भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०१४-१५) - यावेळी तरी लाज राखणार का?
_________________________________________________________________________________
मंगळवार २५ नोव्हेंबर २०१४ या दिवशी ऑस्ट्रेलियाचा तरूण व भरवशाचा फलंदाज फिल ह्यूज स्थानिक सामना खेळताना एक उसळता चेंडू हेल्मेटच्या खाली कानाच्या मागे लागून मैदानावरच कोसळला व दोनच दिवसांनी गुरूवार २७ नोव्हेंबर २०१४ या दिवशी कोमातच वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याचे दु:खद निधन झाले. :sad:

💬 प्रतिसाद
(138)
प
प्यारे१
गुरुवार, 12/18/2014 - 08:24
नवीन
=))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 12/18/2014 - 08:32
नवीन
=))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/18/2014 - 08:38
नवीन
तुम्ही उपरोधाने लिहिलंय का प्रामाणिकपणे लिहिलंय ते समजत नाहीय्ये.
परंतु भारतीय फलंदाजांनी आज परत तोंडघशी पाडलं. केवळ ९७ धावात उरलेले ६ गडी गेले. रोहीत शर्मा हा कसोटीत खेळण्याच्या लायकीचा खेळाडू नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तो झटपट ३०-४० धावा करून जातो हे योग्य नाही. पुढील कसोटीसाठी धवन, रोहित शर्मा व इशांत शर्माला बाहेर ठेवले पाहिजे. सामना अजून तरी दोन्ही बाजूंसाठी समसमान आहे. बघूया उद्या काय होतंय ते.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 12/18/2014 - 09:11
नवीन
सहमत
रैनाने आखुड ट्प्प्याच्या चेंडुवर बरीच मेह्नत आणि प्रगती केली आहे असे वाचले होते.
रोहीत शर्माच्या जागी त्याचा समावेश व्हायला पाहिजे किंवा रायडु पण मधल्या फळीतला चांगला फलंदाज आहे.
आजची भारताची गोलंदाजी आतापर्यंत तरी ठिक झाली आहे.
१०० धावांच्या आसपास आघाडी मिळाली तर मज्जा येईल
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 12/19/2014 - 06:01
नवीन
मिळाली मिळाली १०० ची आघाडी मिळाली! मायला ३ वाजता उठलो जरा ब्याटिंग बघायला मिळेल म्हणून, कसलं काय. मेल्यांनी डिवचलं बाउंसर आपटून आपटून, कांगारूचं शेपूटच मेलं धडाएवढं झालं. शेवटच्या चार पोरासोरांनी २०० कराव्यात.. ??
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/19/2014 - 06:07
नवीन
भारतीय टीम बाबत आम्ही २/३ वर्षांपुर्वीच लिहून ठेवले आहे...
(https://full2dhamaal.wordpress.com/2012/01/26/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a4%e0%a5%8b/)
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 12/18/2014 - 11:57
नवीन
मनापासून...मागे आपण म्हणला होतात की उद्या आहे असाच डाव ऑस्ट्रेलिया डिक्लेअर करेल आणि तसेच झाले याचा संदर्भ माझ्या मनात होता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/18/2014 - 16:27
नवीन
*OK*
उद्या उपाहारापर्यंत भारत कांगारूंना ३२५ पर्यंत गुंडाळेल असं वाटतंय. कांगारु कदाचित ३५० पर्यंत जातील. परंतु भारताला आघाडी मिळणार हे नक्की. अर्थात हे दिवास्वप्न ठरण्याची देखील मोठी शक्यता आहे किंवा हे माझं विशफुल थिंकिंग असावं. असो.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 12/19/2014 - 06:22
नवीन
दिवास्वप्नच ठरलय तुमचं गुरुजी..
५०० चा टप्पा ओलांडलाय कांगारुंनी !!
पुन्हा एकदा पराभवापासून वाचण्याची धडपड.. आणि सरतेशेवटी आणखी एक पराभव दिसु लागलाय !!
२०११ च्या ईंग्लंड दौर्यापासून सुरु झालेली वाताहात संपण्याची चिन्हे दिसत नाहियेत.. :-(
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/19/2014 - 09:31
नवीन
अशक्यप्राय अंदाज वर्तविल्याबद्दल स्वतःलाच दोन थोतरीत मारून घेतल्या. भारतीय गोलंदाज अत्यंत फालतू आहेत हे असा कसा विसरलो मी? लागोपाठ दुसर्या पराभवाची चिन्हे आहेत (असे वाईट अंदाज कधीही चुकत नाहीत).
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 12/18/2014 - 05:22
नवीन
बाहर कुत्ताभी नही यांना हाकललेच पाहिजे.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 12/20/2014 - 03:48
नवीन
परत एकदा येरे माझ्या मागल्या. ऑस्ट्रेलीया किती विकेट्ने जिंकणार ते फक्त ठरायचे राहीले आहे.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 12/20/2014 - 05:42
नवीन
व्हेज जेवण न मिळाल्यामुळे इशांत चांगलाच पेटलाय... दोन आऊट.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/20/2014 - 08:41
नवीन
शेवटी पुन्हा एकदा लाजिरवाणा पराभव. वाईट वाटतंय आणि रागही येतोय. आता माझी सटकली, मला राग येतोय अशी अवस्था झालीये.
पहिल्या डावात ६ बाद २४७ नंतर मिचेल जॉन्सनला जितकी खराब गोलंदाजी केली तशी इतर कोणत्याही देशाने केली नसती. आखूड टप्प्याचे चेंडू टाकून त्याला लॉलीपॉप दिले. याही डावात अश्विन पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. भारताचा डीआरएस ला असलेला अतार्किक विरोध अजून किती काळ चालणार आहे?
पुढच्या कसोटीसाठी काढायचं तरी कोणाला? धवन, ईशांत शर्मा, रहाणे, अश्विन यांनी एकेका डावात बर्यापैकी कामगिरी करून आपली जागा पक्की करून ठेवलीये. धोनी, विजयचा तर प्रश्नच नाही. यादवने चांगली गोलंदाजी केलीये. वरूण एरॉन २-३ बळी घेतोय. रोहीत शर्मा मात्र सर्व ४ डावात अपयशी ठरलाय. पुजारा जम बसल्यावर बाद होतोय. कोहलीला काढण्याचं धाडस नाही (कोहली मागील ७ कसोटीतील १४ डावांपैकी १२ डावात अपयशी ठरला आहे).
पुढील कसोटीसाठी रोहीतच्या जागी जडेजा किंवा रैना आत यावा. एरॉनच्या जागी शमी व धाडस करून पुजारा किंवा कोहलीच्या जागी लोकेश राहुलला संधी द्यावी असं वाटतंय.
इतके बदल करूनही फार काही फरक पडेल असं वाटत नाही. पत्त्याच्या कॅटमध्ये सगळे ५२ पत्ते जोकरच असतील तर कितीही वेळा पिसून पत्ते वाटले तरी काय फरक पडणार आहे!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/20/2014 - 16:26
नवीन
धोनी आता पराभवाची फुसकी कारणे देतोय. सकाळी सरावासाठी दिलेली खेळपट्टी म्हणे चांगली नव्हती. तिथे सराव करताना धवनच्या हातावर चेंडू लागला. सामना सुरू व्हायच्या जेमतेम ५-७ मिनिटे त्याने सांगितले की आपण खेळू शकणार नाही व त्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण अस्वस्थ झाले व कोहलीला बॅटिंगची मानसिक पूर्वतयारी करण्यासाठी जेमतेम ५-७ मिनिटे मिळाली. त्यामुळे सकाळच्या सत्रात फलंदाजी कोलमडली म्हणे.
काय चाललंय हे. कोणत्याही क्षणी मैदानावर फलंदाजी करणार्या खेळाडूंव्यतिरिक्त अजून २ फलंदाज पॅड घालून तयार असतात. कोहली ४ थ्या क्रमांकावर खेळतो. तिसर्या दिवसअखेर भारताचा एक गडी बाद झाला होता. धवन व पुजारा नाबाद होते. त्यामुळे ४ थ्या क्रमांकावरील कोहली व ५ व्या क्रमांकावरील रहाणे पॅड बांधून तयार असणारच होते. दिवसाच्या पहिल्या षटकात किंवा पहिल्या चेंडूवर बळी गेला असता तर कोहलीला फलंदाजीला यावेच लागले असते. त्यामुळे त्याला मानसिक तयारी करायला फक्त ५-७ मिनिटे मिळाली हे कारण हास्यास्पद आहे.
हाच धोनी जॉन्सनला टाकलेल्या ढीगभर आखूड टप्प्यांच्या चेंडूंचे आणि डीआरएस ला असलेल्या विरोधाचेही समर्थन करत होता. खराब गोलंदाजी आणि फलंदाजी केली हे कबूल करा ना. उगाच फुसकी आणि हास्यास्पद कारणे कशाला देता.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 20:15
नवीन
+ १..
तरी पण....
लिहायला काही हरकत नाही.
निदान ४ लोकं वाचतात, चर्चा करतात, एक मानसिक समाधान मिळते.
खेळीमेळीच्या अंगाने जाणारी कुठलीही चर्चा उत्तमच.
असे माझे मत आहे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 12/22/2014 - 16:39
नवीन
माझा प्रतिसाद गायबलेला दिसतोय.
असो, चालायचं.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 12/24/2014 - 01:07
नवीन
चालायचे...
आमचे पण अधून-मधून प्रतिसाद गायब होतात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 12/22/2014 - 15:56
नवीन
एक वाचनीय लेख
http://www.espncricinfo.com/australia-v-india-2014-15/content/current/story/812755.html
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/25/2014 - 09:48
नवीन
उद्या खोकेदिनाच्या दिवशी (किंवा खोके उघडीप दिनाच्या दिवशी) भा.प्र. वेळेनुसार पहाटे ५:०० वाजता मेलबोर्न येथे तिसरा कसोटी सामना सुरू होत आहे. उद्या पहाटे साडेचारलाच उठायला लागणार.
भारताने मेलबोर्नवर फेब्रुवारी १९८१ मध्ये ऐतिहासिक विजय मिळविला होता. पहिल्या डावात १८२ धावांनी मागे पडल्यावर भारताने दुसर्या डावात बर्यापैकी फलंदाजी करून ३२४ धावा केल्या होत्या. भारताचा दुसरा डाव वादग्रस्त ठरला. आधीच्या ५ डावात अपयशी ठरलेल्या गावसकरने एकाग्रतेची पराकाष्ठा करून दुसर्या डावात संयमी फलंदाजी केली होती. परंतु तो ७० धावांवर असताना पायचित बाद दिल्यावर गावसकरचा संताप अनावर झाला. चेंडू आपल्या बॅटची कड घेऊन पॅडवर गेला आहे अशी त्याची ठाम समजूत होती. त्यामुळे बाद नसताना बाद दिल्याच्या संतापात गावसकर सामना सोडून द्यायला निघाला होता. परंतु भारतीय संघ व्यवस्थापकांनी परिस्थिती संयमाने हाताळून वाद थांबविला. विजयासाठी दुसर्या डावात जेमतेम १४३ धावा करायच्या असताना कांगारूंचा डाव फक्त ८३ डावात आटोपला होता. कपिलने अंगात ताप असताना तुफान गोलंदाजी करून २८ धावात ५ बळी मिळविले. घावरीने २ व दोशीने २ बळी घेतले होते. घावरीने तुफान फॉर्मात असलेल्या ग्रेग चॅपेलला पायामागे चेंडू टाकून पहिल्याच चेंडूवर शून्यावर त्रिफळा बाद केले होते.
त्यानंतर गेल्या ३३ वर्षात खेळल्या गेलेल्या ६ मालिकांमध्ये भारताला मेलबोर्नमध्ये क्सोटी सामन्यात विजय मिळविता आलेला नाही.
उद्याच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात जायबंदी मिचेल मार्शच्या जागी मधल्या फळीचा व सलामीचा फलंदाज जो बर्न्स पदार्पण करण्याची शक्यता आहे. भारतीय संघात रविंद्र जडेजा जायबंदी झाल्याने त्याच्या जागी तरूण अष्टपैलू फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलपेक्षा प्रग्यान ओझाला घ्यायला हवे होते.
उद्याच्या सामन्यात खरं तर रोहीत शर्माच्या जागी अक्षर पटेलला घ्यायला हवे. परंतु ईशांत शर्माप्रमाणे रोहीत शर्मादेखील धोनीचा "नीलाक्ष तनय" असल्याने रोहीत शर्मा बाहेर जायची शक्यता कमी आहे. भारताने धाडस करून पुजाराऐवजी लोकेश राहुलला खेळविण्याचाही विचार करावा.
फारसा आशा नाहीतच. निदान भारताने हा सामना एकतर्फी न करता चांगली लढत द्यावी व सामना रोमहर्षक करावा हीच किमान अपेक्षा आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/26/2014 - 03:53
नवीन
आज आणि उद्या टाइमपास करत बसणार...
कधी-कधी असापण फुकटचा टाइमपास करावसा वाटतो...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 12/26/2014 - 03:56
नवीन
ऑस्ट्रेलिया ११५ ला ३...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/26/2014 - 08:52
नवीन
दोन्ही संघांना समसमान दिवस गेला. भारताला एक गोलंदाज कमी पडतोय. रोहीत शर्माला वगळले ते चांगले केले, परंतु त्याच्याऐवजी अक्षर पटेल किंवा रैना आत आला असता तर एक जास्तीचा गोलंदाज मिळाला असता. एकंदरीत खेळपट्टीत फारसा दम दिसत नाही. गोलंदाजांना खेळपट्टीचा फारसा उपयोग झाला नाही व फलंदाजी सुद्धा संथ झाली.
अश्विनला परदेश दौर्यावर न्यावे की नाही याचा विचार व्हायला पाहिजे. त्याने आतापर्यंत २१ कसोटीत १०९ बळी घेतले आहेत. २१ पैकी तो ६ कसोटी सामने परदेशात खेळला आहे व त्यात त्याने फक्त १४ बळी घेतले आहेत. भारतात खेळलेल्या १५ कसोटीत त्याला तब्बल ९५ बळी मिळाले आहेत. एकंदरीत तो परदेशात अजिबात प्रभावी ठरत नाही असं दिसतंय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/27/2014 - 10:03
नवीन
ऑस्ट्रेलिया ५ बाद २१६ वरून सर्वबाद ५३०. पुन्हा एकदा खालच्या फलंदाजांनी रडविले. हॅडीन ५५, हॅरिस ७४, मिचेल जॉन्सन २८ यांनी स्टीव्हन स्मिथच्या बरोबरीने चंगळ केली. स्मिथ भारताला चांगलाच नडलाय. आतापर्यंतच्या ५ डावात ३ शतके व १ अर्धशतक करून १८९.०० या सरासरीने त्याने तब्बल ५६७ धावा केल्या आहेत. रॉजर्सनेही लागोपाठ ३ डावात अर्धशतके करून चंगळ केली आहे. भारताची गोलंदाजी परदेशात फारच निष्प्रभ ठरलीये. फलंदाजीकेंद्रीत आयपीएल या तमाशाचे दुष्परीणाम २०११ मध्येच दिसायला सुरूवात झाली होती. २०१४ मध्ये गोलंदाजी अजून खालावली आहे. भारताने १ बाद १०८ अशी चांगली सुरूवात केली आहे. धवन पुन्हा एकदा स्थिरावल्यावर २८ वर बाद झाला. धवनने या वर्षाच्या सुरवातीला न्यूझीलँड मध्ये शतक आणि मागच्या सामन्यात ८१ हे दोन डाव सोडले तर बाकी कामगिरी यथातथाच आहे. एकतर त्याला ६ व्या क्रमांकावर खेळवावे किंवा डच्चू द्यावा. पुजाराही इंग्लंडच्या दौर्यापासून धडपडत आहे. असा फलंदाज ३ र्या क्रमांकासाठी अजिबात योग्य नाही. सामन्याचा निर्णय काय होणार (म्हणजे ऑस्ट्रेलिया जिंकणार का सामना अनिर्णित राहणार) ते उद्याच कळेल.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/28/2014 - 06:11
नवीन
भारताचा आजचा दिवस चांगला चालला आहे. अजिंक्य रहाणे आणि विराट यांनी शतकी खेळी करुन अजूनही मैदानावर टीकून आहे, अतिशय सकारात्मक खेळ. अजिंक्य राहणे यांनी बाऊंसरला मस्त धुतला चांगले खेळताहेत. आजचा खेळ संपेपर्यंत पाचशेची मजल मारायला हरकत नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/28/2014 - 07:09
नवीन
अजिंक्य राहणेचा एका बेजाबदार स्वीपच्या नादात पायचित झाला आणि त्यानंतर आलेल्या के. राहुलला सामन्यात आपली फलंदाजी दाखवायची चांगली संधी होती. एक झेल सुटला होता आणि स्वतःच्या दोन की तीनच धावा झालेल्या होत्या आणि लगेच हवेत मारायची काय गरज नव्हती झेलबाद होउन तोही परतला. आता कर्णधार धोनी ज्याने कधीच परदेशात शतक केलेलं नाही, आज मैदानावर उभे राहुन विराटला साथ देण्याची गरज आहे, शंभर धागा अजून हव्या आहेत. दोन दिवसाचा खेळ बाकी आहे, किमान शंभर धावांची आघाडी मिळावी सामना वाचवायचा असेल तर असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/28/2014 - 07:11
नवीन
प्रतिसाद प्रकाशित करत नै तर धोनीही परतला. कसोटी सामन्याचं कर्णधारपद काढून घेतलं पाहिजे याचं. लै कौतुक झालं याचं.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Sun, 12/28/2014 - 07:21
नवीन
परदेशात कसोटीत संधीवर पाणी कसं ओतायचं हे भारतीय संघाला चांगलच माहीत आहे..
लोकेश राहुल डोक्यात भुसा भरल्यासारखा खेळला !!!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/28/2014 - 07:26
नवीन
आजच्या दिवसाच ८ षटकाचा खेळ बाकी शमी आणि विराट खेळतोय. विराटने स्ट्राइक आपल्याकडे जास्त ठेवणे गरजेचं धावा मिळवणे आणि विकेट सांभाळणे गरजेचे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/28/2014 - 07:36
नवीन
विराट कोहलीच सचिनचे सर्व धावांचे विक्रम मोडेल असं मला नेहमी वाटतं पण स्वभावाला मुरड घातली पाहिजे. ८२ धावांनी आपण मागे आहोत कशाला मसल दाखवतोय गोलंदाजाला अरे बाबा शांत राहून निमूट खेळ कर राजा.
४५०-७
दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/28/2014 - 08:02
नवीन
विराट १६९ वर परतला बाहेर जाना-या चेंडुला ब्याट घातली आणि आपली अवसान घातकी भारतीय फलंदाजी संपली ४६२-८ दोन दिवस बाकी आहेत उद्या दिवसभर ते फलंदाजी करतील शेवटी आपल्याला फलंदाजी देतील असे वाटते अनिर्णित कड़े जाता येईल.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 12/28/2014 - 08:17
नवीन
तरी पण चालेल...
आपले फलंदाज तो पण आनंद आपल्याला मिळू देतील की नाही, ही पण एक शंका आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/28/2014 - 10:05
नवीन
३ बाद ४०९ वरून ८ बाद ४६२. ऑस्ट्रेलियाच्या आणि आपल्या तळाच्या फलंदाजात जमीनअस्मानाचा फरक आहे. धवन आणि पुजाराला ३० चा आकडा पार करता येत नाहीय्ये. दुसर्या आणि तिसर्या क्रमांकाचे फलंदाज जास्तीत जास्त २७-२८ धावाच करताहेत हे फारसं चांगलं दृश्य नाही. नवोदीत राहुल आज बहुतेक दडपणाखाली स्वस्तात गेला. ४ बाद ४०९ अशा भक्कम परिस्थितीत पाटा खेळपट्टीवर फलंदाजी करण्याची सुवर्णसंधी त्याने वाया घालविली. त्याला अजून १-२ कसोटी सामने तरी खेळविले पाहिजेत. धोनी नेहमीप्रमाणे स्वस्तात गेला. एकंदरीत सलामीला विजय (५ डावात १ शतक व ३ अर्धशतके) आणि नंतर मधल्या फळीत कोहली(५ डावात ३ शतके) आणि रहाणे (५ डावात १ शतक व २ अर्धशतके) सोडले तर इतरांची फलंदाजी म्हणजे आनंदच आहे. गोलंदाजांवर तर लिहिण्यासारखं सुद्धा काही नाही. धवन व पुजाराला वगळले तर रैना, नमन ओझा, रोहीत शर्मा व बुद्धीमान साहा हे पर्याय शिल्लक राहतात. त्यातल्या शेवटच्या दोघांना संधी देऊन झाली आहे. आता उरलेल्या दोघांना संधी देऊन पहावी.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/28/2014 - 10:09
नवीन
या सामन्यात पहिल्या दिवशी ५, दुसर्या दिवशी ६ व आज तिसर्या दिवशी ७ खेळाडू बाद झाले. हाच क्रम सुरू राहिला तर उद्या एकूण ८ व परवा एकूण ९ खेळाडू बाद व्हायला हवेत. उद्या भारताचे उर्वरीत २ व नंतर ऑस्ट्रेलियाने आपले ५ खेळाडू बाद झाल्यावर डाव घोषित करावा व नंतर भारताचा १ खेळाडू बाद झाला तर दिवसात एकूण ८ खेळाडू बाद होतील. नंतर ५ व्या दिवशी भारताचे उर्वरीत ९ खेळाडू बाद करून ऑस्ट्रेलियाला सामना जिंकता येईल.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Mon, 12/29/2014 - 07:41
नवीन
३५० पेक्षा कमी लक्ष्य ठेवून कांगारु डाव घोषित करतील असं वाटत नाही.. त्यामुळे विजयाची शक्यता नाहीच.. पावसाच्या कृपेने अनिर्णित राहू शकेल सामना.. नाहीतर पराभव आहेच..
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Mon, 12/29/2014 - 07:44
नवीन
आणि शेपुट गुंडाळण्याची क्षमता नसल्याने डाव घोषित करण्याचीच वाट पहावी लागणार..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 12/29/2014 - 09:40
नवीन
सामना अनिर्णिततेकडे झुकलेला आहे. ऑस्ट्रेलिया उद्या अर्धा-पाऊण तास खेळून ३५० पेक्षा जास्त लक्ष्य ठेवून डाव घोषित करतील. भारताला घसरगुंडी होऊन पराभव होऊ नये यासाठी धडपडावे लागणार आहे. भारताला १ गोलंदाज कमी पडतोय. पुढच्या सामन्यात तरी ५ वा गोलंदाज खेळवावा. तसेही ३ च फलंदाज धावा करताहेत. इतर फलंदाज असून नसल्यासारखेच आहेत. त्यामुळे एखादा फलंदाज कमी झाला तरी विशेष फरक पडणार नाही.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 12/30/2014 - 06:07
नवीन
शेवटच्या दिवशी ७० षटकंही खेळून काढणं कठीण दिसतय !!
४ बाद १०४
अजुन ३५ षटकं बाकी आहेत :(
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 12/30/2014 - 07:19
नवीन
पुजाराकडून परत एकदा निराशा !!
अजूनही २० षटकं बाकी !! :-(
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 12/30/2014 - 07:41
नवीन
रहाणेपण गेला !! संपलं सगळं !!
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 12/30/2014 - 08:29
नवीन
अनपेक्षितरीत्या सामना अनिर्णित !! स्मिथने ४ षटके आधीच सामना संपवायला होकार दिला..
२००७-०८ ला सिडनीमधे क्लार्कने शेवटच्या षटकात ५ चेंडुत ३ बळी घेउन ऑस्टेलियाला विजय मिळवून दिला होता ..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 12/30/2014 - 09:55
नवीन
नशिबानेच वाचलो. स्मिथने अजून ४ षटके खेळायला हवी होती. भारताचे तळाचे फलंदाज कधीही कोसळू शकतात हा इतिहास आहे. शेवटच्या ४ षटकात भारताचे तळाचे ४ फलंदा़ज बाद होणे अशक्य नव्हते. स्मिथने डाव घोषित करायलाही उशीर केला. अजून ४५-५० मिनिटे अगोदर डाव घोषित केला असता तर सामना जिंकण्याची जास्त संधी मिळाली असती.
०-४ हार होण्यापेक्षा आता ०-३/०-२/१-२ असा निकाल लागेल. मागच्या मालिकेपेक्षा थोडी प्रगती दिसतेय. तीनही कसोटी सामन्यातून एकच सत्य समोर येतंय ते म्हणजे भारताचे फक्त तीनच खेळाडू कामगिरी करताहेत (मुरली विजय, कोहली आणि रहाणे). उरलेले ८ जण नुसते जागा भरण्यापुरते संघात आहेत. गोलंदाजीत तर काहीच दम नाही. फलंदाजीत धवन, पुजारा धोनी, रोहीत शर्मा आणि लोकेश राहुल जवळपास सर्व डावात अपयशी ठरले. लोकेश राहुलने सोन्यासारखी संधी मातीत घालविली. दोन्ही डावात अत्यंत खराब फटका मारून त्याने विकेट फेकली. एकवेळ चांगल्या चेंडूवर बाद झाला असता तर त्याला सहानुभूती मिळाली असती. आता मात्र त्याचा राग येतोय. त्याला आता परत संधी मिळणं अवघड दिसतंय. धवन, अश्विन आणि रोहीत शर्मा हे फक्त आणि फक्त भारतीय खेळपट्ट्यांवरच कामगिरी करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. फेब्रुवारीपासून सुरू होणार्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मधील विश्वचषक स्पर्धेत त्यांना संघात घेण्याची घोडचूक करू नये. तंत्रशुद्ध समजला जाणारा पुजारा इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही अपयशी ठरलाय. त्यालाही काही काळ बाहेर ठेवायला हवे.
शेवटी ४ थ्या कसोटीसाठी लोकेश राहुल बाहेर जाणार हे नक्की. त्याच्या जागी रैना किंवा रोहीत शर्मा आत येईल. धवनला आणि पुजाराला पण काढायला हवं. पण धवनच्या जागी सलामीला कोण येणार? कदाचित रहाणे सलामीला येऊ शकतो. पण सध्या तो ५ व्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याची जागा बदलण्याचा धोका धोनी पत्करेल असे वाटत नाही. म्हणजे सलामीचा एक फलंदाज व तिसर्या क्रमांकाचा फलंदाज यांच्या बाबतीत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. भारताने एक फलंदाज कमी करून अष्टपैलू अक्षर पटेलला संधी देउन पहावी. तसेच रैनालाही आत आणावे. त्यामुळे दोन गोलंदाज वाढतील. एकंदरीत सगळा आनंदीआनंद आहे.
- Log in or register to post comments
न
नया है वह
Tue, 12/30/2014 - 11:44
नवीन
धवन सध्यातरि सन्घातच राहिल जोपर्यन्त त्याला पर्यायि सलमिचा डावखुरा फलन्दाज मिळत नाहि.
- Log in or register to post comments
श
शेखर काळे
Wed, 12/31/2014 - 08:20
नवीन
त्याची सरासरी ५०च्या जवळ आहे. शिवाय ३र्या क्रमांकावर खेळणारा दुसरा कोण चांगला फलंदाज आहे ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 12/31/2014 - 09:32
नवीन
>>> त्याची सरासरी ५०च्या जवळ आहे. शिवाय ३र्या क्रमांकावर खेळणारा दुसरा कोण चांगला फलंदाज आहे ?
पूर्वपुण्याईवर संघात स्थान अबाधित राखण्याचे दिवस गेले. पुजाराने २०१४ मधील १० कसोटीतील २० डावात केलेल्या धावा अशा आहेत.
१, २३, १९, १७, ३८, ५५, २८, ४३, २४, २, ०, १७, ४, ११, ७३, २१, १८, ४३, २५, २१
एकूण धावा - ४८३, सरासरी - २४.१५, शतके - ०, अर्धशतके - २, सर्वाधिक - ७३
५०+: २, ४०-४९: २, ३०-३९: १, २०-२९: ६, १०-१९: ५, ०-९: ४
तो २० डावांपैकी १५ वेळा २९ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर बाद झालेला आहे. त्याची सरासरी फक्त २४.१५ आहे व २० डावात फक्त दोनच अर्धशतके आहेत. संपूर्ण वर्षभर अशी खराब कामगिरी असलेला खेळाडू संघात असू शकत नाही.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Tue, 12/30/2014 - 10:16
नवीन
धोनी कसोटी क्रिकेट मधून निवृत्त - हर्षा भोगले फेसबुकवर!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 12/30/2014 - 10:21
नवीन
http://www.espncricinfo.com/india/content/current/story/814975.html
MS Dhoni has retired from Test cricket with immediate effect following the drawn Test against Australia at the MCG. Virat Kohli will take over as India captain for the final Test of the series, which India has already lost, in Sydney.
धोनीने कसोटीतून निवृत्त व्हायला नको होते. त्याच्याइतका चांगला यष्टीरक्षक सध्यातरी भारताकडे नाही. त्याने फक्त कसोटी संघाचे कर्णधारपद सोडायला हवे होते कारण कसोटीमध्ये तो अत्यंत बचावात्मक व अनाकलनीय निर्णय घेणारा कर्णधार आहे. तो एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट नेतृत्व करतो, परंतु कसोटीमध्ये तो पूर्णपणे बचावात्मक पवित्रा घेतो.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Tue, 12/30/2014 - 10:25
नवीन
नोप, टेस्टमध्ये बॅटिंगही काही चांगली नाही त्याची. चांगला निर्णय.
पण वन्डे मध्ये त्याचा हात धरेल असा कोणी नाही.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 12/30/2014 - 10:40
नवीन
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांना मायदेशात एखादा दणका देउन निवृत्त व्हायला हवं होतं..
पण असो यानिमित्ताने विराटला संघबांधणीला जास्त वेळ मिळेल .. सिडनीतच अॅडलेडप्रमाणे त्याचा खेळ बहरेल आणि विजयाने एकदिवशीय मालिकेत जोमाने उतरु अशी अपेक्षा !!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 12/30/2014 - 12:01
नवीन
निदान ही कसोटी तरी ड्रॉ झाली....
अॅडलेडचेच खेळाडू परत एकदा चौथ्या कसोटीत खेळतील असा अंदाज आहे.
ह्या वेळी बहूदा शिखर धवन चांगला खेळेल असे वाटते.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »