Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वोल्क्सवॅगन वेंटो बद्दल मत

द
देशपांडे अमोल
Sun, 11/23/2014 - 08:48
🗣 93 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय. ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का? एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ? तसं मी बर्‍या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन. आपली मते जाणण्यास उत्सुक. कळावे.आभारी.

प्रतिक्रिया द्या
29898 वाचन

💬 प्रतिसाद (93)
स
सर्वसाक्षी Sun, 11/23/2014 - 09:55 नवीन
माझा अनुभव उत्तम आहे. मी साडेतीन वर्षे वेंटो वापरत आहे आणि समाधानी आहे. देखभाल खर्च पहिली दोन वर्षे प्रतिवर्षी रुपये १०,५००.००. तिसर्‍या वर्षी १७००० - ब्रेक डिस्कस/ पॅड्स बदलल्यामुळे. सर्विसींग वर्षातून एकदा/ १५००० किमी चालल्यावर. शहरात बी २ बी गर्दीत सरासरी १०, बाहेरगावच्या प्रवासात १६-१७ किमी प्रतिलिटर. गाडी दणकट आहे. सहा महिन्यांपूर्वी अलाइनमेंट केली, बॅलन्सिंगला वेट वापरावी लागली नाहीत. सस्पेन्शन्स उत्तम आहेत. गाडी घेताना स्पेअर व्हील १५" चेच पहिजे असा आग्रह धरा नपेक्षा १४" चे दिले जाते. मी बराच नडलो तेव्हा १५" चे जरा वापरलेले मॅगव्हील मला फुकट मिळाले.(पहिले १४" परत न घेता)
  • Log in or register to post comments
द
देशपांडे अमोल Sun, 11/23/2014 - 10:53 नवीन
धन्यवाद सर्वसाक्षीजी. लॉँग रन मध्ये आरामदायक व प्रवासाचा जास्त त्रास न जाणवू देणारी असेल ना? तसेच सार्विसिंग बद्दल अनुभव कसा आहे? वेबसाइट वर दिल्या प्रमाणे त्यांचे नवी मुंबईत नेरुळ इथेच फक्त सर्विस सेंटर आहे असे दिसते. तर विथ अपायंटमेंट च जावे लागते का? शिवाय स्पेर्स बरेच महाग वैगेरे आहेत का? असं कळलं की लॅपटॉप लावून ते गाडी चेक करतात. म्हणजे ते अप्लिकेशन आपण आपल्या लॅपटॉप वर घेऊ शकतो का?
  • Log in or register to post comments
च
चंद्रनील मुल्हेरकर Sun, 11/23/2014 - 11:53 नवीन
लांब प्रवासात आरामदायक गाडी हवी तर सेडान कशाला घेताय ?एसयुवी घ्या सरळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे अमोल
ध
धडपड्या Sun, 11/23/2014 - 12:37 नवीन
फोक्सवॅगनच्या गाड्या जनरली अवजड प्रकारात येतात... देखभाल व्यवस्थित ठेवली तर अविरत सेवेची गॅरंटी.. साधारणत: स्पेअर्स उच्च दर्जाचे वापरले जात असल्याने बर्यापैकी महाग असतात. ए.सी. बेस्ट इन क्लास... हायवेवर रोड ग्रीप उत्तम, कंट्रोल सोपे.. एकदा सवय झाली, की दुसरी वापरावीशी वाटत नाही.. मी स्वत: पोलो वापरतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे अमोल
ध
धडपड्या Sun, 11/23/2014 - 12:47 नवीन
स्कोडा रॅपिड सुद्धा चेक करा... बर्यापैकी पैसे वाचतील. दोन्ही गाड्या एकाच असेंब्लीवर बनतात.. फिचर्स फक्त कमी जास्त होतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे अमोल
क
कपिलमुनी Mon, 11/24/2014 - 09:17 नवीन
स्कोडा रॅपिड पण मस्त आहे . सेम फीचर ते पण कमी किंमतीमधे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धडपड्या
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/27/2014 - 11:56 नवीन
Skoda la Spare parts cha khoop problem ahe. Soochana: Marathit liha mhananaryano mazya hapisatalya computer waroon jang jang pachadoon sudha Marathi type karu shakat nahiyye. :( Krupaya maaf karane
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 11/27/2014 - 12:40 नवीन
कोणता काँप्युटर वापरता आपण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 11/28/2014 - 06:38 नवीन
waparatoy windows 8 aslele yantrach. Pan client machine asalyane tyachyawar kaay kaay block kele ahe kalat nahi. Mipa chya bhasha badala madhe marathich selected disate pan pratyaksh type kartana matra English madhe type hote ahe. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 11/30/2014 - 03:08 नवीन
क्विलपॅड वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सर्वसाक्षी Sun, 11/23/2014 - 18:21 नवीन
मलातरी नक्कीच आरामदायक वाटते. सर्वीस उत्तम. १०० रु दिले की घरुने नेली/ पोचवली जाते. सहसा अपॉइंट्मेंट मागावी लागत नाही, वर्ष होत आले की त्यांचाच फोन येतो. स्पेअर्स व लेबर मध्ये बहुधा लुटत नसावेत. मध्यंतरी उंदरांनी वायरींग कुरतडल्यामुळे गाडी सर्विस सेंटर ला पाठवावी लागली, वायर खाल्ल्याने एसी ही बंद झाले होते. पण २४ तासात १८०० रुपयात काम झाले. गाडी घरुन नेल्यापासुन परत आल्यापरयंत सतत एसेमेस अपडेट येतात. काम करण्याआधी खर्चाचा अंदाज दिला जातो. बदललेले पार्ट गाडीत घालुन परत पाठवतात. गाडी मजबुत आहे. स्पीड्ला खड्डा आला तरी किंचितही विचलित होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे अमोल
स
स्वाती दिनेश Sun, 11/23/2014 - 12:41 नवीन
पोलो माझी पण आवडती.. पसाटही आवडते. स्वाती
  • Log in or register to post comments
द
देशपांडे अमोल Sun, 11/23/2014 - 16:40 नवीन
सर्वांचे आभार. आपल्या प्रतिक्रियांमधून मला गाडी विषयी निर्णय घेण्यास मदत होईल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/24/2014 - 06:03 नवीन
फियाट लिनियाचाही विचार करून पहा.जर्मन गाड्याचे सुटे भाग महाग असतात असे ऐकले आहे. लिनिया ५००० आर.पी.एम.ला ११२ बी.एच.पी. पॉवर देते तर वेण्टो ५२५० आर.पी.एम.ला १०३ बी.एच.पी. लिनिया Maximum Torque - 207Nm@2200rpm तर वेंटो- 153Nm@3800rpm ह्या दोन्ही बाबतीत लिनिया सरस दिसते आहे.होय ना? येथे दोन्ही पेट्रोल गाड्यांची तुलना करून पहा- http://www.cardekho.com/compare/fiat-linea-and-volkswagen-vento.htm
  • Log in or register to post comments
ध
धडपड्या Mon, 11/24/2014 - 06:57 नवीन
फियाटच्या गाड्यांचे आयुष्यमान बरेच कमी आहे.. स्पेअर्स आता सगळ्याच कंपन्या भारतातच बनवत असल्याने सगळ्यांच्या किंमती जवळपास सेमच झाल्यात.. एलीगन्स, ग्रेस हवीच असेल तर होंडाचा विचार करा, परंतु मेंटेनन्स जास्त आहे, पण कंफर्ट आणि ड्रायव्हिंग प्लेझरला तोड नाही.. तशा फोक्सवॅगनच्या गाड्या रणगाडा कॅटेगरीमध्ये येतात...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/24/2014 - 10:04 नवीन
पण मारुती व टाटा डिझेल गाड्यांसाठी फियाटचेच इंजिन वापरतात.शिवाय मारुती गाड्यांचा पत्रा फियाटच्या मानाने तकलादू असतो असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धडपड्या
क
कपिलमुनी Mon, 11/24/2014 - 10:30 नवीन
एका मिपाकराचा स्विफ्टचा पत्रा सीएन्जी केट बसवल्यामुळे फाटला होता आणि एकूणच मारूतीचा पत्रा आणि टाटाचा प्लास्टेक / फायबर हलक्या दर्जाचा असता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
काळा पहाड Mon, 11/24/2014 - 11:42 नवीन
फियाटच्या गाड्यांचे आयुष्यमान बरेच कमी आहे..
आँ? हे काय तिसरंच? व्होल्क्स वॅगन येण्यापूर्वी फियाट हीच सर्वात टिकावू गाडी होती. एक ब्लॅक जोक फियाट ओनर्स मध्ये पॉप्युलर आहे: फियाट्ची गाडीचं जीवनमान तिच्या कंपनी (जीवनमाना) पेक्षा जास्त आहे. बाकी वजन ज्यास्त असल्यानं मायलेज कमी आहे पण फियाट मध्ये बसल्यावर जितकं सुरक्षीत वाटतं त्याच्या निम्मं सुद्धा मारूतीत बसल्यावर वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धडपड्या
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/24/2014 - 08:13 नवीन
माझी स्वतःची पोलो आहे ... काय गाडी आहे राव ! पण तरीही मला वाटत आहे की वेन्टो घ्यायला हवी होती ! डोळे झाकुन वेन्टो घ्या ... दुसर्‍या गाडीचा विचार करणारच असाल तर होन्डा सिटी द ऑल टाईम क्लासिक !!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/27/2014 - 11:59 नवीन
sahamat. aataa tara vento Diesel pan ali ahe. New Polo Diesel 1500 cc pan mast ahe.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
वेल्लाभट Mon, 11/24/2014 - 08:24 नवीन
मला असलेली माहिती, ऐकलेले अनुभव: अ‍ॅव्हरेज लाजिरवाणं. लक्झरी उत्तम आहे पण प्रॅक्टिकॅलिटी कमी. उदाहरणार्थ ग्राउंड क्लियरन्स कमालीचा कमी. छोटास्सा स्पीडब्रेकरही घासतो, खड्डे दणकतात. चारच जणांना छान. पाचवा अनवेलकम. रॅपिड (जुळी बहीण) उजवी आहे. सियाझ चा विचार केलायत का? ती यापेक्षा भारी आहे असं वाटतं. सिटी ट्राईड अँड टेस्टेड आहेच. बघा. सेडानच हवी असेल तर हे पर्याय आहेत. नाईतर स्कॉर्पियो बघा म्हटलं असतं.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 11/24/2014 - 08:40 नवीन
सियाझचा विचार केला आहे का? सियाझ गाडी छानच आहे. पण थोडी underpower वाटते. test drive घेऊन विचार करा. गेली दोन वर्ष मी dzire Petrol वापरतो. एकदम उत्तम..!! अ‍ॅवरेज मस्त (१५ शहरात आणि हायवे वर २० पर्यंत)..आणि देखभालखर्च ३०००/- (आत्तापर्यंत - नवीन गाडी असल्याने). पण डिझायर आणि वेंटोची comparison नाही होऊ शकत. पण डिझायरच्या अनुभूवामुळे जर मोठी सेडान घ्यायची गरज (आणि ऐपत) आली तर सियाझलाच first preference देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/24/2014 - 08:52 नवीन
पण डिझायर आणि वेंटोची comparison नाही होऊ शकत.
येस्स ! पण सुरक्षितता सेफ्टी च्या मुद्द्यावर फोल्क्सवॅगनला सध्या तरी कोणीही तोड देवु शकत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
व
वेल्लाभट Mon, 11/24/2014 - 09:08 नवीन
त्यावरून आठवलं, परवा एक बातमी फिरत होती. टोयोटा एटिऑस च्या वायूपिशव्या उघडल्या नाहीत. प्रवासी गंभी...र जखमी झाला. कंपनीकडून उत्तर आलं.... the airbags did not deploy because the car did not collide properly. कुठल्याही गाडीचं होऊ शकतं असं. टोयोटाचंही झालं. अर्थात, फोक्सवागनची सेफटी फीचर्स कमी आहेत असं म्हणण्याचा उद्देश नाही. गैरसमज नकोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/24/2014 - 09:17 नवीन
. the airbags did not deploy because the car did not collide properly.
हा हा हा ... ह्यावरुन एक जोक आठवला ! बायको नवर्‍याला फोन करते ... बायको : हॅल्लो डार्लिनंग कसा आहेस ? मला तुला एक गुड न्युज आणि एक बॅड न्युज द्यायची आहे . नवरा ऑफीसच्या कामात व्यग्र असतो तो वैतागुन म्हणतो नवरा : अगं मी आत्ता खुप बीझी आहे , पटकन गुड न्युज सांग , बॅड न्युजला द्यायल वेळ नाहीये आत्ता . बायको : ओके. गुड न्युज इज मी आत्ताच कन्फर्म केलं की आपल्या नवीन ऑडी ए ८ च्या एयर बॅग्स पर्फेक्ट काम करतात :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 11/25/2014 - 03:06 नवीन
डार्क ह्युमर म्हणतात तो हाचं.....चायला ऑडी ए८...माझी स्वप्नसुंदरी आहे ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
वेल्लाभट Mon, 11/24/2014 - 09:11 नवीन
आमचीही आहे. मारुती डोळे मिटून घ्यावी कधीही. लक्झरी वगैरे कमी असते इतर गाड्यांपेक्षा हे मान्य. पण परिस्थिती बदलतेय आता; उदा. सियाझ, एर्टिगा. डिझायर कव्वा गाडी आहे. (जुनीच अधिक आवडते) फुल फिदा. फुल सॅटिस्फाईड. It never lets you down.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ध
धडपड्या Mon, 11/24/2014 - 09:43 नवीन
इटिओस हीच मुळात किर्लोस्कर समुहाची गाडी आहे.. फक्त टोयोटाचं नाव वापरतात... डिझायर मुळात स्विफ्ट चे एक्सटेंडेड व्हर्जन असल्याने बेसिक्स तसेच ठेवलेत... याचा परिणाम ब्रेकिंग वगैरे वर जाणवतो.. हवी तेवढी एफिशिएन्सी नाही.. हायवे वर रस्ता सोडते.. जर तुमचं दिवसाला ६० -७० कि.मी. वापर होणारच असेल, तर तुम्ही CNG किंवा डिझेल चा का नाही विचार करत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
य
योगी९०० Mon, 11/24/2014 - 13:20 नवीन
हवी तेवढी एफिशिएन्सी नाही.. हायवे वर रस्ता सोडते.. पटलं नाही. मला तरी हा अनुभव नाही. एफिशिएन्सी च्या बाबतीत मी खुष आहे. स्पर्शलाकूड..!! माझी गाडी डीझायर आहे म्हणून कौतूक करत नाही पण हायवे रस्ता सोडते असे अजूनही वाटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धडपड्या
ट
टक्कू Mon, 11/24/2014 - 17:04 नवीन
सहमत.... एकदम स्टेबल एफिशियन्सी १९.५ हायवे १७ सिटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ध
धडपड्या Mon, 11/24/2014 - 19:08 नवीन
एफिशिअन्सी, फक्त फ्युएल कन्सम्शन बाबत नाही, तर ब्रेकिंग बाबत बोलत होतो.. ७०-८० च्या वेगात जर पॅनिक ब्रेकिंग केलेत तर गाडी रस्ता सोडते... लवकर कंट्रोल होत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/24/2014 - 09:59 नवीन
मारुतीवाले सियाझ(डिझेल) व डिझायर(डिझेल्)मध्ये फियाटचेच इंजिन वापरतात हे कळले. http://www.business-standard.com/article/news-cd/maruti-extends-its-diesel-engine-contract-with-fiat-114071800953_1.html तेव्हा डोळे झाकून चितळ्यांच्या बाकरवडीसारखे डोळे झाकून मारुती गाड्या घेवू नयेत असे म्हणते.
  • Log in or register to post comments
ध
धडपड्या Mon, 11/24/2014 - 11:10 नवीन
हे जुन्या गाड्यांचे असायचे... इंजीन नाही, टेक्नोलॉजी वापरायचे.. सध्याची जी K- Series Engines आहेत, ती पूर्णपणे भारतीय आहेत... फियाटची नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/24/2014 - 11:18 नवीन
हम्म. पण मग हा बातमीदार हे म्हणतोय- The Maruti Ciaz gets the option of a 1372cc, four-cylinder petrol engine and a Fiat-sourced 1248cc, four-cylinder diesel engine. The petrol motor makes 91bhp and 13.2kgm, while the diesel engine makes 89bhp and 20.4kgm. http://www.autocarindia.com/auto-news/maruti-ciaz-vs-rivals-price-and-specification-comparison-390900.aspx
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धडपड्या
म
माझीही शॅम्पेन Mon, 11/24/2014 - 11:28 नवीन
अहो माईकाका internet आणि shoroom मध्ये फरक असतोय !!! सध्या तरी ही fiat engine वाल्या गाड्या दुकानात नाहीयेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
प
प्रसाद१९७१ Mon, 11/24/2014 - 11:42 नवीन
K-Series Engines पेट्रोल ची आहेत. डीझेल ची इंजिन फीयाट ची वापरत असावी मारुती. पूर्वी पण स्विफ्ट ला वापरायचे. त्यात चूक काहीच नाही. जे जे चांगले असेल ते वापरावे, ग्राहकांचा पण फायदाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धडपड्या
प
प्रसाद१९७१ Mon, 11/24/2014 - 11:47 नवीन
लिनिया किंवा फियाट च्या सगळ्याच गाड्या चांगल्या डिझाइन केलेल्या असल्या तरी फार खपत नाहीत. लिनिया महीन्याला १०० पण तयार होत नाहीत. अशी न खपणारी गाडी घेउन काय करायचे? त्याचे स्पेयर पार्ट कसे मिळतील? अश्या गाड्यांना रीसेल व्हॅल्यु पण नसते. मारुती किंवा हुंडाई घ्यावी. वोक्स वॅगन ची युरोप मधली पोलो आणि भारतातली पोलो ह्यात फरक असतो. सेफ्टी पण युरोप मधल्या आणि भारतातल्या गाड्यांची वेगवेगळी असते. त्यामुळे पोलो च्या नावावर जाऊ नये, त्या फक्त बाहेरुन सारख्या दिसतात. तसा ही वोक्स वॅगन चा भारतातील खप वाढत नाहीये ( कमीच होतोय ), त्याला काहीतरी कारण असेलच.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/24/2014 - 12:06 नवीन
मुद्दा चांगला आहे पण एखादी वस्तु जास्त खपते म्हणजे ती उत्तम व खपत नाही ती टाकाउ ही मानसिकता चुकीची आहे. फोक्सवॅगनच्या गाड्याही चांगल्या असतात असे ऐकले आहे. हुंडाईच्या गाड्या चांगल्या असतेलही पण त्या दिखाऊ वाटतात. आम्हा भारतियांना कळपाची मानसिकता असते. मित्रांनी घेतली मारुती,शेजार्यांनी घेतली मग मीही तीच घेणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
काळा पहाड Mon, 11/24/2014 - 12:20 नवीन
मारूती हा मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. हीरो होंडा कसं पूर्वी नवीन स्टीकर आणून स्प्लेंडरला नवीन नवीन नावं देवून नको तितक्या किंमतीत विकायचं, मारूती तोच प्रकार आहे. आणि माजोरडे पणा ला तर तुलना नाही. आणि हुंडाई म्हणजे तर लुटारूच. अरे, तुम्ही गाडी विकताय की तुमच्या गाडी मधल्या सॉफ्टवेयरची नवीन पॅकेजेस विकताय. ड्युअल टोन कलर आण, किंमत नवीन लाव, मागचा कॅमेरा लाव, किमत नवीन लाव, कुठे मोबाईल कनेक्ट करायचं आण किमत नवीन लाव. तो आय टेन नावाचा भंपक प्रकार पाहून (आणि तो घेणारे भद्रजन पाहून) तर हात टेकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
व
वेल्लाभट Mon, 11/24/2014 - 12:55 नवीन
हेच वाटलं अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
प्रसाद१९७१ Mon, 11/24/2014 - 12:23 नवीन
एखादी वस्तु जास्त खपते म्हणजे ती उत्तम व खपत नाही ती टाकाउ ही मानसिकता चुकीची आहे.
मुद्दा ह्याच्या पेक्षा उलटा आहे. एखादी वस्तु जर खरच सो कॉल्ड चांगली आहे, तर ती खपत का नाहीये ह्याचा विचार केला पाहीजे. खपत नाहीये म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहेच. लोक स्वताचा पैसा घालुन गाडी घेताना विचार करतच नसतील असे नाही.
आम्हा भारतियांना कळपाची मानसिकता असते. मित्रांनी घेतली मारुती,शेजार्यांनी घेतली मग मीही तीच घेणार...
उलट आहे, भारतीयांना काही कळत नसताना पण फक्त ब्रँडनेम साठी जास्त पैसे घालतात. वोक्सवॅगन चे ब्रँडनेम नक्कीच मारुती पेक्षा चांगले आहे ( हे दिसतेच आहे चर्चे वरुन ), त्यासाठी लोक १० टक्के जास्त पण किंमत देतील, तरी पण खुपच कमी खपते म्हणजे काहीतरी गडबड आहे. ती शोधावी, नक्की खात्री पटल्यावरच घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
काळा पहाड Mon, 11/24/2014 - 12:08 नवीन
अश्या गाड्यांना रीसेल व्हॅल्यु पण नसते.
गाडी घेतानाच विकायचा विचार करायचा? हे म्हणजे लग्नाच्या रिसेप्शन मध्य्च एखाद्या घटस्फोटाच्या वकीलानं गिफ्ट देताना आपलं कार्ड देण्यासारखं आहे. खालचे टोमणे तुम्हाला नाहीत. भारतीयांना आहेत.
तसा ही वोक्स वॅगन चा भारतातील खप वाढत नाहीये ( कमीच होतोय ), त्याला काहीतरी कारण असेलच.
भारतीय मेंटॅलिटी! कितनी सेफ है पेक्षा कितना देती है याचा विचार.
मारुती किंवा हुंडाई घ्यावी.
आणि दोन्ही कडचे आरसे (लागतात म्हणून) बंद करून चालवावी. आणि मग पार्किंग बिर्किंग चा खर्च न करता रस्त्याच्या बाजूला उभी करून ट्रॅफिकची कोंडी करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 11/24/2014 - 12:18 नवीन
गाडी घेतानाच विकायचा विचार करायचा?
५ वर्षानी तरी विकणारच ना. आणि लिनिया चा बंपर ला किंवा बॉनेट ला काही झाले ( अगदी तुमची चुकी नसताना ), तर तुमच्या गाडीच्या रंगाचे पार्ट मिळायला महीना महीना थांबायला लागते. कंपनीमधुन मागवायला लागतात. मारुतीचे पाहीजे त्या रंगाची बॉनेट, बंपर शोरुम मधेच असतात. त्याचे कारण आहे की खप प्रचंड आहे.
भारतीय मेंटॅलिटी! कितनी सेफ है पेक्षा कितना देती है याचा विचार.
भारतीय वोक्सवॅगन आणि युरोपात तयार होणारी वोक्सवॅगन ह्यात फरक असतो. फक्त नावावर जाउ नये. ह्या भारतातल्या गाड्यांची युरोपियन नियमांनुसार क्रॅश टेस्ट झाली असल्याचे तुमच्या कडे काही माहीती आहे का? मारूती सुद्धा निर्यातीच्या वेगळ्या गाड्या बनवते. वोक्सवॅगन चा भारतातला खप वाढत का नाहीये ( बाकीच्यांचा वाढुन ) ह्या मागे कारणे तर नक्कीच असणार. कमीतकमी ती शोधण्याचा प्रयत्न तर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Mon, 11/24/2014 - 12:32 नवीन
महीना महीना थांबायला लागते.
माझ्याकडे फियाट आहे आणि मला हा प्रॉब्लेम कधीच आलेला नाही.
भारतीय वोक्सवॅगन आणि युरोपात तयार होणारी वोक्सवॅगन ह्यात फरक असतो.
अहो पण स्विफ्ट पेक्षा पोलो सुरक्षित आहे की नाही? तुमच्या कडे उपलब्ध पर्यायानुसार पोलो हा सर्वात चांगला ऑप्शन आहे.
५ वर्षानी तरी विकणारच ना.
गाडीचं जिवनमान पाच वर्षाचंच असतं का? घेणारा नाही का घेत पाच वर्ष जुनी गाडी? तसंच समजायचं. शिवाय ही गाडी विकून नवीन गाडी घेणं ज्याला परवडतं (हा एक आतबट्यातला प्रकार असतो) त्याला हा फरक नगण्य असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
व
वेल्लाभट Mon, 11/24/2014 - 12:53 नवीन
गाडी घेतानाच विकायचा विचार करायचा? हे म्हणजे लग्नाच्या रिसेप्शन मध्य्च एखाद्या घटस्फोटाच्या वकीलानं गिफ्ट देताना आपलं कार्ड देण्यासारखं आहे.
हा हा हा हे जाम आवडलं ! टोट्टली अग्रीड
भारतीय मेंटॅलिटी! कितनी सेफ है पेक्षा कितना देती है याचा विचार.
तेही महत्वाचं आहे. आहे आता मेंटॅलिटी. जगात सर्वत्रच फ्युएल एफिशियंट कार्स चा जमाना आहे. इकडे जास्तच महत्व आहे त्याला अंमळ; काय करणार?
मारुती किंवा हुंडाई घ्यावी. आणि दोन्ही कडचे आरसे (लागतात म्हणून) बंद करून चालवावी. आणि मग पार्किंग बिर्किंग चा खर्च न करता रस्त्याच्या बाजूला उभी करून ट्रॅफिकची कोंडी करावी.
काय संबंध? उगाचच काहीतरी शेरे मारायचे? फोक्सवागन अथवा फियाट घेतल्यावर मारुती ह्युंडई वाल्यांना हिणवायचा स्वभावही फीचर म्हणून मिळतो वाटतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 11/27/2014 - 12:06 नवीन
Volkswagen cha bhartatla khap kami honyache ek karan kimmat ani servicing chya babtitle wait anubhav ha ahe. Mazi gadi ghetali tya dealer chya mhananyanusar- Ek tar tulanene servicing kendre kami ani servicing queue motha. apalya kade chote chote accident ani dent pent che praman itke jast ahe ki service center chi kshamata kami padate. Tyamule motha waiting queue ani gadbadine kame urakane. Europe madhalya planners na mhane itaka motha servicing volume expected navata. Ata dealers sathi mhane norm parat badalnar ahet. (marathit na lihita English lipi waparali yabaddal kshama asavi)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 11/24/2014 - 12:59 नवीन
स्विफ्ट पेक्षा पोलो सुरक्षित आहे की नाही?
माहीत नाही. मला नाही वाटत की असे कुठे सिद्ध झाले आहे. जे लोक स्विफ्ट वापरतात ते त्या गाडीच्या फार प्रेमात असतात.
माझ्याकडे फियाट आहे आणि मला हा प्रॉब्लेम कधीच आलेला नाही.
तुम्हाला कधी बॉनेट कींवा बंपर बदलून घ्यायला लागला नसेल. ते सर्व सोडा, तुम्हाला काय कारण वाटते की फियाट पंटो ( का पुंटो ), किंवा लिनिया खपल्या नाहीत ह्याचे? मी आधीच सांगीतले आहे की गाड्या चांगल्या आहेत नक्कीच डीझाइन च्या दृष्टीने, आणि दिसायला पण चांगल्या आहेत. तरी का खपल्या नाहीत? त्याच कीमतीच्या गाड्या धो-धो खपत असताना सुद्धा? काहीतरी कारण ( अनेक ) नक्कीच असतील ना. ती कमीत कमी शोधा तरी. तिच गोष्ट पोलो आणि वेंटो ची. लोक डीझायर साठी महीना, २ महीने वाट बघतायत पण वेंटो घेत नाहीत. स्विफ्ट अजुन तुफान खपतीय पण पोलो चा खप कमी होत चाललाय. ते का?
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 11/24/2014 - 18:10 नवीन
तुम्हाला काय कारण वाटते की फियाट पंटो ( का पुंटो ), किंवा लिनिया खपल्या नाहीत ह्याचे?
पुंटो (Italian: Point) आणि लिनिया (Italian: Line). ओके. फियाट च्या न खपण्याची बरीच कारणे आहेत. पब्लिक परसेप्शन हे एक, टाटा हे दुसरं पण ते सगळं अलाहिदा. आल्टो ही सगळ्यात जास्त खपणारी कार आहे. ती जास्त खपली म्हणजे ती सुरक्षित कार होत नाही. तुम्हाला तुमची फॅमिली सेफटी जास्त महत्वाची की रिसेल व्हॅल्यू हे तुमचं तुम्ही ठरवायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Mon, 11/24/2014 - 13:04 नवीन
गाडी घेतानाच विकायचा विचार करायचा? हे म्हणजे लग्नाच्या रिसेप्शन मध्य्च एखाद्या घटस्फोटाच्या वकीलानं गिफ्ट देताना आपलं कार्ड देण्यासारखं आहे.
घर घेताना पण माणसे ते पुन्हा विकले जाताना काय होइल ह्याचा विचार करतात. आज वेंटो घेतली आणि वर्षानी ऑनसाईट ला जायला लागले तर कीती व व्हॅल्यु येइल ते नको का बघायला? आणि मी सामान्य माणसांबद्दल बोलतोय का.पा. जे पैसे जमवुन, लागले तर कर्ज काढुन गाड्या घेतात. १० लाखाची गाडी घेताना अशी सामान्य माणसे ५ वर्षानी ५०००० मिळाले तरी चालतील असा विचार नाही करु शकत.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 11/24/2014 - 13:05 नवीन
कुणी आपल्या विचारांचे, मतांचे, ग्रहांचे तारे कशाला तोडा? Image removed. सियाझ आउटसेल्स सिटी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा