वोल्क्सवॅगन वेंटो बद्दल मत
नमस्कार मंडळी,
प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय.
ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का?
एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ?
तसं मी बर्या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन.
आपली मते जाणण्यास उत्सुक.
कळावे.आभारी.
💬 प्रतिसाद
(93)
प
प्रसाद१९७१
Mon, 11/24/2014 - 13:07
नवीन
पोलो , वेंटो चे नाव पण नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 11/24/2014 - 13:11
नवीन
जग्वार , लॅन्ड रोव्हर, रोल्स रॉईस वर्शाला किती खपतात हो ? फारच कमी नै ... लई फालतु गाढ्या असणार त्या मग !
खपतं ते सर्व्वोत्तम हा निकष आवडला बुवा तुमचा :D
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 11/24/2014 - 13:20
नवीन
काय प्रगो, तुमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाकडुन ही अपेक्षा नव्हती.
प्रत्येक गोष्टीत काही वर्ग वारी नसते का? तुलना स्विफ्ट आणि पोलो अशी आहे. किंवा डीझायर, सीयाझ आणि वेंटो अशी आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 11/24/2014 - 13:34
नवीन
निव्वळ खप हा डिसायडींग क्रायटेरीया कसा काय असु शकतो ? एनी वे , प्रत्येकाचे डिसिजन क्रायटेरीया वेगवेगळे असतात ... निव्वळ खप पाहुन निर्णय घेणे ही मेंढ्यांची मेन्टालिटी झाली !
आता तुम्ही आम्हाला शिकले सवरले म्हणालात म्हणुन थोडेसे ग्यान पाजळतोच :D
प्रत्येक गाडीचे पॅरामीटर लक्षात घेतले तर ती एक एन डायमेन्शनल मेट्रीक स्पेस मानता येईल ( खप ही केवळ एक डायमेशन आहे , इतर अनेक डायमेशन्स असतील जसे की सेफ्टी , पॉवर , फ्युल इफीशन्शी एत्च एत्च) आणि मग कोणत्याही दोन बिंदुतील अंतर मोजता येईल . ठोडक्यात तुमची "अपेक्षित" द्रीम कार आणि त्याला सर्वात जवळचे अॅप्रॉक्षीमेशन शोधता येईल .
असे स्टॅटीस्टीकल मॉडेल पुर्वी तयार केले होते मी :)
...
पण ते मॉडेल गाडी निवडण्यासाठी तयार न करता मॅच मेकींग साठी अर्थात सुयोग्य वधु निवडण्यासाठी तयार केल्याने सुरवातीलाच वादग्रस्त ठरुन स्कॅप करण्यात आहे :(
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 11/24/2014 - 13:41
नवीन
तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते समजले नाहीये नीट. खप हा क्रायटेरीया नाहीये.
पण 'खप' हा डेटा पॉईट काहीतरी सांगतोय. ते हे सांगतोय की आपल्या एव्हडे बजेट असलेल्या २०००० लोकांनी मागच्या महीन्यात स्विफ्ट घेतली, पण पोलो १००० लोकांनी पण घेतली नाही. असे का ह्याचा अनॅलिसिस तर आधी करा. त्यातुन काय कारणे निघतायत ते बघा, मग विचार करा.
वोक्सवॅगन नावाला भुलु नका. ते भारतात काय करतात ते बघा.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 11/24/2014 - 13:52
नवीन
बरं
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 12/01/2014 - 15:50
नवीन
तुम्ही डिझायर आणि वेंटो कंपेअर करताय? सारखे बजेट?
आणि, बाय द वे, गाडी घेताना केवळ तेव्हाचेच नव्हे, तर नंतरचे बजेट पण पहावे लागते. त्या बजेटनुसार दिझार आणि वेंटो आर अॅपल टू ओरेंज.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 11/24/2014 - 14:47
नवीन
ते मॉडेल जर अजून असेल तर पाठवता का व्यनीमधून? माझ्यासारख्या "इच्छूकांना" उपयोगी पडेल :)
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/24/2014 - 19:03
नवीन
पोलो आणि स्विफ्ट च्या किंमतींमधली तफावत पाहीलीत का? लाखभर रुपायांचा फरक आहे.. पोलो विकतानाच "प्रिमियम हॅचबॅक" म्हणून विकली जाते, स्विफ्ट नाही...
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/27/2014 - 12:15
नवीन
sahamat ahe. Polo madhe Dual air bags hi ata basic feature mhanoon yete.
Polo chya standard (basic model madhe sudha asatat)Feature Madhe
1. AC ; 2. Front two power windows; 3.Tilt/Telescopic steering adjustment 4.interal wiring
ityadi goshti yet.
ata 5. Front Dual airbag hi feature hi feature add zali ahe.
- Log in or register to post comments
ट
टक्कू
Mon, 11/24/2014 - 17:06
नवीन
म्हणजे तुम्हाला तो चार्ट कसा वाचावा, त्यातून काय बघावं हेच कळलेलं नाहीये :D
चालायचंच.
लोल !
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 11/24/2014 - 13:48
नवीन
फियाट व टाटाचा काही काळापुरता करार झाला होता. फियाटच्या गाड्या टाटाच्या शोरूम्समधून विकल्या जात व गाड्यांचे सर्विसिंगपण टाटाचे डीलर्स करीत. फियाटच्या गाड्या खपल्या नाहीत ह्याचे कारण हेच आहे.टाटाच्या डीलर्सना फियाट गाड्या दुरुस्त करण्यात वा विकण्यात नफा कमी मिळत असल्याने त्याचा फियाटवर परिणाम झाला.असो.
आणी धागा वेंटो घ्यावी की घेवू नये असा आहे.!
अमोल,- वेंटो,लिनिया,सिटी,रॅपिड्,सियाझ ह्या सर्वांची तू चाचणी-हाक घ्यावीस व ठरवावेस असे म्हणते.
- Log in or register to post comments
म
मैत्र
Mon, 11/24/2014 - 17:19
नवीन
वरच्या वाद चर्चेत पडण्याइतकं सेडानचं ज्ञान नाही. कित्येक वर्षे जुनी अॅक्सेंट शहरात शांतपणे वापरतो आहे आणि ह्युंडाई च्या सवयीमुळे आणि विलक्षण आकर्षक डिझाइन मुळे वेर्ना फ्लुइडिक नवीन मॉडेल बरेच दिवस मनात आहे.
मिपावरच्या इतर अशाच चर्चेमुळे अतिशय कमी वापर (२० किमी किंवा त्याहून कमी) चांगली चाललेली गाडी बदलू नये अशा मताने चालतो आहे (यावरही जाणकारांची मते आवडतील - अॅक्सेंट पेट्रोल जीएलएस जुने १०+ वर्षे मॉडेल - शहरात १०किमी/लि, बाहेर क्वचित जास्तीत जास्त १३-१४). वेंटो पेक्षा नवी वेर्ना दिसायला जास्त छान आणि आरामदायक वाटली. वेंटो म्हणजे जर्मन ट्रक - दणदणीत आणि भक्कम. पण सेडानची रोल करण्याची शान वाटत नाही.
तर फोक्सवॅगन - वर चर्चेत फोक्सवॅगन भारतात एक आणि बाहेर एक बनवते असं वाचलं.
इथे अशी बातमी आहे की भारतात फक्त पोलो आंतरराष्ट्रीय क्रॅश टेस्ट मध्ये पास झाली -
http://www.autocarindia.com/auto-news/indian-cars-fail-crash-safety-tests-371115.aspx
त्यात ग्यानबाची मेख अशी की ही टेस्ट एन्ट्री लेव्हल मॉडेलवर केली जाते. पोलो आता एअरबॅगशिवाय मिळतच नाही म्हणून ती पास झाली.
प्रत्यक्षात फोर्ड फिगो एअरबॅगशिवाय पास झाली आहे.
इतर बातम्यांमध्ये स्विफ्ट आणि डॅटसन गो या दोन्ही फेल झाल्याची माहिती आहे.
http://www.business-standard.com/article/companies/datsun-go-swift-fail-global-crash-tests-114110400011_1.html
या बातम्या अतिशय ताज्या (नोव्हेंबर १४) मधल्या आहेत.
वेंटो ही पोलोचीच सेडान असल्याने अर्थात जास्त सुरक्षित असावी. कारण या टेस्ट मध्ये सेडान नव्हत्या. सर्व कॉम्पॅक्ट कार्स ची तुलना केली गेली.
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/24/2014 - 19:19
नवीन
एअरबॅग्स चे उघडणे, न उघडणे हे अत्यंत रिलेटिव्ह असते.. हे सेंसर्स हेडलाईटच्या मागे असतात.. बर्याचदा मोठा अपघात होउनही हेडलॅंपला धक्का लागला नाही, तर एअरबॅग उघडत नाहीत, तर छोट्या अपघातातही योग्य जागेवर धक्का बसला तर उघडतातही...
- Log in or register to post comments
द
देशपांडे अमोल
Mon, 11/24/2014 - 18:30
नवीन
धन्यवाद मंडळी,
अपेक्षे प्रमाणे मिपाकरांकडून वाचनीय व अभ्यासू प्रतिसाद आले. त्यातून गाइडेन्स ही मिळाला व बरेच नवीन पैलू ही कळाले. मी आता जवळपास वेंटो वर फ्रीझ होतोय. इतर काही कारणांपेक्षा मला वाटतं ब्रँड व जर्मन टेक्नॉलॉजी ने भुरळ घातली असावी. तसेच स्वतःला अपग्रेड करण्याची इच्छा - ती देखील असणे शक्य आहे. सेल्स मध्ये असल्याने प्रवास बराच होतो आणि कंफर्ट हा देखील एक पॅरामीटर होताच. शिवाय सेफ्टी आणि दणकटपणा हा पण एक विचार केला - आणि वेंटो वर ज़ीरो डाउन झालो.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार. तुमच्या गरजेला मिपाकरांना साद घातली की ते नक्की धावून येतात आणि मिपा वरील चर्चेतून नक्कीच खूप काही घेण्यासारखे असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पुन्हा एकदा आभार.
कळावे.
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 11/25/2014 - 06:47
नवीन
अभिनंदन!
मी अकरा वर्षे झेन वापरली आणि ३ वर्षांपूर्वी ७५,००० ला विकली. दुसरी गाडी घेण्यासाठी अनेक पर्याय तपासले. वर्ना आणि वेन्टो शॉर्ट्लिस्ट केले. शेवटी दान वेन्टोच्या बाजूने पडले. आज तीन वर्षे होऊन गेली. समाधानी आहे!
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Mon, 11/24/2014 - 20:01
नवीन
जुनी गाडी का बदलताय बॉ? २००८ म्हणजे फार जुनी नाही. चांगली चालत असेल तर तीच वापरा. ह्युंदाईच्या गाड्या १०-१२ वर्ष आरामात चालतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/25/2014 - 06:08
नवीन
नवी गाडी घ्यावी कि जुनी यावरील एक लेख मूळ इंग्रजीत आहे तसाच देत आहे.
वाचून पहा विचार करा म्हणजे नवी गाडी घ्यायची कि नाही याच्या विचारांची बैठक पक्की होईल.
मी यात कोणतेही मत प्रदर्शन करीत नाही चूक कि बरोबर हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे
Indians generally trade / upgrade their cars after only 5 years of ownership. Here is a classic situation : Sell a 5 year old WagonR for that shiny new Swift / Getz / Vista. Or an '03 Honda City for a new Civic / Octavia / Corolla. Or an '03 Octavia for a new Laura / Accord.
Either you will buy a new car from the same segment, or upgrade to a higher segment. The latter seems to be the more popular option amongst indians. We were curious to know the absolute financial implications and ran some numbers on the excel. I have used a typical C Segment sedan as the basis of calculation. For segments lower or higher, simply equalize the appropriate numbers.
What actually makes financial sense? Should you retain your existing car for another 3 - 5 years or trade up toward a new car?
Considerations
• Since we are assuming that a 5 year old car is already on hand, I am going to calculate the cost of ownership from the 6th year to the 10th.
• A 5 year old car in India would have typically covered about 60,000 – 80,000 kms. Translated, it still has a good amount of useful healthy life in it. A well-maintained modern C segment sedan will easily deliver reliable service of at least 1,50,000 kms. An immaculately maintained C-segment will go upto 2,00,000 kms or over.
• The loan is entirely paid off (Don’t you just love the non-EMI times of your life!)
Option ONE : Retain your existing car
• Rs. 4,25,000 : The resale value of your 5 year old C-segment sedan (e.g. Honda City) as of today.
• Rs. 20,000 : Averaged maintenance cost per year. Thus, you would spend a total of a lac over the next 5 years on a timing belt replacement, suspension overhaul, new brake pads and other required items.
• Rs, 35,000 : Total cost of insurance premiums for the next 5 years.
• Rs. 1,50,000 : Resale cost (realistic) of your 10 year old C-segment sedan in year 2013.
Thus, if you retain your existing sedan for the next 5 years, you will incur a total ownership cost of Rs. 4,10,000 OR Rs. 82,000 p.a.
Option TWO : Upgrade to a C+ segment car
• Rs. 12,50,000 : Cost of a new Honda Civic or equivalent sedan.
• Rs. 4,25,000 : Proceeds from the sale of your existing sedan used as down-payment toward the new car.
• Rs. 20,000 : Approximate EMI per month for 8.25 lacs on a 5 year term.
• Rs. 6,000 : Averaged maintenance cost per year.
• Rs. 1,20,000 : Total cost of insurance premiums for the next 5 years.
• Rs. 6,20,000 : Realistic resale of your new C+ sedan in year 2013.
Thus, if you upgrade from a C-segment sedan to a C+ segmenter, you will spend a total of Rs. 11,55,000 over the next 5 years. OR 2,31,000 per year
But that’s not the entire picture, is it? What we have not calculated yet is the opportunity cost of the Rs. 20,000 per month that you are blowing away toward the new car’s EMI. If you don’t upgrade, that money can instead be invested. Even if reasonably invested, the saved Rs. 20,000 per month will become a whopping 15 lakh rupees at the end of 2013!
Net net, retaining your current 5 year old sedan (over a 12.5 lakh sedan upgrade) will make you richer by 22.5 lakh rupees over the next 5 years! That’s an earning of Rs. 4,50,000 per year. OR Rs. 37,500 a month.
Shocked? Yup, me too. Remember, the cost of a new car is not the EMI alone. The long list consists of depreciation, taxes, higher insurance premiums, loan interest costs and more. Even if you are a business owner and can avail of depreciation benefits, the numbers still don’t justify an upgrade to a higher sedan. On the other hand, you can consider upgrading sensibly. Plenty of used (and excellent) Accords, Mondeos & RS' in the 6 - 7.5 lakh price band. Lateral upgrades do give you immense bang for the buck.
This is all the more reason to maintain your car well. Not only will it last a longer period and give you reliable service, but it will fetch you a better resale too. Now you know why I am known to use my cars till they drop apart.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 11/25/2014 - 06:11
नवीन
हा २००८ चा लेख मी संगणकात साठवून ठेवलेला होता पण ती गणिते आजही लागू होतात
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Tue, 11/25/2014 - 09:54
नवीन
प्री-ओन्ड टाटा नानो किंवा मारुती अल्टो घ्यायची म्हणतोय, त्याबद्धलही जाणकारांनी सल्ला द्यावा.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 11/25/2014 - 10:00
नवीन
नॅनोच्या फंदात पडू नका....आणी ऑल्टो घेतलीत तर K-10 Kappa ईंजिनवालीच घ्या
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/25/2014 - 10:17
नवीन
प्री ओन्ड नॅनो..... वेल्ल्ल....... शक्यतो नको. नवी कोरी घेतलीत तर गाडी वाईट नाहीये. अतिशय प्रॅक्टिकल आहे माझ्या मते. बसून चालवून बघितलंय. मागे पुढे उत्तम लेग व हेड रूम. ८० ९० पर्यंत व्यवस्थित जाते, सिटी ड्राईव्ह साठी उत्तम. अर्थात त्या गाडीच्या मर्यादा आहेतच व हायवेला त्या प्रकर्षाने जाणवतात. लगेज स्पेस न के बराबर. गाडी आवाज खूप करते. एसी बरे आहे. टर्निंग रेडियस, मायलेज उत्तम.
आफ्टर सेल्स ठीकठाकच.
नवीन के१० घ्या. दी बेस्ट एन्ट्री लेव्हल हॅचबॅक. स्वतः वापरतोय. तक्रार नाही. चालवायला सुसाट. ६८पीएस विथ ८०० किग्रॅ कर्ब वेट.... अर्र.... काय उसळते राव गाडी..... प्रेमात....
थोडं बजेट वाढवता आलं, तर ग्रँड आय१० खल्लास गाडी आहे.
- Log in or register to post comments
स
सुखी जीव
गुरुवार, 11/27/2014 - 05:47
नवीन
मस्त आहे VENTO. अत्यंत दणकट सेफ.मस्त पिक अप, stable
माझ्यासाठी VENTO का CITY असा प्रश्न होता. CITY च्या प्रेमात पडल्यामुळे VENTO सोडली.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 11/27/2014 - 06:57
नवीन
हे वाचा
लोकसत्ताचा लेख आहे. यात लिहील्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सुरक्षा चाचणीत फोक्सवागन ची पोलोही सपशेल नापास झाली होती म्हणे !
आता बोला.
आणि भारतातल्या वेडझव्या ड्रायव्हिंगला जोवर ताळ्यावर आणलं जात नाही (जे व्हर्च्युअली इम्पॉसिबल आहे) तोपर्यंत एअरबॅगच काय, आणखी कुठलंही सेफटी फीचर दिलं तरी अपघाताचा धोका टळणार नाही. तरीही आशा; की नव्या वाहन कायद्याच्या नियमांची चोख आणि प्रामाणिक अंमलबजावणी झाली तर कदाचित थोड्डीशी शिस्त यावी ड्रयव्हर्स ना.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/27/2014 - 07:09
नवीन
आजच १ सेदान (बहुतेक होंडा अमेझ) काहीही सिग्नल (हॉर्न, लाईटसची उघडझाप, इ.) न देता डावीकडून फक्त १-१.५ फूट अंतर ठेउन ओव्हरटेक करून गेली... स्पीड ७०+ आरामात असावा तिचा (मीच ५०+ ला होतो)
रस्ता ५ लेनचा एक्स्प्रेस्स हायवे...जेमतेम २ गाड्या टेंपो पॅरलल जात असतानाची वेळ
:(
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 11/27/2014 - 10:59
नवीन
गोर्या लोकांनी चाचण्या घेतल्या म्हणजे अंतिम? ह्यांचा मित्र म्हणतो की गाडी २०० किमी वेगाने आदळली तर काय होईल अशा प्रकरच्या चाचण्या असतात. येथे पवन पुत्र मारूतीच नव्हे तर चार बांगड्या मिरवणारी भारतात विकली जाणारी ऑडी पण कदाचित नापास होईल.
खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खडे, बेपर्वा चालक्,सगळा रस्ता माझाच असे समजून चालवनारे चालक्,दर १५ सेकण्दांनी हॉर्न वाजवायचाच असा पण केलेले चालक, मागे कितीही रहदारी होवू दे, मी माझी गाडी मला पाहिजे तशीच चालवणार... हे सुधारत नाही तोवर सा़क्षात हेन्री फोर्ड जरी येथे अवतरले तरी अपघात होतच राहतील.
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 11/27/2014 - 12:14
नवीन
नाही हो, माईसाहेब.. गाडी आदळतांना तिचा वेग जर ६०-८० किमी प्रति तास असेल (धोका कळून पॅनिक ब्रेकींग केल्यास आदळण्याच्या वेळी जनरली वेग ह्यापेक्षा कमीच रहात असेल..) तर गाडीचं काय होतं ह्याच्या टेस्ट्स असतात ह्या..
गाडीची "स्ट्रक्चरल इंटीग्रिटी" महत्त्वाची असते म्हणे, ब्वॉ.. फक्त एअरबॅग्स असल्यानी गाडी सुरक्षित होत नाही. बाकी, सीट बेल्ट लावत चला, हां..
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/27/2014 - 12:27
नवीन
Polo ani Ford Figo chi structural integrity tikali mhane. Mhanoon tya air bag lawoon safe hotat. Pan bakichya air bag lawoon pan titakya safe honar nahit mhane. Pan tyat Hyundai i20 ani Swift baddal kay mhatale ahe mahit nahi. Mhanaje structural integrity tikali ka nahi te mahit nahi.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 11/27/2014 - 13:07
नवीन
छान. हे तज्ञ लोक गाडीचे दरवाजे उघडून structural integrity पासून ते तुमच्या त्या थर्मोडायनॅमिक्सपर्यंत पोचले नाहीत म्हणजे मिळवली.
पुंटो,सियाझ,सिटी? त्या टिकल्या का त्यात?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 11/28/2014 - 06:35
नवीन
बेअरिंग सुटायला लागलं ना आताशा माईसाहेबांचं!!!
- Log in or register to post comments
ट
टिलू
गुरुवार, 11/27/2014 - 13:29
नवीन
Celerio बद्दल काय मत आहे ? गाडी चान्गली आहे असे ऐकले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 11/27/2014 - 14:54
नवीन
बजेट कमी असेल तर मस्त गाडी आहे. मी ऑटो गाडी चालवली आहे. चांगली आहे. ५ लाखात ऑटो गाडी म्हणजे स्वस्त आहे.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 11/28/2014 - 06:12
नवीन
सहमत. चालवलेली नाही. रिव्ह्यूज आणि स्पेक्स वरून सांगू शकतो की उत्तम पर्याय आहे. थोडं अधिक बजेट असल्यास झेस्ट बघू शकता.
- Log in or register to post comments
ब
बाहुली
Fri, 11/28/2014 - 08:06
नवीन
होण्डा ब्रिओ कशी आहे ??
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 11/30/2014 - 03:12
नवीन
छान आहे. जागा कमी आहे पण खुप. ६ फुट उंच असाल तर बसायला त्रास होईल.
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Sat, 11/29/2014 - 16:57
नवीन
वेंटो नक्कीच चांगली आहे
पण
टाटा झेस्ट (Zest) चालवून पहा अफालूत्न गाडी आहे म्हणतात ना खेळ-बदलू ...कमीत कमी बजेट मध्ये जबरस्त !!!!
- Log in or register to post comments
च
चिगो
Mon, 12/01/2014 - 07:02
नवीन
मान्य आणि धन्यवाद.. धन्यवाद कारण की मी ही गाडी घेतोय आणि मिपावर ह्या गाडीला "अंगठा वर" देणारे आहेत, ह्याचा आनंद..
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Mon, 12/01/2014 - 07:25
नवीन
सध्या भारतात बेस्ट इंजिनीयर्ड कार्स कोरियन आहेत. जर्मन आपल्याकडे कचर्याखेरीज काहीच विकत नाहीत, विशेषतः मास मार्केटात (चांदणी, बांगड्यांबद्दल हे विधान नाही.(म्हटलं तर आहे. खरं तर एक्स-१, क्यू-३, ए-क्लास ही याचीच उदाहरणे आहेत)).
परत फोवेच्या डीलर्सचा माज, कंपनीचा माज (वॉरंटी आणि इतर क्लेम बाबत)आणि एकुणच आफ्टर सेल्स सर्व्हिसची अवस्था बघता सध्या फोक्सवॅगनच्या वाटेला न गेलेलंच बरं.
- Log in or register to post comments
य
योगी९००
Mon, 12/01/2014 - 08:41
नवीन
नुकतीच अमेझ गाडी माझ्या पहाण्यात आली..(माझ्या चुलत भावाने घेतली म्हणून....त्याने त्याची स्विफ्ट डिझेल विकली आणि अमेझ पेट्रोल घेतली).
डिझायर बुक केल्यानंतर ही अमेझ लाँच झाली होती. त्यामुळे होंडा गाडी घेऊ शकलो नाही अशी चुटपुट वाटली. पण नवीन अमेझ बघीतल्यावर डिझायरचा निर्णय चांगला होता हे पटलं. अमेझच्या पत्रा एकदम तकलादू वाटला आणि workmanship सुद्धा सो सो वाटली. आणि अमेझचा डॅशबोर्ड कमालीचा outdated वाटला. डिझायर किंवा असेंन्ट च्या डॅशबोर्ड्च्या तुलनेत होंडा अमेझ फारच डावी वाटली. गाडी चालवताना केबीन मध्ये थोडा जास्त ईंजीनचा आवाज येतोय असे वाटले पण पिक-अप्/ब्रेकींग मात्र व्यवस्थित वाटले.
अमेझ गाडी launch करण्यात होंडाने थोडी घाई केली असे वाटते. डिझायरला टक्कर देण्यासाठी आणि किंमत कमी ठेवण्यासाठी कमी गुणवत्तेचे मटेरीयल वापरेले असावे अशी शंका आली. होंडाकडून ही अपेक्षा नव्हती. (पण होंडा सिटी मात्र खुपच छान आहे).
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 12/01/2014 - 10:38
नवीन
होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे. डिझायरचा पत्रा जेमतेम. फोक्स्वॅगन व फियाट गाड्या जास्त मजबूत वाटतात. दुर्दैवाने फोकस्वॅगन्चे लोक विमान विकल्याच्या थाटात बोलत असतात.त्यामुळे तेथे जाणारे लोक कमी.
टाटांच्या गाड्यांबद्दल न बोललेलेच बरे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 12/01/2014 - 11:51
नवीन
होंडा अमेझचा पत्रा तकलादू आहे. डिझायरचा पत्रा जेमतेम.>>>>> अहो पत्र्याच्या जाडीवर काही नसते अवलंबुन. फ्रेम कशी आहे आणि कीती चांगली डीझाइन केली आहे ते महत्वाचे असते. फ्रेम नुसती मजबुत, जाडजुड असुन पण उपयोग नाही, लवचिक पण पाहीजे. शॉक शोषुन घेइल अशी पाहीजे.
पत्रा नुस्ते झाकण्याचे काम करतो, बाकी काही नाही.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 12/01/2014 - 13:14
नवीन
मागून टेम्पोने वा रि़क्षाने धडक दिली तर अमेझचे सगळे डिझाइन मागून बाहेर येइल असे हे म्हणतात. फक्त जाडीवर नसते हे मान्य पण भारतात तरी ते म्हत्वाचे आहे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/01/2014 - 18:29
नवीन
अगदी बरोबर.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2