Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धोतर आणि तांब्या

श — शब्दानुज, Sun, 11/23/2014 - 09:06
हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले अचानक गुडगुड आवाज कानी पडले कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले आजवर कैकवार धोतर बाहेर सोडले एका अपघाताने शहाणपण आज सुचल

प्रतिक्रिया द्या
10794 वाचन

💬 प्रतिसाद (68)
प
प्रचेतस Sun, 11/23/2014 - 09:11 नवीन
धोतर आणि तांब्या हे शीर्षक वाचून आमच्या एका मित्रांची आठवण झाली. पुढे कविता वाचून पाहता त्यावर शिक्कामोर्तबच झाले.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Sun, 11/23/2014 - 17:32 नवीन
यावर हो सहमत होणार नाही तो मिपाकरच नव्हे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Sun, 11/23/2014 - 20:25 नवीन
याच्याशी जो सहमत होणार नाही तो दोन आयडीचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ख
खटपट्या Sun, 11/23/2014 - 20:56 नवीन
अरे पण या विषयाचे स्वमित्व हक्क "त्यांच्याकडून" यांच्याकडे आलेच कसे? मोनोपोली आहे "त्यांची"...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sun, 11/23/2014 - 20:56 नवीन
मला उगीचच माईसाहेबांचे 'हे' आठवले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Sun, 11/23/2014 - 22:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु Mon, 11/24/2014 - 05:16 नवीन
"राखीव" जागेतील आगंतूक घूसखोरी "क्षणभंगूर" ठरो हीच अगोबा चरणी प्रार्थना.. समस्त हा.मुक्त्.ओसाडवाडी मित्रमंडळ. स्(दा) गावडे (आ)सूड नाखु(ष) वाघुळ्बुवा शब्द्फोडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
शब्दानुज Mon, 11/24/2014 - 05:39 नवीन
त्या राखीव जागाच संपवायच्या आहेत....मग आरक्ष ण कसे देणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन Mon, 11/24/2014 - 08:51 नवीन
वल्लेश गडचढवी विसरलात काय ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पैसा Mon, 11/24/2014 - 08:57 नवीन
नीट वाच रे उलटे लटकणार्‍या. प्रार्थनाच "अगोबा" चरणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 11/24/2014 - 09:01 नवीन
अर्र तेच्यामारी. उलटे लटकून डोक्यात रक्त साकळलं बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्यारे१ Mon, 11/24/2014 - 09:00 नवीन
प्रार्थना कुणाच्या चरणी केली आहे बघा की! वल्लीसहस्त्रनामांपैकी अग्रक्रमानं येणारं अगोबा हे नाम भक्तांना अत्यंत प्रिय असून त्याच्या जपाने आनंद प्राप्त होतो असा अनुभव आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आदूबाळ Sun, 11/23/2014 - 21:09 नवीन
ब्याक्कार हसतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
हाडक्या Sun, 11/23/2014 - 21:14 नवीन
धोतर आणि तांब्या.. *lol* . *lol* . *lol* त्या मिपाकराचा तांब्या पितळेचा की ईस्टीलचा ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
श
शब्दानुज Mon, 11/24/2014 - 05:45 नवीन
धॉतराचा लोगो नाही विचारलात ज्या अर्थी तांब्या शेजारी उडाला म्हण्जे पितळ नसाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ज
जेपी Sun, 11/23/2014 - 09:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Sun, 11/23/2014 - 09:23 नवीन
अहो पन बांधकाम झाले का त्याचे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 11/23/2014 - 11:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Sun, 11/23/2014 - 12:04 नवीन
शौचालयात पण तांब्याच होय......??? अरारारारारारारारारा....... अवघड आहे....
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 11/23/2014 - 12:59 नवीन
रुळावर तांब्या घेऊन जायचे साहजिकच सवय लागली असेल ताब्यांची, आता लागलेल्या सवयी मुळे ताब्यां न नेल्या प्रेशर येत नसेल. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज
H
hitesh Sun, 11/23/2014 - 15:30 नवीन
शौचालतही तांब्या तंब्रेल लागेलच की. न्हाइतय फव्वारा किंवा कागदी बोळे ठेवायला हवेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज
स
सस्नेह Sun, 11/23/2014 - 12:12 नवीन
शिव शिव ! 'जे न देखे रवी' ते आम्ही का बरे वाचतो ?
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Sun, 11/23/2014 - 14:04 नवीन
एक गंभीर विषय मी विनोदातुन मांड्ला आहे..रुपकातुन ते मांडले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
श
शब्दानुज Mon, 11/24/2014 - 05:07 नवीन
मिपाकर कधिपासुन गंभिर चर्चा करणार
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Mon, 11/24/2014 - 15:35 नवीन
माहित नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
श
शब्दानुज Mon, 11/24/2014 - 05:13 नवीन
चर्चा आणि कवितेचा संबंध यावर पीएचडी होऊ शकेल.....गरजवंतांनी विचार करावा
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/24/2014 - 07:40 नवीन
बुवांनु, नवीन आयडी घ्येतलांव कांय??
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/24/2014 - 08:19 नवीन
हेच विचारणार होतो ! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
श
शब्दानुज Mon, 11/24/2014 - 18:07 नवीन
रावजी अवं नवं पाहुणा हाय जी....... काहि महिन्यांपुर्वी ज्या एकोणीस वर्षीय मुलाने गोंधळ घातला तोच मी .. .....शब्दानुज.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेपी Tue, 11/25/2014 - 03:09 नवीन
या आडुन तुला काही सुचवायचे आहे का भाच्या....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
श
शब्दानुज Tue, 11/25/2014 - 04:50 नवीन
नेमके कशाच्या आडुन??? कवितेच्या प्रतिक्रियेच्या इतर मुळात 'ही' प्रक्रीयाच आडुन आडुन करण्याची असल्याने संभ्रम आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Tue, 11/25/2014 - 05:45 नवीन
रावजी अवं नवं पाहुणा हाय जी....... काहि महिन्यांपुर्वी ज्या एकोणीस वर्षीय मुलाने गोंधळ घातला तोच मी .. .....शब्दानुज..... याच्या आडुन........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
श
शब्दानुज Tue, 11/25/2014 - 13:46 नवीन
काही विषेश नाही फक्त नवा भिडु लिंबुटींबु असल्याचे कळावे आणि लोकांनी सांभाळुन घ्यावे यासाठी.... (गुप्त हेतु कुतुहलातुन जुन्या कविता परत वाचल्या जाव्यात यासाठी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
V
vikramaditya Mon, 11/24/2014 - 08:43 नवीन
सहज "सुलभ" लिहितेल. "गुड!गुड!"
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 11/24/2014 - 08:47 नवीन
"गुड!गुड!"
क्याप्स लॉक चुकून ऑन होतं काय ओ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya
V
vikramaditya Mon, 11/24/2014 - 11:12 नवीन
त्यांनी कवितेत वापरलेल्या 'गुडगुड' शब्दावर एक कोटी करण्याचा एक (आता निष्फळ म्हणावा लागेल असा) प्रयत्न होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विवेकपटाईत Mon, 11/24/2014 - 08:54 नवीन
नमो नमो नमो स्वछता अभियान धोतर आणि तांब्या = घरात शौचालय - बाहेर करायची घाण अखेर घरात करू लागले ....कुठे आणून ठेवला महाराष्ट्र माझा....
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Mon, 11/24/2014 - 14:17 नवीन
:D
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 11/25/2014 - 05:56 नवीन
अरे अरे मोकळ्यावर शौचास बसण्याची महान परंपरा चालवणारा अजून एका वीराला आपण कायमचे मुकलो आहोत. केवळ एक तांब्या रेल्वेगाडी खाली आला म्हणुन चार भिंतीत कोंडुन घेउन मलविसर्जन करण्याचा निर्णय घेणे केवळ भेकड पणाचे निदर्शक आहे. अरे असे हजार तांब्ये कुरबान झाले तरी बेहत्तर. उघड्यावर शौच करण्याची महान परंपरा खंडीत करण्याचे धाडसच कसे होते म्हणतो मी. कलियुग आहे हे घोर कलियुग. अशा वागण्याने आपण आपले स्वर्गातले स्थानही गमावतो याची खंत नाही वाटत कोणाला. किंबहुना चार भिंतींमधे मलविसर्जन करुन आपण या भुतलावरच नरकयातना भोगण्यास सुरुवात करतो आहोत याची कोणाला जाणिव का होत नाही? मोकळ्या जागेवर शौचास बसण्याची महान परंपरा आता इतिहास जमा होण्याच्या मागावर आहे. आठवा सिंहगड एक्सप्रेसने मुंबै ला जाताना खिडकीतुन दिसणारे ते अविस्मरणिय दृष्य. रेल्वे रुळांच्या कडेला बसणार्‍या महात्म्यांचे दर्शन सकाळी सकाळी व्हावे आणि दिवस चांगला जावा या उद्देशाने अनेक जण रोज पुणे मुंबई अपडाउन करतात. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी सरकारही या परंपरेची मुस्कुटदाबी करण्यास प्रोत्साहन देत आहे. काय तर म्हणे घरात शौचालय नसेल तर निवडणुकीस उभे रहाता येणार नाही. मी थुंकतो अशा निवडणुकीवर जी असल्या अनैसर्गिक अटींवर आधारीत असेल. एखाद्याच्या नैसर्गिक अधिकारांची गळचेपी करणारे नियम करायचे आणि मग आमच्या देशाला एक महान लोकशाही परंपरा आहे असे मिरवायचे हे परस्परविरोधी नाही का? निसर्गाचे दान निसर्गाला परत देण्यासाठी निसर्गात बसण्या ऐवजी आता अजून एक जण चार भिंतींच्या आत स्वतःला अक्रसून घेउन, घूसमटत, गुदमरत, दरवाजावर कोणाची थाप पडते आहे का या विचाराने भेदरत मलविसर्जन करणार. ही महान परंपरेच्या जपणूकी साठी संवर्धनासाठी मी काही सुध्दा करु शकत नाही याची, माझी मलाच फार शरम वाटते आहे. उत्तीष्ठत - जाग्रत - प्राप्यवरान्निबोधत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 11/25/2014 - 06:04 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पैसा Tue, 11/25/2014 - 09:00 नवीन
म्हणा लोकांनो आता, कुठे नेऊन ठेवलात .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
य
यसवायजी Tue, 11/25/2014 - 09:33 नवीन
हाहा.. ग्राऊंड क्लियरंस जादा असला म्हंजे झालं. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ब
बॅटमॅन Tue, 11/25/2014 - 09:34 नवीन
ठ्ठो =)) =)) =)) धन्य. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
श
शब्दानुज Tue, 11/25/2014 - 14:58 नवीन
त्या विराच्या सन्मानार्थ आदरांजलीचा सोहळा आहे. तरी उपस्थिती दाखवावी..... क्रुपया आहेर आणु नये आपला तांब्या हाच खरा आहेर........ चला ऊठा....तांब्या चळवळ चालु करुया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ब
बॅटमॅन Tue, 11/25/2014 - 14:59 नवीन
चला ऊठा....तांब्या चळवळ चालु करुया
तांब्याचे अधिष्ठान असलेली चळवळ चालू करावी लागत नाही. निसर्गकृपेने ते काम आपोआप होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
श
शब्दानुज Tue, 11/25/2014 - 15:25 नवीन
तांब्या कुठे (बाहेर की आत ) वापरता यावर चळवळ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
श
शब्दानुज Tue, 11/25/2014 - 15:32 नवीन
स्थळ सांगायचे राहिले हगणदारी'युक्त" गाव शिश्याची काटेवाडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
ख
खटपट्या Wed, 11/26/2014 - 05:58 नवीन
टाळ्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
त
तिमा Tue, 11/25/2014 - 14:07 नवीन
गाड्या बंद पडल्यावर, अशा रुळांमधून चालताना अगदी, 'केकवॉक' चा आनंद मिळायचा.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 11/26/2014 - 12:37 नवीन
हाफशेंचुरी!!!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा