Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कल्पनेतल्या डोक्याच्या दह्याने ... - भाषेची दौर्बल्ये

A
arunjoshi123
Mon, 11/17/2014 - 10:34
🗣 52 प्रतिसाद
मौजमजा
कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल.
---------------------------- हे वाक्य दिडेक वर्षापासून ऋषिकेशच्या सहीत रोज दिसते. या वाक्याचा साहित्यिक अर्थ तज्ञांना स्पष्ट आहेच. पण इथे ते उदाहरण घेऊन भाषेची दौर्बल्ये मांडत आहे. (माझ्या स्वतःच्या लेखनातही भाषेची अनेक दौर्बल्ये आहेत/असणारच. पण विषय तो नाही.) --------------------------- पायरी १: "कल्पनेतल्या" म्हणणे चूक आहे. कल्पना एक संकल्पना आहे नि तिला मिती (म्हणून आत / बाहेर असे प्रकार )नसतात. परंतु रिलेशन असते. तेव्हा कल्पनेच्या असे म्हणायला पाहिजे. (भाषेत षष्ठी विभक्ती फक्त संबंध दाखवते म्हणून ती अचूकपणे बिनधोक वापरता येते. कारण आपल्याला वस्तूंमधे कोणता तरी एक संबंध आहे इतकेच सांगायचे आहे तेव्हा ही विभक्ती सेफ आहे.) पायरी २: धूपदीप हा धूप आणि दीप असा द्वंद्व समास आहे. पण धूपदीपांनी म्हणतात १. धूपाने नि दीपाने कि २. धूपाने नि दीपांनी कि ३. धूपांनी नि दीपाने कि ४. धूपांनी नि दीपांनी पैकी नक्की काय हे ठामपणे सांगता येत नाही. म्हणून ते वेगवेगळे लिहिलेले बरे. पायरी ३: आता "कल्पनेच्या धूपांनी आणि दीपांनी" (समजा दोहोंचे अनेकवचन असे अपेक्षित आहे) म्हटले. पण इथे दीप हे कल्पनेतले आहेत कि कोठले तरी वेगळे, बाहेरचे, कल्पनेचा संबंध असलेले कि नसलेले हे कळत नाही. म्हणून कल्पनेच्या शब्द दोनदा लिहायला लागेल. आता "कल्पनेच्या धूपांनी आणि कल्पनेच्या दीपांनी" असे म्हणू. पायरी ४: १. कल्पनेच्या धूपांनी आणि २. कल्पनेच्या दीपांनी मधे "आणि" चा वापर संदिग्ध आहे. देव नक्की केव्हा खुष होतो? दोहोंनी सवत्यासवत्याने कि दोघे एकत्र असताना यापैकी एक ठाम अर्थ काढता येत नाही. म्हणून सुधारून "कल्पनेच्या धूपांनी आणि कल्पनेच्या दीपांनी या दोहोंनी एकत्र" असे करू. पायरी ५: पुलंचे हे वाक्य वाचताना सबब "खुष होण्याची कल्पना (प्रक्रिया नव्हे)" देवाचीच का, त्याच्याच स्वतःच्या डोक्यातली का असे मधे मधे वाटते. त्यामुळे तिथे "मनुष्याची कल्पना" असे लिहिणे गरजेचे आहे. मग ते "मनुष्याच्या कल्पनेच्या धूपांनी आणि मनुष्याच्या कल्पनेच्या दीपांनी या दोहोंनी एकत्र" असे होईल. पण "मनुष्याच्या कल्पनेचा धूप" कि "मनुष्याच्या धूपाची कल्पना"? बहुतेक "मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना" याचा अर्थ व्यवस्थित होतो. पायरी ६: "कल्पनेतल्या धूपदीपांनी" म्हणताना १. देवाला धूपदीप प्राप्त झाल्यावर किंवा २. माणसाच्या मनात केवळ त्यांची कल्पना आहे म्हणून असे दोन अर्थ होतात. नक्की काय ते शेवटपर्यंत कळत नाही. आपण प्राप्त होणे गृहित धरू. ती कल्पना पोरगी आहे कि संकल्पना हे देखिल नीट स्पष्ट व्हायला हवे. म्हणून आपण "मनाचे" हा शब्द घालू. (पुलंना मनोबा माहित असायची शक्यता न के बराबर.).मग ते वाक्य असे दिसते:
जर मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना आहे तसे धूप आणि मनुष्याच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना जशी आहे तसे दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर ...
किंबहुना मूळ वाक्यातील कल्पना हा शब्द, जो त्या वाक्याचे क्रक्स/सौंदर्य आहे, तो रिडंडंट वाटत आहे. कारण त्याचा काही अर्थ निघत नाहीय. "धूप आणि दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर ..." इतकेच अर्थपूर्ण आहे. पायरी ७: पुढे "कल्पनेतील सज्जनपणा"बद्दल. आतापर्यंत येथल्या सार्‍या कल्पना ज्या मनुष्याच्या संदर्भात हे वाक्य आहे त्या मनुष्याच्या आहेत. पण तो सज्जनपणा हा मोठा लोचा आहे. १. इतरांच्या कल्पनेतील मनुष्याचा सज्जनपणा २. मनुष्याच्या कल्पनेतील इतरांचा सज्जनपणा ३. कोणाच्याही कल्पनेतला कोणाचाही कोणताही सज्जनपणा असे त्याचे तीन अर्थ निघू शकतात. मग ते वाक्य असे दिसते:
जर मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना आहे तसे धूप आणि मनुष्याच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना जशी आहे तसे दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर अशा मनुष्याच्या मनाच्या इतरांच्या सज्जनपणाच्या कल्पनेमुळे त्याने तृप्त राहायला काय हरकत आहे?
पायरी ८: प्रक्रिया अ (धूपदीप मिळणे) मुळे ब (देव) स्थिती क (खूष) मधे जात असेल तर प्रक्रिया ड (इतरांचा काल्पनिक सज्जनपणा) मुळे ई (मनुष्य) स्थित फ (तृप्तता) मधे जायला पाहिजे असे अजब लॉजिक इथे आहे. कशाचा कशाला अर्थाअर्थी संबंध नाही. पण त्याचा नी भाषेचा संबंध नाही. पायरी ९: हा प्रश्न आहे कि हरकत नसावी असा विचार आहे हे कळत नाही. पायरी १०: यात मनुष्य शब्द तीनदा आणि कल्पना हा शब्द पुन्हा तीनदा आला आहे. इथे तिन्ही ठिकाणी तोच मनुष्य अभिप्रेत आहे, जेव्हा कि तिन्ही ठिकाणी कल्पना हा शब्द वेगवेगळ्या कल्पनांना आहे. प्रत्येक वेळी आलेला हा मनुष्य तोच आहे हे निसंदिग्धपणे कसे सांगावे? या पायर्‍या बर्‍याच पुढे नेता येतील पण सध्याला असो. ------------------------- तर (या सगळ्या पायर्‍या टाळून, इफ अप्लिकेबल) तुम्ही इथे आलेले आहातच तर खालचे दोन गंमतशीर खेळ खेळू: १. पुलंचे वाक्य तोच आणि एकच आशय देत अचूक शब्दांत मांडणे. त्याचे दोन किंवा जास्त अर्थ निघाले नाही पाहिजेत. २. मूळ वाक्याचे (नको ते) शक्य तितके अर्थ काढणे.

प्रतिक्रिया द्या
14166 वाचन

💬 प्रतिसाद (52)
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 09:48 नवीन
वेल, १. चहापत्ती ओली गोडसर असल्यास लहानपणी २. साखर आजही ३. दूध आजही पोटात वेगवेगळं रिचवतो मी कधीकधी. अर्थात या नंतर मी उभा राहिलो काय, बसलो काय, झोपलो काय - वायू सर्वत्र - त्या जागा निर्वात थोडीच असणारेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पैसा Fri, 11/21/2014 - 04:57 नवीन
४. इतर जन सबब माणसाच्या सज्जनपणाबद्दलची कल्पना करतात. ५. अशा स्वतःबद्द्लच्या सज्जनपणाच्या कल्पनेमुळे सबब माणसाने वर देव जसा खुष होतो आहे त्या धर्तीवर तृप्त राहायला हरकत नसावी.
इथे सज्जनपणा सबब माणसाचा आहे का दुसरा कोणी आपण सज्जन असल्याचे दाखवतो ते पाहून सबब माणूस खूश होतो, याबद्दल शंका. म्हणजे एक उदाहरण देते. जोशीबुवा मला म्हणाले, तुला माझा मोबाईल देतो. जोशीबुवा कित्ती चांगले, मला मोबाईल देणार, खरे सज्जन आहेत हो; म्हणून मी खूश होते. आता जोशीबुवा खरे सज्जन/चांगले असतील किंवा नसतील, ते मला मोबाईल देतील किंवा नाही देणार. कदाचित त्यांना नकोसा झालेला मोबाईल माझ्या गळ्यात घालतील. ते सगळं आत्ता लागू नाही. सध्या जोशीबुवांच्या चांगुलपणाबद्दल मी खूश व्हायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा