Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

द सिक्रेट- नवीन अंधश्रद्धा ?

प
पिंपातला उंदीर
Tue, 12/02/2014 - 11:25
🗣 75 प्रतिसाद
अंधश्रद्धा या सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात . म्हणजे भारत हा साप -हत्ती चा आणि मागासलेला देश आहे असे मानणाऱ्या युरोपिअन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण अंधश्रद्धा भरभरून आढळतात . भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत . याचा एक दणकून पुरावा म्हणजे २१ नोव्हे . २०१२ च्या निमित्ताने उडालेला धुरळा . जग आता नष्ट होणार म्हणून अनेक लोकांची पळापळ सुरु झाली होती . शेवटी नासा ला मध्ये पडून हे धादांत खोटे आहे असे निवेदन द्यावे लागले होते . तरी पण तो दिवस उलटे पर्यंत अनेक लोकांनी आपले 'जिझस ' पाण्यात बुडवून ठेवले होते . तर सांगायचा मुद्दा हा कि खरच अंधश्रद्धा या बाबतीत खरच 'काळ -गोर ' (No pun intended ) करता येत नाही . मला 'द सिक्रेट ' या प्रकरणाचा शोध 'चित्रलेखा ' मासिक वाचताना लागला . चित्रलेखाने चक्क या विषयावर कवर स्टोरी केली होती . काय आहे हे प्रकरण ? Rhonda Byrne या लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे . याच विषयावर एक फिल्म पण आहे . तू नळी वर तिचा काही भाग उपलब्ध आहे . तर या पुस्तकात Rhonda ने एक नियम मांडला . 'The Law of Attraction ' (आकर्षणाचा नियम ?). Rhonda च्या मते हा नियम फ़क़्त काही ठराविक लोकांनाच माहित होता . यात मोठमोठे महाराजे , कलाकार , सेनानी आणि मानवी इतिहासाला वळण देणार्या व्यक्तींचा समावेश होता . पण Rhonda च्या मते हा मानवी जीवनाला वेगळे वळण देणारा आणि मानवाच्या सगळ्या आशा आंकाक्षा पूर्ण करणारा नियम तिला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून तिने हे पुस्तक लिहिले होते . हा The Law of Attraction 'असे सांगतो कि माणूस हा सकारात्मक विचारांच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते म्हणजे भरपूर संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत वैगेरे मिळवू शकतो . वर वर तर हे विधान /नियम निरुपद्रवी आणि खर वाटू शकत . पण ग्यानबाची मेख अशी आहे कि या नियमाला पूर्ण पुस्तकात वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे . त्यासाठी Placebo Effect च्या मागचे कार्यकारण भाव आणि Quantum Physics चे नियम याचे दाखले देण्यात आले आहेत . म्हणजे एका साध्या नियमाला तो एक त्रिकालाबाधित नियम आहे असे सिद्ध करण्याचा खटाटोप . म्हणजे या पुस्तकात वजन कसे कमी करावे किंवा घातक रोगांपासून The Law of Attraction ' वापरून मुक्ती कशी मिळवावी यावर वेगळे प्रकरण आहे . त्यावर अनेक तज्ञांनी टीका केली . म्हणजे सकारात्मक विचार करणे हि चांगली गोष्ट आहे पण दुर्धर रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणारा माणूस The Law of Attraction ' वापरून बरा होऊ शकतो का ? अनेक वैज्ञानिक आणि Medical Experts नी हे पुस्तक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईक याना खोटी आशा लावते अशी टीका केली आहे . साहजिकच या पुस्तकावर आणि The Law of Attraction ' वर टीकेची राळ उडाली . अनेक लोकांनी यावर टीका केली आहे कि या नियमावर विसंबून राहणारे आणि प्रत्येक समस्येवर 'Instant Solution ' शोधू पाहणारे लोक आपल्या आयुष्यातील समस्येच्या root cause पर्यंत जाण्याच टाळतात आणि हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे .आता या पुस्तकातल्या Quantum Physics च्या दाखल्या बद्दल Rhonda Byrne ने विज्ञान या विषयाचा कधी अभ्यास पण केला नव्हता . तरी पण तिच्या दाव्यानुसार The Law of Attraction ' वापरून अतिशय क्लिष्ट अशा Quantum Physics चे नियम समजून घेतले . तिच्या या दाव्यावर सडकून टीका होणारच होती आणि तशी ती झाली देखील . शिवाय आपल्यासोबत घडणारया सर्व वाईट घटना आपणच नकारात्मक विचार करून आपल्याकडे आकर्षित करून घेतो हा The Law of Attraction चा व्यत्यास पण तितकाच धोकादायक . म्हणजे दिल्ली बलात्कार प्रकरणातील बलात्कारित मुलीने नकारात्मक विचार करून तो बलात्कार ओढवून घेतला होता का ? किंवा लातूर मध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या किंवा सर्वस्व गमावलेल्या लोकांनी हा भूकंप नकारात्मक विचार करून घडवून आणला होता का ? साहजिकच victim असणाऱ्याला दोषीच्या पिंजर्यात हा नियम उभा करतो . पाश्चात्य लोकांकडून आलेलं सगळ भारी अस मानून चालणार्या आपल्याकडे पण या पुस्तकाचा खप चिक्कार वाढला आहे . माझे काही मित्र पण यात आले . ते कायम आम्ही सध्या किती आनंदी आहोत आणि सकारात्मक आहोत हे दाखवत असतात आणि कुठलाही प्रश्न शेयर करायला गेल कि Think Positive ' चा डोक्यात जाणारा सल्ला देतात . इतकेच नाही तर आम्ही द सिक्रेट वाचल आहे हे status of symbol समजणाऱ्या लोकांचा संप्रदाय आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे . अनेक बापू -महाराज -साध्वी यांचे संप्रदाय कमी होते कि काय म्हणून यात या नवीन cult ची भर . आता तर The Law of Attraction चे दाखले अनेक महाराज लोक पण आपल्या प्रवचनात द्यायला लागले आहेत . हा नियम वापरून प्रबोधन करणार्या Motivational Speakers चे तांडे पण तैयार झाले आहेत . हो आणि ते Speakers आपल्या प्रबोधनासाठी भरभक्कम फी आकारतात . The Law of Attraction वापरून पैसे कमवत नाहीत . यालाच विरोधाभास म्हणतात कि काय ?

प्रतिक्रिया द्या
19610 वाचन

💬 प्रतिसाद (75)
स
स्पा Tue, 12/02/2014 - 11:54 नवीन
रोचक
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 12/02/2014 - 12:11 नवीन
हा सिक्रेट व्हिडीओ आमच्या ऑफिसमध्ये as a part of training म्हणून सुद्धा दाखवला होता... ओम शांती ओमचा "किसी चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी कोशिश करती है" हा डायलॉग "The Secret" व्हिडीओ पाहून आठवला...!!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 12/02/2014 - 12:26 नवीन
किसी चीझ को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलानेकी कोशिश करती है
हा संवाद आम्ही "प्यार अगर सच्चा हो तो पुरी कायनात..." असा वाचला/ऐकला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ज
जेपी Tue, 12/02/2014 - 12:29 नवीन
लाबंलचक डॉयकॉल आहे तो . चिज पासुन प्यार पर्यंत सगळ मिळत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बॅटमॅन Wed, 12/03/2014 - 08:19 नवीन
डॉयकॉल
कुठल्यातरी गोळी किंवा रेचकाचे नाव वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
स्पा Tue, 12/02/2014 - 12:13 नवीन
मला तर हा प्रकार "असेल हरी तर देईल खाटल्यावरी" असा वाटला
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 12/02/2014 - 12:33 नवीन
"द सिक्रेट" अतिशय विनोदी पुस्तक आहे. वेळ जात नसेल तर वाचण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 12/02/2014 - 13:29 नवीन
गावडे काकाशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 12/02/2014 - 13:51 नवीन
स्पा पुतण्या, माझं एक निरिक्षण आहे. आपल्याकडच्या एकाहून एक सरस अशा खुळचट कल्पनांवर विश्वास असणारे "द सिक्रेट" हा "त्यांच्याकडील" खुळचट प्रकार म्हणून पाश्चिमात्यांना हसतात. आहे की नाही गंमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Tue, 12/02/2014 - 13:54 नवीन
आपल्याकडच्या एकाहून एक सरस अशा खुळचट कल्पनांवर विश्वास असणारे "द सिक्रेट" हा "त्यांच्याकडील" खुळचट प्रकार म्हणून पाश्चिमात्यांना हसतात.
