Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कामाचे बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग १

A
arunjoshi123
Wed, 11/19/2014 - 10:34
🗣 96 प्रतिसाद
मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे. तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते. या व्यतिरिक्त, आपण बर्‍यापैकी मध्यम वर्गाच्या आसपासचे असल्याने, आपल्या मनात बरेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, धार्मिक, मानववंशशास्त्रसंबंधित, उत्क्रांतीसंबंधित, इ इ अनेक प्रकारचे छोटे मोठे कामाचे वा बिनकामाचे १-२ ओळींचे विचार येतात. तितकी एक ओळ, विचार लिहिण्यासाठी धागा काढणे इष्ट वाटत नाही. तेव्हा असे प्रश्न नि विचार इथे एकेका प्रतिसादाच्या रुपाने सदस्यांनी टाकावेत. आता कोणी म्हणेल इंटरनेट, गुगल, विकिपिडिया असताना याची काही गरज नसावी. अर्थातच हे खरे आहे. याची ८०% गरज इंटरनेट भागवू शकते. पण तरीही खालील काही निरीक्षणे नोंदवतो. १. इंटरनेटवर आपण मशिनला प्रश्न विचारत असतो. मशिन भाव पोचला आहे का हे बर्‍याचदा कळत नाही. २. नेटवर आलेल्या शोधांना वाचून पाहून उर्जा कधी कधी इतकी घालावी लागते कि आपण ते कुतुहल "राहू देतो". ३. विकिपेडिया खूप छान आहे पण तो संज्ञा खूप वापरतो आणि अशा नव्या संज्ञांचे खूप सारे संदर्भ, लिंका देतो. ४. हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते. ५. उत्तर मिळत असताना जालाशी पुढे संवाद करता येत नाही. केल्यासही त्याला मिपीय संवादाचा फ्लेवर नसेल. अजून एक - असे बरेचशे प्रश्न असतात कि ते गुगलसाठी नसतातच. अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते. सध्याला आपण या इनिशिएटिवबद्दल काय म्हणू इच्छिता ते सांगा वा आपले प्रश्न विचारा, विचार प्रकट करा वा इतरांचे प्रश्न उत्तरा वा विचारांवर भाष्य करा. आपल्या विचारावरचे एखादे थर्ड पार्टीचे सहमतीपूर्ण भाष्य पाहिले कि दिवस फार चांगला जातो असे जनरल निरीक्षण आहे. ----------------------------- अर्थातच मिपा काय विचारले जात आहे, त्याचे काय उत्तर दिले जात आहे नि त्याधारित कृतींचा काय परिणाम होत आहे याला जबाबदार नसेल.
  • कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २

Book traversal links for कामाचे बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग १

  • कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २ ›

प्रतिक्रिया द्या
45693 वाचन

💬 प्रतिसाद (96)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/20/2014 - 09:07 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 08:57 नवीन
तुमच्यापैकी कोणी पीसीला ५.१ होम थिएटर "नीट" कनेक्ट केलं आहे का? सीपीयूच्या रिअर साईडचे जॅक आणि वूफरचे जॅक यांचा काही संबंध दिसेनाय.
  • Log in or register to post comments
व
वाचक Fri, 11/21/2014 - 23:02 नवीन
असावा असे गृहित धरुन उत्तर सब वूफर हा 'अ‍ॅक्टिव्ह' किंवा 'पॅसिव्ह' असतो - अ‍ॅक्टिव्ह ला पीसी चे कनेक्शन बहुधा चालणार नाही, वेगळा 'प्री-अँप' लागेल. फोटो टाका, मग नीट सांगता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 09:00 नवीन
मिपावर फोटो टाकण्यासाठी तो इतरत्र अपलोडवून इथे त्याची लिंक द्यावी लागते. (हा द्रावीडी प्राणायाम का?) तर तुम्ही फोटो कोठे अप्लोड करता? आणि त्यातल्या केवळ इथेच दिसायच्या फोटोची परमिशन्स कशी बदलता? ---------------- लॅपटॉपवरून आणि मोबाईलवरून फोटो मिपावर डकवायला सर्वात सोपा मार्ग काय?
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:11 नवीन
मिपाच्या सर्व्हरवर ताण पडू नये म्हणून. कारण चित्राम्च्या फाईली जास्त वजनदार असतात. फोटो अपलोड गूगल फोटो, पिकासा, फ्लिकर, फेसबुक कुठेही करा! गूगलवर प्रत्येक फोटोला शेअरिंग ऑप्शन्स असतात. तिथून त्याचे सेटिंग बदलता येते. मिपावर फोटो टाकायला शॉर्टकट नाही. कोणत्यातरी साईटीवर तो फोटो असला पाहिजे. घरच्या पीसीवर असून उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
समीरसूर गुरुवार, 11/20/2014 - 10:51 नवीन
मिपाच्या अँड्रॉईड अ‍ॅपवर मराठी कसे लिहावे? मला पासवर्डच टाकता येत नाही त्यामुळे सगळं घोडं अडतं.
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 11/20/2014 - 11:25 नवीन
संगणकावरुन मिपावर येताना आयडी मराठीत पडतो आणी पासवर्ड इंगजीत. मोबल्यावर मराठी आयडी टंकल्यावर किपॅड टोगल करुन इंगजीत जायचे आणी पासवर्ड टाकायचा.मला ही हा प्रॉब्लेम यायचा.ट्राय करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
म
मदनबाण गुरुवार, 11/20/2014 - 10:59 नवीन
हल्ली डास फार वाढले आहेत ! फार चावतात... डास मारणारे कॉइल, जाळायचा पेपर , लिव्कीड , स्प्रे सोडुन इतर कोणत्या घरगुती उपायांनी यांचा पराभव करता येइल. ऑडोमॉस रोज चोळण्याचा कंटाळा येतो... काही वेगळा उपाय यावर आहे काय ? आता मी माझ्या तिर्थरुपांना सहज प्रश्न केला होता :- की बघा... डासा मारणार्‍या वड्या , लिक्वीड इं डास मरतात... ते मरतात { काही प्रमाणात तरी } म्हणजे या रसायनांचा परिणाम त्यांच्या शरिरावर होतो म्हणुन... मग आपल्या श्वासावाटे आपण तो सतत घेतो त्यामुळे आपल्या फुफ्फुसावर,मेंदुवर याचा परिणाम होत असेल काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:13 नवीन
मच्छरदाणी वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नाखु Fri, 11/21/2014 - 05:07 नवीन
एकदम निर्धोक आणि खात्रीशीर उपाय. विशेषतः लहान मुलांना अंगावर नीट पांघरूण घेण्याची सवय नसते आणि पंख्याने फारसा फरक (डासांना) पडत नसल्याने मच्छरदाणी उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मदनबाण Tue, 11/25/2014 - 05:00 नवीन
मच्छरदाणीचा उपाय नक्कीच चांगला आहे,पण डासांचा उपद्रव हल्ली इतका वाढला आहे की, घरच्या संगणकावर काम करताना सुद्धा तंगड्यांना लपुन छपुन चावतात ! त्यामुळेच उपाय योजने बद्धल विचारणा केली आहे. मध्यंतरी सोसायटीने धुरांडेवाला माणुस बोलवला त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही, हे अचानक डासांचे प्रमाण कसे काय वाढले ते कळत नाही, त्याच मुंबईत सध्या डेंगु चे रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिसत आहे,म्हणुन जरा काळजी वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अनुप ढेरे Tue, 11/25/2014 - 18:20 नवीन
खिडक्यांना जाळ्या बसवा. आणि घराचं दार बंद ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 11:40 नवीन
आणि ते मोबाईलवर cntl+\ कसे टायपाबे?
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:12 नवीन
तुम्हाला भाषाबदल मराठी/English स्वतः क्लिकून करावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 12:20 नवीन
मोबाईलवर इथे (या खिडकित) इंग्रजी कसे लिहावे? इंग्रजी किबोर्ड असतो पण स्पेस दाबले कि लगेच एक मराठी शब्द बनतो. मग "स्वतः क्लिकून" तेही मोबाईलवर इतरत्र, कॉपी करायचे आणि इथे पेस्ट करायचे? मोबाईलवर इंग्रजी लिहायला डोक्याचे इतके दही का होत असावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:30 नवीन
कोणता कीबोर्ड वापरताय? गूगल हिंदी कीबोर्डवरचे इंग्लिश या खिडकीत पण इंग्लिशच उमटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ज
जेपी गुरुवार, 11/20/2014 - 12:47 नवीन
my mobile can not make curd of my brain .बगा जमल 15 सेंकदात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 12:41 नवीन
मी स्विफ्त्की वापरतो. मिपावर डायरेक्त इंग्रजी टंकता येत नाही. किबोर्ड इंग्लिश मोड मधे असो नैतर हिंदी.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 11/20/2014 - 12:55 नवीन
एक प्रश्नः "व्हॉट" म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
ज
जेपी गुरुवार, 11/20/2014 - 13:01 नवीन
टाईमपास. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
र
रेवती गुरुवार, 11/20/2014 - 19:56 नवीन
सेलफोनवर होत असलेले संभाषण साठवून कसे ठेवायचे?/ तसे करता येते हे नुकतेच ऐकलेय. (मग त्यांनाच विचारा हे म्हणू नका, ते माझ्या ओळखीचे नैत)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 11/20/2014 - 22:19 नवीन
बरेचसे अँड्रॉईड अ‍ॅप्स उपलब्ध आहेतः उदा.: रेकॉर्ड माय कॉल्स काही उपकरणंही आहेत, पण हे महागडे ऑप्शन्स आहेत असं वाटतं. बाकी असं रेकॉर्डिंग करतांना काही कायदेशीर बाबींकडेही लक्ष द्यावं लागेल, त्यांचा उहापोह इथे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/21/2014 - 00:18 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! सहा पद्धती दिल्यात त्या वाचून बघते. मला एकदा हाताने लिहून गोष्टींची लिस्ट करायला नको म्हणून हवं होतं पण हे एकदम कायदेशीर प्रकरण आलं आणि ते योग्यही आहे. उपकरणं मलाही महाग वाटतायत. रेकॉर्ड माय कॉल्स वर बघते पण नेमके एकाने रिव्ह्यूमध्ये त्याच्या /तिच्या ग्याल्याक्सी एस ४ वर वर्क करत नाही असे म्हटले आहे. एक जुना फोन आहे, त्यावर बघते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
क
कंजूस Fri, 11/21/2014 - 01:56 नवीन
कार्बनच्या काही साध्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डीग पर्याय आहे. प्रत्येक रेकॉर्डीँग त्या कॉन्टैक्टचा फोल्डरमध्ये WAV फाईलफॉर्मेट साठवले जाते. ती फाईल इमेलही करता येते. इंटरनेट /अॅप नसल्यामुळे डेटा चोरण्याची काळजी नाही. फारफार उपयुक्त. {फक्त असे रेकॉर्डीँग ही सोय आहे त्याचा उपयोग कोर्टाच्या दाव्यात पुरावा ठरत नाही }
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/21/2014 - 12:00 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अंतु बर्वा Fri, 11/21/2014 - 05:44 नवीन
हिरव्या देशातुन एक होम थिएटर सिस्टीम घेउन जात आहे. वोल्टेजचा फरक असल्या कारणामुळे वोल्टेज स्टेपअप करणारी यंत्रणा (ट्रान्स्फॉर्मर) वापरण्याचा अनुभव कुणाला आहे का? गुगल्बाबा विविध पर्याय दाखवतोय पण कुणाला FirstHand Experience असेल तर पहावा म्ह्णुन इथे विचारतोय... वापरला असल्यास कुठली कंपनी इत्यादी माहीती देउ शकलात तर उत्तम :-)
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 11/21/2014 - 07:09 नवीन
उसगावाहुन मी पण सोनी ची होम थिएटर सिस्टीम आणली होती. ती इथे जोडली आणि व्होल्टेज (११०->२२०) साठी एक साधा स्विच लावला आणि सिस्टीम चालु केली पण काही वेळात (साधारण १०/१५ सेकंद) बंद पडली. बर्‍याच वेळा प्रयत्न केला पण काहीच फरक पडला नाही. मग एका टेक्नेशीअन ला दाखावला त्याने सांगीतले की वॅटेज मॅच होत नाही आहे आणि ट्रान्स्फॉर्मर बसवावा लागेल. मग मी तसा ट्रान्स्फॉर्मर उसगावाहुन एका सहकार्‍या कडुन मागवला . त्या नंतर ती सिस्टीम व्यवस्थित चालु झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा
अ
अंतु बर्वा Fri, 11/21/2014 - 17:52 नवीन
धन्यवाद मराठी माणूस. ट्रान्सफॉर्मर जोडल्यावर चालू झाली म्हणजे आधी जास्त वोल्टेज वर जोडूनही सिस्टिम डॅमेज नाही झाली म्हणायची. जाणे उद्यावर आले आहे पण आज प्रयत्न करुन बघतो ट्रान्सफॉर्मर इकडुनच घेउन जाता येतो का ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
च
चतुरंग Sat, 11/22/2014 - 03:31 नवीन
पॉवरची मोजणी अशी करा. तुमच्या सिस्टिमचे वॉटेज किती आहे ते बघा. समजा २२० वॉट आहे तर तुमच्या सिस्टिमला २२० वॉट/११०होल्ट = २ अँपिअर करंट लागणार इथे यूस मधे. तिकडे भारतात २२० वॉट/२२० वोल्ट = १ अँपिअर करंट लागणार. तुम्हाला एक दणकट ट्रान्सफॉर्मर बनवून घ्यावा लागेल ज्याची प्रायमरी २२०वोल्ट १.५ करंट देइल आणि सेकंडरी ११० वोल्ट ३ अँपिअर करंट देईल. जास्ती वॉटेज घेण्याचे कारण वोल्टेजमधले चढउतार आणि लॉसेस. सिस्टीमला व्यवस्थित फ्यूज वगैरे बसवून घ्या. पुण्यात असलात तर नागनाथपाराजवळ राजीव इलेक्ट्रॉनिक्स मधून बनवुन घ्या. मला त्याम्चा चांगला अनुभव आहे. बनवून घेताना फक्त स्टेपडाउन ट्रान्सफॉर्मर हवा आहे आणि वॉटेज अमुकअमुक एवढे सांगितलेत तरी पुरे. फ्युज मात्र घ्याच म्हनजे सिस्टिमला प्रॉब्लेम नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा
अ
अंतु बर्वा Mon, 11/24/2014 - 07:08 नवीन
खुप धन्यवाद डीटेलवारी प्रतिसादासाठी चतुरंगसर... आजच लँड झालोय भारतात. पुण्याला गेलो तर नक्कीच तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी जाईन.. पण नाहीच जाणे झाले तरी आपण दिलेल्या माहिती आधारे मुंबईतही मिळणे कठीण नसावे. सुट्टी संपुन परत येताना ईथे सेटअपचा अनुभव मांडेनच... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
A
arunjoshi123 Fri, 11/21/2014 - 08:57 नवीन
कोणता मोबाईल नेट न वापरता डायरेक्ट थर्मॉमीटरने तापमान मोजतो काय?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 11/21/2014 - 12:42 नवीन
ब्लॅक होल आहे कि नाही? हिग्ज बॉसॉन आहे कि नाही? म्हणे तो नै पण त्याची वेगळी कोणतीतरी दुसरीच दोन भावंडं सापडलीत. शेवटी काय ठरलं?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 11/21/2014 - 12:46 नवीन
एक जीपीएस(खास याचेच)उपकरण मिळते रु८हजार~ यात (अक्षांश रेखांश +) वेळ ,तापमान, आर्ऱ्दता, उंची मोजण्याचे, कँपास इ॰ सेन्सर असतात त्याने शक्य होते.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 11/21/2014 - 13:00 नवीन
मोबाईलच्या संदर्भात हे सगळं आहे फक्त थेट तापमान नाही, ह्यूमिडिटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
A
arunjoshi123 Fri, 11/21/2014 - 12:56 नवीन
आनंद कार्लसनचे गेम जे नियमांनी चालू आहेत त्या आंतरराष्ट्रीय नियमांनी चेसचा गेम दोन खेळाडूंनी (संगनमतीने म्हणा तर) लांबवायचाच ठरवला तर ते जास्त्तीत जास्त कीती चाली खेळत ड्रॉ देखिल होऊ शकणार नाहीत? १. कोणी हारला वा जिंकला कि गेम संपतो. २. स्टेलमेटझाला कि गेम संपतो. ३. तीनदा त्याच मूव रिपिट झाल्या कि गेम संपतो. ४. पन्नास चालीत प्यादे एक घर तरी "चालले" नाही किंवा प्यादासहित कोणतेही इतर मारले गेले नाही तर (डावात बाकी काहीही परिस्थिती असो, कोणतीही वेळ असो) डाव ड्रॉ होतो. ५. पहिल्या ४० (४०*२ मूव्स) चाली २ तासात खेळायच्या असतात. संपूर्ण डावाच्या दुसरा तास पूर्ण होण्याच्या सेकंदाला ४० चाली नाही झाल्या तर ज्या प्लेअरचे क्लॉक क्लिकत असते तो हरतो. ६. नंतर २० चालींना १ तास मिळतो. मागे न वापरलेला वेळ त्यात जमा होतो. ७. नंतर १५ सेकंदाला एक चाल. मागे न वापरलेला वेळ त्यात जमा होतो. ------------------ हे सगळे नियम पाळून खेळाडू टाईमपास करू लागले तर जास्तीत जास्त किती चाली खेळू शकतात. याला नंबरला मर्यादा आहेच का मुळी?
  • Log in or register to post comments
अ
असंका Sat, 11/22/2014 - 09:14 नवीन
अनेक जुने पाने स्पिकर पडले आहेत. ते एकमेकांना जोडून सराउंड सिस्टीम करणे शक्य आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 11/22/2014 - 12:17 नवीन
'लैंगिक, करीअरविषयक' मी तर घाईघाईत मधला स्वल्पविराम बघितलाच नाही.
  • Log in or register to post comments
अ
असंका Sat, 11/22/2014 - 12:20 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ट
टवाळ कार्टा Sat, 11/22/2014 - 12:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
आ
आदूबाळ Sat, 11/22/2014 - 16:00 नवीन
वेगळाच "विषय" आहे हा... :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Mon, 11/24/2014 - 10:44 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
A
arunjoshi123 Mon, 11/24/2014 - 14:17 नवीन
खुलासा - "लैंगिक करीयरविषयक" प्रश्न मला अभिप्रेत नव्हते असे नाही. स्वल्पविराम न बघण्यात फारशी काही चूक झालेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
य
यसवायजी Sat, 11/22/2014 - 12:41 नवीन
गोल्ड डिपॉजिट ही काय भानगड असते? म्हणजे, बॅन्का ते सोने विकुन कुठे इन्वेस्ट करतात आणी काही वर्षांनी तेवढेच सोने व्याजासकट परत देतात काय? काही बॅन्का तयार दागिनेसुद्धा ठेवून घेतात म्हणे. (१% पे़क्षा कमी व्याज देतात). पण त्यांचा काय फायदा आहे त्यात?
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 11/22/2014 - 13:20 नवीन
गोल्ड डिपॉझीट हे पहिल्यांदाच ऐकल. गोल्ड डिपॉझिट लोन हे माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
क
कंजूस Mon, 11/24/2014 - 13:37 नवीन
सराउंड साउंडची सिस्टिम कुठे ऐकली आहे का आणि काय अपेक्षा आहेत ?टु वे /फोरवे स्पिकर चा आवाज ऐकला आहे का ?खरा स्टिरिओ ? असं विचारण्याचं कारण प्रत्येक पध्दतीत वेगळा अनुभव असतो. जुनेपाने स्पिकर आहेत त्यात खोल /लंबगोल बेस साउंड (ढग्गा ,खर्ज ई॰)साठी उपयुक्त आहेत. वॉटेज काय आहे हे पण पहावे लागेल. फिलिप्सचे चांगले असतात.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 11/25/2014 - 17:42 नवीन
अपेक्षा इतकीच की स्पिकर टाकून द्यायला लागायला नकोत.... वॉटेज स्पिकरवर लिहिले अस्ते का? दोन कॉम्प्युटरचे स्पिकर- jbl platinum आहेत. एक जुन्या TV चा सब वूफर आहे- panasonic. हे तीन पडून आहेत. शिवाय एक फ&ओ आणि एक लोकल अशा दोन "२.१" सिस्टीम आहेत, त्या दोन्ही वापरात आहेत. हे सगळे एकत्र करता येइल का? सबवूफर ला जॅक नाहिये. फक्त दोन वायर आहेत. बाकी सराउंड म्हणजे काय ते नीट माहित नाही. डॉल्बी वाल्या टॉकिज मध्ये जसा चारी बाजूंनी आवाज येतो तसे असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा