Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सकाळी सकाळी कोठे वेळ असतो ....!!

प — प्रकाश१११, Fri, 11/21/2014 - 17:06
सकाळी सकाळी कोठे वेळ असतो थोडाही मोकळा मोकळा ...? ठेवायचा असतो चहा कधी कमी कधी जास्त साखर मात्र थोडी इकडे थोडी तिकडे नंतर असतोच स्वयंपाक नव-याचा भरायचा असतो डबा डब्यात थोडेसे हे थोडेसे ते निघता निघता खिडकीतून बघत बसते कोप-यावर वळले की मात्र थोडा दम खाते मग मुलांचे - थोडे थोडे दटावते मुलाना कधी धम्मक लाडू देते पाठीला सुतासारखे होतात सरळ स्वताला आवरून घेण्यासाठी थोडी थोडी मदत मात्र घेतात पोरांचे करता करता जीव मात्र हैराण होतो त्यांच्या डब्यात त्याना हवे तेच हवे असते रोज रोज बटाटा त्यांचे अगदी फेव्हरेट असते …. मुले गेली तरी सुटका होते कोठे ..? सासू सासरे खाणे कमी असले तरी त्यांनाही चवीचे लागते कशी बशी मोकळी होते मग बसते कॉम्प्यूटरवर काही प्रतिक्रिया आल्याका कवितेला तेवढे बघून घेते बस तेवढेच घरातला पडलेला पसरा मग त्याच्याकडेही बघते …. प्रकाश

प्रतिक्रिया द्या
1596 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पाषाणभेद Fri, 11/21/2014 - 17:17 नवीन
पका काका ही मात्र नेहमीसारखी नाही वाटली. परकाया प्रवेश झाला नाही.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 11/21/2014 - 17:45 नवीन
सकाळी सकाळी कोठे वेळ असतो ....!!
हे शीर्षक वाचून "एक्झॅक्टली!" अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली....
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Fri, 11/21/2014 - 17:48 नवीन
सकाळी सकाळी कोठे वेळ असतो.... >>>> चटकन " शौचालयात" हे उत्तर आले.... सॉरी हां.. =))
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Fri, 11/21/2014 - 17:49 नवीन
कवितेची सुरुवात छान झाली, नंतर कुठेतरी घसरल्यासारखी वाटली. :(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा