Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी कधी

व — वेल्लाभट, Mon, 11/17/2014 - 06:49
हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी. विडंबन नाही, पण ज़हनसीब च्या चालीवर बसणारी ही कविता. कधी कधी कधी कधी मी गातो एकट्याने कधी कधी अजूनही अजूनही आठवते एक गाणे कधी कधी धृ कधी काळी त्या ओळी माझ्या मला वाटल्या मनाच्या गोष्टीही त्या शब्दांमध्ये दाटल्या धूळीच्या राशी त्या दिवसांवर आता साठल्या तरी पुन्हा तरी पुन्हा उलगडतो तीच पाने कधी कधी १ कधीतरी वाटेवरती जेंव्हा मी विसावतो उगाचच मागे का मी तेंव्हा वळून पाहतो अजूनही कुणाला तरी शोधत असा राहतो खुणवती खुणवती ती हिरवी गर्दराने कधी कधी २ a कधी कधी नकळत होतो थोडासा उशीर अन अनोळखी चेहरे ही मग देती कधी धीर अन चहुकडे बघता बघता होतो मी अधीर अन हरवतो बघुनिया चमचमती ती दुकाने कधी कधी ३ कधी मग दरबारी अन प्याला वाटतो हवा अन कधी भैरवीतही ऐकू येई मारवा कधी ठेका त्या इंग्रजीचाही हवा हवा उमगती उमगती गज़लाही त्या नव्याने कधी कधी ४ कधी कधी कधी कधी मी गातो एकट्याने कधी कधी अजूनही अजूनही आठवते एक गाणे कधी कधी कधी कधी कधी कधी मी गातो एकट्याने कधी कधी - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
1608 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रकाश१११ Mon, 11/17/2014 - 14:45 नवीन
कधी काळी त्या ओळी माझ्या मला वाटल्या मनाच्या गोष्टीही त्या शब्दांमध्ये दाटल्या धूळीच्या राशी त्या दिवसांवर आता साठल्या तरी पुन्हा तरी पुन्हा उलगडतो तीच पाने कधी कधी १....सुरेख
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 11/18/2014 - 10:14 नवीन
मनापासून धन्यवाद प्रकाश
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 11/25/2014 - 16:05 नवीन
क्या बात.. मस्त कविता एकदम. मुळ गाणे मला माहितीच नाही किंवा आठवत नसेल त्यामुळॅ तर कविता आनखिनच छान वाटली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 11/26/2014 - 06:34 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
स
स्वप्नज Tue, 11/25/2014 - 16:47 नवीन
कविता वाचली नाही... चक्क कविता गाईली...(शेजारी कोणी नव्हते याची खात्री करुन) मस्त जमलेय गीत/कविता...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 11/26/2014 - 06:29 नवीन
मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा