हरियाणाचे संत रामपाल प्रकरण आणि न्यायालयांचा अवमान करणारे चाहत्यांचे सांशंकीत वर्तन
हरियाणा राज्यात (तथाकथीत संत) रामपाल नावाच्या व्यक्तीवर न्यायालयीन अवमाननेचे आणि हत्येचे काही आरोप आहेत. न्यायालयात उपस्थिती टाळण्याचे चाळीसपेक्षा अधीक प्रयत्नांनतर उच्चन्यायालयानी अजामीनपात्र वॉरंट काढून रामपालला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे या रामपाल महाशयांनी चक्क स्वतःचे खासगी सशस्त्र कंमाडो आणि चाहत्यांच्या भरोशावर न्यायालय आणि शासन यंत्रणेलाच खूले आव्हान दिले आहे. न्यायालयासमोर हजर न राहण्याचे त्याचे म्हणणे न्याययंत्रणा भ्रष्ट आहे. पण खरे तर अशा प्रकारचे आरोप होऊ नयेत म्हणून भारतीय घटनेनुसार आणि परंपरांनुसार भारतीय न्याययंत्रणेत बर्यापैकी समतोल आणि विश्वासार्हताही आहे की उठ सूठ कोणत्याही सोम्या गोम्याने यावे आणि न्याययंत्रणा आणि शासन यंत्रणेलाच आव्हान द्यावे हे स्विकारण्याचे धाडस करावे भारतीय न्याययंत्रणा एवढीही टा़कावू नाही.
भारतीय न्यायालयीन प्रक्रीया त्रिस्तरीय आहे स्थानिक उच्च आणि सर्वोच्च न्यायालय असे तीन स्तर आहेत एका स्तरावर प्रॉब्लेम असेल तर दुसर्या किंवा तिसर्या स्तरावर फिल्टर लागतोच. एखाद्या न्यायाधिशाचे एखाद्या प्रकरणात व्यक्तीगत हितसंघर्ष असण्याची शक्यता असल्यास दुसरा न्यायाधीश प्रकरण हाताळतो. त्या शिवाय हजार आरोपी सुटले तरी चालतील पण निरपराधाला शिक्षा होऊ नये हे तत्वाचीही अंमलबजावणी होतेच. ह्या तत्वामुळेच अटक झालेल्या रामपालाला जमानत मिळाली. पण हि जमानत मिळालेली मंडळी आपल्या लोकप्रीयतेचा गैरफायदा घेऊन न्यायालयीन प्रक्रीयेचाच गैरफायदा घेताना दिसतात.
माझा या धाग्याचा हेतु रामपालाबद्दल सध्या चालू प्रसंगाबद्दल मर्यादीत नाही त्याला आज ना उद्या अटक होईलच न्यायालये आणि संबंधीत यंत्रणा काय ती कार्यवाही करतील. या प्रसंगाच्या निमित्ताने काही संबंधीत पैलूंची चर्चा करणे हा मुख्य उद्देश आहे.
चाहत्यांनी आपणास आवडणार्या व्यक्तीची पाठराखण कायद्याच्या आणि न्याययंत्रणेच्या विरुद्धजाऊन करणे कितपत इष्ट आहे. अमूक तमूकचे चाहते अमूक तमूकला अटक करू देणार नाहीत अटक झाली तर सार्वजनिक हिंसेच्या उपद्रवमुल्याचा उपयोग होईल अशा धमक्या आणि अटकेचे निमीत्ताने सामाजिक शांततेचा भंग करणे कितपत उचीत असते ?
जमानत मिळालीकी आरोपातून सुटका झाल्या प्रमाणे विजयी प्रतिक्रीया देणे योग्य आहे का ?
माध्यमांची भूमीका चाहत्यांच्या वागण्याचे रिपोर्टींग करण्याची असते, का चाहत्यांना भडकावण्याची असते ?
दुसरा एक महत्वाचा मुद्दा या निमीत्ताने रामपाल सारख्या व्यक्तींना एवढ्या प्रमाणात शस्त्रे उपलब्ध होतात. अनधिकृत शस्त्रांचा आपर नियंत्रणात ठेवण्यात देशभरच्या पोलीस यंत्रणा वारंवार अयशस्वी होताना दिसताहेत. असुरक्षेने अधिक असुरक्षेचे वातावरण निर्माण होण्याची प्रक्रीया होते.
तीसरा मुद्दा न्यायालयीन दिरंगाईचा, जसे कि या रामपाल प्रकरणात या रामपालाला २००८ मध्येच अटक झाली होती पण मुख्य प्रकरण लवकर निकाली न निघताच त्याचे जास्तच फोफावले. एकतर न्यायालयीन प्रक्रीयेत अधीक वेळ जाणे न्यायालयीन प्रक्रीयेवरील विश्वास उडण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होत आहे.
अशा जमानत मिळालेल्या व्यक्तींवर चोख पाळत ठेऊन आवश्यक सुरक्षेच्या पलिकडे खासगी सुरक्षा मिळणार नाही आणि पुन्हा अटक करण्याची चौकशी आणि न्यायालयापुढे हजर करण्याची वेळ आल्यास तसे सहज करण्यासंबंधी संबंधीत कायदे आणि प्रक्रीयेत काही त्रुटी आहेत का ?
एकाच्या चुकीने दुसर्याच्या चुकीचे समर्थन न करण्याची दक्षता चाहत्यांनी घ्यावयास हवी असे तुम्हाला वाटते का ? चर्चेतील मनमोकळ्या सहभागासाठी धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }