माणुसकी
लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं
आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं
कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी ….
रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो
कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला ….
कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून"
अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं !
मग म्हणायचे आधी माणूस हो ….
वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या
लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं …
पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा
दबतच गेली सगळी स्वप्न त्याखाली ….रोज…. बदलून गेलं सगळंच
नाही झुगारता आलं ते सगळं कारण आजूबाजूचे माझेच होते… नाही कसं म्हणू त्यांना?
सहन करायची सवय तिथूनच लागली… सगळं मनात ठेवायचं …
'शूर मुलं कधीच रडत नसतात' हे आणखी एक डोक्यात ठोकलं गेलं
प्रसंग विसरले गेले पण शिकवण कायम राहिली
एक एक यत्ता जात राहिल्या…एक दिवस सुशिक्षित म्हणून शिक्का बसला
प्रगती पुस्तकांची रास लागली पण खरी प्रगती कुठे झाली ?
माणूस म्हणून कसं वागायचं हे लहानपणी शिकवलं होतं
पण तरीही शिवाजी शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा ही तो घरच्यांची इच्छा !
आपण बरं आणि आपलं काम बरं हेच सांगण्यात आलं सतत
आज ही हृदयद्रावक प्रसंग दिसला की काळीज पिळवटून निघतं सुरुवातीला
मग परत तेच ठसवलेले विचार आणि डोक्याचा भुगा
काढता पाय घेतला जातो तिथून पण मन त्याची पाठ सोडत नाही
बदलावंसं वाटतंय स्वतःला पण जोखड अजूनही आहेच मनात
मग फक्त बहिणाबाईचे ते शब्द आठवत राहतात ….
"धावा ऐकून न आडला त्याले पाय म्हणू नाही"
काय लिहुन गेली ही बाई!! खरच!!+१ अपर्णा: तुमचं "धावा ऐकुन न काढला त्याले पाय म्हणु नाही" हे व्हर्जनही खासच! मा. पं,: लेखन आवडलं.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }