माझे पहिलेच प्रवास वर्णन - फिलीपाइन्स
(मी फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे,
http://www.misalpav.com/node/13573 श्री प्रभाकर पेठकर ह्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार flickr वर upload करून टाकले आहेत. आशा आहे नाहीतर मला कोणीतरी मार्गदर्शन करावे.)
हे माझे पहिलेच प्रवास वर्णन आहे. झंप्या ह्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनावरून मला पण स्फूर्ती मिळाली आहे. एस्पिकचा एक्का व इतरांप्रमाणे माझी ओघवती भाषा वगैरे नाही आहे तरी सांभाळून घेणे.
मी जानेवारी २०१३ मध्ये फिलीपाइन्सला २-३ दिवसांसाठी office च्या कामासाठी गेले होते. Airport अगदीच सामान्य होता पण देश मात्र प्रथम दर्शनीच प्रेमात पडावे असा. मुळात नजरेत भरतात त्या गगनचुंबी इमारती.
मी पण मनिला येथे राहत होते. मी राहत असलेला भाग म्हणजे "मकाती" होता आणि पिकासो स्टूडिओ मध्ये रहात होते. हॉटेल खूपच छान होते. मला ह्या हॉटेलची प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे रूम्स व toilets तर खूपच स्वच्छ होती पण त्याचबरोबर त्या रूमला जी attached बाल्कनी होती ती दोन्ही बाजूने मस्त रंगवलेली होती. रूम मध्ये पण छान सजावट होती. आणि रूम मध्ये छोटा फ्रीज, microwave वगैरे सर्व सोई होत्या. तश्या त्या सर्वत्रच असतील म्हणा पण मी जर जास्तच प्रेमात पडले होते माझ्या रूमच्या.
आणि ह्या बाल्कनीच्या दोन बाजू
त्यातल्या त्यात आठवणारी गोष्ट म्हणजे महागाई. आपल्यापेक्षा खूप महाग. कॉफ्फी बनवण्याची सामग्री ठेवलेली होती पण मला चहा हवा होता. म्हणून मी tea sache मागवला. तो तर मिळाला पण बिल बघून माझे डोळेच पांढरे झाले. एका tea sache साठी १८० रुपये (आपल्या currency मध्ये मी लगेच convert केले). अगदी जीवावर आले पण नशिबाने पैसे ऑफिसने भरायचे होते म्हणून त्यातल्या त्यात कमी दु:ख झाले पण नंतर मी काळजी घ्यायला लागले.
मला ऑफिसच्या कामामुळे जास्त फिरायला मिळाले नाही पण एकंदरीत मला फिलिपिनो माणूस हा खूप कष्टाळू, शिस्तप्रिय आणि मदत करायला तयार असाच वाटला. तसेच ऑफिसमधील लोक खूप प्रोफेशनल असल्याचे जाणवले. आणि ह्या देशावर अमेरिकेचा प्रचंड प्रभाव असल्याचे जाणवले. मार्कोसच्या राजवटीमध्ये ह्या देशातील जनतेने खूप सहन केले. त्याच्या बायकोकडे तर चपलांचे हजारो जोड होते असे वाटल्याचे स्मरते. पण तरी देखील हा देश त्यातूनही वर येण्यासाठी धडपडत आहे. अजून काही दशकानंतर हा देश आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देईल हे नक्की.
मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी एका Landmark नावाच्या mall मध्ये गेले होते. आणि एका floor वर फक्त purses च पाहून वेडी झाले. खाण्यापिण्याचे जरा हाल होते. एकतर महाग (आपली भारतीय मानसिकता. लगेच रुपये किती होतात हे calculate करायचे) आणि त्यातूनही आपण नक्की काय खात आहोत ते कळत नव्हते. पिकासो हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट घेत असताना समोर दिसणारी एक गोष्ट पळते मध्ये वाढून घेतली. तोंडात टाकली तर जर बेचव वाटायला लागली आणि क्षणार्धात भानावर आले. भानावर कसली, पाचावर धारण बसली. आपण नक्की काय खाल्ले. व्हेज कि नोन व्हेज. बरे नोन-व्हेज तर नक्की काय. बीफ वगैरे होते कि काय ह्याचा विचार करून गरगरायला लागले. शेवटी रेस्तौरंतच्या एका स्टाफला विचारले कि बाबा हे नक्की काय आहे. तो काय बोलला ते कळले नाही पण शेवटी मीच माझ्या मनाशी ठरवले कि काही तरी व्हेजच होते अशी समजूत काढली स्व:ताचीच आणि थोडी relax झाले.
मनिला मध्ये मी जेथे फिरत होते तिकडे सगळीकडे subway किंवा तत्सम chain होतीच पण मला सगळीकडे New Bombay (Authentic Indian Cuisine) ही restaurant chain मिळाली व माझा पोटाचा प्रश्न सुटला. जेवण मात्र खूप तेलकट आणि तिखट होते पण मी चालवून घेतले. मी पण भारतातून आले आहे आणि त्यातूनही पुणे - मुंबई वाली म्हटल्यावर मालकीण बाई पण गप्पा मारायला आली. अर्थात मला वाटले कि आता काहीतरी discount मिळेल पण तसे काही नाही झाले हा भाग अलहिदा.
अजून एक गोष्टीचे अप्रूप वाटले. सर्व taxis एकदम मस्त. अगदी टोयोटा इत्यादी. आणि मला वाटते प्रत्येक पब्लिक ट्रान्सपोर्ट वर "HOWS MY DRIVING" आणि मग काही टेलीफोन नं दिलेले आढळले. जर driving चांगले नसेल तर मला वाटते त्या नंबरवर फोन करून तक्रार करायची सोय असेल.
आणि एक अतिक्षय लक्षात येणारे वाहन म्हणजे "जीपनी". जीपनी म्हणजे आपल्याकडची रिक्शा जशी सर्वत्र आढळते तसे आढळणारे वाहन. पण जीपनी चे रिक्शा बरोबर तुलना करणे म्हणजे जीपनी वर अन्याय होइल. जीपनी म्हणजे आपल्या कडची एखादी मिनी बस पण दिसायला मात्र जीप सारखी. अगदी मस्त वाहन होते. बसायचा मोह झाला पण वेळ पण नव्हता आणि जाणार कुठे हा पण प्रश्न. खरे म्हणजे मला फ्री टाईम फक्त संध्याकाळी मिळत होता ते पण काही तासच. दुसर्या दिवशी client बरोबर मीटिंग आहे हि टांगती तलवार असायचीच मनात.
एकदा तर एक train दिसली जाताना. अगदीच साधी होती आणि आपल्याकडे जशी गर्दी तशीच गर्दी होती. माझी गाडी पण फास्ट असल्यामुळे जसा जमला तसा फोटो काढला
आणि अजून एक विचित्र वाहन आढळले. स्कूटरला जशी एक sidecar जोडलेली असते तशी रिक्शाला जोडलेली sidecar. बघून गंमतच वाटली.
दोन दिवस राहून जसे जमेल तसे philippines पहायचा प्रयत्न केला. एकटीच असल्यामुळे जास्त काही शूर वगैरे बनायचा प्रयत्न केला नाही. पण एकंदरीतच घरी परत येताना खूप चांगल्या आठवणी घेवून आले. ऑफिसमध्ये भेटलेली लोक पण खूप छान होते व एकंदरीतच खूप कोऑपरेटीव होते.
पिकासो ची स्वागतिका
रूम सर्विस साठी आलेली Diane
भारतात परत येताना airport वर सोडायला आलेला taxi driver
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debt