Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कामाचे बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग १

A
arunjoshi123
Wed, 11/19/2014 - 10:34
🗣 96 प्रतिसाद
मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे. तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते. या व्यतिरिक्त, आपण बर्‍यापैकी मध्यम वर्गाच्या आसपासचे असल्याने, आपल्या मनात बरेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, धार्मिक, मानववंशशास्त्रसंबंधित, उत्क्रांतीसंबंधित, इ इ अनेक प्रकारचे छोटे मोठे कामाचे वा बिनकामाचे १-२ ओळींचे विचार येतात. तितकी एक ओळ, विचार लिहिण्यासाठी धागा काढणे इष्ट वाटत नाही. तेव्हा असे प्रश्न नि विचार इथे एकेका प्रतिसादाच्या रुपाने सदस्यांनी टाकावेत. आता कोणी म्हणेल इंटरनेट, गुगल, विकिपिडिया असताना याची काही गरज नसावी. अर्थातच हे खरे आहे. याची ८०% गरज इंटरनेट भागवू शकते. पण तरीही खालील काही निरीक्षणे नोंदवतो. १. इंटरनेटवर आपण मशिनला प्रश्न विचारत असतो. मशिन भाव पोचला आहे का हे बर्‍याचदा कळत नाही. २. नेटवर आलेल्या शोधांना वाचून पाहून उर्जा कधी कधी इतकी घालावी लागते कि आपण ते कुतुहल "राहू देतो". ३. विकिपेडिया खूप छान आहे पण तो संज्ञा खूप वापरतो आणि अशा नव्या संज्ञांचे खूप सारे संदर्भ, लिंका देतो. ४. हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते. ५. उत्तर मिळत असताना जालाशी पुढे संवाद करता येत नाही. केल्यासही त्याला मिपीय संवादाचा फ्लेवर नसेल. अजून एक - असे बरेचशे प्रश्न असतात कि ते गुगलसाठी नसतातच. अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते. सध्याला आपण या इनिशिएटिवबद्दल काय म्हणू इच्छिता ते सांगा वा आपले प्रश्न विचारा, विचार प्रकट करा वा इतरांचे प्रश्न उत्तरा वा विचारांवर भाष्य करा. आपल्या विचारावरचे एखादे थर्ड पार्टीचे सहमतीपूर्ण भाष्य पाहिले कि दिवस फार चांगला जातो असे जनरल निरीक्षण आहे. ----------------------------- अर्थातच मिपा काय विचारले जात आहे, त्याचे काय उत्तर दिले जात आहे नि त्याधारित कृतींचा काय परिणाम होत आहे याला जबाबदार नसेल.
  • कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २

Book traversal links for कामाचे बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग १

  • कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २ ›

प्रतिक्रिया द्या
45693 वाचन

💬 प्रतिसाद (96)
व
विजुभाऊ Wed, 11/19/2014 - 10:37 नवीन
अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते. आणि आमच्या डोक्याची मंडई होते
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 11/19/2014 - 11:37 नवीन
तुमी सोप्पे प्रश्न इचारा ना राव. शिवाय अवगड प्रस्न इचारायला बंदी घाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
वेल्लाभट Wed, 11/19/2014 - 10:50 नवीन
ओह ! अजून एक... चांगलं आहे. मिपा गूगल ला काँपीट करेल काही काळाने. 'सर्च इंजिन दॅट अन्डरस्टँड्स युवर एमोशन्स' अशी काहीशी टॅगलाईन घेऊन.
  • Log in or register to post comments
ह
हवालदार Wed, 11/19/2014 - 10:57 नवीन
१) गचान्डी धरणे म्हन्जे नक्की काय करणे? २) बोम्बलत सुटणे याला आरोळ्या देत सुटणे यपेक्शा अजून काही अर्थ आहे का?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 11/19/2014 - 12:18 नवीन
खरंच कि, गचान्डी शरीरात कुठे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हवालदार
ख
खटपट्या गुरुवार, 11/20/2014 - 01:43 नवीन
गचान्डी हा शरीराचा भाग नसावा बहुतेक. माझ्यामते गचान्डी म्हणजे कॉलरला धरुन नेणे/पकडणे. कॉलर नसेल तर जे काही घातलंय त्या वस्त्राचा कॉलरजवळील भाग. जसे पोलिस एखाद्या चोराला पकडून नेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ख
खटपट्या गुरुवार, 11/20/2014 - 01:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मदनबाण गुरुवार, 11/20/2014 - 10:07 नवीन
गचान्डी कळलं पण मग मुसक्या आवळणे म्हणजे काय ? कसे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 10:25 नवीन
मुसक्या आवळणे याचा उगम शेतीत आहे. धान्य पिकून त्याची कापणी केल्यावर बैल त्यावरून फिरवायचे सो दॅट दाणे व बाकी गोष्टी वेगवेगळ्या होतील. तसे करताना बैलांनी धान्य वा अन्य काही खाऊ नये म्हणून त्यांच्या तोंडापुढे फडके वा तत्सम बांधायचे. दॅट इज़ आवळिंग ऑफ मुसक्या. मुसकी म्हणजे तोंड असावे. मुस्काट फोडणे, मुस्काटात मारणे, इ.इ. म्हणतात तोही त्यातलाच प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कपिलमुनी Fri, 11/21/2014 - 11:53 नवीन
तूच ना तो ? तोच ना तू ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेपी गुरुवार, 11/20/2014 - 10:25 नवीन
पुर्वी धान्याचे खळे करताना जनावरचा वापर व्हायचा.बैलांनी खळ्यातील धान्यात तोंड घालु नये यासाठी त्यांचे तोंड दोरीच्या जाळीने बंद करत.या जाळीला मुसके असे नाव आहे.यावरुन मुसक्या आवळणे आल आसव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 10:26 नवीन
अच्छा, जाळीला मुसके म्हणतात तर! मी तोंडालाच मुसके समजत होतो. अज्ञानाची मुसकी आवळल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मदनबाण गुरुवार, 11/20/2014 - 10:32 नवीन
ओक्के... धन्यवाद ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेपी गुरुवार, 11/20/2014 - 10:35 नवीन
हायला बहुतेक दोघ एकाच वेळी टायपत होतो की,14-55 ची एकच वेळ दाखवतय. आणी तुमच्या मुसक्या आमी आवळाव्या तोबा तोबा *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रन्गि पाउस Fri, 11/21/2014 - 19:30 नवीन
बालपणी मुस्कट (muscat/मस्कत) हे एक ठिकाण आहे हे कळल्यावर ...मुस्कटात ह्या शब्दाला एक वेगळीच फ्लेवर आली/:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 11/19/2014 - 11:29 नवीन
तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते
बाप्रे..... तुम्ही "असली" सदरं पेप्रात सल्ले म्हणून छापण्याच्या विचारात आहात का ? अवांतर कुतूहल- पोटापाण्यासाठी काय करता आपण?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 11/19/2014 - 11:35 नवीन
पोटापाण्यासाठी मी नोकरी करतो. इतर काही अजून रोचक करता येईल असे वाटत असल्यास सांगा =)) -------------- लैंगिक शब्द हायलाईट का केला आहे? ते वेगळे कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 11/19/2014 - 11:45 नवीन
अमुक तमुक "तज्ञ " म्हणून पेप्रात सल्ले छापायचे ... ता.क- तज्ञ म्हणजे आत्मविश्वासाने समोरच्याला चुकीचा सल्ला देणारा माणूस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 11/19/2014 - 12:16 नवीन
एक प्रश्न - मामलेदार कोण?
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 11/21/2014 - 11:32 नवीन
तहसिलदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ब
बॅटमॅन Fri, 11/21/2014 - 12:02 नवीन
मामलेदार म्हणजे रमा दामले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
क
कंजूस Wed, 11/19/2014 - 14:18 नवीन
गच्छंती(गम गच्छामि वगैरे)केली- तो गेला चे अपभ्रंश -गच्छंति करायला लावली -गच्छांडी -इधरसे खसकने वगैरे ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/19/2014 - 14:23 नवीन
बोँब ठोकणे ही गोष्ट स्मशानात चिता पेटवल्यावर करतात अर्थात केवळ आरोळी देणे नाही तर शोक अनावर होऊन दु:खावेगाने ओरडणे.
  • Log in or register to post comments
ह
हवालदार Wed, 11/19/2014 - 15:39 नवीन
आत्ता कळाले की आमचे पिताश्री पुर्वी का ओरडले होते ते. म्हणजे गमतीने देखील सगळीकडे बोम्बाबोम्ब म्हणू नये तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्यारे१ Wed, 11/19/2014 - 16:09 नवीन
हवालदार, खरंच माहिती नव्हतं का काय? होळी असते का तुमच्याकडं? नसली तर एक काम करा. तोंडाचा आ करा. (चंबू केलात तरी चालेल) आता तोंडातून, घशातून आ आ आ असा आवाज काढा नि त्याबरोबरच त्वायकोंदो मध्ये हाताची मुठ पंच मारतात तशी करा आणि तळहातामागचा भाग तोंडासमोर आणा. हळू हळू हात तोंडावर आपटा. जमलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हवालदार
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 11/19/2014 - 16:33 नवीन
मला पडलेला एक गहन प्रश्णः असे धागे काढण्यामागचा प्रेरणास्त्रोत काय असावा?
  • Log in or register to post comments
स
सचिन कुलकर्णी Wed, 11/19/2014 - 16:58 नवीन
मिपा माबो होण्याच्या मार्गावर.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
आ
आदूबाळ Wed, 11/19/2014 - 17:18 नवीन
कुणी काही म्हणो - मला तर आवडतात असले धागे. मलाही असले लय प्रश्न पडतात, आणि त्याची उत्तरं शोधायचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करत असतो. इतरांना पडलेले प्रश्न पाहिले की आपुलिया जातीचा सापडल्याचा आनंद मिळतो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 08:40 नवीन
हाहाहा, अगदी अगदी!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
र
रामपुरी Wed, 11/19/2014 - 18:10 नवीन
"हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते" तुम्ही मराठी संस्कॄतीतले दिसत नाही. असलं मराठी वाचून पश्चिमाभिमुख टोकावर जायला पाय सळसळतोय
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 08:19 नवीन
तुम्ही मराठी संस्कॄतीतले दिसत नाही.
असे म्हणता यावे. महागावरान पार्श्वभूमी (याला जनरली मिडल क्लास लोक मराठी संस्कृती म्हणायला लाजतात), त्यानंतर सरळ दिल्लीत १५ वर्षे नि सासर अमराठी यामुळे आपलं निरीक्षण बरोबर वाटतंय. ----------------
असलं मराठी वाचून ...............
भाषेत इतकी दौबल्ये असताना भाषाशुद्धीवर इतका भर देणं मला फार विचित्र वाटतं. टेबलाचा पाय तुटला असताना तो दुरुस्त करायचा सोडून नेहमी नेहमी टेबलक्लॉथ ठिक केल्यासारखं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
ब
बोका-ए-आझम Wed, 11/19/2014 - 20:54 नवीन
मिपीय संवाद हा खल्लास शब्द सापडला बाकी इथे!
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 11/20/2014 - 06:17 नवीन
निचिंती हा शब्द खूप दिवसांनी वाचला, आजकाल सगळे लोक सर्रास निश्चिंती असं म्हणतात.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 07:15 नवीन
धाग्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सर्वांचे आभार. हा धागा मीच विचारायच्या प्रश्नांचा धागा आहे असा गैरसमज होऊ नये म्हणोन सध्याला आखडता घेतोय. अन्यथा मी इतके प्रश्न विचारतो कि धागा मी एकट्यानेच प्रश्न विचारायचा आहे कि काय असे वाटू लागते.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 08:31 नवीन
धाग थांबवू नका! माझा एक प्रश्न आहे, पूर्वी मानलेला भाऊ, मानलेली बहीण असले प्रकार खूप ऐकायला यायचे. हल्ली हे बंद झालंय का?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 11/20/2014 - 12:43 नवीन
मानलेला भौ. ... आमच्या शाळेत नववीत असताना" मानलेली बायको" "मानलेला नवरा" असेही काही प्रकार होते. कॉलेजात असताना मित्राच्या मित्राला आम्ही "चुलत मित्र "मावस मित्र"असे म्हणायचो. चुलत मैत्रीणी सुद्धा असायच्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 08:35 नवीन
माझ्या तरी मानलेल्या बहीणी असायच्या. पण आता संपर्क तुटला आहे. लातूरकडे ८० च्या, ९० दशकात बाय डिफॉल्ट स्त्रीयांना शेजारच्या, अल्पपरिचित, ताई म्हणत. जिला भाऊ नाही, तिला कोणी मानलेला भाऊ असेच असे.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 08:40 नवीन
शेजारच्यांना सहसा काहीतरी नात्याने हाक मारतातच. पण त्याकाळात कॉलेजमधे, नोकरीच्या जागी वगैरे असे मानलेले भाऊ बहिणी खूप पाहिले/ऐकले आहेत. मात्र आताची कॉलेजला जाणारी मुलं मुली सरळ मित्र आहे, मैत्रीण आहे असं म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 08:56 नवीन
अगोदर हे मित्रमैत्रीण प्रकर्ण इतके पचनी पडले नसल्यानेच मानलेल्या भौभैणीचा प्रकार जास्त असावासे वाटते. त्यात परत या मानलेल्या भैणी राखी बांधत असत म्हणजे तर एटर्नल फ्रेंडझोनची निश्चिंती =)) नात्यातली बहीण राहोच, अशा बहिणीबद्दल जरी कुणी प्रेम जाहीर केलं तर लोक काय साला इन्सेस्ट करतोय अशा नजरेने पहायचे तोही एक रोचक प्रकार होता. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 08:59 नवीन
आणि अशा मानलेल्या भाई आणि ताईने नंतर समजा लग्न केलंच तर तो प्रकार "दादा भाई नौरोजी" म्हटला जायचा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 09:35 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यसवायजी गुरुवार, 11/20/2014 - 12:34 नवीन
दादा भाई नौरोजी :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/20/2014 - 16:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 09:03 नवीन
एकाच गावात मानलेले भाऊ बहीण वेगवेगळे संसार करू लागले, मोठे झाले तर बहिणीला भावाच्या घरात खूप मोठा सांपत्तिक अधिकार असे असे आठवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह गुरुवार, 11/20/2014 - 08:39 नवीन
'प्रश्न पडतात' कसे ? माझ्यासमोर तर ते उभे राहतात ! *biggrin*
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 08:55 नवीन
उभे राहिलेले प्रश्न इथे नाही विचारायचे, फक्त पडलेले. किती ती भाषेची दौर्बल्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 08:57 नवीन
दौर्बल्य भाषेचे नसून भाषिकांचे असते. किती हे दौर्बल्य =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्यारे१ गुरुवार, 11/20/2014 - 09:02 नवीन
+१. भाषा हे 'फक्त' माध्यम आहे. अन्यथा दोन वेगळ्या भाषा वापरणारे लोक एकमेकांसमोर आले असता त्यांच्यात 'संवाद'च झाला/घडला नसता. अथवा मूकबधिर लोकांमध्ये काही संभाषणं घडू शकली नसती. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 09:05 नवीन
भाषेला असे हातासरषी बाजूला करणारे प्रतिसाद मला फार प्यारे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 11/20/2014 - 09:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा