राधा
या शब्दांना दे, सुर तुझे संगीत
दरवळू दे गीत, स्वरांच्या लाटेवर
जणू दिवाणी राधा, शोधिते कान्हा
होऊनी बावरी, प्रीतीच्या वाटेवर || धृ ||
दाटले मेघ अन तरी लालिमा क्षितिजी
मनी भावनांची दाटी अन एकांताची भीतीहि
तू समीप येऊन नेत्रांतून बस हृदयी
ध्वनी कानी अन, नाव बसू दे तुझेच या ओठांवर || १ ||
तू श्वास तुझी मज आस
अन तुझा ध्यास घेतला मनी...
सर्वस्व आणि हे स्वत्व
पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी..
मी शरण सोडूनी मरण
आजही जगण्याचीही आस मनी ना उरली || 2 ||
पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी..ही पाच तत्वे कोणती ?