हा हा , जे ब्बात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
स्पा Tue, 12/02/2014 - 13:56 नवीन
खुळचट कल्पनांवर विश्वास असणारे
बाकी कर्म करत रहा,फळाची अपेक्षा धरू नका सारख्या कल्पनांवर विश्वास असणे , आणि काहीच कर्म करू नका ,फळ मिळेल या काल्पेवर हसणे यातला फरक कळत नसणार्यांची आम्हाला ज्याम मौज वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ह
हाडक्या Tue, 12/02/2014 - 15:53 नवीन
अगदी अगदी.. एकच वाक्य घेऊन आख्खे पुस्तक लिहू शकणारा लेखक नक्की ईंजिनिअर असावा बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Tue, 12/02/2014 - 16:20 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ट
टवाळ कार्टा Wed, 12/03/2014 - 05:31 नवीन
\m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
होकाका Sat, 12/06/2014 - 14:35 नवीन
I have experienced the truth in The Secret. Many times. Sorry. Unable तो type in marathi on mobile.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वेल्लाभट Tue, 12/02/2014 - 12:38 नवीन
हेहे. तुमचं विश्लेषण आवडलं. मी हे पुस्तक वाचलंय. या पुढचंही बिहाइंड द सिक्रेट का कायतरी असं पुस्तकही वाचलंय. पहिलं कुतुहलाने, एका मित्राने सुचवलं म्हणून. दुसरं नाईलाजाने, गिफ्ट मिळालं म्हणून. पण मुळातच मला सेल्फ-हेल्प किंवा पॉसिटिव्हिटीचा भडिमार करणारी पुस्तकं जमत नाहीत. डोक्क्यात जातात. आग लागलीय तरीही 'विझेल, विझेल' असा विचार करत बसायला हे लेखक सांगतात. त्यामुळे मी नादाला लागत नाही. सिक्रेट पुस्तकाच्याही अधीन होणारे लोक हं'च माझ्यामते. असं होत असेल तर कामधंदा सोडून बसेल हो सगळं जग. हवीय कशाला मेहनत आणि कष्ट? येतोय की पैसा.... जस्ट विश इट फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट. ..... हह! वायझेडगिरी. गंमत म्हणून वाचायला हरकत नाही अगदी वाचायचच असेल तर. पण बघा; पॉझिटिव्ह विचारालाही प्रॅक्टिकॅलिटीच्या मापकाने मापून मगच मनात जागा द्यावी. मग सिक्रेट असं काहीच नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/02/2014 - 13:18 नवीन
बरोबर आहे. नुसता कृतीशिवाय पॉझीटीव्ह विचार म्हणजे डे ड्रिमिंग आहे. गोष्टीतल्या शेखचिल्ली ने तरी दुसरे काय केले होते. कृतीशील रहाण्यासाठी पॉझिटीव्ह विचार हवेतच. पन त्यांचे हवेत इमले नकोत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/02/2014 - 13:37 नवीन
अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा हा काही आशियायी लोकांचा मक्ता नाही. माणूस इथून तिथून सारखाच ! पाश्च्यात्य अंधविश्वास किंवा अंधश्रद्धांची पाश्च्यात्यांनीच सांगितलेली पोतंभरून उदाहरणे इथे सापडतील. मुख्य म्हणजे ही उदाहरणे सागरातील केवळ एक थेंबच आहेत ! ;)
  • Log in or register to post comments
स
संचित Tue, 12/02/2014 - 14:18 नवीन
जोपर्यंत कर्माचा त्याग न करता positive विचार केले जात आहे तोपर्यंत त्यात काही वाईट वाटत नाही. पण नुसतेच त्यावर अवलंबून राहू नये.
  • Log in or register to post comments
च
चंद्रनील मुल्हेरकर Tue, 12/02/2014 - 14:56 नवीन
what the bleep do we know आणि down the rabbit hole या नावे दोन डॉक्युमेंट्री आहेत. अत्यंत फालतु व खोटी गोष्ट अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडल्याने हा कल्ट पसरला आहे. ( मी साधारणतः 2009ला या कल्टविषयी वाचले होते. दिड दशकापासुन एँजोलिना ते ऐश्वर्यापर्यंत अनेकींची कामना मी केली आहे. लॉ ऑफ एट्रेक्शननुषार माझ्या कामना पुर्ण व्हायला हव्यात पण त्या झाल्या नाहीत. त्याअर्थी हा लॉ खोटा समजायला हर्कत नसावी.)
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Tue, 12/02/2014 - 16:26 नवीन
मी साधारणतः 2009ला या कल्टविषयी वाचले होते. दिड दशकापासुन एँजोलिना ते ऐश्वर्यापर्यंत अनेकींची कामना मी केली आहे. लॉ ऑफ एट्रेक्शननुषार माझ्या कामना पुर्ण व्हायला हव्यात पण त्या झाल्या नाहीत. त्याअर्थी हा लॉ खोटा समजायला हर्कत नसावी.
यावर पठडीतले तयार उत्तर म्हणजे, "तुम्ही तेवढ्या तीव्रतेने त्या गोष्टींची कामनाच केली नव्हती. (म्हणजे अभिषेकने तुमच्यापेक्षा जास्त तीव्रतेने केली होती बहुदा ;) ) " फोलपणा कळून ही आपल्या धारणांची भलामण करु पाहणार्‍या कल्टबद्दल एक मानसशास्त्रीय लेख वाचला होता इथेच मिपावर(अत्ता सापडत नाहीये.) त्यात या तर्‍हेच्या वागणुकीची कारणमिमांसा कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
च
चंद्रनील मुल्हेरकर Tue, 12/02/2014 - 17:08 नवीन
तीव्रता????? अहो एँजोलीना आणि ऐश्वर्याला बघुन रोमारोमात जे दाटुन यायचे ते तीव्रतेत मोजताच येणार नाही, पण जौंद्या ,इतके डीटेल नाय सांगु शकत :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ब
बॅटमॅन Wed, 12/03/2014 - 08:20 नवीन
समजले =)) =)) =)) आपल्याला अनेक मिपाकरांची मूक संमती आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
ट
टवाळ कार्टा Wed, 12/03/2014 - 08:46 नवीन
एँजोलीना आणि ऐश्वर्याला
नावे कदाचित बदलतील...पण भावना त्याच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 12/03/2014 - 09:08 नवीन
अगदी अगदी....अशा भावना डीटेलमध्ये सांगण्याची आदर्श जागा म्हणजे मचाक. मिपाचा हा विभाग सुरू जाहल्यास बाकी प्रतिसाद एकदम भरभरून मिळेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हाडक्या Wed, 12/03/2014 - 13:27 नवीन
या मागणीस बॅट्यास अनुमोदन.. रच्यकने, मचाक सध्या थंड पडलेले दिसतेय. आता दुसरीकडे बाजार भरतो की बाजारच उठलाय हे काय माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेपी Fri, 12/05/2014 - 04:59 नवीन
अगदी अगदी....अशा भावना डीटेलमध्ये सांगण्याची आदर्श जागा म्हणजे मचाक. मिपाचा हा विभाग सुरू जाहल्यास बाकी प्रतिसाद एकदम भरभरून मिळेल फक्त बोलाची कढी,कुनी पुढाकार घेत नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Fri, 12/05/2014 - 13:22 नवीन
काय केलं पायजे ते बोला की मग. मागणी करून झालीये कधीच, किती तरी वेळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मृत्युन्जय Wed, 12/03/2014 - 09:43 नवीन
त्याचे काय झाले असेल की ऐश्वर्या आणि एँजोलीना यांच्या रोमारोमात चंद्रनील मुल्हेरकरांचा विचार केल्यावर अश्या तीव्र भावना दाटुन येत नसतील. त्यामुळे या बाबतीत त्यांचे पोझिटिव्ह व्हाइब्स कमी पडले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
प
पिंपातला उंदीर Tue, 12/02/2014 - 16:38 नवीन
@हाड्क्या अगदि अगदि. हेच म्हणार होतो
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Wed, 12/03/2014 - 04:53 नवीन
प्रतिक्रिया दिल्यबद्दल धन्य्वाद
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 12/03/2014 - 05:03 नवीन
शिवाय आपल्यासोबत घडणारया सर्व वाईट घटना आपणच नकारात्मक विचार करून आपल्याकडे आकर्षित करून घेतो हा The Law of Attraction चा व्यत्यास पण तितकाच धोकादायक . म्हणजे दिल्ली बलात्कार प्रकरणातील बलात्कारित मुलीने नकारात्मक विचार करून तो बलात्कार ओढवून घेतला होता का ? किंवा लातूर मध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या किंवा सर्वस्व गमावलेल्या लोकांनी हा भूकंप नकारात्मक विचार करून घडवून आणला होता का ? साहजिकच victim असणाऱ्याला दोषीच्या पिंजर्यात हा नियम उभा करतो . माझ्यामते भुकंप, बलात्कार किंवा अपघात अशा ठिकाणी हा लॉ अप्लाय होत नाही असे यांचे म्हणणे आहे. तुमचे करीअर, तुमचे ध्येय अशा ठिकाणी तुम्ही सकारात्मक विचार करून प्रयत्न केले तर यश मिळते असे या लॉ चे म्हणणे असावे. हा The Law of Attraction 'असे सांगतो कि माणूस हा सकारात्मक विचारांच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते म्हणजे भरपूर संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत वैगेरे मिळवू शकतो प्रयत्न करू नका ..नुसताच विचार करा असे कोठेही या लॉने सांगितलेले नाही. मोठमोठ्या लोकांनी, राजे महाराजे यांना हा लॉ माहित होता म्हणजे त्यांनी सकारात्मक उर्जा पसरवायचा प्रयत्न केला. युद्ध किंवा मोठे प्रकल्प सुरू करताना एखादे सकारात्मक भाषण देऊन सैनिकात उत्साह जागृत करण्याचे तंत्र ह्याच लॉ ने आले असावे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Wed, 12/03/2014 - 05:47 नवीन
सकारात्मक विचार करा हि शिकवणूक आपल्या अनेक संतांनी पण दिली आहे . इतर अनेक पुस्तकात पण हे येउन गेले आहे . प्रश्न तिथे सुरु होतो जिथे त्याला काहीतरी चमत्काराचे गुण लावून वर त्याला वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा प्रयत्न होतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
प
पिंपातला उंदीर Wed, 12/03/2014 - 05:54 नवीन
माझ्यामते भुकंप, बलात्कार किंवा अपघात अशा ठिकाणी हा लॉ अप्लाय होत नाही असे यांचे म्हणणे आहे. तुमचे करीअर, तुमचे ध्येय अशा ठिकाणी तुम्ही सकारात्मक विचार करून प्रयत्न केले तर यश मिळते असे या लॉ चे म्हणणे असावे मला अस वाटत नाही . इथे Rhona Byran त्सुनामी च्या घटने बद्दल काय म्हणते ते पाहा . The hundreds of thousands killed in the Asian tsunami, the thousands who died on 9/11, the millions put to death in the Holocaust? Are we simply to assume it was all their own fault? Byrne sounds rather weary as she skirts round this subject in her book but, basically, her answer is an extraordinary yes. "By the law of attraction, they had to be on the same frequency as the event," she says, allowing only a small concession: "It doesn't necessarily mean they thought of that event." http://terribletruth-beautifullie.blogspot.in/2009/06/yes-secret-does-blame-victim.html मुळात हा सगळा लेखच वाचनीय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
य
योगी९०० Wed, 12/03/2014 - 06:01 नवीन
मला एवढचं कळलं पुस्तक वाचून आणि व्हिडीओ पाहून.. की जर आपण ह्या लॉ वर विश्वास ठेवला, तर आपण जास्तीत जास्त सकारात्मक विचार करू आणि हळुहळु त्या गोष्टीची आस लागून आपणच त्यादृष्टीने योग्य तेवढेच कष्ट घेऊ. अशा कष्टामुळे आणि dedicated efforts मुळे आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्तच असते..पण मूळात लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन चा शब्दशः अर्थ घेतला तर तुम्ही म्हणता ती अंधश्रद्धाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ख
खटपट्या Wed, 12/03/2014 - 05:27 नवीन
मी फक्त सकारात्मक विचार करुन पोट कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघुया जमतं का ते. :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/03/2014 - 05:31 नवीन
कोणाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 12/04/2014 - 04:28 नवीन
स्वतःचेच. वाढवायचे असेल तर.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/04/2014 - 10:46 नवीन
@टवाळ कार्टा कोणाचे? >>> =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मृत्युन्जय Wed, 12/03/2014 - 06:31 नवीन
मला सिक्रेट सारखी पुस्तके मुळात वाचायला आवडत नाही. अशी पुस्तके त्याच गोष्टी सांगतात ज्या आपल्याला माहिती असतात पण आपण काही कारणाने आचरणात आणत नाही. त्यामानाने ती पुस्तके आवडतात जी Execution किंवा implementation (इंग्रजी शब्दांसाठी क्षमस्व. एकदम मराठी शब्द सापडले नाहित) शिकवतात ती आवडतात. त्यामुळे डेल कार्नेजीची काही पुस्तके आवडतात. पण एक गोष्ट मात्र खरी की सिक्रेट मध्ये काही चांगल्या गोष्टी नक्की सांगितल्या आहेत. बी पोझिटिव्ह हा अ‍ॅटिट्युड योग्य नक्कीच आहे. सकारात्मक विचारांचा योग्य परिणाम होतो हे म्हणणे खटकण्याजोगे नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Wed, 12/03/2014 - 07:08 नवीन
अमंलबजावणी, कार्यकृती कार्यक्रम, कर्ता इत्यादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पिंपातला उंदीर Wed, 12/03/2014 - 10:17 नवीन
अवांतर -ज्या डेल कार्नेजी ने अनेक लोकाना आपल्या पुस्तकातून प्रेरणा दिली त्याने आयुष्याला कंटाळून आत्महत्या केली होती असा प्रवाद आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 12/04/2014 - 08:29 नवीन
अरेरे. लोका सांगे तत्वज्ञान मधलाच प्रकार की हा. पण त्याची पुस्तके मात्र खुप छान आहेत. असा प्रवाद आहे म्हणजे खात्रीशीर बातमी नाही काय ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 12/04/2014 - 11:39 नवीन
काहि लोक अस म्हनतात काहि लोक तस. : ) http://kingsley2.wordpress.com/2003/11/25/did-dale-carnegie-commit-suicide/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
विटेकर Wed, 12/03/2014 - 08:31 नवीन
बेम्बट्या .... तस्मात कुंभार हो... गाढवास तोटा नाही !
  • Log in or register to post comments
र
रायनची आई Wed, 12/03/2014 - 12:55 नवीन
आमच्या नात्यातच एक सद्स्या आहेत ज्या पूर्णपणे अशा पॉझिटिव थिन्किन्ग वाल्या पुस्तकान्च्या आहारी गेल्या आहेत..अगदी त्याना सान्गितल की आज खूप ट्राफिक होत..तरी त्या म्ह्णतात की ऑफिस मधून निघण्यपूर्वी विचार करायचा आज ट्रफिक लागणार नाही तर खरच लागत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 12/04/2014 - 11:05 नवीन
आणि कुठलाही प्रश्न शेयर करायला गेल कि Think Positive ' चा डोक्यात जाणारा सल्ला देतात
अगदी खरंय ....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/04/2014 - 16:37 नवीन
१. बायकोने भाजी खारट केली... थिंक पॉजीटीव्ह... हॉटेलमधून पार्सल आणा. २. बायकोने भाजी न करता आमटी केली... थिंक पॉजीटीव्ह... हॉटेलमधून पार्सल आणा. ३. बायकोने आज खिचडी केली....थिंक पॉजीटीव्ह... हॉटेलमधून पार्सल आणा. ४. बायकोने आज बटाटे वडे आणि चिंचेची चटणी केली...थिंक पॉजीटीव्ह...लसणीची चटणी विकत आणा. ५. मुद्दा क्रमांक १ ते ४ रिपीट झाल्यास , व्यनि करणे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/04/2014 - 17:12 नवीन
५ व्या दिवशी बायको म्हणेल आज हॉटेलातच जाउ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/04/2014 - 18:53 नवीन
म्हणूनच म्हणालो....व्यनि करा... मी येतोय फेब्रूवारीत, तुला आता बाबांकडे न्यायलाच हवे... थिंक पॉझीटीव्ह रे बाबा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा