स्वर तुझा
डोळे बंद करून
ऐकत बसतो
तुझ्या आवाजातील
पहाट ओवी
अशाच स्वरात
आई म्हणायची
माझ्या लहानपणी
तुझा आवाज ऐकूनही मला
असेच वाटते
घेऊन जातो
माझ्या बालपणात
दिसू लागते ती कोवळी पहाट
आणी येत रहातो गंध
वाफाळलेल्या चहाचा
मी पसरतो आळसावून
आणी
जातो हरवून
तुझ्या स्वरात ….
केलीस ग बये
माझी सकाळ सुंदर
येतोयना तुझा कोवळा आवाज
झिरपत झिरपत
माझ्या पर्यंत
तू पाठविलेल्या
व्हाईस मेल मधून
जसा कोकिळेचा स्वर येतो दुरून
गर्द रानातून
माझ्यापर्यंत
कधीतरी
अलगद.....
तसाच तुझा स्वर
मी ऐकत बसतो
ह्या बर्फाळ एकांतात
कधीपण …
प्रकाश
💬 प्रतिसाद
(3)
व
वेल्लाभट
Mon, 11/17/2014 - 07:24
नवीन
वाह चित्ररूप काव्य
- Log in or register to post comments
ग
गौरी लेले
Mon, 11/17/2014 - 12:19
नवीन
सुरेख कविता !
अभिनंदन प्रकाश !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 11/17/2014 - 13:37
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments