Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स

व
वेल्लाभट
Fri, 11/14/2014 - 10:37
🗣 165 प्रतिसाद
'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच. माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता. तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे. आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात. या क्षणी हा क्रम आहे. १) पाको रबान pour homme - अतिशय वेगळा आणि स्ट्राँग वास. वुडी व फ्लोरल नोट्स Top Notes - Rosemary Clary Sage Brazilian Rosewood Middle Notes - Tonka Bean Lavender Geranium Base Notes - Honey Amber Musk Oakmoss prpr २) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla drred ३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk boss ४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla. brut ५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk jm ६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss. lomani ७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar. nblue ८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar. cred ९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk edw १०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco. tabac जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो. आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया द्या
123252 वाचन

💬 प्रतिसाद (165)
व
वेल्लाभट Sat, 11/15/2014 - 08:49 नवीन
क्लास्स्स्स आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vrushali n
म
मनिमौ Sat, 11/15/2014 - 08:07 नवीन
ंइस दिओर्र फ्रोम च्रिस्तिन दिओर
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 11/15/2014 - 10:17 नवीन
आत्मुबुवा अत्तरवाले कुठे आहेत? त्यांनी एका कट्ट्याला आणलेलं 'पैल्यापावसानंतरमातीचावास'वालं अत्तर अजून लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/15/2014 - 10:48 नवीन
मला धागा आवडला. धाग्यावर लक्ष आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sun, 11/16/2014 - 18:56 नवीन
केविन क्लाइन चा ऑब्सेशन परफ्युम अतीशय आवडतो. लेडीज साठी जे.लो. चे परफ्युमस मस्त वाटतात.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 11/17/2014 - 07:35 नवीन
माहितीपूर्ण धागा आहे, पण ह्या माहितीचा उपयोग करून घेण्याइतपत खिसा खुळखुळायला लागला की अवश्य तसे केले जाईल! :-) तूर्तास... असो! ;-)
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/17/2014 - 20:25 नवीन
नोट्स कशा आयडेंटिफाय करायच्या म्हणे?
  • Log in or register to post comments
द
दर्यासारंग Sun, 11/23/2014 - 10:07 नवीन
कालच उद विचारुन आलो,मु.अली वर, ५००० रु. १०mlला.
  • Log in or register to post comments
द
दर्यासारंग Sun, 11/23/2014 - 11:59 नवीन
इतके महाग परवडणार नाही ५०० रुच्या आत येतील ते सान्गा. चार्ली ४० रु, २०० रु, ५०० रु वापरुन झालेत. किमतीप्रमाणे क्वालिटि बदलते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/24/2014 - 05:53 नवीन
कालच उद विचारुन आलो,मु.अली वर, ५००० रु. १०mlला. अहो,जरा कमी किमतीचे उद सुद्धा मिळते... अगदी महागडेच घ्यावे असे थोडीस आहे ? किमतीप्रमाणे क्वालिटि बदलते. अगदी खरं ४०-१०० मिळणार्‍या वस्तुचा दर्जा हा तसाच असणार...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दर्यासारंग
म
मदनबाण Tue, 12/02/2014 - 10:39 नवीन
गेल्या आठवड्यात पाकिजा मार्केट मधे जाउन आलो आणि या वेळी २ वेगळी अत्तरे घेण्याची संधी मिळाली. :) एक म्हणजे शमामा {Shamama } आणि दुसरे जाफरान Zafran (SAFFRON) { केशराचे अत्तर }. उद अत्तराचे २ प्रकार मला माहित झाले आहेत, एक तांबड्या रंगाचे वुडी फ्रेग्रंस असलेले आणि दुसरे व्हाईट उद हे अगदी वेगळ्या गंधाचे अत्तर आहे.आसाम मधे तयार होणारे उद हे सर्वात उत्तम मानले जाते. :) पाकिजा मार्केट मधे Al Jamil & Bros यांचे दुकान आहे, त्यांच्याकडे गेलो होतो, हे अत्तरे एक्स्पोर्ट करतात. काही दिवसांपूर्वीच २० लाखाचे जाफरान अत्तर एक्स्पोर्ट केले अशी माहिती देत त्यांनी या अत्तराची ओळख करुन दिली. सुभानल्ला ! इस इत्र की खुशबु बोहोत सुकुन देने वाली है | असे त्याला सांगताच त्याने एक्स्पोर्ट क्वालिटीची अत्तराची बाटली त्याच्या माणसाला माझ्यासाठी उघडायला लावली... आणि त्यांचा अप्रतिम गंध वेडावुन गेला. :) Image removed. 40, Pakeeza Market M S Ali Road, Grant Road, Mumbai - 400007 त्यांनी मला मातीच्या मडक्यांपासुन बनवण्यात येणारे अत्तर सुद्धा दाखवले {पहिल्या पावसाच्या मातीचा गंध असलेले}, पण पुढच्या खेपेला ते घ्यावे असा विचार करुन मी पाकिजा मार्केट मधुन बाहेर पडलो. अत्तराच्या औषधी गुण धर्मा बद्धल अधिक इकडे :- The Medicinal Benefits of Attar जाता जाता :- फ्रुट अत्तर कधी ऐकले आहे का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
वेल्लाभट Tue, 12/02/2014 - 10:46 नवीन
भारीच......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 12/02/2014 - 11:18 नवीन
अजुन एक... ज्यांना उद अत्तर घ्यायचे असेल त्यांनी आधी व्हाईट उद ट्राय मारावे कारण ब्राउन रंगाचे उदला वुडी फ्रेगंस असल्याने काहींना तो आवडणार नाही, त्याच्या अगदी विरुद्ध व्हाइट उद आहे. मला स्वतःला देखील व्हाइट उद जास्त आवडतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
प्रमोद देर्देकर Tue, 12/02/2014 - 11:38 नवीन
बाणा तु तर अत्तर वेडा आहेस रे . मी सध्या मजमुआ वापरतो आहे. छान वास आहे. बादवे ठाण्याचे एखादे दुकान सांग की जिथे ऊद मिळेल. मी नेहमी अलोक हॉटेलच्या मागे नाईकवाडीत एकच दुकान आहे तिथुन सगळी पर्फ्युमस घेतो.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/02/2014 - 15:34 नवीन
बादवे ठाण्याचे एखादे दुकान सांग की जिथे ऊद मिळेल. मोहन कुलकर्णी यांचे "केतकी" नावाचे दुकान आहे. पत्ता :- तांबे हॉस्पिटलच्या समोर, बी-केबीन. { वामन हरी पेठे यांचे दुकान जवळच आहे.} यांच्याकडे बर्‍यापैकी अत्तरे मिळतात,पण उद मिळेल की नाही ते सांगता येत नाही. मी नेहमी अलोक हॉटेलच्या मागे नाईकवाडीत एकच दुकान आहे तिथुन सगळी पर्फ्युमस घेतो. आधी इथे २ परफ्युम्स बनवणारी दुकान होती,मी जो वरती परफ्युम विषयी प्रतिसाद दिला ते माझे पहिले परफ्युम याच पैकी एका दुकानातुन घेतले होते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Junction Lo... { Official Song Released }
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 12/04/2014 - 09:37 नवीन
दुकान आहे. तिथे मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
वेदांत गुरुवार, 07/21/2016 - 08:47 नवीन
सध्या मी फेरारी अत्तर वापरतोय. मस्त सुवास आहे...
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 07/21/2016 - 12:18 नवीन
लईच डाउन मार्केट झाली म्हणायची फेरारी अत्तर लागली. गाड्या उडवन परवडत काय आता त्यायले - शूमाकर चा फॅन झुम्मम.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 07/21/2016 - 09:06 नवीन
4711 eau de cologne
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद गुरुवार, 07/21/2016 - 09:37 नवीन
मला खर्^या फुलांच्या सुगंधाखेरीज इतर सुवास फारसे आवडत नाहीत. बाहेर फार वेळ जायचे असल्यास क्वचित वापरते. त्यामुळे खुशबू की दुनिया अनोळखी. पण भेट म्हणून मिळालेले केशर-गुलाब , सोनचाफा ही डोंबिवलीच्या हेमन्त मधली अत्तरे आवडली होती. पेट थेरपी, लिहाच आणि तेही सविस्तर . वाचायला खूप आवडेल.
  • Log in or register to post comments
ब
बरखा गुरुवार, 07/21/2016 - 11:32 नवीन
धागा वाचुन अनेक सुगंध मनात दरवळुन गेले. मला ही अत्तरे आणि परफ्युम खुप आवड्तात. तुमच्या लिस्ट मधील बरिचशी परफ्युम मी वापरलेली आहेत. अजुनही ती पसंतीच्या यादीत आहेत. मला अजुन काही आवड्लेली परफ्युम म्हणजे- वन-ओ-वन फॉर वुमन, सिगार, मोगरा, चंदन.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत गुरुवार, 07/21/2016 - 11:43 नवीन
वेल्ला साहेब, पेट थेरपी आणी अजुनही कोणी जाणकार..एक सल्ला द्या ना...फक्त चंदनाचाच सुवास (टॉप, मिडल आणि बेस नोटस फक्त sandalwood) असलेला पर्फ्युम कोणता ??
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/21/2016 - 12:27 नवीन
मिट्टी वापरलेय का कोणी?
  • Log in or register to post comments
व
वेदांत गुरुवार, 07/21/2016 - 13:34 नवीन
मी वापरलय .. मंद सुगन्ध असतो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 07/21/2016 - 16:51 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
प
पद्मावति गुरुवार, 07/21/2016 - 17:23 नवीन
आहा, काय मस्तं धागा आहे. माझा वीक पॉइण्ट. मला भयंकर आवडतात. माझे काही आवडते..शनेल 5, estee लॉडर चं सेन्शुअस, ब्यूटिफुल, bvlgari चं जॅसमिन noir. cartier चा माझ्या एक खूप आवडीचा पर्फ्यूम होता पण तो आता बनवत नाही म्हणे त्याचं उत्पादन थांबवलंय चार, पाच वर्षांपासून:( नेहमी वेगवेगळे सुगंध ट्राय करते एकच एक सुगंध नाही वापरत. मस्क, जॅसमिन, सॅंडलवुड अशाप्रकारचे जरा हेवी नोट वाले सुगंध मला आवडतात. फ्रूटी, citric फ्लेवर्स नाही आवडत.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/22/2016 - 04:42 नवीन
शनेल५................ अ क्लासिक. मॅरिलिन मॉन्रो पासून लोकांनी वापरलेला पर्फ्यूम. अफलातून वास. एन्चॅन्टिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
म
मदनबाण Sat, 07/23/2016 - 17:16 नवीन
@प्रसाद भागवत चंदनाचा सुगंध असलेला प्रफ्युम माहित नाही, पण अत्तर ठावुक आहे. Arochem चे सुखद हे उत्तम चंदनाचे रोल ऑन अत्तर आहे. Image removed. माझ्या तिर्थरुपांनी मला कलोन असलेला परफ्युम हवा होता म्हणुन लिश्टनस्टाइन { जगातला ६ वा लहान देश एक,राजधानी वडुज } मधुन मला सुपर ड्राय नाईट नावाचा प्रफ्युम आणला.{ क्राफ्टेड अँड बॉटल्ड इन फ्रान्स } Image removed. लाईट् आणि झकास... आता अत्तरात रजनीगंधा आणि मिट्टी अत्तरची भर पडली आहे,ही अर्थातच इंदुरातुन आणली. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- Nucleya
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Sat, 07/23/2016 - 18:19 नवीन
धन्यवाद मदनबाण साहेब..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कबीरा Wed, 07/27/2016 - 14:05 नवीन
धागा लैच जमलाय, बाकी अत्तराचा फाया प्रकार काय कळला नाही राव.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 07/28/2016 - 00:12 नवीन
कापसाचा लहानसा बोळा! त्याला अत्तर लावायचं आणि तो बोळा कानात खुपसायचा. बेंगरुळ दिसतं म्हणा... पुर्वी श्रीमंती मिरवण्याची फ्याशन होती तेव्हा ठिक होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा
व
वेदांत गुरुवार, 07/28/2016 - 09:47 नवीन
रोजच्या वापरासाठी चांगला डीयोड्र्न्ट सुचवा ... प्लेबाय,सिन्थोल,निविया,नायके,KS ई. वापरुन झालेत ..
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/28/2016 - 11:05 नवीन
ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस (शक्यतो ओरिजिनल) आदिदास, नायके, रीबॉक - गुड वन्स प्लेबॉय - महाग पण चांगले. फ्युएल चा अनुभव चांगला आहे. फॉग चे काही काही बरे आहेत. जोवान मस्क बघा. सिगार उत्तम टिकतो. जस्ट कॉल मी मॅक्सी निव्हिया ने इरिटेशन होऊ शकतं, माझा अनुभव. डेनिम फ्रॅगरन्सला बरे आहेत पण वास टिकत नाही. डेव्हिड ऑफ कूल वॉटर (२५०-४००) रुपये याच्या मोहात मुळीच पडू नका. अ‍ॅक्स भंपक आहेत माझ्या मते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
व
वेदांत गुरुवार, 07/28/2016 - 11:32 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद ... ओल्ड स्पाईस (ओरिजिनल) वापरला आहे, पण आवडला नाही. खर सांगायाच तर, फेरारी अत्तर वापरत असल्यामुळे डिओ घ्यायचा का की नाही यात गोंधळून गेलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
म
महासंग्राम Wed, 08/03/2016 - 07:02 नवीन
रच्याकने
डेव्हिडऑफ कुल वाटर
हे वाचून डेव्हिड नावाचा माणूस थंड पाण्यात ऑफ झालाय असं वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
I
II श्रीमंत पेशवे II Tue, 09/25/2018 - 12:32 नवीन
धागा खूपच छान आणि अनपेक्षित आहे .....मस्त माहिती प्रसारित झालीये ......जणू परफ्युम्स ची बँकच मला उध आवडतो डीओ मध्ये किलर जीन्स च्या शोरूम मध्ये मिळणारा रेक्लेस छान आहे. Axe चा तिकिट ट्राय करून पहा engage मध्ये क्लासिक वूडी छान आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
प्रसन्न३००१ Mon, 08/01/2016 - 10:30 नवीन
सिंथोलचे डीयो-स्टीक्स मिळतात हल्ली, ७० रुपये किंमत आहे आणि साधारण महिना-दीड महिना पुरते. वास उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे लॉंगलास्टिंग आहे. बाकी लेयर शोट चा कलोनस्प्रे पण चांगला आहे रोजच्या वापरासाठी (नेव्हीब्ल्यू रंगाच पकिंग आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
र
रंगासेठ गुरुवार, 07/28/2016 - 09:49 नवीन
पर्फ्युम्स कुठून विकत घ्यावेत? ऑनलाइन मधे भरपूरदा झोल होतो असं रिव्यु वाचलेत.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/28/2016 - 10:59 नवीन
हे मीही ऐकलंय. पण अनुभव चांगला आहे माझा. प्रत्यक्ष घेणं चांगलं असं मानलं तर काही गोष्टी बघून घ्याव्यात जसं की, पॅकिंग (उघडलेलं, रीपॅक्ड वाटत असेल तर घेऊ नये) दुकान (एकदम नवीन दुकानातून मोठ्या रकमेचा घेऊ नये), ... आणि काही गोष्टी.... परंतु तरीही चुना लावला जाऊ शकतो. त्यामुळे जस्ट बी व्हिजिलंट इतकंच म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगासेठ
र
रंगासेठ गुरुवार, 07/28/2016 - 11:23 नवीन
ऑनलाइन मागवून बघतो कसा अनुभव येतो ते. अ‍ॅमॅझोन जिंदाबाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/28/2016 - 11:32 नवीन
पहील्यांदाच एवढी नावे वाचली, नायतर आपल्याला दोनच नाव माहीत, एक केळकरांचा मोगरा, आणी दुसरा चार्ली. गोव्यात काही ठीकाणी रस्त्याच्या कडेला काही लोकं केवड्याची फुलं पारदर्शी काचेच्या बाटलीत पाणी भरुन वीकायला ठेवल्याचं पाहीलय.
  • Log in or register to post comments
ए
एस.योगी Mon, 08/01/2016 - 10:14 नवीन
'अरमाफ'चे डिओ 'शेड्स' आणि 'पॅराटी' (Shades & Paraty) एकदम लाजवाब ....!
  • Log in or register to post comments
व
वेदांत Tue, 10/04/2016 - 12:59 नवीन
Tres Nuit Armaf for men एक्दम झकास ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस.योगी
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/01/2016 - 11:00 नवीन
ह्म्म्म , धागा वाचुन काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ... फार पुर्वी चित्रांगदासाठी हा परफ्युम घेतला होता .... Image removed. अजुनही हा सुगंध मनात दरवळतोय , नुसत्या आठवणीनेच मोहरुन जायला होतं , नक्की कशाने , सुगंधाने की तिच्या आठवणीने ... कळतच नाही :)
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न३००१ Mon, 08/01/2016 - 11:34 नवीन
१) अझारो क्रोम लिजेंड/युनाईटेड/स्पोर्ट्स २) बर्बेरी ३) नौटिका चा अक़्वा रश ४) डेव्हिडऑफ कुल वाटर ५) पोलीस विंग्स गोल्ड
  • Log in or register to post comments
व
वेदांत Wed, 08/03/2016 - 06:26 नवीन
सध्या अत्तर मार्केट मधे बरेच वेग-वेगळे सुगंध मिळत आहेत, उदा. लिरिल,पोलो स्पोर्ट्स,ह्यूगो बॉस ई. याच्या विषयी जाणकारानी माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 08/03/2016 - 07:19 नवीन
बॉस चं अत्तर कव्वा असतं राव. आणि जिव्हॉन्शाय इर्रेझिस्टेबल पण छान तसंच एक आवडणारं म्हणजे डनहिल डिझायर चं अत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
व
वेदांत Wed, 08/03/2016 - 08:41 नवीन
केमिकल वापरुन बनवतात का? @वेल्लाभट साहेब, http://www.basenotes.net/threads/397094-Chennai-Attars-Perfumes
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कबीरा Wed, 08/03/2016 - 08:11 नवीन
सध्या वापरात असलेली अत्तरे - 1. कस्तुरी अंबर - उग्र वास पण तेवढाच प्रसन्न. गुणधर्मानुसार उन्हाळ्यात वापरू नये म्हणतात. सर्दी झाल्यास नाकाला थोडे लावावे. 2. चंदन - एव्हरग्रीन. सगळ्यात आवडते अत्तर. 3 . खस - उन्हाळ्यामध्ये वापरायला जास्त छान वाटते. 4. मोगरा - एकदम नॅच्युरल 5. पारिजातक - अजून एक आवडते अत्तर. प्युअर फुलांचा सुवास. ह्याचा सुवास जास्त वेळ टिकत नाही म्हणून कुपी जवळ बाळगूनच असतो. खीखीखी 6. उद - मागे एकदा मित्र मक्के ला गेला असताना खास लक्षात ठेऊन माझासाठी आणलेले अत्तर. ह्याचा वास म्हणजे केवळ जन्नत. अहाहा. अगदी पुरवून पुरवून वापरतो. 7. मुखमल अजमल - केवळ अप्रतिम. 8. ice बर्ग - काहीसे deo च्या वासाकडे झुकणारे आणि थोडे चिकट असणारे अत्तर. शाही चंदन - काही फारसा फरक जाणवला नाही पण किंमत मात्र डबल. दिवसाच्या मूड प्रमाणे आज कुठले अत्तर लावावे हे ठरवतो. :) :) :) औरंगाबादेत अत्तर गल्ली आहे. तिकडचा एक पंटर पकडला आहे. साहेब आमचं अत्तर प्रेम बघून थेट पुण्याला कुरिअर करतात. त्यांच्याकडे खास वर्जिनल माल असतो म्हणे.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 08/03/2016 - 09:11 नवीन
मस्तं लिस्ट. अत्तर कधी ट्राय नाही केलंय. पण आता करीन. पण अत्तर पर्फ्यूमसारखं स्प्रे करता येतं का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा