Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिड्या मारायला, तंबाखू मळायला निवांत टपरी

आ
आगाऊ म्हादया......
Fri, 11/21/2014 - 06:32
🗣 16 प्रतिसाद
शीर्षक वाचून दचकू नका. मी माझ्या प्रोजेक्ट साठी एक विषय घेतला आहे. Barriers to intention to quit tobacco among adult tobacco users. आता यासाठी किती जणांना विचारू ना की तुम्ही सेवन करता का म्हणून...म्हणून मीच टपर्यांवर जाणार आहे. आपण पीत असलो काय नसलो काय, चांगल्या निवांत टपऱ्या नक्की माहित असू शकतात, खास अड्डे असू शकतात. ४०० लोकांचा इंटरव्यू मला घ्यायचा आहे. सर्वांची माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाईल, अन माझ्या रिसर्च साठी त्याचा उपयोग केला जाईल. Intenet based survey हे भारतात तरी सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ ठरतात. म्हणून हा प्रकार. म्हणून मग म्हटल मिपाकरांनाच विचारावं, पुण्यात असे निवांत अड्डे,वेळा कुठले आणि काय असू शकतील? सकाळी गडबड असते. दुपारी rush नसते (त्यामुळे respondent मिळत नाहीत). संध्याकाळी लोक मित्रांसोबत गप्पांच्या मूड मध्ये असतात. म्हणून निवांतपणा महत्वाचा. सिगारेट, बिडी, हुक्का, चिलीम, तंबाखू, पान, चैनी खैनी, गुटखा, मिश्री, तपकीर यापैकी काहीही. काथ्याकूट होण्याची वाट पाहतोय. आपला आगाऊ म्हाद्या....__/\___

प्रतिक्रिया द्या
10147 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ख
खटपट्या Fri, 11/21/2014 - 06:43 नवीन
र्‍हायला कुटं तुमी, मुंबै, पूने की आनकी कुटं ?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 11/21/2014 - 06:45 नवीन
अरारा आत्ता वाचलं. पुणे. पुण्याचं काही माहीत नाही बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Fri, 11/21/2014 - 07:25 नवीन
पुण्यात १ आत्मुबाबा गायछापवाले रहातात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ह
हाडक्या गुरुवार, 03/12/2015 - 18:02 नवीन
संन्यास चालू आहे ना रे तुझा सध्या.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 11/21/2014 - 13:09 नवीन
चालायचच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ज
जिन्क्स Fri, 11/21/2014 - 09:13 नवीन
कल्याणीनगर ला "अ‍ॅडलॅब्स" च्या मागे cybage, TCS अशा नावाजलेल्या आय.टी कंपन्या आहेत. तिथे भरपूर टपर्या आहेत. संध्याकाळी/रात्री त्या भागात सिगारेटच्या थोटकांचा ढीग पडलेला असतो. त्या भागात तुम्ही गेल्यास एकाच दिवशी तुम्ही ४०० लोकांचा इंटरव्यू घेउ शकाल. अवांतरः त्या भागात पुरुषांपेक्शा स्त्रीया सिगारेट ओढताना जास्त दिसतात.
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 11/21/2014 - 13:08 नवीन
नवीन माहिती. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
क
कपिलमुनी Fri, 11/21/2014 - 09:22 नवीन
एक पंढरीची वारी करा ! ४००० तरी सहज सापडतील एकाच ठिकाणी
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 11/21/2014 - 10:23 नवीन
काथ्याकुट हा धागा लिहीतांना शिर्षक आकर्षक न ठेवता केवळ शिर्षकातून अर्थबोध झाला पाहीजे. असे शिर्षक प्रश्नार्थक हवे. असा नियमच करायला हवा किंवा असले धागे संपादीत व्हायला हवे. केवळ शिर्षक वाचून फसगत होते अन आपल्या संबंधीत नसलेल्या विषयाचे अकारण वाचन होते. या विषयी वेळोवेळी जाग्रूती केली आहे. पण स्ंपादन हाच उपाय दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 11/21/2014 - 10:51 नवीन
१. आर्यभूषण छापखान्याची गल्ली (डेक्कन) २. हॉटेल पॅरेडाईज (कर्वे रस्ता, रेल्वे आरक्षण केंद्राच्या जवळ) ३. तिलक (टिळक रस्ता) ४. "नाद" नामक पानाची दुकानं (कर्वेनगर, कोथरूड) ५. शौकीन (नळस्टॉप) अवांतरः तुम्ही उत्पन्न-गटांनुसार आणि व्यवसायांनुसार stratification केलं असेलच.
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 11/21/2014 - 13:07 नवीन
हो हे सगळ आहे माझ्या लिस्ट वर, तो आर्यभूषण स्पोट सोडून. हॉटेल पॅरेडाईज तर मला हुकमी एक्का वाटलेला, कालच जाऊन आलो, पण लोक अगदी गहन चर्चा करीत असतात, मोस्टली नाकारतात इंटरव्यू. आणि सगळे स्मोकर्स. त्यामुळे नको म्हटल/,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 11/28/2014 - 03:57 नवीन
ते आर्यभूषण छापखाना गल्ली सांगून सोडलात ते बेष्ट झाल घ्या.काल जाऊन आलो. चांगले झाले इंटरव्यूज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पाषाणभेद Fri, 11/21/2014 - 10:59 नवीन
आपण कोणत्या व्यवसायाशी संब्ंधीत आहात? जसे विद्यार्थी, वैद्यकिय, समाजसेवक आदी. हा विषय गहन आहे. केवळ ४०० व्यक्तींच्या तेही एकाच शहरातील व्यक्तींच्या मुलाखती घेवून आपण या विषयाला न्याय देवू शकत नाही. केवळ पदवीसाठी ठिक आहे.
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 11/21/2014 - 13:04 नवीन
पाषाणभेद, Occupation ला महत्व आहे आणि त्यासाठी मी Kuppuswamy scale वापरत आहे. एकाच शहरातील ४०० लोकांचा मी एरवीच घेऊ शकतो कारण ३१.३ % लोकांना तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याची इच्छा आहे असा GATS चा रिपोर्ट आहे. यावरून काढलेला तो sample size आहे. Data monotonous , skewed होऊ नये याची काळजी मी घेतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
स
सुबोध खरे Fri, 11/28/2014 - 05:19 नवीन
फक्त ३१ टक्के. जवळ जवळ १०० टक्के लोकांना कधी न कधी तरी तंबाखू सोडण्याची इच्छा होते. कळत पण वळत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे. कारण तंबाखू आपल्या मनावर इतकी जबरदस्त पकड बसवून ठेवतो कि सोडा म्हटले तरी सुटत नाही. http://www.drugabuse.gov/publications/research-reports/tobacco/nicotine-addictive
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ म्हादया......
आ
आगाऊ म्हादया...... गुरुवार, 03/12/2015 - 17:47 नवीन
अहो आयुष्यात प्रत्येक जन एकदातरी सोडतोच तंबाखूचं सेवन. पण GATS चा रिपोर्ट 'who were ready to set a quit date' याचा prevalence देतो, आणि तोच हवाय म्हणून घेतलाय तो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा