Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि किल्ला - माझा मिपावरील श्री गणेशा

द
दिप्स
Sun, 11/23/2014 - 14:08
💬 56
नमस्कार मंडळी, आज मिपावर माझा पहिला लेख टाकताना खूप आनंद होत आहे. खर तर काही लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तेव्हा जुन्या जाणत्यांनी समजून घेऊन मार्गदर्शन करावे हि विनंती. गेली जवळपास दिढ वर्ष मी मिपाचा नियमित वाचक आहे. तेव्हा वेगवेगळ्या विषयावरचे एक से बढकर एक लेख वाचताना वाटायचं आपण हि प्रयत्न करून बघावा. आता तो योग जुळून आला आहे, परवा माझा वाढदिवस झाला त्यावेळी केलाला एक संकल्प कि - बाकी काही नाही तरी प्रवासवर्णन लिहावे. तर मग करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरया! गेल्या दिढ वर्ष्यात मिपावर बरीच प्रवासवर्णन वाचली (मी इस्पिकचा एक्का सरांचा खूप मोठा पंखा आहे), ट्रेकिंग च्या मोहिमा बघितल्या पण कर्नाल्याविषयी वाचनात आल नाही तेव्हा जरा वेगळ्या ठिकाणाविषयी लिहिताना बर वाटतंय. मी आणि माझा मित्र राहुल जो कि सदा न कदा कुठ न कुठ फिरत असतो याने राजमाचीला नाईट ट्रेकिंग चा प्लान बनवला होतो पण बाकीचे कुणी तयार होईनात तेव्हा ठरलं कि दोघच जाऊ कुठ तरी जवळ वन डे ट्रेक ला आणि कर्नाळ्याचा प्लान फिक्स केला. कर्नाळा हे मुंबई - गोवा हायवे वर पनवेल पासून १३ किलोमीटरवर आहे. आम्ही ऐरोली, नवी मुंबईकर. त्यामुळे ऐरोलीहून सकाळी ६.२८ ची लोकल पकडून पनवेलला गेलो. पनवेल रेल्वे स्थानकापासून पायी १० मिनिटावर पनवेलच बस स्थानक आहे. तिथून अलिबाग किंवा पेनकडे जाणार्या बस कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या गेट वर सोडतात. 1 ट्रिपला सुरुवात करण्यापूर्वी काही उपयुक्त माहिती जाणून घेवूया – तेथील मुख्य आकर्षण १) अर्थातच पक्षी अभयारण्य २) घनदाट जंगल ३) थम्ब्स अप च्या आकाराचा डोंगर आणि त्यावरील छोटासा किल्ला. पक्षी अभयारण्य दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत सुरु असते. ऑक्टोबर ते एप्रिल हा चांगला काळ आहे भेट देण्यासाठी. पक्षी निराक्षणासाठी आभाळ निरभ्र असलेल चांगल. कर्नाळा किल्ल्याचा थोडा इतिहास – 2 सकाळी १० च्या सुमारास आम्ही गेटवर पोहचलो. तेथे प्रत्येकी तीस रुपयाच तिकीट काढावे लागते, जर तुमच्या बरोबर प्रोफेशनल क्यामेरे असतील तर त्याची सेप्रेट फी द्यावी लागते आणि हो जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घेऊन आला असाल तर तुम्हाला ओळखपत्र दाखवाव लागत. गेटवरच अभयारण्याचा मोठा नकाशा लावला आहे तो बघून आम्ही सुरुवात केली. 3 उजवीकडून आत मध्ये गेल्यावर पक्ष्यांचा आवाज ऐकू येवू लागला पण एकही पक्षी दिसेना. बरीच हौशी मंडळी मोठमोठ्या दुर्बीण, क्यामेरे घेऊन आले होते, त्यांच्याकडील फोटो पहिले. पण आमच्या मोबाईल क्यामेर्यावर काही दिसेना तेव्हा म्हणल कमीत कमी आवाज तरी रेकॉर्ड करावा. त्याचा हा एक प्रयत्न – पक्ष्यांचे आवाज आम्ही पायवाटेने जसजस आतमध्ये गेलो तशी वाट गायब होत गेली. थोड पुढ गेल्यावर आम्हाला एक गाईड भेटले, त्यांनी सांगितली कि हा रस्ता किल्ल्यावर जात नसून न्यचरल ट्रेलचा भाग आहे जो कि खास पक्षी निरक्षणासाठी आहे. न्यचरल ट्रेल-१, 4 न्यचरल ट्रेल-२, 5 न्यचरल ट्रेल-३, 6 न्यचरल ट्रेल-४, 7 तसं पण ह्या उंचच उंच झाडांवरती दुर्बिनाविना आम्हाला काही दिसत नव्हते म्हणून आम्ही माघारी फिरून डावीकडून किल्ल्याची वाट धरली. गेटपासून किल्ल्याचं अंतर जवळपास २.५ किलोमीटर आहे, तास-दीड तास लागतो किल्ल्यावर जायला. निम्म्यापर्यंत चढण जराशी अवघड आहे पण नंतर पुढे रस्ता सरळ आहे. हळूहळू वर जाताना मला सारखं माथेरानमध्ये फिरत असल्यासारखे वाटत होत पण एक फरक होता कि इतर ठिकाणापेक्षा हे पर्यटनासाठी वेल म्यानेजड वाटलं (ठिकठिकाणी पक्षी निराक्षणासाठी मचाण उभारली आहेत, प्रसाधनगृहे आहेत) आणि माथेरान मध्ये एखाद्या बागेतून फिरल्यासारख वाटत पण इथे एक प्रकारचा वाईल्ड फील येतो. इथे झाडांवर मोठमोठी कोळ्यांची जाळी आहेत (ती पण आमच्या क्यामेर्यात आली नाहीत). वाळवीची /मुंगळ्याची घरटी, 8 वारूळ, 9 जंगली मशरुम, 10 झाडावरील बांडगुळची नक्षी, 11 दगडांवरील शेवाळाची रांगोळी, 12 झाडांच्या मुळांचा गुंतावळा 13 आणि हो हा झोका 15 अजून काही फोटोज – फुलपाखरू १, 16 फुलपाखरू २, 14 पाथ टू हेवन, 17 आमचा फराळ, 18 ह्याने आम्हाला नाष्टा नाही करून दिला, 19 डोंगरावरील देवीच देऊळ, 20 पनोरमा, 21 किल्ला १, 22 किल्ला २, 23 किल्ला ३, 24 किल्ला ४, 25 कर्नाळा माची, 26 कर्नाळ्याची स्फिंक्स, 27 आमची आवडती जागा. 28 बर्याच वेळा आपण फोटो काढायच्या नादात मूळगोष्ट विसरतो कि फोटो हे दुसर्यांना दाखवण्यासाठी असतात, जे काही आहे ते आपण आपल्या डोळ्यात साठवून घ्यावं. इथं आम्ही २-३ तास बसलो होतो, मस्त गार वारा सुरु होता. तिथं असलेल्या शांततेचा आणि समोरच्या निसर्गाचा आम्ही मनमुराद आस्वाद घेतला. त्यावेळी एकदमच मनात आल कि फोटोप्रमाणे हे क्षण पण साठवता आले तर किती बर होईल. पण शेवटी ३.१९ ची लोकल पकडायची होती म्हणून नाईलाजाने उठून याव लागल. खाली एक गेस्ट हाउस आहे तिथे जखमी पक्षी उपचारासाठी ठेवले आहेत आणि सर्व प्रकारची (फुलझाड, फळझाड आणि शोभेची झाड) छोटी रोपटी विक्रीस ठेवली आहेत. तेथेच महिला बचत गटाचे एक छान कॅन्टीन आहे, तिथ आम्ही हातपाय धुवून पुन्हा एकदा ताजतवान झालो परतीच्या प्रवासासाठी आणि मुंबईतल्या कलकलाटासाठी. तर असं हे मुंबईकरांसाठी जवळ असलेले एक वेगळे, शांत आणि वेल ३ इन १ ठिकाण. नक्की भेट द्या आणि हो लेखनाविषयी मार्गदर्शन करावे हि विनंती.

प्रतिक्रिया द्या
17613 वाचन

💬 प्रतिसाद (56)
ब
बॅटमॅन Fri, 12/12/2014 - 13:10 नवीन
ओह अच्छा, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
कंजूस Fri, 12/12/2014 - 13:33 नवीन
विरारच्या पूर्वेला डोंगरावर जिवतानी देवी ,पश्चिमेला (१०किमी)अर्नाळा गाव ,समुद्र किनारा आणि पाण्यात थोडे आत अर्नाळा किल्ला आहे इकडे जाऊ नका कारण शहर
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 12/12/2014 - 13:38 नवीन
अच्छा, म्हणजे नुसते गावच नाही तर त्या नावाचा किल्लादेखील आहे तर. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Fri, 12/12/2014 - 13:37 नवीन
कारण शहरातले लोक जिथे बघायला जातात तिथे गावातले लोक XXयला जातात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/14/2014 - 08:39 नवीन
कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे असे म्हणतात. वरील सगळ्या प्रकाशचित्रात एकही पक्षी दिसत नाही. मी काही वर्षांपूर्वी कर्नाळा अभयारण्यात गेलो होतो. २-३ तासात पक्षी तर सोडाच एकाही पक्ष्याचा साधा आवाज सुद्धा आला नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 12/14/2014 - 09:43 नवीन
रानपक्षी हे काही बगळे नाहीत गाइबैलांच्या मागे फिरणारे. ते मनुष्याचा वावर टाळतात. कावळा चिमणी सारखे वस्तीकडेही येत नाहीत. ही खरी पाखरे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा