Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मॅटिनी

अ — अविनाशकुलकर्णी, Sun, 11/16/2014 - 03:48
मॅटिनी आज रविवारचा दिवस आहे, गुलाबी थंडीचा महिना आहे मुले पण मामा कडे गेली आहेत आज जरा चुकारच मूड आहे............ . नाष्ट्यास कांदे पोह्याचा बेत आहे लिंबू पिळून बशी वाफाळते आहे का लाजतेस प्रिये ,भरव ना घास आज तर राजा राणीच राज्य आहे......... . किचन मधे जरा लुडबूड करु दे मदतीच्या बहाण्यानं तुला सतावू देत. गारठा जरा आज अंमळ जादा आहे स्वयंपाक घरातली उब जरा घेऊ देत........ . नको ति आज बेचव भेंडी अन गवार कोवळी मटार सोलण्यास घेतली आहे नारळ घालून उसळीचा फक्कड बेत आहे, अन्नपुर्णे, तुझ्या हाताची चव निराळीच आहे....... . आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे राहू दे आवरा आवरी, आज एकांत आहे. नाइट शो तर आपला नेहमीचाच आहे, आज भामिनी ,मॅटिनी चा मूड आहे.........

प्रतिक्रिया द्या
5972 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
पाषाणभेद Sun, 11/16/2014 - 03:52 नवीन
लवकर वाचून घ्या कारण गाडी तिकडेच वळतेय.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/16/2014 - 03:55 नवीन
=)) मोबल्यावर हाय नायतर बॅकप घेतला आसता.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 11/16/2014 - 03:58 नवीन
गाडी कारशेडमध्ये जाण्याचा चान्स आहे आज ठाकठोक करून बॉडी रिपेर करायचा मूड आहे. बाल्कनीची तिकीटे १० का २० पॉपकोर्न कूपन फ्रि
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/16/2014 - 04:03 नवीन
बहुतेक पब्लिक आणखीन सुस्तीत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/16/2014 - 04:39 नवीन
बालदिन संपला वाटतं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 11/16/2014 - 05:55 नवीन
बाल्याची तयारी करत आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Sun, 11/16/2014 - 07:02 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/16/2014 - 04:40 नवीन
अकुं ची लिबलिबीत जिल्बी! =))
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 11/16/2014 - 05:11 नवीन
प्रौढदिनाच्या शुभेच्छांची चान चान जिल्बी =))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 11/16/2014 - 05:56 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/16/2014 - 06:51 नवीन
काका जे होईन ते होईन..ख़यालातला रविवार इंजॉय करा. आता पोरं मामाच्या गावी जाण्याची वाट पाहाणं आलं ;) -दिलीप बिरुटे (गारठ्यातला)
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 11/16/2014 - 06:58 नवीन
त्या अजाण "बालकां"ना त्यांचे "पालक" आज असे का चेकाळले त हे कळलंच नसतं ! ! :-))
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 11/16/2014 - 07:00 नवीन
अरेरे... असा रविवार कधी मिळायचा.. फ्रिज साफ करायचाय, नवरा-कम-प्लंबर-कम-इलेक्ट्रिशिअन-कम-खिळेहातोडेवाला-कम-हमाल-कम-एव्हरीथिन्ग फ्री-... वगैरे वगैरे... आज रविवार आहे! ऑल-इन-वन चा रोल वाट बघत आहे! आलो...! (हाकेला ओ देत...) :-)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/16/2014 - 07:07 नवीन
आसा रविवार कधि यायचा. *wink*
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 11/16/2014 - 08:05 नवीन
छान आहे की कविता. मुख्य म्हणजे सूचक (सटल) आहे. ह्या पेक्षा सरळसोट नि थेट धोंडोपंतांची कविता होती जी अजूनही मिपावर आहे. (उत्खनन करणारांना संधी. लाभ घ्यावा.)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 11/16/2014 - 22:23 नवीन
भाऊ इथेच द्या की लिंक... त्यावेळी मिपाकरांनी नुसती धमाल उडवली असेल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रकाश१११ Mon, 11/17/2014 - 06:05 नवीन
आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे राहू दे आवरा आवरी, आज एकांत आहे. नाइट शो तर आपला नेहमीचाच आहे, आज भामिनी ,मॅटिनी चा मूड आहे.........वा
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 11/17/2014 - 07:29 नवीन
य न जॅा य
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 11/21/2014 - 15:38 नवीन
बास का?? म्हणजे मामा मामी चा मॅटीनि मूडचा खेळ खलास कि....
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 11/21/2014 - 15:43 नवीन
ब्यॅकप घ्या ब्यॅकप घ्या
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 11/21/2014 - 15:48 नवीन
=)) जेपी ...१ सर्वर ब्याकप वाल्या लेखांसाठी घ्यायचा का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 11/21/2014 - 15:52 नवीन
म्हैलांच्या "अनाहिता" सारखा पुरुषविभाग "बघा आता" होत नाही तोवर ब्यॅकप घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/21/2014 - 15:57 नवीन
हाहाहा "बघा आता" =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ज
जेपी Fri, 11/21/2014 - 15:55 नवीन
टक्या, खिशाला खार लावायचा नाय. बॅकप घेतला आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 11/21/2014 - 15:57 नवीन
मिपाचा अनमोल "ठेवा" सांभाळून ठेव रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा