Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

येऊर भटकंती-संजय गांधी उद्यान

क
कंजूस
Sat, 11/22/2014 - 18:14
💬 23
आज येऊर (ठाणे)येथे गेलो होतो. ठाणे स्टेशन पश्चिम येथून१६ नंबर बस येऊरसाठी सुटते. सकाळी साडेपाच पासून दर अर्ध्या तासाने बस आहे. पंधरा रुपये तिकीट आहे अर्धा तास लागतो. शिवाईनगर स्टॉप नंतर 'भकेँद्र' स्टॉप आहे. तिथे केँद्र सरकारच्या वनखात्याचे कार्यालय आहे मागच्या अंगणात रुईची पंचवीसेक रोपटी लावली आहेत.याला फुलपाखरू उद्यान संबोधले आहे.येथे वनखात्याने नुकत्याच सुरु केलेल्या फुलपाखरे उद्यानात काही नाही . इथून 'संजय गांधी उद्यान बोरिवली' या राष्ट्रीय उद्यानाची पूर्व हद्द सुरू होते. बसने शेवटच्या स्टॉपला उतरून संजय गांधी उद्यानात दोन तास भटकलो. दुपारच्या वेळेमुळे बिबळ्या झोपला होता.:) पण फुलपाखरे खूप असली तरी चपळ झाली होती:( फोटो नाही मिळाले. झाडांच्या फोटोवर मोबाईल कैमऱ्याची समजूत काढली. १६नं बस रूट:ठाणे प॰, जांभळी नाका,शक्ती मिल, -आंबेडकर रोड-LBS-नाका,ठाणे एसटी आगार, लाइफलाइन हॉस्पीटल,खोपट,(हाइवेखालून) कैडबरी,जेकेग्राम,वर्तकनगर नाका,शास्त्री नगर,शिवाइनगर,खंडेलवाल इस्टेट,भकेंद्र (संजय गांधी उद्यान कमान),-घाट-एर फॉर्स,येऊर गाव,स्वानंद बाबा आश्रम, रोणाचा पाडा,पाटणपाडा,येऊर. १)संजय गांधी उद्यान बोरिवली'मध्ये येऊरकडून अधिकृत प्रवेश नाही. ती पाटी. २)आणि हे बिबट्याबद्दल सावध राहण्यासाठी ३)ही मुख्य वाट ४)एका ओढ्यात पाणी वाहत होते ५)काही झाडांनी पाने गाळली होती ६)चार सह्या केल्याशिवाय हे साहेब दिवस सुरू करत नाहीत ७)पाहुण्याचा आहारासाठी स्वागताला पांढरीरेशमी चादर पसरून दारात वाट पाहणारा कोळी ८)मंद उडणारे फुलपाखरु(SAILOR) ९)शेवाळ ?('लाइकन') १०)वारूळ ११)अजून एक आतिथ्यशील आणखी काही झाडे १२) १३) १४) १५) १६) १७) १८) विशेष सूचना: १९ मे २०१६ । आज येऊरकडून संजय गांधी उद्यानात जाण्यासाठी गेलो होतो परंतू आता प्रवेशच बंद केला आहे.मोठी आठ फुटी भिंत घातली आहे.

प्रतिक्रिया द्या
14287 वाचन

💬 प्रतिसाद (23)
म
मुक्त विहारि Sat, 11/22/2014 - 18:28 नवीन
आमच्या (मध्यवर्ती) डोंबोली पासून हे ठिकाण जास्त दूर नाही....
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 11/22/2014 - 18:56 नवीन
कट्टा यशस्वी होईल. येऊर गावात बरीच हॉटेल्स आहेत हे लिहायचे विसरलो होतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/22/2014 - 21:31 नवीन
आपापला डबा घेवून यायचा.अंगत-पंगत करायची. आणि श्रम परीहारार्थ, नंदी पॅलेस आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ख
खटपट्या Sat, 11/22/2014 - 20:59 नवीन
लहानपण आठवलं !! महीन्यातुन एक फेरी असायची !! आता बरीच वर्षे गेलो नाही. आतमध्ये एअरफोर्सचा एक तळ आहे. पावसात जाण्याची मजा काही औरच. काही ठीकाणाहुन ठाण्याचे मनोहारी दर्शन घडते. एक आश्रमही आहे बाबांचे नाव आता आठवत नाही. सायकलने वर जायचो आणि येताना पैडल न मारता वर्तकनगरपर्यंत यायचो. जवळच उपवनचा निसर्गरम्य तलावही आहे. सद्या त्यातले पाणी खूप कमी झालंय असं ऐकले. एकंदर कट्ट्यासाठी अतिउत्तम जागा.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 11/22/2014 - 21:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 11/22/2014 - 21:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/23/2014 - 04:40 नवीन
मस्त. ह्या निमित्ताने आंबा घाटानजीकच्या घनदाट अरण्यातून वाट काढत वरच्या सड्यावर पोहोचलो होतो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 11/23/2014 - 06:35 नवीन
चांगले ठिकाण दिसतेय. एकदा भेट द्यायलाच हवी.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 11/23/2014 - 07:55 नवीन
धन्यवाद! (शेवाळ म्हणजे algae, तुम्हाला झाडावर दिसलं ते lichenच आहे, त्याला दगडफूल म्हणतात बहुतेक मराठीत)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/23/2014 - 07:58 नवीन
बहुधा हेच शेवाळं पावसाळ्यात रात्री चमकत असतं. झाडी खूप प्रकाशमान दिसतात ह्यामुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
ब
बहुगुणी Mon, 11/24/2014 - 17:43 नवीन
Lichen Lichen की Moss हे असं ओळखता येतं Bioluminescent fungi: Image removed. Foxfire Mushrooms: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Mon, 11/24/2014 - 17:47 नवीन
लय भारी...कुठे बघायला मिळेल हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
भ
भुमन्यु Fri, 12/26/2014 - 12:45 नवीन
ते lichen असण्याचे चान्सेस खुप कमी आहेत. lichen हे प्रदुषण विरहित परिसरातच अढळताम, त्यामुळे येऊर मध्ये lichen सापडणे जरा अवघडच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
क
कंजूस Fri, 12/26/2014 - 14:26 नवीन
भिमाशंकरला पावसाळ्यात वाळक्या काटक्यांवर रात्री चमकणारे शेवाळे पाहायला जातो ते कुठले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु
भ
भुमन्यु Fri, 12/26/2014 - 14:45 नवीन
बहुदा ते lichens असावेत. कारण मी जुलै २०१४ मध्ये गेलो होतो तेव्हा बर्‍याच ठिकाणी lichens अढळले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
द
दिपक.कुवेत Sun, 11/23/2014 - 08:15 नवीन
पण फोटो अजुन सुस्पष्ट चालले असते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 11/23/2014 - 08:52 नवीन
दिपक ,खरं सांगायचं म्हणजे माझा मोबाइल ऑटोफोकस नाही आणि ५०सेमी मिनीमम फोकस आहे. मी नेहमीचं भिंग नेले नव्हते. माझा चष्मा पुढे धरून फोटो काढले चष्मा काढल्यामुळे नीट दिसत नव्हते.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/23/2014 - 13:05 नवीन
छोटेखानी भटंकती . आवडली.
  • Log in or register to post comments
न
निखळानंद Mon, 11/24/2014 - 14:31 नवीन
कुठल्याही गोष्टीची साद्यंत माहिती देण्याची मिपाकरांची पद्धत खूपच कौतुकास्पद आहे. कुठल्या क्र. ची बस तिथे जाते - तिचे प्रवास भाडे आणी थांब्यांसकट महिती देणे हे आपल्या fellow मिपाकरांच्या प्रती असलेल्या जिव्हाळ्यातूनच येत असावे ! येथे वनखात्याने नुकत्याच सुरु केलेल्या फुलपाखरे उद्यानात काही नाही<\cite> किंवा दुपारच्या वेळेमुळे बिबळ्या झोपला होता.:) पण फुलपाखरे खूप असली तरी चपळ झाली होती<\cite> अश्या नोंदींमुळे काही विशेष नसलेल्या गोष्टींचे वर्णन ही विशेष खुमासदार होऊन जाते ! आवडले..
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 11/24/2014 - 14:38 नवीन
मग काय...काही "अतीपरिचित" मिपाकरांनातर बाकीचे टेंप्युतपण "व्यवस्थित" बशीवतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखळानंद
स
स्पा Mon, 11/24/2014 - 14:33 नवीन
झकास वृतांत कंजूस काका
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/24/2014 - 15:49 नवीन
प्रवासभाडे आणि भटकंतीसाठी लागणारा वेळ अशासाठी नोंदवतो की जर तुम्ही एखादे वाहन भाडयाने ठरवले तर गंडत नाही. त्यांचा हिशोब प्रत्यक्ष किती किमी गेलात यापेक्षा किती तास त्याचे वाहन पार्क करून वेळ वाया घालवणार यावर असतो. टुअरिस्ट जागांवर साधारणपणे तासाला दोनशे रुपये काढण्याचा रिक्षावाल्यांचा इरादा असतो. टैक्सिवाले आणखी मागतात.थोडक्यात सांगायचे म्हणजे नियोजन करणे सोपे जावे हा हेतू .जो तो आपल्या आवडीप्रमाणे वेळ घालवणार अपेक्षाभंग तरी होत नाही.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/24/2014 - 16:04 नवीन
सचित्र वृत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा