युरेका
न्यूटन पास्कल Bohr सारे शाळेमध्ये भेटले होते
काही कळले काही घोकले तर काही बिनधास्त ठोकले होते .
पुन्हा कधी भेटतील असे स्वप्नी देखील नव्हते वाटले
पण नको तेव्हा नको तिथे माझ्या आठवणींचे तारु सुटले
तिच्याभोवती पोरांची झुंड जेव्हा फिरत असे
bohr चे मॉडेल माझ्या डोळ्यासमोर तरळत असे
आपणहून जरी हसली नाही तरी cadbury ची जादू चाले
न्यूटन चा inertia तेव्हा मनामध्ये घोळू लागे
तास तास तिच्यासंगे मिण्टा मध्ये सरून जाई
माझ्या चक्रम डोक्यामध्ये आइन्स्टाईन स्मरून जाई
स्पर्श झाला तिचा जेव्हा वीज अश्शी चमकून गेली
conductivity ची theory एका क्षणात समजून गेली
ओठांवरती ओठ दाबता … विसरलो पुढचं सारं
पस्कलच्या नियमाचं दुसरं उदाहरण कुठचं बरं
पण
एक दिवस तिनं मात्र सॉलिड बॉम्ब टाकला
म्हणे जुना कुणी तिचा मित्र तिला भेटला
'"एकाच वेळी का नाही मी तुझी आणि त्याची " ?
तिच्या निरागस प्रश्नाने झाली माझी गोची
वाद विनवण्या भांडण, even होतो रडलो
शप्पथ सांगतो, तेव्हा मी पुरा पुरा मोडलो.
अजूनही डोळ्यामध्ये एक अश्रू लपला आहे
पण श्रोडींगरच्या मांजराचा अर्थ मला कळला आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे.