्यासाठी फक्त आणि फक्त बुवा अर्थात आपले अतृप्त आत्मा यांनाच विचारतो..
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sat, 11/15/2014 - 06:33 नवीन
नॉटिका ब्लू फॉर मेन साठी +१ बाकीचे सुगंध अजून वापरले नाहीत. माझा आवडता brand Givenchy त्यात निओ आणि पाय अधिक आवडीचे
  • Log in or register to post comments
V
vrushali n Sat, 11/15/2014 - 08:04 नवीन
flora by gucci(edp) आणी issey miyake(edt) कॉलेजात बर्याचदा compliments मिळतात :ड
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा